माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव बुधवारी कोळसा खाण घोटाळ्यात आरोपी म्हणून निश्चित झाले आहे. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात २००५ मध्ये कोळसा खाणींचे वाटप झाले होते. कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को समूहास ओडिशातील तालिबारा दोन व तीनमधील खाणींचे वितरण करण्यात आले होते. यात गैरव्यवहार झाल्याचा ठपका सीबीआयने ठेवला होता. त्यात मनमोहन सिंग यांना आरोपी करण्यात आले नव्हते. गतवर्षी ऑगस्टमध्ये सीबीआयने सादर केलेला 'क्लोजर' अहवाल न स्वीकारता न्यायालयाने मनमोहन सिंग यांचा जबाब नोंदवण्याची सूचना केली होती. या पाश्र्वभूमीवर मनमोहन यांना बुधवारी विशेष न्यायालयाने 'आरोपी' म्हणून समन्स पाठवले. मनमोहन यांच्याव्यतिरिक्त उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. पारख, िहदाल्कोचे दोन अधिकारी यांनाही गुन्हेगारी कट, फसवणूक या आरोपाखाली समन्स पाठवण्यात आले आहे.
यापूर्वी दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना अशा प्रकारचे समन्स धाडण्यात आले होते. त्यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये जिंकलेली निवडणुक निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायलयाने रद्द करून त्यांना ६ वर्षे निवडणुक लढविण्यास बंदी घातली होती.
न्यायालयाची पायरी चढावी लागणारे मनमोहन सिंग हे तिसरे पंतप्रधान. हे तीनही पंतप्रधान काँग्रेसचे आहेत यात काहीच आश्चर्य नाही.
विशेष न्यायालयाचे म्हणण्यानुसार कोळसा खाणवाटपात सकृतदर्शनी गुन्हेगारी स्वरूपाची कृती झाल्याचे निदर्शनास येते. यात शुभेंदु अमिताभ, डी. भट्टाचार्य व कुमारमंगलम बिर्ला यांचा समावेश आहे. हिंदाल्कोला खाणवाटप करताना झुकते माप देण्यात आले. तत्कालीन कोळसा सचिव पी. सी. परख व कोळसा मंत्री मनमोहन सिंग यांच्या अप्रत्यक्ष प्रयत्नातून हिंदाल्कोला खाणवाटप झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे न्यायाधीश भरत पराशर यांनी नमूद केले आहे.
बिर्ला समुहातील हिंदाल्को कंपनीला ओरिसातील खाणवाटप करताना, कोळसामंत्री म्हणून डॉ. सिंग यांनी घेतलेल्या निर्णयाने प्रचलित सरकारी नियमांचा भंग झाल्याचा ठपका विशेष सीबीआय कोर्टाने ठेवला. सिंग यांच्या मान्यतेमुळेच हिंदाल्को कंपनीला अचानक प्रचंड नफा झाला आणि सरकारी कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागले, असा ठपकाही कोर्टाने ठेवल्याने मनमोहन यांच्या स्वच्छ कारकिर्दीवर तुर्तास तरी लाभाचा डाग लागला. खुद्द सिंग, उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. पारख, हिंदाल्कोचे दोन अधिकारी यांना आरोपी म्हणून ८ एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेशही कोर्टाने दिले.विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायमूर्ती भरत पराशर यांच्या निर्देशावरून डॉ. सिंग व अन्य पाच आरोपींवर गुन्हेगारी कट रचणे (कलम १२० ब), गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात (कलम ४०९) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोप निश्चित केले आहेत.
