गर्तेत जाणारे जागतिक अर्थकारण : अशक्तांबरोबर सशक्तांचाही कपाळमोक्ष अटळ आहे
लेखनप्रकार
जगाची अर्थिक विभागणी
हे जग अर्थिक दृष्ट्या सर्वसाधारणपणे "आर्थिकदृष्ट्या सबळ आणि देणेकरी उर्फ सधन पुढारलेले देश आणि म्हणुनच दादा देश" आणि "आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि घेणेकरी उर्फ विकसनशील / अविकसित देश आणि म्हणूनच दादा देशांवर कमीजास्त प्रमाणात अवलंबून असलेले देश" असे विभागलेले गेलेले आहे.
अर्थकारणाचे राजकारण आणि राष्ट्रिय कर्जे
जगातल्या सर्व देशातल्या सर्व जनतेला आपली आर्थिक स्थिती उत्तरोत्तर वर वर जावी असे वाटते... विकसित / अविकसित देशांच्या जनतेत याबाबत तत्वतः फरक नाही. म्हणजे, विकसनशील देशांमध्ये जनतेची आर्थिक स्थिती सुधारणे ही मूलभूत गरज असली तरी विकसित देशांमध्येही सुधारलेल्या स्थितीत दर वर्षी अजून सुधारणा व्हावी असेच तेथिल जनतेला वाटते.
या मागणीच्या पूर्ततेसाठी अर्थसहाय्य उभे करणे विकसनशील देशांना शक्य नसते आणि त्यासाठी त्यांना कर्ज घेण्यापलिकडे पर्याय नसतो. ज्यांना पैशाची खरेच खूप गरज आहे त्या अविकसित देशांना पैसे (कर्ज, मदत, इ) अत्यंत जाचक अटींवर आणि पाहिजे त्यापेक्षा कमी प्रमाणात मिळतात. याचे सांगितले जाणारे मुख्य कारण म्हणजे त्या देशांची परतफेडीची ताकद संशयास्पद अथवा कमी असते.
दर वर्षी वाढत जाणारा सरकारी खर्च एका विवक्षित स्तरापलिकडे गेल्यावर विकसित देशांनाही कर्ज घेतल्याशिवाय जनतेला खूष ठेवणे शक्य होत नाही. विकसित देशांच्या सरकारी कर्जाचे मुख्य कारण असे की, मनुष्याच्या सहज स्वभावाप्रमाणे जनतेत सतत वाढत जाणारी पैशाची हाव आवरण्यासाठी "अगोदरच बर्यापैकी पुरेसे असलेले अंथरूण पाहून पाय पसरा" असे सांगण्याचा सारासारविवेकी मार्ग चोखाळण्याऐवजी, ती हाव "विकसित राष्ट्र या शिक्क्यामुळे सहज आणि सुलभ अटींवर मिळणारे राष्ट्रीय कर्ज काढून भागवण्याची" खेळी खेळण्याचा सोपा मार्ग राजकारणी नेत्यांना आकर्षक वाटतो.
यामुळेच, बरेच अर्थतज्ञ, जर्मनीसारखे काही सन्माननिय अपवाद वगळता, विकसित देशांतिल सुबत्तेला, "ऋण काढून केलेला सण (borrowed prosperity)" असे म्हणतात.
आतापर्यंत विकसित असल्याचा शिक्का असलेल्या देशांना अपरिमित पैसा फार सोप्या अटींवर मिळत गेला आहे. मग हे कर्ज किती घ्यावे याला घरबंध राहिला नाही यात तसे आश्चर्य नाही म्हणा... कारण लोकशाहीत नेते सहसा त्यांच्या निवडून आलेल्या मुदतिच्या (४ ते ५ वर्षे) पलिकडे पहायच्या भानगडीत फार क्वचित पाहतात. कारण, त्यांनी घेतलेली राष्ट्रिय कर्जे त्यांना त्यांच्या मुदतित राजकिय परतावा (श्रेय) देतात. पण ती कर्जे व्याजासकट परत करण्याची जबाबदारी त्यांच्या नंतर निवडून आलेल्या नेत्यांवर पडते. याचा परिणाम असा झाला आहे की आता बरेचसे तथाकथीत विकसित देशही अवजड राष्ट्रिय कर्जांखाली चिरडले जात आहेत.
