नक्षीची दुसरी बाजू..
प्रतिक्रिया
In reply to अप्रतिम सुडराव by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तुझे प्रतिसाद आणि कविता पाहिल्या की तुझी स्प्लिट पर्सनॅलिटी आहे असे वाटतेयेप, येईच बोलता हे बाकी आता अनाहीतांचा मारा झेलायला तयार रहा
In reply to तुझे प्रतिसाद आणि कविता by स्पा
In reply to दोन्हींशी सहमत. by बॅटमॅन
In reply to कविता आवडली by पैसा
In reply to कविता आवडली by पैसा
In reply to हेच्च.. by पिलीयन रायडर
>>अनाहिता विरुद्ध इतर असा सुर कशालाएक मिनीट!! ह्यात कुठेही अनाहिता विरुद्ध इतर मांडण्याचा प्रयत्न नाहीये. एकूणच आपल्याकडे लग्नानंतर बाईला कसा सर्व त्याग करावा लागतो, तीच कसं सगळं सोडून येते असा जो काही सूर दिसतो त्यावर लिहीण्याचा छोटासा प्रयत्न आहे, आता हे सुचताना नक्षी निमित्तमात्र झाली हेही खरं. वर पैसातैंनी म्हटल्याप्रमाणे कथा पुन्हा वाचली. माझा दृष्टिकोन चुकलाही असेल तो आधी लेख वाचताना!! आक्षेपार्ह वाटत असेल तर नक्षीची लिंक कृपया संपादक मंडळाने काढून टाकावी. मला नक्षी वाचल्यानंतर जे काही सुचलं ते उतरवलंय, माझंच बरोबर आहे हे मांडण्याचा अजिबात अट्टाहास नाही. आणि अनाहिता विरुद्ध इतर असं तर नाहीच नाही!! इति लेखनसीमा
In reply to >>अनाहिता विरुद्ध इतर असा सुर by सूड
In reply to >>अनाहिता विरुद्ध इतर असा सुर by सूड
In reply to हेच्च.. by पिलीयन रायडर
In reply to मलातरी कवीला "अनाहिताविरोध" by आनन्दिता
पण काही प्रतिसादकर्ते मात्र उगाच खुष झालेत.. ह्याच्याच बद्दल बोलतेय.. लेखकाबद्दल नाही..
In reply to मलातरी कवीला "अनाहिताविरोध" by आनन्दिता
पण काही प्रतिसादकर्ते मात्र उगाच खुष झालेत.
खरंय ! +DIn reply to वा वा by मिसळलेला काव्यप्रेमी
" खिन्न हसला मनाशीयात जिंकलंस मित्रा ! कड्डक! एकांगी विचार होतो हे खरं आहेच बहुतांशी. दोनही बाजू बघायला हव्यात. ऑलवेज. असो वेगळा धागाच निघायचा खरा यावर. पण राहुदे. कविता भनाट. फुल लाईक.
In reply to कविता आवडली. by मितान
In reply to केवळ सूड रावांची आहे म्हणून by सुबोध खरे
केवळ सूड रावांची आहे म्हणून कविता वाचली.ह्याला कंपूबाजी म्हणावे कां डॉक? ;) ह. घ्या. उगा थोडी गंमत केली.
In reply to ह्याला by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to सूड रावांकडे पहिले तर ते अशा by सुबोध खरे
सूड रावांकडे पहिले तर ते अशा संवेदनशील कविता करीत असावेत हे वाटत नाही. ते एखाद्या क्रांतिकारी संघटनेचे नेते असावेत असे वाटते.हो खरय. ते क्रांती घडवून आणतील यावर माझा देखिल विश्वास आहे =))
In reply to :) by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to संदर्भ दिला नसता तरी चालले by सांजसंध्या
In reply to नक्षी या कथेला इतकी छान दाद by इनिगोय
बाकी माझ्या या प्रतिसादात म्हटलं तसं बाई अाणि पुरुष यापलीकडे आपण सगळे माणूसही आहोत, हे प्रत्येकाच्या लक्षात राहिल तो सुदिन.त्या सुदिनी अनाहिताचे नामकरण "माणुस" असे करुयात काय ;) माणुस दिन विशेषांक २११५ =))
In reply to =)) by प्रसाद गोडबोले
माणुस दिन विशेषांक २११५ते अनाहिता च्या नावाबद्दल सोडा हो, पण लोकांची भिकार मानसिकता बदलायला अजुन १०० वर्ष तरी लागतील याची कबुली म्हणायची का ही??
