सुमारे दोन महिन्यापुर्वीची घटना. संध्याकाळी ७ वाजता मोबाईल वाजला. दुस-या टोकाला एक मुलगी. आवाजावरुन काहीतरी किचकट प्रकरण आहे हे लक्षात आले. त्यांना लगेच भेटायला बोलवले. अर्ध्या तासात दरवाजावर आई आणि मुलगी हजर. आईचे डोळे तांबारलेले. बायकोने पाणी देउन भाजीच्या निमित्ताने पळ काढला.
सर्व संभाषणात आई गप्प होती. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या त्या मुलीने सर्व कर्मकहाणी सांगितली. हे प्रसिद्ध घराणे. वाडा जाउन मोठी बिल्डींग बांधलेली. शेवट्च्या मजल्यावर १५०० फुटाचा ब्लॉक. घरात आजी आणि आजोबा. आजोबा दशग्रंथी ब्राम्हण. थोडक्यात सांगायचे म्हटले तर शुभं करोती संस्काराचे घर. ९०% मार्क मिळवून सायन्स ला ऍडमिशन घेतलेल्या लहान भावाचा अचानक घरात त्रास सुरु झाला होता.
सारखा थू, थू करायचा. आई,बहिणीला घाणेरड्या शिव्या देउ लागला होता. बहीणीची ओढ्णी जरा हलली की लगेच "नीट घे ओढणी- तू काय खिडकीतली आहेस का? असे विचारत होता. आईला जरा पदर हलला की लगेच "काय ग **(नगरवधू) अशी शिवी देत होता. कितीही विचारणा केली तरी काही बोलायचा नाही. घुम्या झाला होता. टीवी
सुरु करायला देइना. मला हा काय प्रकार आहे ते समजेना. नंतर बघु म्हणुन त्या जोडीला परत पाठवले. रामदासाना फोन लावला. त्यांना परिस्थिती ची कल्पना देउन मदत मागितली.
रामदासानी दुस-या दिवशी संध्या़काळी एक जागेचा पत्ता दिला. ते आधीच उभे होते.
"मास्तर तुम्ही ३ वर्ष मागे आहात. तुम्हाला हे सहन होणार नाही. नंतर बोल लाउ नका." इती रामदास. मला साधारण धूसर कल्पना आली. संपूर्ण वातानुकुलित आणि डोम शेप टेबलचा कॅफे होता. रामदासानी साईट उघडल्यावर १.५ मिनिटात माझा श्वास कोंडला. जे बघितले ते एवढे भीषण होते की लगेच उठलो आणि बाहेर आलो. रामदास पण माझ्याबरोबर बाहेर आले. हातात पाण्याची बाटली. संपूर्ण बाटली संपवल्यावर सुमारे १० मिनिटानी मला कंठ फुटला. धीस इज हॉरिबल्-मी.
मास्तर तुम्ही वर्ग अर्ध्यावर सोडला. नंतर कुत्रा येतो. सेल्समन पण येतो.- रामदास
संपूर्ण उघड्या देहाने मांडीवरचे तान्हे बाजुला ठेउन जिवंत राह्ण्यासाठी निर्माण केलेल्या पयाने कॅमेर्-याच्या लेन्स वर केलेली सही बघुन मी कासविस झालो होतो.
तुमच्या केसमधे असेच काही असणार असे रामदास म्हणाले. आणि त्यावरचा उपाय पण सुचवला. पण मुलाने स्वःतच्या तोंडाने कबुल केल्यशिवाय केस मधे यश नाही हे बजावण्यास विसरले नाहीत. आता कसोटी लागणार होती अनुभवाची.
साधारण ३ मिटींग नंतर मुलाने कबुली दिली. ती अशी.
१५ ऑगस्ट ला मित्राच्या घरी पार्टीला गेला होता. बरेच जण होते. घरात मोठी मंडळी नसल्यामुळे मोकळे रान मिळाले. रात्री रहायचे ठरले होते. रात्री ९ नंतर मित्राने ४ सिडी काढल्या. सुरवातीला गंमत वाटली. नंतर शिसारी वाटायला लागली. मित्र काही सोडेनात जबरदस्ती ने पहायला लागले.घोटाळा झाला तो ४ थ्या सिडीने.
मूल जन्माला येण्याचे ग्राफिक डीटेल्स आजकाल लवकरच कळतात. पण त्या जागी इतर वस्तू पण जन्म घेतात हे त्या संस्कारी मनाला झेपले नाही. सर्व स्त्री जाती बद्दल घृणा निर्माण झाली. घरी आला. भडभडा ओकला. जागरणाने पित्त झाले म्हणुन घरची गप्प बसली. साधारण ४ दिवसानी शिव्या सुरु.