राष्ट्रिय कर्जफेड आणि दिवाळे वाजणे
अविकसित देशाला परतफेडीचा हप्ता देता आला नाही तर देश दिवाळखोर होतो आणि त्याला अधिक कर्ज मिळणे दुरापास्त होते. अश्या अवस्थेत कर्ज मिळालेच तर त्याच्या अटी पूर्वीपेक्षा जाचक असतात. अश्या देशाला केवळ आर्थिकच नाही तर राजकिय आणि सामाजिक परिणामही भोगायला जातात. त्या देशाच्या चलनाचे अवमुल्यन होते, उद्योगधंद्यांना वाईट दिवस येतात, लोकांवर बेकारीची कुर्हाड कोसळते, उत्पन्न बंद / कमी झाल्याने किंवा अगदी तितकेच राहिले तरीही (चलनाच्या कमी झालेल्या किंमतीमुळे) झालेल्या महागाईमुळे जिवन कठीण होते. मग यातून लोकक्षोभ उसळून सामाजिक-राजकिय अस्थैर्य माजते. या अवस्थेत अविकसित देशांत उलथापालथ होऊन राजसत्ता बदलते... कधी वैध मार्गांनी तर बर्याचदा हिंसेच्या रुपात पुरेपूर किंमत मोजून.
तथाकथित विकसित असलेल्या पण "ऋण काढून केलेला सण (borrowed prosperity)" या रोगाने ग्रस्त असलेल्या देशालाही डोईजड कर्ज घेत राहिल्याने काही काळाने त्याच्या परतफेडीचा हप्ता देणे अशक्य होते. त्याचे कर्ज इतके मोठे होते की त्याला मूळ मुद्दलाचा हप्ता तर सोडाच पण कर्जावरचे वार्षिक व्याज देणेही कठीण होते. अश्या देशाला त्याचा एखादा "दादा" देश वाचवायला पुढे येतो आणि स्वतःचे आर्थिक / राजकिय वजन वापरून त्या देशाला बुडण्यापासून वाचवतो. या प्रकाराचे उत्तम उदाहरण म्हणजे युरोसमुहाने आणि विषेशतः जर्मनीने आतापर्यंत मुख्यतः ग्रीसची आणि काही प्रमाणात आयर्लंड, स्पेन, पोर्तुगाल आणि इटलीची केलेली पाठराखण.
आर्थिक नाड्या आवळणे उर्फ ऑस्टेरिटी
आर्थिक दुरावस्थेत सापडलेल्या तथाकथीत विकसित देशाचे पितळ उघडे पडले (दिवाळे वाजल्याचे उघड झाले) की मग त्याला कर्ज देताना स्वतःच्या पदराला किती खार लावायचा यासाठी देणेदारांना (उदा जर्मनीला) काही सीमा पाळाव्या लागतात... कारण याकरिता वापरलेला पैसा जर्मनीच्या नागरिकांनी इतर युरोपिय देशांच्या नागरिकांपेक्षा (मनःपूर्वक केलेले कष्ट, आठवड्याचे कामाचे तास आणि निवृत्तीचे वाढीव वय या परिमाणांवर) केलेल्या जास्त कष्टांमुळे कमावलेला पैसा आहे. सहाजिकच, कर्जाऊ दिलेला पैसा आपल्या नागरिकांना परत मिळावा यासाठी कर्जाच्या अटी दिवसेदिवस कडक होऊ लागल्या आहेत.
या अटीच्या मागचा मुख्य उद्देश कर्जदार देशाची अर्थव्यवस्था सुधारून कर्ज परतीची शक्यता निर्माण व्हावी हा असतो. ह्याला "बॅलन्सिंग द बजेट" असे म्हणतात. हे तत्वतः आपल्या घराच्या बजेटसारखेच असते... घराच्या कठीण आर्थिक काळात आपण अनावश्यक खर्च कमी करतो आणि शक्य त्या उपायांनी उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करतो. हे साधारणपणे दोन प्रकारच्या कारवायांनी केले जाते :
१. सरकारी खर्च कमी करणे : यामुळे नागरिकांना खूष करण्यासाठी केले जाणार्या अनेक सरकारी खर्चांना चांगलीच कात्री लावावी लागते... पर्यायाने अनावश्यक नोकर्या जातात, अनेक प्रकारची अनुदाने (सबसिड्या) बंद होतात, कामाचे दिवस/तास वाढतात, लोकांचे उत्पन्न कमी झाल्याने मागणी कमी होते आणि पुरवठादार उद्योगधंद्यांत मंदी येते. जर जगभर मंदीचे वातावरण असले (जसे आता आहे) तर उद्योगधंद्यांचे निर्यातीव्दारा उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्नही तितकेसे उपयोगी होत नाहीत.