In reply to माणुस दिन विशेषांक २११५ by आनन्दिता
In reply to अगं हो, त्याचीच कबुली आहे. by स्रुजा
In reply to @ प्रगो, by मितान
In reply to माणुस दिन विशेषांक २११५ by आनन्दिता
In reply to =)) by प्रसाद गोडबोले
In reply to =)) by प्रसाद गोडबोले
In reply to एक मिनिट... by पिलीयन रायडर
In reply to प्रचंड अनुमोदन.. by पिशी अबोली
बाकी खेद, राग वगैरे काही नाही अशा कुणाबद्दल. त्यांनी त्यांचे आयुष्य अगदी असेच जगावे. शक्य तेवढा अजून द्वेष करावा. त्यासाठी प्रचंड शुभेच्छा.+1
In reply to एक मिनिट... by पिलीयन रायडर
In reply to एक मिनिट... by पिलीयन रायडर
आपण स्त्री आणि पुरुष आहोत हे "विसरुन" आपण माणुस आहोत हे लक्षात ठेवुया, असं म्हणालेली नाहीये इनि..म्हणजे आपण माणसं आहोत हे दरवेळी विसरायचं का? 'माणूस' म्हणून असणारी डिग्निटी मोठी की स्त्री/पुरुष म्हणून असणारी डिग्निटी मोठी? "स्त्रियांना माणूस म्हणून वागवा" हे स्त्रीमुक्तीच्या पुरस्कर्त्यांचे म्हणणे हे वाक्य लिहून तुम्हीच खोटं ठरवताय असं वाटत नाही का? अनाहिताचे नाव बदलून माणूस असं केल्याने नक्की कशाला बाधा येते? उलट ती वेळ येणे हेच तर स्त्रीमुक्ती अभियान्/चळवळ इ. इ. च्या विजयाचे लक्षण मानायला हवे असे नाही वाटत?
In reply to अजून एक मिनिट by अन्या दातार
'माणूस' म्हणून असणारी डिग्निटी मोठी की स्त्री/पुरुष म्हणून असणारी डिग्निटी मोठी?ज्या डिग्निटीमुळे त्या त्या वेळी जास्त फायदा होईल ती ती डिग्निटी मोठी, हाकानाका.
In reply to अजून एक मिनिट by अन्या दातार
In reply to एक मिनिट... by पिलीयन रायडर
बाकी माझ्या या प्रतिसादात म्हटलं तसं बाई अाणि पुरुष यापलीकडे आपण सगळे माणूसही आहोत, हे प्रत्येकाच्या लक्षात राहिल तो सुदिन.बाई आणि पुरुष या पलीकडे जाणे म्हनजे नक्की काय ? स्त्री पुरुष समानता म्हणजे नक्की काय ? स्त्री आणि पुरुषांना सर्वत्र समान वागणुक मिळणे आणि सर्वांन्नाच माणुस म्हणुन समान अधिकार मिळणे . हेच होय ना ? मग जेव्हा स्त्री आणि पुरुष दोन्ही समानच ठरतील तेव्हा अनाहिता सारख्या वेगळ्या दालनाची गरजच काय अनाहिताचे स्वतंत्र अस्तित्व असणे हेच स्त्रीयांच्या पुरुषांपेक्षा वेगळे ( मग ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ कोणत्याही अर्थाने असो पण वेगळे ) असण्याचे लक्षण नव्हे काय ? पुरुषांना स्वतंत्र दालनाची गरज भासत नाही , स्त्रीयांना ती का भासावी जर त्या स्त्री पुरुष समानता मानत असतील तर ? पण हा मुद्दा कितीही केले तरी अनाहितांना पतणारा नाही असे दोन वर्षांच्या वादावादीत लक्षात आले आहे म्हणुनच २११५ म्हनले . पण तेव्हाही स्त्रीया आपण पुरुषांपेक्षा कोणत्याही अर्थाने वेगळ्या नाहीतच , आपण सारे माणुसच आहोत सारेच समान असे म्हनतील की नाही हे ठाम पणे सांगता येत नाही .