मनमोहन सिंग आणि पारख निवृत्त झाल्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालविण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले. नोकरशाही तसेच राजकीय माध्यमातून हिंदाल्कोला कोळसा खाणी मिळाव्या म्हणून कंपनीच्या शुभेंदू अमिताभ आणि भट्टाचार्य यांनी षडयंत्र रचले. कुमारमंगलम बिर्ला यांनी ते पुढे रेटले आणि कोळसा सचिव पी. सी. पारख व मनमोहन सिंग यांच्या माध्यमाने या षडयंत्राला अंतिम स्वरूप मिळाले, असा निष्कर्ष न्या. पराशर यांनी काढला. या प्रकरणात दोषी ठरल्यास आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. दिवंगत नरसिंह राव यांच्यानंतर प्रथमच फौजदारी खटल्याला सामोरे जाण्याची वेळ माजी पंतप्रधानांवर आली आहे. मात्र तरीही केवळ काँग्रेस व त्यांचे मित्रपक्षच नव्हे, तर विरोधकांनीही याबाबत वैयक्तिकरित्या मनमोहन यांच्यावर मात्र कोणताही संशय व्यक्त केलेला नाही.
मनमोहन सिंगांना या प्रकरणातून काही वैयक्तिक लाभ झाला का हे महत्त्वाचे नसून या घोटाळ्यामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे हेच जास्त महत्त्वाचे आहे. २-जी तरंगलहरींचे आपल्या हितसंबंधियांना खिरापतीसारखे वाटप करताना सरकारचे रू. १,७६,००० कोटी इतके नुकसान झाले असा अहवाल महालेखापालांनी यापूर्वीच दिला होता. लिलाव न करता आपल्या हितसंबंधियांना कोळसा खाणी दिल्यामुळे सुद्धा सरकारचे रू. १,८६,००० कोटी इतके प्रचंड नुकसान झाले हाही अहवाल महालेखापालांचाच.
काँग्रेसने सुरवातीला या दोन्ही अहवालांची खिल्ली उडविली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व कसलेले वकील कपिल सिब्बल यांनी तर तरंगलहरी वाटपात "झिरो लॉस" झाला, उलट त्यात फायदाच झाला अशी मखलाशी केली. तर दुसरे नामवंत वकील व केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पुढची पायरी गाठताना असे विधान केले की, "ज्या खाणवाटपामध्ये सरकारला नुकसान झाल्याचा आरोप होत आहे, त्या खाणीतला कोळसा अजून बाहेर काढलेलाच नाही. मग कोठे आहे तोटा?". अशी मखलाशी करून आपण स्वतःला व सरकारला हास्यास्पद बनवितो आहे हे या चाणाक्ष वकीलांच्या डोक्यातच आले नाही.
२-जी तरंगलहरींचे वाटप व कोळसा खाणींचे वाटप हे लिलाव पद्धतीने झाले असते तर सरकारला कित्येक लाख कोटी रूपयांचा महसूल मिळाला असता. लिलाव न करता मनमानी पद्धतीने उद्योगपतींना व हितसंबंधियांना वाटप केल्याने हे पैसे सरकारच्या तिजोरीत न येता उद्योजकांच्याच खिशात गेले व देशाला प्रचंड तोटा झाला.
सुदैवाने न्यायालयाने तरंगलहरी व खाणवाटपाचे परवाने रद्द करून त्यांचे वाटप लिलाव पद्धतीने करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मोदी सरकारच्या काळात २-जी तरंगलहरी व परवाने रद्द केलेल्या २१८ खाणींपैकी फक्त थोड्या खाणींचे वाटप लिलाव पद्धतीने केल्यावर तब्बल २ लाख कोटी रूपयाहून अधिक रकमेची बोली लागलेली. जेव्हा सर्व २१८ खाणी लिलाव पद्धतीने विकल्या जातील तेव्हा सरकारच्या तिजोरीत तब्बल १५ लाख कोटी रूपये इतका महसूल मिळण्याची शक्यता आहे.