२. सरकारी उत्पन्न वाढवणे : हे करण्यासाठी आधिपासून असलेले कर कसोशीने वसूल करावे लागतात आणि / किंवा करवाढ करावी लागते.
वरच्या दोन्ही कारवायांमुळे जनतेचे कष्ट वाढतात. अर्थातच जनक्षोभाचा उद्रेक होतो.
अश्या वेळेस कर्ज घ्यावे तर कर्जदारांच्या अधिक अटी स्विकाराव्या लागतात आणि कर्ज न घ्यावे तर देश बुडीत जातो... थोडक्यात "धरले तर चावते आणि सोडले तर पळते" अशी अवस्था येते.
सद्या अनेक युरोपिय (आणि इतर) देश या अवस्थेच्या आहेत... ग्रीस सर्वात पुढे आहे तर आयर्लंड, पोर्तुगाल, स्पेन, इटली, इ रांगेत आहेत.
जागतिक राजकारण आणि अर्थकारणाचे नविन कंगोरे
१. कर्जाच्या ओझ्याखाली ($१८ ट्रिलियन डॉलर सरकारी कर्ज + $१४ ट्रिलियन डॉलर नागरिकांचे खाजगी कर्ज + उद्योगधंद्यांचे अजून खात्रीने न मोजलेले कर्ज) दबलेल्या अमेरिकेचे काय होणार आणि स्वतःच्या समस्येचे उत्तर शोधताना अमेरिका कोणत्या आर्थिक-राजकिय-सामरिक क्लूप्त्या वापरेल इकडे जगाचे (डोके घट्ट धरून) लक्ष आहे.
२. युरोझोनच्या समस्या आता नविन राहिल्या नाहीत. पण जर ग्रीस जर खरोखरच युरोझोनच्या बाहेर पडला तर त्याच्या मागच्या रांगेत असलेल्या देशांची अवस्था अधिक कठीण होईल आणि युरोपची समस्या अधिकच जागतिक होईल.
३. सर्वसाधारण आर्थिक मंदी कमी होती की काय म्हणून सद्या खनीज तेलाच्या किंमतीचे युद्ध छेडले गेले आहे. त्याचा उहापोह मी माझ्या त्या विषयावरील धाग्याच्या प्रतिसादांत केला आहे (तेलाच्या किंमती फार काळ खाली राहिल्या तर होणारे आर्थिक-राजकिय परिणाम आणि कॅनडाचे सद्या चाललेल्या तेलाच्या अर्थ-राज-कारणातले स्थान) त्यामुळे येथे त्यांची पुनरवृत्ती टाळत आहे.
४. पण आर्थिक दृष्ट्या खरोखरच अत्यंत सबळ असलेल्या देशांनाही आश्चर्यकारकरित्या कसे धक्के बसत आहेत हे अधोरेखित करण्यासाठी स्विट्झर्लंडचे उदाहरण मोठे चपखल होईल... २००८ च्या जागतिक आर्थिक भूकंपाने सुरुवात झालेल्या उलथापालथींचा एक नविन अध्याय सद्या युरोपमध्ये चालू आहे.
जागतीक मंदीच्या काळात स्वित्झर्लंडचे स्विस फ्रँक (CHF) हे चलन सबळ राहिले आणि ते युरोच्या तुलनेने वर जात राहिले. महाग CHF चा परिणाम स्विस निर्यात महाग होण्यात होतो. तो परिणाम कमी करण्यासाठी गेले तीन एक वर्षे स्विस नॅशनल बँक (SNB) चलनबाजारात हस्तक्षेप करून CHF चा दर १.२ युरो इतका खाली ठेवत होती. एका युरोला त्याच्या किंमतीपेक्षा जास्त किंमत देऊन बाजारात खरेदी करून असे केले जात होते. यात जरी बँकेचे नुकसान होत असले तरी CHF कृत्रीमरित्या निर्बल ठेवल्याने निर्यातिवरचा दुष्परिणाम कमी करण्यात बँकेला यश येत होते आणि देशाच्या उद्योगांचा बचाव होत होता.
