व्ह्यालेन्टायीन दिन'दिवाणे'
लेखनविषय:
जरी आम्ही असू व्ह्यालेन्टायीन दिन'दिवाणे'
दरसाल गातो एकच गाणे
छे छे ,ही नसे अपुली संस्कृती
नसे ही अपुली परंपरा
जाळा ती शुभेच्छापत्रे
झोडपा त्या जोडप्याला
पाश्चिमात्यांचे हे प्रेमाचे चाळे
आम्ही आहोत मराठी मावळे
प्रेमदिनाची आम्हाला गरजच काय ?
हो हो,ते सगळ ठीकाय
आम्ही तरी कराव काय
आमची सेटिंग होतच नाय
किती वर्ष पहावी वाट
स्वप्नात दिसतो आंतरपाट
बोलणे माझे घे मनावर
नकोस सुंदरी राहूस तू सिंगल
करूनच टाक शुभमंगल
प्रपोज जरी बहु येती तुजला
एक ना धड भाराभर वर
गोंधळू नकोस पुकार स्वयंवर
मुंबईमध्ये जो घेई घर
त्यास मान तुझा प्रियवर...
वाचने
1695
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
मजेदार आहे. :-)
कसला खतरनाक पण लावायला सांगितलात हो !
वा वा वा!
२ महिने अन १३ दिवस झाले त्या वाळंतिणीच्या जयंती का मयंतीला, तरी आज कविता? तिथीनुसार साजरा करताय का वाळंतिणदिवस?
In reply to २ महिने अन १३ दिवस झाले त्या by बॅटमॅन
त्यांना आज झाली असेल कविता. सगळेच शीघ्रकवी थोडेच असतात. ;)
In reply to त्यांना आज झाली असेल कविता. by सूड
हम्म, तेही खरंच म्हणा.
बादवे
शीघ्रकवीनावात बरेच काही दडले आहे. थोऽडा विग्रह पायजे फक्त. ;)
In reply to हम्म, तेही खरंच म्हणा. by बॅटमॅन
विग्रह पायजेबिंगो!! ;) मला पण बरेच दिवस कविता झालेली नाही. काय घ्यावं असा विचार करतोय. ;)
In reply to विग्रह पायजे बिंगो!! ;) by सूड
"शीघ्रेल" घ्या. काव्यरेचक म्हणून अतिशय उपयोगी पडेल.
-(आयुर्वेदाचार्य) बॅटमॅन.
In reply to "शीघ्रेल" घ्या. काव्यरेचक by बॅटमॅन
हात मेल्या, कसला आयुर्वेदाचार्य तू!! असं पटकन धाग्यावर सांगतात का औषध? व्यनि करायला सांगायचं. ;)
In reply to हात मेल्या, कसला by सूड
अर्र, विसरलोच की.
-पोपटहित.
मजेदार आहे. :-)