मनमोहन सिंग सरकारने देशाचे नुकसान केले यात शंकाच नाही. ते स्वतः स्वच्छ असतील, परंतु त्यांच्याच अधिकाराने व त्यांच्यात अखत्यारीत देशाचे नुकसान झाले व ते शांतपणे नुकसान बघत राहिले असे दिसत आहे. देशाचे नुकसान थांबविण्याचे संपूर्ण आणि सर्वोच्च अधिकार हातात असताना गप्प बसून राहणे हा सुद्धा गुन्हाच आहे. स्वच्छ, अपघाताने राजकारणात आलेले, हाडाने राजकारणी नसलेले, सुसंस्कृत, मितभाषी, अर्थतज्ज्ञ इ. विशेषणांनी नटलेले मनमोहन सिंग न्यायालयासमोर आता स्वतःचा बचाव कसा करणार ते पहायचं.
पूर्वी एका लेखात मनमोहन सिंगांबद्दल एक यथार्थ वाक्य आले होते.
Manmohan Singh has been overestimated as an economist and, at the same time, he has been underestimated as a politician.प्रचंड घोटाळे उघडकीस येऊनसुद्धा ज्या तर्हेने मनमोहन सिंगांनी आपली खुर्ची १० वर्षे वाचविली त्यावरून वरील वाक्य सिद्ध होते. त्यांचे राजकीय गुरू नरसिंहराव यांनी याच तर्हेने आपली खुर्ची वाचविली होती. अत्यंत उपद्रवी व बेभरवशाचे असलेले सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी सातत्याने पाठपुरावा करून २-जी तरंगलहरी वाटपातील घोटाळा शोधून काढला. त्याचप्रमाणे भाजपचे महाराष्ट्रातील खासदार हंसराज अहीर यांनीदेखील सातत्याने पाठपुरावा करून कोळसा खाणवाटप घोटाळा शोधून काढला. याबद्दल हे दोघेही अभिनंदनास पात्र आहेत. "मी निश्चितच दुःखी आहे. पण हा जीवनाचाच एक भाग आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेचा मी आदर करतो आणि कायद्याच्या प्रक्रियेला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. निष्पक्ष चौकशीत सर्व पुराव्यांनिशी माझे निरपराधित्व सिद्ध होईल, अशी आशा आहे." अशी प्रतिक्रिया मनमोहन सिंगांनी दिली आहे. या प्रतिक्रियेवरून ते निश्चितच न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील असं दिसतंय. परंतु या खटल्यात काँग्रेसच्या इतर अनेकांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. तत्कालीन महालेखापाल विनोद राय यांनी आपल्या पुस्तकात "आपल्या अहवालात ठपका ठेवलेल्या युपीए सरकारमधील काही जणांची नावे वगळावीत" असा आपल्यावर दबाव येत होता असे स्पष्ट लिहिले आहे. मनमोहन सिंगांचे पूर्वीचे प्रसिद्धी प्रमुख संजय बारू यांनीही आपल्या पुस्तकात "तरंगलहरी व कोळसा खाण वाटपासाठी" पंतप्रधान कार्यालयावर कसा बाहेरुन दबाव येत होता याचीही सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे हा खटला सुरू होउ नये व मनमोहन सिंगांना न्यायालयात जावे लागू नये यासाठी काँग्रेस जीवापाड प्रयत्न करेल. काँग्रेसकडे चिदंबरम्, सिब्बल, खुर्शिद असे कसलेले वकील आहेत. मनमोहन सिंगांचे आरोपपत्रातील नाव वगळावे यासाठी सुरवातीला केंद्रीय गुप्तचर खात्याच्या विशेष न्यायालयाला विनंती करण्यात येईल. ती विनंती न्यायालयाने फेटाळली तर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातील. तिथेही विनंती मान्य नाही झाली तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. असे एकापाठोपाठ एक अर्ज करून काँग्रेस या खटल्याचा प्रारंभ जास्तीतजास्त लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरूच ठेवील. शेवटी काय होईल ते बघायचं. मात्र या निमित्ताने काँग्रेसचे भ्रष्टाचाराने काळेकुट्ट झालेले हात परत जनतेसमोर येत आहेत हेच महत्त्वाचं.