मात्र आता सतत पडत्या युरोच्या तुलनेने CHF ची किंमत कमी ठेवणे SNB ला इतके महाग झाले आहे की तिने गेल्या गुरुवारपासून जास्त किंमत देऊन युरो खरेदी करणे बंद केले आहे आणि CHF ला मुक्तपणे खरेदी-विक्रीचे चलन "फ्री फ्लोटिंग करन्सी" जाहीर केले आहे. याचा परिणाम असा झाला की युरोच्या तुलनेने CHF त्वरीत ३० टक्के महाग झाला आणि सद्या तो १ CHF = १ युरो (अश्या १५% जास्त) किंमतीवर स्थिरावला आहे. याचा मोठा फटका निर्यातिवर अवलंबून असलेल्या मोठमोठ्या स्विस कंपन्यांना बसला आहे आणि त्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली आहे.
स्वित्झर्लंड इतका वेळ आर्थिकदृष्ट्या तुलनेने सुरक्षित जागी बसून होता. इतकेच नव्हे तर जागतिक अर्थकारणामधला बराचसा पैसा सबळ CHF मध्ये संक्रमित झाल्याने स्विस बँका व अर्थव्यवस्था सबळ झाली होती. अश्या स्वित्झर्लंडची हालत त्याच अर्थकारणाच्या दूरगामी फटक्याने (रिपल् इफेक्ट) आज खराब झाली आहे !
या परिस्थितीला तोंड देण्यासाठी SNB ने वापरलेला खास उपाय :
SNB ने तिचा शुन्यावर असलेला मूलभूत व्याजदर * (की इंटरेस्ट रेट) -०.७५ (उणे पाऊण टक्के) इतका खाली आणला आहे !
आता बोला !
* (तुलनेसाठी : सद्याचा भारतिय रिझर्व बँकेचा सद्याचा मूलभूत व्याजदर +७.७५% आहे)
वाचने
17081
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
चांगला लेख
In reply to चांगला लेख by आजानुकर्ण
अगदी अगदी. माहिती आवडली.
In reply to चांगला लेख by आजानुकर्ण
हो तसाच !
अभ्यासपूर्ण लेखन
उत्तम लेख
उत्तम
या विषयावर रोजच सध्या वाचायला
च्यामरी...अवघडच आहे म्हणा कि...
शिवाय सध्या सिलिकॉन व्हॅली पण तेजीत आहे म्हणतात.
In reply to शिवाय सध्या सिलिकॉन व्हॅली पण तेजीत आहे म्हणतात. by अर्धवटराव
अमेरिका आणि अमेरिकन कंपन्या
अभ्यासपूर्ण लेख आवडला. जागतिक
मला असे वाटते
In reply to मला असे वाटते by चौकटराजा
पण नियोजन करणार कोण? नियोजित
In reply to पण नियोजन करणार कोण? नियोजित by नगरीनिरंजन
कोण करणार बरं ?
सुरेख आणि सोप्या शब्दात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }हम्म!
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
लेखाचे शीर्षक काहीसे पटले
लेखाचे शीर्षक काहीसे पटले नाही... कारण जर सशक्तांचा त्यांच्या करणीने कपाळमोक्ष झाला तर त्यात दु:ख्ख करण्यासारखे काही नाही (उदा. जपान)... पण जर सशक्तांच्या खेळीमुळे जर अशक्तांचा, त्यांचा कंट्रोल नसतांना, कपाळमोक्ष होत असेल तर ती खेद बाळगण्याजोगी बाब आहे....लेखाचे शिर्षक केवळ वस्तुस्थिती निदर्शक आहे... त्यात काय चांगले आणि काय वाईट याचा निर्देश नाही ! बरोबर असो अथवा चूक, जगातील सबळ आपल्या करणीचे अनिष्ट परिणाम नेहमीच जाणीवपूर्वक किंवा अनाहूतपणे दुसर्यावर लादत आलेले आहेत. आणि मग जगले तगलेले त्यांची करणी कशी उच्च आणि नीतिमत्तेच्या परिघाच्या आत होती याचा इतिहास लिहीत आले आहेत. डार्विनबाबा "सर्व्हायल ऑफ द फिटेस्ट..." असं कायकी बोलून गेला आहेच.In reply to लेखाचे शीर्षक काहीसे पटले by डॉ सुहास म्हात्रे
तेही आहेच.
देवा ह्या बड्या देशांना
छान लेख. एक निरिक्षण : ज्या
वाढती विषमता
In reply to वाढती विषमता by विशाखा पाटील
प्रेसिडेन्ट बिल क्लिंटन यांचं
In reply to प्रेसिडेन्ट बिल क्लिंटन यांचं by पिवळा डांबिस
ओबामा जाता जाता १८
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }In reply to ओबामा जाता जाता १८ by मदनबाण
आता त्याला काय करणार?