लोकांची भिकार मानसिकताभिकार मानसिकता म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला ? तुमच्या मते स्त्री पुरुष समानता म्हणजे नक्की काय ? जर समानता असेल तर स्वतंत्र दालन किम्व्वा स्वतंत्र दिन साजरा करण्याची गरजच का पडते ? अशी गरज भासणे हे समानता नसण्याचेच लक्षण नव्हे काय ?
अनाहिता चं याहून चांगलं बारसंमी म्हणतोय की जेव्हा खर्या अर्थाने स्त्रीपुरुष समानता असेल तेव्हा अनाहिताची गरजच भासणार नाही . एकी कडे स्त्रीपुरुष समानता यावी असे म्हणणे आणि दुसरी कडे अशी समानता आली तरीही अनाहिता सारखे राखीव दालन स्त्रीयां साठी असलेच पाहिजे असे म्हणणे हा दुटप्पी पणा नव्हे काय ?
अत्यंत हीन दर्जाचा प्रतिसाद !!! यातून काय सिद्ध होतंय ते वेगळं सांगायला नको !ह्यात हीन दर्जा म्हणजे काय हेच कलाले नाही . मी कोठे अश्लील बोललो नाही कोनाचा अनादर केला नाही कोनाला जीवे मारण्याची धमकी दिली नाही . उलट बाई अाणि पुरुष यापलीकडे आपण सगळे माणूसही आहोत, हे प्रत्येकाच्या लक्षात राहिल तो सुदिन ह्याला अनुमोदन दिली आहे . आणि त्या सुदिनी तरी अनाहिता सारख्या राखीव कुरणाची गरज भासणार नाही असा आशावाद व्यक्त केला आहे तेव्हा माणुस म्हणुन सर्वांनाच समान मानले जाईल असे म्हनले आहे .
+१ अनुमोदन.अनुमोदन जरुर द्या . पण स्वतचा वेगळा विचार ही मांडा . घोळक्याने चालणे ही मेंढ्यांची मनोवृत्ती झाली .
तुम्हाला अनाहिता बद्दल काही सांगितलं तर ते पूर्वग्रह बाजुला ठेवुन समजुन घेता येईल का ही शंकाच आहे.सांगुन तर पहा . मी कसलेही पुर्वग्रह ठेवत नाही . शुन्यातुन सुरुवात करु . माझा इतकाच प्रश्न आहे की स्त्री पुरुष हे विसरुन आपण सारेच माणुस आहोत हे लक्षात येईल तेव्हा अनाहिताची गरजच काय ? तुम्ही अनाहिता मधे काय बोलता ठावुक नाही , पण दिवाळी अंक - २०१४ साहित्य चर्चा काव्य पाककृती कलादालन भटकंती नवे लेखन मराठी दिन ह्या पेक्षा वेगळे भिन्न असे काही बोलत असाल असे वाटत नाही . दोन वर्ष तुम्ही अनाहिता चालवताय (?) ह्या वर्षी विशेषांकही काढलात , आनंदच आहे , पण हे सारे मिपाच्या मुख्य प्रवाहात राहुन करणे शक्य नव्हते का ? ह्याही उपर आता तुम्ही म्हणाल की आम्हाला नीलकांत ने स्वतंत्र विभाग दिला तर तुमची अजुन जलफळाट होत आहे तर मला हसु येईल . मला अतार्किक गोष्टींवर हसु येते . सर्वच जण समान असतील तर काही विषेष व्यक्तींना स्वतंत्र सवलत का द्यावी आणि अशी सवलत दिली जात असेल तर त्यांन्ना समान का मानावे हा माझा साधा सवाल आहे . शुध्द आणि खणखणीत तर्काच्या आधारे कोणीही मला हे पटवुन द्यावे , मी जाहीर पणे माझी चुक कबुल करेन . शुध्द आणि खणखणीत तर्क !!
पण ह्याचा अर्थ असा होत नाही की "नेहमीच" स्त्री, पुरुष स्वत:च वेगळेपण सोडून केवळ माणुस ह्या एका पातळीवर असतील.अनाहिता म्हणुनच अस्तित्वात आहे.हेच हेच म्हणतोय की हे विधान तर्काच्या आधारव्र पहायला गेल्यास सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी आहे . एकीकडे तुम्ही अपेक्षा करता की स्त्री आणि पुरुष ह्याच्या पलीकडे जाऊन माणुस म्हणुन विचार करावा आणि दुसरी कडे म्हणताय की आम्ही नेहमीच असा विचार करणार नाही !! आता ह्याला काय म्हणावे ?
