मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ८: " चतुष्पाद प्राणी"

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ८: "चतुष्पाद प्राणी" *************************************************************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता **************************************************************************************** नमस्कार मंडळी! छायाचित्रणाच्या स्पर्धांना सदस्यांचा भरभरुन प्रतिसाद लाभत आहे त्याबद्दल सर्व मिपाकरांना धन्यवाद. यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "चतुष्पाद प्राणी". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे. येथे फक्त चतुष्पाद प्राण्यांची छायाचित्रे अपेक्षित असून पक्षी, किटक, सरिसृप आदी इतर वर्गातील छायाचित्रे गृहित धरली जाणार नाहीत. प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेसाठी अशी एकच प्रवेशिका देता येईल. मात्र "स्पर्धेसाठी नाही" असे विषद करुन सदस्य एकापेक्षा अधिक छायाचित्रेही टाकू शकतील. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १९ मार्च २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम नेहमीप्रमाणेच राहतील. सर्वच स्पर्धकांना आणि सहभागी मंडळींना शुभेच्छा! *************************************************************************** मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?

वाचने 78039 वाचनखूण प्रतिक्रिया 167

कॅप्टन जॅक स्पॅरो 04/03/2015 - 09:27
मी काही चांगला फोटोग्राफर नाही. उगीच आपल पॉइंट आणि शुट एवढचं जमतं फक्त. तरी घ्या गोड मानुन ही प्रवेशिका...!! एकुण पाय १२. =)) a शिर्षकः आळशी माऊज!!!

मुक्त विहारि 04/03/2015 - 10:21
नेपाळच्या ट्रिपला गेलो असतांना, पशुपतीनाथ मंदीरात, एका बोकडाचा पशू-बळी देण्या पुर्वीचा फोटो. . =========== कुत्र्यांचे आणि माझे पुर्वजन्मीपासूनच फार घनिष्ठ संबंध.एक-मेकांना अजिबात चावायचे नाही, ह्या एकमेव अटींवर आमचे हे संबंध आहेत.मी कुठेही गेलो तरी कुत्री माझ्या बरोबर मैत्री करतात.नेपाळमधली कुत्रीपण त्याला अपवाद कशाला करतील? . ============================== डिस्क्लेमर : संपादक मंडळाने कुठलाही फोटो निवडावा. हमकू भाग लेनेमे इंटरेस्ट हय.बक्षीसमे नही हय.

In reply to by पियुशा

श्रीरंग_जोशी 13/03/2015 - 18:10
दोन कारणे असू शकतात
  1. जो फोटो इथे प्रकाशित करायचा आहे तो पब्लिक (अ‍ॅक्सेसिबल) केलेला नाही.
  2. जो दुवा वापरलाय तो चुकीचा आहे.
फ्लिकरवरून चित्राचा दुवा घेताना तो अ‍ॅड्रेस बार मधून कॉपी करू नये. फ्लिकरमध्ये ते चित्र ओपन केले असता चित्राखाली उजव्या कोपर्‍यात तीन चिन्हे असतात. त्यापैकी मधले चित्र उजवीकडे दिशा दाखवणारा बाण आहे. त्यावर क्लिक करावे. एक छोटासा पॉप अप बॉक्स ओपन होतो. त्याचे शीर्षक असते Share. चित्र शेअर करण्याचे विविध पर्याय त्यात असतात. त्यापैकी Link हा पर्याय निवडावा. त्याखालील टेक्स्टबॉक्समध्ये जी लिंक दिसेल ती इथे मिपावर फोटो प्रकाशीत करण्यासाठी वापरावी.

In reply to by पियुशा

पियुशा 18/03/2015 - 12:56
https://flic.kr/p/coMr9C कुनितरि मदत करा सम्पद्कानो हि लिन्क आहे

In reply to by पैसा

पियुशा 18/03/2015 - 14:30
दिला ना ग प्रा. चा पब्लिक केला तरी होत नाहिय मायाकडुन

In reply to by पियुशा

पैसा 18/03/2015 - 14:39
अजून अ‍ॅक्सेस रिस्ट्रिक्टेड असंच येतंय, त्यामुळे मला पण डाऊनलोड करता येत नाहीये. तुझ्या पीसीवर फोटोची फाईल असेल ती मला जीमेलवर अटॅच करून पाठव बघू.

मेघनाद 04/03/2015 - 11:36
Monkey and Dog ह्या छायाचित्रात माकड त्याचा खाण्यावरचा हक्क गाजवताना दिसतय...बिचारया कुत्र्याच्या पिल्लाला काही मिळेल असे वाटत नाही. आयत्यावेळी उपलब्ध असलेल्या साध्या मोबाईल वरून क्लिक केलेले छायाचित्र आहे....त्यामुळे दर्जा फारसा चांगला नाही. मापदंडात बसत असल्यास प्रवेशिका स्वीकारावी.

अबोली२१५ 04/03/2015 - 12:08
चतुष्पाद प्राणी मला फोटो काढण्याची आवड खूप पूर्वी पासून होती पण माझ्याकडे चांगला कॅमेरा नाही होता. हा फोटो खूप जुना आहे. कृपया करून करून तुम्ही हा फोटो स्पर्धेसाठी गृहीत धरावा.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

क्रेझी 04/03/2015 - 14:24
फारच गोड फोटो आलाय हा :D क्युट आहे मांजरीचं पिल्लू अगदी उचलून जवळ घ्यावंसं वाटलं बघताक्षणी :D

प्रचेतस 04/03/2015 - 14:12
राजमाचीच्या भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात बसून गप्पा हाणत बसलो होतो तेव्हा हे दृश्य मिळाले. a

मोहनराव 04/03/2015 - 14:56
गोव्याला मित्रांबरोबर फिरायला गेलो होतो. तेव्हा हे गोड वासरु रस्त्यातुन जाताना दिसले. vaasaru

डॉ सुहास म्हात्रे 04/03/2015 - 16:20
आमची सोनी... स्पर्धेसाठी...  . हे स्पर्धेसाठी नाही...

सौरभ उप्स 04/03/2015 - 17:15
a कोकणात जेवण झाल्यावर निवांत बसलेला हा पठ्ठ्या कितीवेळ हलतच नव्हता... कदाचित माझाही एक फोटो काढ अस त्यास सांगावयाचे असावे....

In reply to by सौरभ उप्स

सविता००१ 05/03/2015 - 16:18
काढ ना रे माझा पण एक फोटो.. असं म्हणतायत त्याचे डोळे. झक्कास फोटो

In reply to by भुमन्यु

क्रेझी 05/03/2015 - 08:25
बापरे! अस्वल! कित्येक वर्षात बघितलं नाही. लहानपणी काही लोक अस्वलाचे खेळ दाखवायला येत त्यानंतर आजच बघितलं. कुठे काढला आहे हा फोटो?

सविता००१ 05/03/2015 - 10:56
विशालदा, ये हुई ना बात.. मस्त. काय दिसतोय...

In reply to by मिनियन

पैसा 18/03/2015 - 16:11
सरडा पण छान आहे. आणखी एकाने बेडूक दिला आहे, मग सरडा का नको? चतुष्पाद प्राणी म्हटलंय ना, पृष्ठवंशीय नाही म्हटलेले! ;)

वेल्लाभट 05/03/2015 - 22:57
जरा विसावू या वळणावर a कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एचएस एफ ४ १/८०० ११ एम एम आयएसओ २००