In reply to आता त्याला काय करणार? by पिवळा डांबिस
तुमचा हा अभिप्राय मराठी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हानेIn reply to आता त्याला काय करणार? by पिवळा डांबिस
"तुमचा हा अभिप्राय मराठी
यातून लवचिक अर्थव्यवस्था
अमेरिका
करांव्यतिरिक्त दुसरे पर्याय
थोडेसे विस्कळीत
In reply to थोडेसे विस्कळीत by क्लिंटन
पण क्रुगमनचा उपाय म्हणजे आजचं
In reply to पण क्रुगमनचा उपाय म्हणजे आजचं by आदूबाळ
+१ आदुबाळ .. त्यावरच
In reply to पण क्रुगमनचा उपाय म्हणजे आजचं by आदूबाळ
पण क्रुगमनचा उपाय म्हणजे आजचं
In reply to पण क्रुगमनचा उपाय म्हणजे आजचं by क्लिंटन
फरक
In reply to फरक by आदूबाळ
ते एक ट्रिलियनचं नाणं पाडायची
In reply to ते एक ट्रिलियनचं नाणं पाडायची by नगरीनिरंजन
(No subject)
In reply to (No subject) by आदूबाळ
तसाही क्रुगमन यांच्याबद्दल
In reply to फरक by आदूबाळ
ठिक आहे ना. कर्ज कधीतरी परत
In reply to ठिक आहे ना. कर्ज कधीतरी परत by क्लिंटन
त्यामुळे सरकारकडे या
In reply to थोडेसे विस्कळीत by क्लिंटन
रशियाने १९९८ मध्ये डिफॉल्ट
रशियाने १९९८ मध्ये डिफॉल्ट केले पण २००० मध्ये पुतिन हा खमका अध्यक्ष झाल्यानंतर २-३ वर्षातच रशिया वॉस बॅक टू बिझनेस.राष्ट्रीय कर्ज माफ किंवा रिस्ट्रक्चर झाल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा सबळ करण्यासाठी त्या देशाकडे उत्पन्नाचा सबळ स्रोत असणे आवश्यक असते... कारण जर उत्पन्नच पुरेसे नसले तर परत कर्जाचे दुष्टचक्र सुरू होते. तेलाच्या पडलेल्या किंमती, अफगाणिस्तान युद्धाचा डोईजड खर्च आणि त्याच युद्धात हरण्याची नामुष्की या सर्वांचे एकत्र परिणाम सोविएत संघराज्य तुटण्यासाठी कारण ठरले. परंतु, रशियाकडे खनिज तेल व वायू; तंत्रज्ञानावर आधारलेले उद्योग; प्रचंड भूभागावरची नैसर्गिक संपत्ती; आणि "सोशिक जनता" आहे. त्यामुळे कर्जमाफी/रिस्ट्रक्चरिंग नंतर त्यांच्या कर्जपरतीचा खर्च GDP च्या तुलनेने आवाक्यातला झाला. संघराज्य भंगून उरलेल्या रशियाची मोठी सामरिक शक्ती बेजबाबदार हातात किंवा बंडाळीत रूपांतरित होणे हे पाश्चिमात्य जगाला परवडणारे नव्हते त्यामुळे कर्जमाफी/रिस्ट्रक्चरिंगच्या अटी फार कडक होणार नाहीत याची काळजी घेतली गेली. त्यानंतर ३ ते ६ पट वाढलेल्या आणि दशकभर किंवा अधिक वर राहिलेल्या खनिज तेल व वायूच्या किंमतींनी रशियाच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणेला मदत केली. आता पडलेले/"पाडलेले" तेल/वायुदर रशियाची सर्वात मोठी समस्या आहे. अर्जेंटिनाकडे खनिजसंपत्ती; शेतमालाचे उत्पन्न; आणि "सोशिक जनता" आहेत. त्यामुळे दशक-दोन दशकांच्या प्रयत्नाने तो देश परत ऊर्जितावस्थेस आला. ग्रीसच्या बाबतीत वरची समीकरणे अगदी विरुद्ध आहेत. ग्रीसकडे असा कोणताही मोठा उत्पन्नाचा स्रोत नाही जो त्याच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात हातभार लावू शकेल. त्याचबरोबर "सोशिक जनता" नसणे ही एक मोठी समस्या आहे... काहीसे अतिशयोक्तिपूर्ण वाटले तरी तेथे कर भरणे सर्वसाधारणपणे