आंतरजालीय महिलादिन विशेषांक! तुमच्याकडे तो वाचुन त्यावर टिपण्णी करण्याचा मनाचा मोठेपणा नसणारच.. ते वर दिसलंच.. अर्थात अपेक्षाही नाहीचेत..अहो मुख्य बोर्डावर नवीन लेखन मधे दिसलेच नाही ते लिखाण ही काय आमची चुक झाली काय ? शिवाय अनाहिता विषेषांक म्हणल्यावत अॅक्सेस रीस्ट्रीक्टेड असेल असे वाटल्याने साईडला क्लिक करावे असा विचारही मनात आला नाही हो ! ( हे असेच होते . म्हणुनच मुख्यप्रवाहात लेखन करावे हे अपेक्षित आहे ) तदुपरी सुड ने लोन्क दिल्याने नक्षी वाचली , सुडची कविताही वाचली , दोन्हीतील टोन निघेटीव्ह आहे असे माझे स्पष्ट मत आहे हे ही नोंदवले आहे . अजुन सविस्तर चर्चा हवी असल्यास तीही करु .
पुरुषांना अनाहिता बद्दल काय वाटतं हा अगदीच गौण मुद्दा आहे कारण तुम्हाला एकंदरीत अनाहिताची, तिच्या कार्यपद्धतीची ०.००१% सुद्धा माहिती नाही.पुरुषांना काहीही वाटत नाही हो अनाहिता बद्दल . आमच्या कॉलेजात एक गार्डन खास मुलींसाठी आरक्षित होते , तेव्हा फार कुतुहल वाटायचे , काय करत असतील नक्की येथे ? काय असेल ह्यांची "कार्यपधती" वगैरे . पुढे कॉलेजचा जी एस झाले तेव्हा मुलींच्या रीप्रेस्नेटीव्ह सोबत तिथे जाण्याचा योग आला होता . श्यॅ . काहीच "खास" नसते हो . कार्यपध्दती वगैरे सगळे सेम टु सेम मुलांसारखेच , झुडपांआड बसुन डबाच खात बसतात फक्त ... श्यॅ ..फारच अपेक्षा भंग झाला होता .
आताशा त्याचा राग, कंटाळा किंवा वैतागही येणं बंद होत चाललं आहे.हे हे प्रगतीचे लक्षण आहे . जेव्हा राग कंटाळा वैताग येणे पुर्ण बंद होईल तेव्हाच खर्या अर्थाने "खरेच राव , स्त्री आणि पुरुश नेहमीच अगदीच समान असतात काहीच फरक नाही " हे पटेल . २११५ हा माझा आशावाद आहे .
तुमच्यासाठी.. तुमची लेव्हल अजुनही तीच आहे म्हणून..धन्यवाद ! माझी लेव्हल मी जाणतो . मी कटटर तार्किक माणुस आहे , वर म्हणल्या प्रमाणे एकीकडे स्त्रीपुरुष समानता व्हावी आणि सर्वांना माणुस म्हणुन ओळखले जावे असे म्हणणे आणि तरीही स्त्रीयांना स्वतंत्र दालन असावेच असे म्हनणे ही दोन विधाने तर्काच्या आधारावर स्वयं विरोधी नाहीत हे सिध्द करा असे माझे साधे सोपे म्हणणे आहे
अनाहिता दालनाची गरज संपणे किंवा तिचं नाव माणुस होणे वगैरे स्त्री मुक्तीच्या चळवळीच्या यशाची लक्षणे नाहीतहेच हेच ते सेल्फ कॉन्ट्रॅडिक्शन .