वाचने
29548
प्रतिक्रिया
127
मिसळपाव
प्रतिक्रिया
काँग्रेसच्या ३ पंतप्रधानांवर
+१००००००० अगदी असेच म्हणायचे
In reply to काँग्रेसच्या ३ पंतप्रधानांवर by मृत्युन्जय
३ पंतप्रधानांवर कॉर्टात जायची
In reply to काँग्रेसच्या ३ पंतप्रधानांवर by मृत्युन्जय
३ पंतप्रधानांवर कॉर्टात जायची वेळ आली यात आश्चर्य वाटण्यासारखे काहिच नाही. ते ६० पेक्षा जस्त वर्षे सत्तेवर आहेत. त्यामानाने ३ पंतप्रधान म्हणजे फारच कमी झाले.या प्रतिसादातल्या अतीअजब तर्कामध्ये भारत ६५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही विकसनशिल (म्हणजे साध्या मराठीत गरीब आणि स्पष्ट मराठीत अजून काही, पण असो) देश का राहिला आहे याचे गमक आहे. लोकशाहीत लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे सरकार मिळते या प्रवादाचे उत्तम उदाहरण !!! पंतप्रधानासारख्या देशाच्या सर्वोच्च्य कार्यकरी पदावरच्या व्यक्तीकडून ही अपेक्षा ठेवणार्या नागरिकांना अजून किती चांगले सरकार मिळू शकेल ???!!! कोणत्याही प्रगल्भ लोकशाहीत केवळ पंतप्रधान नव्हे तर कोणत्याही पक्षाच्या जबाबदार पदाधिकार्यावर कोर्टात खटला भरावा इतका स्पष्ट पुरावा मिळाल्यास त्या अधिकार्याला अथवा त्याच्या पक्षाला मते देणार्या नागरिकांनाच नाही तर त्या देशाच्या सर्व जनतेला ती गोष्ट लाजिरवाणी व अपमानास्पद वाटते. हम्म !या प्रतिसादातल्या अतीअजब
In reply to ३ पंतप्रधानांवर कॉर्टात जायची by डॉ सुहास म्हात्रे
मी कधीहि कोणत्याही एका
In reply to या प्रतिसादातल्या अतीअजब by मृत्युन्जय
लाख मोलाचा मुद्दा
In reply to मी कधीहि कोणत्याही एका by डॉ सुहास म्हात्रे
मी कधीहि कोणत्याही एका पक्षाच्या पायाशी माझे स्वत्व / निष्ठा वाहिलेली नाही. आंधळेपणाने कोण्या नेत्याशी/पक्षाशी बांधिलकी ठेवणे मझ्या बुद्धीला पटत नाही.+१आंधळेपणाने कोण्या नेत्याशी
In reply to मी कधीहि कोणत्याही एका by डॉ सुहास म्हात्रे
कोणत्याही प्रगल्भ लोकशाहीत
In reply to मी कधीहि कोणत्याही एका by डॉ सुहास म्हात्रे
बापरे, अजून इस्काटून संगायला
In reply to कोणत्याही प्रगल्भ लोकशाहीत by मृत्युन्जय