मुलाला क्रिकेट आवडते हे कळल्यावर रामदासानी सुचवल्याप्रमाणे क्रिकेट ऍकॅडीमी मधे नाव घालायला सांगितले. आता मुलगा बरा आहे. थूंकणे थांबले आहे. शिव्या बंद आहेत.
भरपूर अभ्यास-भरपूर खेळ.
कट्ट्यावर सर्वसाक्षीनी एकाच बिल्डींग मधे मुले एकमेकाशी नेटवर बोलतात ही माहिती दिल्यावर हा बॉम्ब बाहेर आला.
पॉर्न ला सर्वाना केव्हाना केव्हा सामोरे जावे लागते. मी पण गेलोय. पण आधी ते एवढे सुलभ नव्हते, स्वस्त तर नव्हतेच नव्हते. आता पर्वर्जन ऑफ हाय्येस्ट ऑर्डर विथ क्लिक ऑफ बटन. फक्त १५ रुपयात खाउच्या पैशात. पालक बेसावध. लहान वयात ह्या पर्वर्जनला सामोरे जाउन त्यातल्या खर्-या खोट्याची जाण न आल्याने ही पिढी पंगू मनाने आपल्या भविष्यातील सहजिवनाचा सत्यानाश करणार काय हा प्रष्न अनुत्तरित रहातो.
जाता जाता: वस्तू काय ते इथे लिहू शकत नाही. तेवढा निर्ढावलेला नाही. आय लिव इट टू युअर इमॅजिनेशन.
तुम्हाला शीमेल ही काय भानगड असते ते माहित आहे काय? नसेल तर देव तुमचे भले करो.
वाचने
17147
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
शीर्षक.
भीषण
पालकांचा अंकुश हवाच
प्रभूजी, वाचलेले केवळ भीषण आहे!
लैंगिक शिक्षण
प्रकोआ
काय लिहू?
अहो प्रभु
एखाद दुसरी कथा
हो का?
In reply to एखाद दुसरी कथा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
ता क.
In reply to हो का? by विनायक प्रभू
प्रभूसर
+१ !
In reply to प्रभूसर by रामदास
एकदा का अनेकदा
In reply to प्रभूसर by रामदास
प्रभूसर,
वास्तव
कमी
In reply to वास्तव by मुक्तसुनीत
टँजंट
In reply to कमी by विनायक प्रभू
विदा ?
In reply to कमी by विनायक प्रभू
विदा
In reply to विदा ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
तथास्तु
In reply to विदा by विनायक प्रभू
विदा
In reply to विदा by विनायक प्रभू
मला
In reply to विदा by मुक्तसुनीत
एक शंका
In reply to मला by राघव
अंदाज
In reply to एक शंका by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
कालाय
खरे आहे
In reply to कालाय by विसोबा खेचर
साला,
In reply to कालाय by विसोबा खेचर
क्या बात है !!!!!!
In reply to साला, by सखाराम_गटणे™
>>>तेव्हा
In reply to कालाय by विसोबा खेचर
तीन एक
प्रभु ! मी
In reply to तीन एक by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
अरेच्चा
कॅफे
पुढच्याच ठेच...
धन्यवाद
In reply to पुढच्याच ठेच... by विसुनाना
कलियुग चालु आहे...
नक्की
प्रभुजी की जय हो
नाना
In reply to प्रभुजी की जय हो by अवलिया
हम्म मी
In reply to नाना by विनायक प्रभू
खरे आहे
In reply to नाना by विनायक प्रभू
.
In reply to नाना by विनायक प्रभू
लैंगिक आकर्षण ही आदिम भावना आहे.
In reply to नाना by विनायक प्रभू
काही
टाळ्या
In reply to काही by महेश हतोळकर
धन्यवाद राजे!
In reply to टाळ्या by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
मलाही पटलं
In reply to काही by महेश हतोळकर
प्रेशर हँडलिंग
विषय वेगळा आहे.
In reply to प्रेशर हँडलिंग by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत पण
In reply to विषय वेगळा आहे. by विसुनाना
घरातले
हम्म...काही विचार पटले..काही नाही...जसे..
तीन वर्षं?
"जर
In reply to तीन वर्षं? by मृदुला
येस स्रर
खरतरं या
In reply to येस स्रर by विनायक प्रभू