मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्ह्यालेन्टायीन दिन'दिवाणे'

फुंटी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
जरी आम्ही असू व्ह्यालेन्टायीन दिन'दिवाणे' दरसाल गातो एकच गाणे छे छे ,ही नसे अपुली संस्कृती नसे ही अपुली परंपरा जाळा ती शुभेच्छापत्रे झोडपा त्या जोडप्याला पाश्चिमात्यांचे हे प्रेमाचे चाळे आम्ही आहोत मराठी मावळे प्रेमदिनाची आम्हाला गरजच काय ? हो हो,ते सगळ ठीकाय आम्ही तरी कराव काय आमची सेटिंग होतच नाय किती वर्ष पहावी वाट स्वप्नात दिसतो आंतरपाट बोलणे माझे घे मनावर नकोस सुंदरी राहूस तू सिंगल करूनच टाक शुभमंगल प्रपोज जरी बहु येती तुजला एक ना धड भाराभर वर गोंधळू नकोस पुकार स्वयंवर मुंबईमध्ये जो घेई घर त्यास मान तुझा प्रियवर...

वाचन 1695 प्रतिक्रिया 0