म्हणुन मी स्पष्ट प्रश्न विचारला होता की तुम्हाला भाजपला मत दिल्याबद्दल अपमानास्पद आणी लाजिरवाणे वाटते काय?हा प्रश्न गैरलागू आहे. तो तसा असण्याची अजून काही स्पष्ट कारणे आहेत, ते अशी... १. मी भाजपला मत दिले हा शोध तुम्हाला कुठून लागला ? भारतिय लोकशाहीत गुप्त मतदान पद्धत आस्तित्वात आहे. त्यामुळे कोणी कोणाला मत दिले हे सांगण्याचा आग्रह करणे अवैध आहे. तशातही कोणी तसा आग्रह केलाच तर त्याचे उत्तर न देण्याचा हक्क मी नेहमीच राखून ठेवतो. त्यामुळे तुमच्या या दाव्याचे :) आले. असो. २. मुख्य म्हणजे मी माझे मत कोणाल दिले ते जाहीर केले नाही, तर माझ्यावर रागवेल अथवा ज्याची मला भिती वाटेल अशी कोणतीही व्यक्ती आस्तित्वात नाही. याचे कारण मी अगोदरच स्पष्टपणे लिहीले आहे...मी कधीहि कोणत्याही एका पक्षाच्या पायाशी माझे स्वत्व / निष्ठा वाहिलेली नाही. आंधळेपणाने कोण्या नेत्याशी/पक्षाशी बांधिलकी ठेवणे माझ्या बुद्धीला पटत नाही. दोषी व्यक्ती कोणत्याही पक्षाची असली तरी ती दोषीच असते. माझे मत मी दर निवडणूकीच्या वेळेस माझ्या समजूतीने देशाला जास्तीत जास्त चांगला ठरू शकेल अश्या उमेदवाराला आणि पक्षाला देतो.३. पक्ष येतील, पक्ष जातील. नेते येतील, नेते जातील. भारत देश ताठ मानेने पुढे जात राहणे हे आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचे. हे मात्र माझे स्पष्ट आणि व्यक्त मत आहे. ====== असो. यापलिकडे जास्त वाद केल्यास तो वितंडवादाकडे झुकेल आणि "फायदा-व्यय गुणोत्तर" खूपच प्रतिकूल होईल. तेव्हा या विषयावरचा संवाद इथेच थांबवूया. तुम्हाला तुमची मते बनवण्याचा आणि मांडण्याचा अधिकार आहे याचे मला भान आहेच.किंचित फरक...
In reply to कोणत्याही प्रगल्भ लोकशाहीत by मृत्युन्जय
>>> मी आपले वरील विधान परत
In reply to कोणत्याही प्रगल्भ लोकशाहीत by मृत्युन्जय
मृत्युन्जय
या लेखास अनुशंगून मला काही
तुमचा गैरसमज झालेला असावा. मी
In reply to या लेखास अनुशंगून मला काही by हाडक्या
मी आधीच स्पष्ट केले आहे की,
In reply to तुमचा गैरसमज झालेला असावा. मी by श्रीगुरुजी
भुसंपादन विधेयक
In reply to मी आधीच स्पष्ट केले आहे की, by हाडक्या
भूसंपादन विधेयक किंवा शेती
In reply to भुसंपादन विधेयक by कपिलमुनी
>>> मग गैरसमज कशा अर्थाने
In reply to मी आधीच स्पष्ट केले आहे की, by हाडक्या
वरील प्रतिसादातील "सध्या
In reply to >>> मग गैरसमज कशा अर्थाने by श्रीगुरुजी
गुरुजी मी निरिक्षणातून दिसून
In reply to >>> मग गैरसमज कशा अर्थाने by श्रीगुरुजी
वैचारीक मर्यादा आहे
In reply to तुमचा गैरसमज झालेला असावा. मी by श्रीगुरुजी
वैचारीक मर्यादा
In reply to वैचारीक मर्यादा आहे by विकास
खुलासा
In reply to वैचारीक मर्यादा by हाडक्या
पहीली गोष्ट म्हणजे मी हे
In reply to खुलासा by विकास
योग्य मुद्दा.