भ्याडाचे लक्षण समजले जाते आणि त्याविरुद्ध कडक उपाययोजना करणारे सरकार सत्तेवर येऊ/राहू शकत नाही. सोशिक जनता अडचणीच्या काळात खाली गेलेला आर्थिक स्तर स्वीकारून "अधिक काम + कमी उत्पन्न + काटकसरीचे जीवन" ही त्रिसूत्री मनाने/मनाविरुद्ध स्वीकारून जीवनशैली त्याला साजेशी बदलते; याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. ग्रीसमध्ये आतापर्यंतचा अनुभव अगदी उलटा आहे... बहुसंख्य ग्रीक अजूनही त्यांच्या सुखवस्तू जीवनशैलीची किंमत जर्मनीसारख्या सधन देशाने उचलावी अश्याच मताचे दिसतात. थोडक्यात त्यांना उत्पन्न जर्मन सुखवस्तू माणसासारखे हवे, मात्र काम आणि करव्यवस्था अरबस्थानातल्या राजपुत्रासारखे हवी आहे. शिवाय, लोकशाहीवादी युरोझोनमध्ये असल्याने ग्रीसमध्ये कोणतेही जाचक कायदे लोकमताविरुद्ध अमलात आणणे हे नैतिकदृष्ट्या परवडण्यासारखे नाही. वरील देशांतील आणि ग्रीसच्या अर्थव्यवस्थेत अजून एक फार महत्त्वपूर्ण फरक आहे... तो म्हणजे इतर सर्व देश सर्व प्रकारे सार्वभौम आहेत आणि आपली अर्थव्यवस्था आणि चलनव्यवस्था स्वतंत्रपणे बदलू शकतात. ग्रीस युरोझोनचा सदस्य आहे त्यामुळे त्याची चलनव्यवस्था युरोपियन सेंट्रल बँक नियंत्रित करते. मात्र युरोसंघाच्या घटनेत असलेल्या एका मोठ्या अर्थशास्त्रीय कमतरतेमुळे संघातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर/बजेटवर आणि पर्यायाने त्यांच्या अंतर्गत उत्पन्न/खर्चावर संघाचे नियंत्रण नाही. इतकेच नाही तर ते हिशेब तपासणे म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे असे सांगून सदस्य देश त्याला आक्षेप घेऊ शकतो/घेतो. या सुटीच्या आवरणाखाली ग्रीस (आणि इतर काही युरोझोन देशांनी) बर्याच अवैध गोष्टी करून त्या प्रसंग गळ्याशी येईपर्यंत लपवून ठेवल्या होत्या. त्या इतर देशांना कळत नव्हत्या असे नाही पण युरोप एकत्रीकरणाच्या लोभाने आणि २००८ पर्यंत केवळ वरच जाणार्या अर्थव्यवस्थेमुळे युरोप राजकीयदृष्ट्या एकत्र होईपर्यंत असे प्रसंग तरून जातील अश्या सोयीस्कर स्वप्नावर आधारलेल्या कल्पनेने ते गप्प राहिले होते. आता त्याच चुकीचे हाडूक युरोझोनच्या गळ्यात अडकून जिवावर (युरोझोनचे तुकडे पडणे) उठले आहे. सारांश : युरोझोन समस्या आणि इतर देशांच्या समस्या एकमेकाविरुद्धची दोन टोके आहेत. इकडचा उपाय तिकडे लागू पडणार नाही.In reply to थोडेसे विस्कळीत by क्लिंटन
अर्थातच अमेरिका डिफॉल्ट
अर्थातच अमेरिका डिफॉल्ट नजिकच्या काळात करेल असे वाटत नाही.अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज हा एक वेगळाच अर्थ-राज्य-शास्त्रीय विषय आहे. अमेरिकेच्या जागी इतर कोणताही देश असता तर नक्कीच मोठ्या अडचणीत असता. "अमेरिका डिफॉल्ट करणार नाही" म्हणण्यापेक्षा "अमेरिकेने डिफॉल्ट केला असे म्हणण्यास तिचे कर्जदार धजावत नाहीत" हे सत्य आहे. कारण अमेरिका काही गोष्टींमुळे वेगळा आहे. त्यातील महत्त्वाच्या खालीलप्रमाणे आहेत : १. जागतिक राजकीय आणि मुख्य म्हणजे सामरिक महाशक्ती... थोडक्यात सम्राटाला कर्जाची आठवण करून देणे अथवा अधिक