तुम्हाला "तुमच्या सारख्या" लोकांशी बोलावं वाटतं.. तुमचे विचार, प्रॉब्लेम्स, राहणीमान इ ज्यांना जास्त चांगल्या पद्धतीने "रिलेट" करता येईल... ते नसतं तर तुम्ही काय जगुच शकत नाही का? पण असल्याने व्हॅल्यु अॅडीशन होते ना आयुष्यात.. तसंच अनाहिता आहे.. त्यासाठीच अनाहिता आहे.हे म्हणजे अनाहिता हा उघड उघड एक कंपु आहे हे तुम्ही मान्य करीत आहात ... तसे असेल तरीही त्याला हरकत नाही , फक्त हे क्लीयर नाहीये . (किमान अजुन तरी मला असे तुमच्या इतके कोणी स्पष्ट पणे म्हणलेले दिसले नाहीये ) आता माझे वैयक्तीक मत - मी सर्वांना वृत्तीच्या पातळीवर पहातो , स्त्री पुरुष असा भेदच नाही , शेवटी सर्व माणसेच . सारेच समान . कोणी तरी "स्त्री पुरुष ह्या पलीकडे जाऊन माणुस म्हणुन विचार करुयात " असे म्हनले म्हणुन कोणी तरी समविचारी भेटल्याचा आनंद झाला होता , पण सारेच "समान" माणुस झाले तरी "समान" नाहीत असे काही तरी विरोधाभासी विधान दिसले म्हणुन हसु आले . असो.
प्रतिसाद अतिशय वैयक्तिक आहेहरकत नाही . चालायचेच .
In reply to सर्व अनाहितांना माझा सादर by प्रसाद गोडबोले
In reply to चांगला प्रतिसाद दिलात तुम्ही. by स्रुजा
जिथे सांघिक कामगिरी महत्वाची ठरते तिथे आम्ही याचा योग्य वापर करतो. त्याला कंपूबाजी असे नाव पडल्यास, ती मेंढरांची प्रवृत्ती वाटल्यास नाइलाज आहेह्यातुन जे कळायचे ते कळाले. एकुणच तुमचे सारे तर्क All are equal, but some are more equal than others ह्या धर्तीवरचे आहेत असा माझा तर्क झालेला आहे . मी आधीच म्हणल्या प्रमाणे मी सारेच वृत्तींच्या लेव्हल वर पहातो , स्त्री पुरुष उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ मिसळ्पाव अनाहिता असा कोणताच भेद नाही . तदुपरी स्त्रीयांचे वेगळे भावविष्व असते आणि ते प्रत्येक्वेळी पुरुषांपुढे मांडायची गरज नसते म्हणुन स्वतंत्र दालनाची गरज आहे हे एकदम तार्किक वाटले आणि पटले ही !( हाच सेम तर्क पुरुष विभाग काढण्या करता देता येवु शकतो , पण तसा तो दिला जात नाही आणि पुरुषांनाही स्वतंत्र विभागाची गरजही भासत नाही ह्यातुन काय बरे अनुमान निघते ? ) असो पण सारेच माणुस ह्या अभिव्यक्तीला पोहचल्यावरही , सर्वांचे भावविश्व समान झाल्यावरही , सर्वजण सारखेच संवेदनशील झाल्यावरही २११५ फॉर दॅट सेक ३११५ सालीही स्वतंत्र वेगळे अस्तित्व राहिलेच पाहिजे हे किमान माझ्या तरी आकलन शक्तीच्या बाहेर आहे . म्यॅट्रीक्स पिक्चर मधे कसे निऑला सारेच मॅट्रीक्स रुपात दिसायला लागते तसे काही मला सारेच समान भासत असल्यान्याने मला तुमचा तर्क पटत नाहीये ... असो .
असो. माझा कोठेही अनाहितांना हिणावण्याचा उद्देश नव्हता . मी फक्त " सगळेच समान पण वेगळे अस्तित्वही हवेच " ह्यामागील तर्क शोधत होतो/आहे . तदुपरी कोणी दुखावले गेल्यास क्षमाप्रार्थी आहे .