In reply to या लेखास अनुशंगून मला काही by हाडक्या
एखादा कुठल्या तरी पक्षाचा,
In reply to या लेखास अनुशंगून मला काही by हाडक्या
अमोल इथे इतके आयडी मोदी
In reply to हा प्रतिसाद अगोदरच दिला आहे. by पिंपातला उंदीर
चांगल्याला चांगले
In reply to अमोल इथे इतके आयडी मोदी by मृत्युन्जय
मोदी किंवा भाजप विरुध्द मी
In reply to अमोल इथे इतके आयडी मोदी by मृत्युन्जय
पिंपातला उंदीर,
In reply to मोदी किंवा भाजप विरुध्द मी by पिंपातला उंदीर
२जी स्पेक्ट्रम ची सुरुवात
बरोबर
In reply to २जी स्पेक्ट्रम ची सुरुवात by विजुभाऊ
२-जी तरंगलहरींचे वाटप नक्की
In reply to २जी स्पेक्ट्रम ची सुरुवात by विजुभाऊ
आपल्याला माहीत नाही
In reply to २-जी तरंगलहरींचे वाटप नक्की by श्रीगुरुजी
लिंक वाचली. हे प्रकरण आणि
In reply to आपल्याला माहीत नाही by खंडेराव
निकालाचे काही माहित
In reply to लिंक वाचली. हे प्रकरण आणि by श्रीगुरुजी
पूर्वीही हा काथ्या कुटला होता
या लेखातल्या प्रकरणाची
न्यायालयाची पायरी चढावी लागणारे मनमोहन सिंग हे तिसरे पंतप्रधान. हे तीनही पंतप्रधान काँग्रेसचे आहेत यात काहीच आश्चर्य नाही.हा शेरा आणि इतर छुपे हल्ले करण्याचा मोह टाळला असता तर ह्या लेखाची उंची वेगळी असती आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे लेखातल्या मुख्य मुद्द्यांना योग्य तो न्याय मिळाला असता ! असे अवांतराला स्वतःच आमंत्रण देण्याची परिणती स्वतःच स्वतःच्या मुद्द्यांची किंमत कमी करण्यात होते ! बाकी या प्रकरणामध्ये भारतीय राजकारणावर दूरगामी प्रभाव पाडण्याची ताकद असल्याने, त्याच्याकडे बारकाईने लक्ष जाणारच. दोन्ही बाजूंच्या पाठीराख्यांच्या आणि/किंवा निष्पक्ष जाणकारांच्या "मुद्देसूद व वैध भाषेतल्या" प्रतिसादांची प्रतीक्षा आहे.+१
In reply to या लेखातल्या प्रकरणाची by डॉ सुहास म्हात्रे
शेवटी काय होईल ते बघायचं.
प्रचारकी लेखच आहे.
?
In reply to प्रचारकी लेखच आहे. by hitesh
ह्या तर चोराच्या उलट्या बोंबाच ,
काँग्रेसला इतका काळा पैसा
.
In reply to काँग्रेसला इतका काळा पैसा by डँबिस००७
काय?
In reply to . by hitesh
हायला !
In reply to . by hitesh
स्पेक्ट्रम स्वस्तात वाटले तेंव्हा त्याचा मोबदला म्हणुन जनतेला कॉल रेटही कमी होते ना ?खरे आहे हो तुमचे ! एखादा चोर एखाद्या संपन्न घरात चोरी करतो तेव्हा समाजातील दरिद्री घरांची संख्या एकने कमी होत असते ! पोलिस उगाचच त्याच्या मागे लागतात वास्तविक अर्थिक विषमता कमी करण्यास हातभार लावला म्हणून आपण त्यांचा सत्कारच करायला हवा.वाटले होतेच असे दरिद्री युक्तिवाद होतील.
In reply to हायला ! by विटेकर
कधी कधी काही लोक वाद करताना
In reply to . by hitesh
....Sahamat lspik Ekkaa...!!
In reply to कधी कधी काही लोक वाद करताना by डॉ सुहास म्हात्रे
कोळसा खाणवाटप
जर निबिदा मागवण्यात आल्या
In reply to कोळसा खाणवाटप by सुधीर
माझा प्रश्न
In reply to जर निबिदा मागवण्यात आल्या by मृत्युन्जय
लोकसत्तेतल्या लेखावर इथे थोडी
In reply to कोळसा खाणवाटप by सुधीर
तुमची लिंक गंडली का हो?