कर्ज देणार नाही असे म्हणणे कठीण असते. तो "गैरसोयीच्या" कर्जदारासाठी कोठून, कशी आणि कोणत्या प्रकारे समस्या उभी करेल हे सांगता येत नाही ! २. लहान आणि मोठ्या ऋणकोंबरोबर बँकांचा व्यवहार अगदी उलट प्रकारचा असतो. लहान ऋणकोने कर्जापरताव्यात हयगय केली आणि त्यासाठी बँकेने नियमांप्रमाणे त्याचे दिवाळे वाजवले तरी बँकेला फार फरक पडेल असे नाही. याविरुद्ध, ऋणको इतका मोठा असेल की त्याच्या बुडण्याने बँक बुडू शकेल, तर बँक स्वतः त्याला तरण्यासाठी अजून कर्ज द्यायला तयार असते. अमेरिका या दुसर्या प्रकारचा ऋणको आहे. जर अमेरिका बुडाली तर धनकोंनाही मोठे धोके आहेत, त्यातले मुख्य असे : अ) कर्ज देणार्यांचे (धनकोंचे) $१८ बिलियन एका झटक्यात $० होतील. आ) अमेरिकेच्या सर्व धनकोंच्या (उदा. चीन, पाश्चिमात्य देश, इ) उत्पन्नाचे मोठे स्रोत अमेरिकेत विकल्या जाणार्या त्यांच्या उत्पादन आणि सेवांवर अवलंबून आहेत; ते एका झटक्यात आटतील. इ) अमेरिकेबरोबरचे सर्व व्यवहार अर्थातच अमेरिकन डॉलरमध्ये होतात. कोणत्याही कारणाने डॉलरची किंमत घसरली तर केवळ कर्जपरतीमध्ये समस्या होईल इतकेच नाही तर कर्जाच्या मूळ भांडवलाची किंमत घसरणीच्या प्रमाणात कमी होईल. ई) सामरिक व राजकीय दृष्ट्या जागतिक महासत्तेबरोबर पंगा कोणालाच परवडत नाही... देणेकर्याला तर नाहीच नाही. या सगळ्यामुळेच अमेरिकेचा सर्वात मोठा देणेकरी, प्रतिस्पर्धी आणि दोन क्रमांकाची जागतिक महासत्ता असलेल्या चीननेही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आणि / किंवा डॉलरला मोठा धक्का देण्याचे कटाक्षाने टाळले आहे. हे जर चीनला स्वतःच्या फायद्याला धक्का न देता करणे जमले असते तर केव्हाच केले असते !In reply to अर्थातच अमेरिका डिफॉल्ट by डॉ सुहास म्हात्रे
या सगळ्यामुळेच अमेरिकेचा
In reply to या सगळ्यामुळेच अमेरिकेचा by मदनबाण
चीनने डॉलर पासून दूर होण्याचे
In reply to चीनने डॉलर पासून दूर होण्याचे by डॉ सुहास म्हात्रे
केवळ चीनच नाही तर
In reply to थोडेसे विस्कळीत by क्लिंटन
क्लिंटनजी, तुम्ही दिलेला लेख
In reply to क्लिंटनजी, तुम्ही दिलेला लेख by नगरीनिरंजन
केन्सच्या म्हणण्यानुसार
In reply to केन्सच्या म्हणण्यानुसार by बोका-ए-आझम
अच्छा, मग यावेळी वेगळं काय
In reply to अच्छा, मग यावेळी वेगळं काय by नगरीनिरंजन
प्रश्न असा आहे की नक्की
In reply to प्रश्न असा आहे की नक्की by बोका-ए-आझम
कोणत्याही क्षेत्रात नोकर्या
ग्रीस आणि युरो
भारत
आमचे अर्थशास्त्र .....
In reply to आमचे अर्थशास्त्र ..... by चौकटराजा
भारतात शेतकरी नसलेल्यांना
In reply to भारतात शेतकरी नसलेल्यांना by नगरीनिरंजन
काका .. आता मुटेकाकांच्या
In reply to काका .. आता मुटेकाकांच्या by हाडक्या
कोणत्या धाग्यावर मामा? लिंक
In reply to कोणत्या धाग्यावर मामा? लिंक by नगरीनिरंजन
मामा काय म्हणता राव. तुम्हाला
In reply to मामा काय म्हणता राव. तुम्हाला by हाडक्या
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by नगरीनिरंजन
तुमी नेहमीच येल्कम हो, ननि..