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥
In reply to आत्ता पर्यंत ३ प्रतिप्रतिसाद by प्रसाद गोडबोले
In reply to सर्व अनाहितांना माझा सादर by प्रसाद गोडबोले
In reply to सचिनच्या डोळ्याना सुखावना-या फटक्यांची आठवण झाली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सर्व अनाहितांना माझा सादर by प्रसाद गोडबोले
In reply to सर्व अनाहितांना माझा सादर by प्रसाद गोडबोले
अनुमोदन जरुर द्या . पण स्वतचा वेगळा विचार ही मांडा . घोळक्याने चालणे ही मेंढ्यांची मनोवृत्ती झाली .आजवर मिपावर अनेक वेळा लेख आणि प्रतिसादांच्या रुपात मी माझे विचार मांडले आहेत. जिथे तिथे पिंका टाकायच्या म्हणून, सतत स्वतःचे वेगळेपण दाखवून द्यायची काही गरज वाटत नाही म्हणून, मला जे वाटले ते आधीच एका प्रतिसादात आल्याने, त्यावर फक्त सहमती दर्शवली. तुमच्यापर्यंत जे पोचायला हवं होतं ते पोचलं. बाकी मग आम्ही घोळक्यात असल्याने आमच्या स्वतंत्र विचारसरणीवर काही मर्यादा येत नाहीत आणि जिथे सांघिक कामगिरी महत्वाची ठरते तिथे आम्ही याचा योग्य वापर करतो. त्याला कंपूबाजी असे नाव पडल्यास, ती मेंढरांची प्रवृत्ती वाटल्यास नाइलाज आहे आणि आम्हाला त्याचा शश्प फरक पडत नाही. हे मी अनुमोदन देणाऱ्या सर्वच अनाहीतांच्या वतीने बोलते आहे. आता स्त्री पुरुष समानता आणि अनाहीताची गरज - वर्षानुवर्षे चघळला गेलेला विषय. सृजाने दिलेला प्रतिसाद योग्य आहेच. शिवाय ही खूप सापेक्ष टर्म आहे. प्रत्येक बाईचे प्रश्न वेगळे आहेत आणि पूर्वीपासून चालत आलेली ही स्त्री-पुरुष समानता चळवळ अशी लगेच संपणारी नाही. जिथे आजही जाहिररीत्या बहिणीला जाळून टाकेन अशी भाषा करणारे लोक आहेत, क्षणाक्षणाला पुरुषांचे नकोसे स्पर्श आहेत, बायकांना सर्रास मारहाण करणारे नवरे आहेत, बायकांवर होणारे अत्यंत नीच पातळीचे विनोद चवीने चघळले जात आहेत, तिथे सरळ सरळ स्त्री ला किती कमी पातळीचे लेखले जाते हे दिसून येतेच. आमच्या दृष्टीने अनाहिता च्या माध्यमातून जे काही होतंय, ज्या कुणा स्त्रियांना मोकळेपणाने तिथे व्यक्त होऊन हलके वाटते आहे, ज्यांना कुणाला इथे लेख टाकला की वाईट साईट प्रतिक्रिया येतील याची भीती वाटत होती आणि हळूहळू सांघिक भावनेतून ती भीती दूर होऊन मुख्य बोर्डावर लेख येत आहेत, एका बंदिस्त दालनातून आम्ही जर आमच्या अशाच छोट्या छोट्या प्रश्नांना (मग ते घरातल्या स्त्री मुळे उद्भवले असतील तरीही) उत्तरे शोधण्यात यशस्वी होत आहोत, तर आमच्यापुरतं स्त्री -पुरुष समानतेच्या लढ्यातला तो खारीचा वाटा असेल, आणि आम्ही आनंदी आहोत. अनाहिता असावे की नसावे यावर पूर्वीपासून दोन मतप्रवाह आहेत आणि ते बदलणार नाहीत हे माहित आहे. त्यामुळे या विषयावर काही लिहिण्याची इच्छा नाही. याचा अर्थ प्रतिवाद करायला जमला नाही, सो कॉल्ड शुध्द आणि खणखणीत तर्क देता आला नाही असा घेतल्यास हरकत नाही. प्रतिसादात हीन काय होते? आधी जरा हे बघु. ८ मार्च ला अनाहिता विशेषांक प्रकाशित झाला. मुख्य बोर्डावर जरी हे लेख दिसले नाही, तरीही 'अनाहिता महिला दिन विशेषांक वाचण्यासाठी इथे टिचकी मारा' आणि 'डाऊन लोड करण्यासाठी इथे टिचकी मारा' हे सर्वाना दिसत असताना अपवाद वगळता कुणालाही एक साधे