In reply to लोकसत्तेतल्या लेखावर इथे थोडी by अनुप ढेरे
वरची लिंक बरोबर आहे. ऋषिकेश
In reply to तुमची लिंक गंडली का हो? by सुधीर
धन्यवाद
In reply to वरची लिंक बरोबर आहे. ऋषिकेश by सव्यसाची
ऑक्शन चा प्रकार कोणता असावा
In reply to धन्यवाद by सुधीर
विचारायचे कारण
In reply to ऑक्शन चा प्रकार कोणता असावा by सव्यसाची
तुम्ही म्हणता आहात तसे रिवर्स
In reply to विचारायचे कारण by सुधीर
सव्यासाची साहेब
In reply to तुम्ही म्हणता आहात तसे रिवर्स by सव्यसाची
अपेक्षित
In reply to सव्यासाची साहेब by सुधीर
अंतिम उपयोग (end use) हा निकश
In reply to अपेक्षित by सुधीर
कुबेर
In reply to अंतिम उपयोग (end use) हा निकश by सव्यसाची
"समजा एखाद्या कंपनीने घरगुती वापरासाठी खाण परवाना मिळवून स्वस्तात कोळसा काढला आणि नंतर तो वीज वा अन्य कंपन्यांना महागात विकला तर त्यास सरकार कसे रोखणार? तोही भ्रष्टाचारच." - कुबेरसुरुवातीला दिलेला कुबेरांचा लेख वाचलात तर त्यात मुख्य आक्षेप (वर म्हटल्याप्रमाणे) कोळशाच्या वापरावरून किंमत ठरविण्यावर होता. कोळशाच्या किंमती बाजाराभावाने ठरवल्या जाव्यात. कोळसा कशासाठी वापरला जाणार आहे यावरून त्या ठरविल्या जावू नयेत असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचा हा मुद्दा चुकीचा आहे असे मला वाटत नाही. पण ज्या बोली खूप कमी भावाला गेल्या त्यांचा पुन्हा लिलाव होण्याची शक्यता आहे या बातमीवरून असं वाटत नाही की कोळशाच्या किंमती कोळशाच्या वापरावरून ठरविल्या जात असाव्यात. एवढेच मला म्हणायचे आहे. पण अर्थात पॉलिसी नेमकं काय म्हणते हे मला माहीत नाही.सेटींग
In reply to कुबेर by सुधीर
कुबेरांच्या मुद्द्यात तथ्य आहे असे दिसते
In reply to सेटींग by विकास
छान चर्चा.
In reply to कुबेरांच्या मुद्द्यात तथ्य आहे असे दिसते by सुधीर
नव्या भ्रष्टाचाराची नांदी असं
In reply to तुमची लिंक गंडली का हो? by सुधीर
गल्ली क्रमांक चुकला आहे :)
In reply to लोकसत्तेतल्या लेखावर इथे थोडी by अनुप ढेरे
कोळश्याच्या प्रतवारी
In reply to कोळसा खाणवाटप by सुधीर
+१ ..
In reply to कोळश्याच्या प्रतवारी by श्रीगुरुजी
देशाला स्वातंत्र मिळुन ६५
खड्डे खणायच काम
In reply to देशाला स्वातंत्र मिळुन ६५ by डँबिस००७
मनरेगा अंर्तगत नाला बंडिंग ,
भ्रष्टाचार
In reply to मनरेगा अंर्तगत नाला बंडिंग , by प्रसाद१९७१
असे कसे ?
In reply to भ्रष्टाचार by कपिलमुनी
परफेक्ट..
In reply to भ्रष्टाचार by कपिलमुनी
ते काँग्रेसच्या दुर्दशेचे
In reply to भ्रष्टाचार by कपिलमुनी
>>> ते काँग्रेसच्या दुर्दशेचे
In reply to भ्रष्टाचार by कपिलमुनी
सहमतीसाठी धन्यवाद !