In reply to आमचे अर्थशास्त्र ..... by चौकटराजा
शक्य असेल तर शेत विकत घेणे हे श्रेयस्कर !
हे महाराज खोटं बोलुन राहिले कि काय?
अभ्यासपुर्ण लेख...
इस्पिक एक्का साहेब,
In reply to इस्पिक एक्का साहेब, by चौकटराजा
बाकी मंदी, तेजी, ताण, घबराट ई
बाकी मंदी, तेजी, ताण, घबराट ई ई औद्योगिक क्रांति अगोदर होते का हो ?हे तर सर्व प्राण्यांत आणि प्रकर्षाने मानवप्राण्यात सुरुवातीपासूनच "अन्न, सुरक्षा आणि प्रजनन" यांची तजविज करण्याच्या धडपडीत होते आणि आहे ! सतत जागा बदलणार्या भटक्या-शिकारी माणसाला कोणत्याही गोष्टीचा मोठा साठा करून तो बरोबर घेऊन जाणे जिकीरीचे असते. त्याकाळी मंदी आणि तेजी ऐवजी निसर्गचक्र आणि त्यामुळे झालेली अन्नाची चणचण अथवा मुबलकता याची चिंता असणे/नसणे अवलंबून होते. त्याचबरोबर, इतर टोळ्यांशी अन्नासाठी आणि आस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष अनिवार्य होता. म्हणजेच ताण आणि घबराट ह्या भावना अर्वाचीन तर नाहीतच पण केवळ मानवापुरत्याच आहेत असेही नाही. मात्र माणसाने भटकंती सोडून शेती करणे सुरू केले तेव्हा मोठ्या मानवसमूहांचा आकार वाढला आणि त्यांच्यामध्ये देवघेवीचा व्यापार सुरू झाला. त्यानंतर जमीन, वस्तू आणि चलन यांचे माणसांच्या समुहांवर वर्चस्व गाजविण्यासाठी असणारे महत्व त्या समुहातल्या चलाख मानवांच्या ध्यानात यायला वेळ लागला नसावा. जेव्हा एखाद्या गोष्टीचा साठा करणे आणि त्याचे संरक्षण करणे समुहातले आपले महत्व राखण्यासाठी आवश्यक होते, तेव्हा ती स्थिती मानवाला मंदी (साठा आहे पण ग्राहक नाही), तेजी (गाहक आहे आणि साठा नाही / साठा आहे पण त्याची विक्री करणारा प्रतिस्पर्धी नाही), ताण (साठ्याचे संरक्षण कसे करावे), घबराट (साठाच्या मालकिसाठी निर्माण झालेल्या प्रतिस्पर्ध्याला कसे तोंड द्यावे), हे सगळे संघटीत स्वरूपात सुरू झाले असणार !तेजी-मंदीची घबराट
In reply to तेजी-मंदीची घबराट by बोका-ए-आझम
हाॅलंडमधल्या ट्युलिप फुलांची
हाॅलंडमधल्या ट्युलिप फुलांची मागणी अचानक वाढली आणि त्यामुळे त्यांची किंमतही.सोळाव्या शतकाच्या सुरुवातीच्या कालात आस्तित्वात आलेला ट्युलिप मॅनिया हा युरोपच्या आर्थिक मंदीच्या इतिहासातला एक मोठा चमत्कारीक अध्याय आहे ! हा प्रसंग जगातला पहिला आर्थिक फुगा (इकॉनॉमिक बबल) समजला जातो. युरोपमध्ये नविनच आलेले ट्युलिप डच उच्चभ्रूंमध्ये इतके प्रिय झाले की १६३७ च्या मार्चमध्ये ट्युलिपच्या एका कंदाची किंमत ३,००० ते ४,१०० गिल्डर इतकी होती... हा आकडा त्याकाळच्या कसबी कारगिराच्या दहा वर्षांच्या उत्पन्नाइतका मोठा होता. इतकेच काय तर एका कंदाच्या बदल्यात १२ एकर जमीन दिल्याचा किस्साही सांगितला जातो ! अर्थातच थोड्या काळाने हा फुगा फुटून बर्याच जणांचे दिवाळे वाजवून गेला. त्यानंतर कोणत्याही आर्थिक फुग्याला (जेव्हा एखाद्या गोष्टीच्या मूळ अंगभूत पात्रतेपेक्षा अनेक पटींनी किंमत मोजली जाते त्या अवस्थेत) ट्युलिप मॅनिया असे संबोधण्याची प्रथा पडली आहे.बोधप्रद माहिती.