क्लिक करावेसे वाटले नाही याबाबत कौतुक करावे वाटतेय हो. एवढेही कुतूहल वाटले नाही कुणालाच? एरवी इथे मिपावरच 'काय असतं बरं अनाहीतात' यावर चर्चा रंगतात, मागे अजून किती रंगत असतील माहिती नाही, पोरगी पटाव शास्त्रावर जिथे लेख लिहिले जातात, खरड वह्यांमधुन उचकापाचक केली जाते, आणि मिपाबाहेर देखील समाजात अजून बरेच काही आहे ज्यात स्त्रियांच्या प्रत्येक बाबतीत (दुर्दैवाने तिचे शरीर) नको तेवढे लक्ष घातले जाते. तिथे स्त्रियांच्या लेखात/अंकात कुठे लक्ष घाला असे वाटून त्याकडे न बघणे, तेही फक्त एक क्लिक दूर असताना हे जामच कौतुकास्पद आहे हां. उपरोध बाजूला ठेवून, ठळक पणे समोर अंक दिसत असताना, तो अनेकांकडून फेसबुक वरही शेअर झाला असताना, व्हॉट्सअॅपवर आलेला असताना, कुणी त्याकडे ढुंकून पहिले नाही हे पटण्यासारखे मुळीच नाही. तर ते एक असो. बरे मुख्य बोर्डावर अनेक स्त्रिया देखील लिखाण करतात. गेल्या काही दिवसात हे प्रमाण देखील वाढले आहे. त्यावर तरी आपण प्रतिसाद देता का? अर्थात कुणी कुठल्या लेखावर काय प्रतिसाद द्यावेत, हा सर्वस्वी त्या व्यक्तीचा प्रश्न आहे, पण केवळ मुख्य बोर्डावर आले नाही म्हणून पाहिले नाही हे काही समजले नाही. आता आणि हे सगळे बघता, महिला दिनानिमित्त मिपावरील स्त्रियांच्या दालानातर्फे एक अंक प्रकाशित झाला, ज्यात स्त्रियांचे आरोग्य, प्रेरणादायी स्त्रिया आणि इतरही काही स्त्री केंद्रित विषयांशिवाय सर्वच पद्धतीचे उत्तम लेखन स्त्री लेखिकांनी केले. जर मुख्यप्रवाहात लेखन करावे हे अपेक्षित आहे असे तुम्ही म्हणता, तर मग या लेखनाबद्दल, वेगळ्या उपक्रमाबद्दल चकार शब्दही न बोलता, इनिच्या एका प्रतिसादाला फाटे फोडायला 'माणूस दिन विशेषांक' असे म्हणत लगेच प्रतिसाद दिले जातात, तेव्हा त्यात हिणवले गेल्यासारखे वाटते. आणि हेच खटकले, हीन वाटले. एखाद्या प्रतिसादाची पातळी हीन वाटण्यासाठी तो अश्लील, धमकी देणारा असावाच असे काही नाही. याहुन अधिक चर्चा करण्यात रस नाही.
In reply to हीन प्रतिसाद by अजया
"काहीवेळा" गोष्टी हाय लेव्हल वरुन बघाव्या लागतात, केवळ स्त्री-पुरुष म्हणुन नाही.. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की "नेहमीच" स्त्री, पुरुष स्वत:च वेगळेपण सोडून केवळ माणुस ह्या एका पातळीवर असतील.पिरातैंच्या या वाक्यामुळे हा प्रतिसाद वास्तववादी वाटला आणि प्रचंड आवडला. पुन्हा सर्वांचे आभार!! :)
In reply to मला काय म्हणायचंय हे समजून by सूड
"काहीवेळा" गोष्टी हाय लेव्हल वरुन बघाव्या लागतात, केवळ स्त्री-पुरुष म्हणुन नाही.. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की "नेहमीच" स्त्री, पुरुष स्वत:च वेगळेपण सोडून केवळ माणुस ह्या एका पातळीवर असतील.एकूण प्रतिसादाशी तुलना करून पाहता हे वाक्य म्हणजे भांगेत तुळस आहे.
In reply to मला काय म्हणायचंय हे समजून by सूड
In reply to ख्याक by स्पा
In reply to स्त्री पुरुष समानता म्हणुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to स्त्री पुरुष समानता म्हणुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to तर्कनिष्ठतेची योग्यायोग्यता. by एस
In reply to तर्कनिष्ठतेची योग्यायोग्यता. by एस
अप्रतिम सुडराव