In reply to >>> ते काँग्रेसच्या दुर्दशेचे by श्रीगुरुजी
सध्या हाय वे रस्ता बांधणी ११
काँग्रेसची देणगी १५ लाख कोटी रूपयेची दिवाळखोरी,
इतर प्रतिसाद चांगला मांडलाय
In reply to काँग्रेसची देणगी १५ लाख कोटी रूपयेची दिवाळखोरी, by डँबिस००७
कालाय तस्मै नमः
In reply to इतर प्रतिसाद चांगला मांडलाय by हाडक्या
सर्वांचेच हात काळे
एकदा बांधून वापरायला सुरूवात
सवय
In reply to एकदा बांधून वापरायला सुरूवात by श्रीगुरुजी
या प्रश्नाला दोन्ही बाजू आहेत
In reply to सवय by कपिलमुनी
अन्याय
In reply to या प्रश्नाला दोन्ही बाजू आहेत by श्रीगुरुजी
माझे मत
In reply to अन्याय by कपिलमुनी
>>> जत त्या रहिवाशाला माहित
In reply to अन्याय by कपिलमुनी
सहमत
In reply to >>> जत त्या रहिवाशाला माहित by श्रीगुरुजी
श्रीगुर्जी
In reply to या प्रश्नाला दोन्ही बाजू आहेत by श्रीगुरुजी
....Atta aale Valanavarche Pani Valanavar..????
In reply to श्रीगुर्जी by hitesh
हितेशभौ, तुम्ही
In reply to श्रीगुर्जी by hitesh
अरे वा!
In reply to श्रीगुर्जी by hitesh
शंका श्रीगुर्जीना विचारली होती.
In reply to अरे वा! by विकास
तस नाही
In reply to शंका श्रीगुर्जीना विचारली होती. by hitesh
नस्त्या मारामार्या नकोत.
In reply to शंका श्रीगुर्जीना विचारली होती. by hitesh
नस्त्या मारामार्या नकोत.नस्त्या मारामार्या सोडून दुसरे काही करण्याचा प्रयत्नही न करणार्या आयडीचा हा प्रतिसाद पाहून ड्वाळे पाणाव्ले... नाय, नाय, घळ्घळा व्हावू लाग्ले =)) +D =))हितेसचाचा
In reply to शंका श्रीगुर्जीना विचारली होती. by hitesh
प्रश्नाची बाजू
In reply to सवय by कपिलमुनी
सहमत
In reply to प्रश्नाची बाजू by आजानुकर्ण
विलासराव ठाकरे
In reply to प्रश्नाची बाजू by आजानुकर्ण
त्या इमारतीत २५-३० वर्षे
In reply to एकदा बांधून वापरायला सुरूवात by श्रीगुरुजी
मनरेगा योजना
सर्वांचेच हात काळे अस म्हणण चुकीच आहे
त्या साठीच
In reply to सर्वांचेच हात काळे अस म्हणण चुकीच आहे by डँबिस००७
गुरुजी ,
चांगली सूचना आहे. विचार
In reply to गुरुजी , by प्रसाद गोडबोले
कपिल मुनी,
आपली तोंडच काळी
In reply to कपिल मुनी, by डँबिस००७
एकाने चुक केली तर दुसर्
शक्य नाही
In reply to एकाने चुक केली तर दुसर् by जानु
रजिष्ट्रेशन करतांना तर मनपाचे
नाही समजत
In reply to रजिष्ट्रेशन करतांना तर मनपाचे by जानु
नवीन माहिती मिळाली
In reply to नाही समजत by आजानुकर्ण
बॅक टू कोळसा प्लीज
हा घ्या
In reply to बॅक टू कोळसा प्लीज by सतीश कुडतरकर
आंगठ्याच्या बाजूचे बोट
In reply to हा घ्या by विकास
असे का?
कोळसा खाण वाटप लिलाव आणि २-जी
In reply to असे का? by हुप्प्या
जाने दो भाईयों !
बाकी हुप्प्या यांशी सहमत हा
मी स्वतः कट्टर काँग्रेसविरोधी
+१
In reply to मी स्वतः कट्टर काँग्रेसविरोधी by कॅप्टन जॅक स्पॅरो
असंगाशी संग प्राणाशी गाठ.
In reply to +१ by विकास
वरील लेखात असे लिहिले होते.