साल्याने पेपर टाकलाय.......
आय टी मध्ये राजीनामा देणे, या क्रियेला पेपर टाकणे असे म्हणतात, त्यावर हि कविता.
साल्याने पेपर टाकलाय...................
तो रोज ऑफिसला येतो
वेळेत येतो; वेळेत जातो
नऊ तास भरले नाहीत; तर चिंता करतो
कमी भरले तास; तर नंतर भरून काढतो
साहेबाने काम दिले; तर नाश्त्याला पण जात नाही
साहेब जागेवर असताना; जागचा उठत नाही
कितीपण महत्वाचे काम असो; साहेब गायब झाल्याशिवाय हा जागचा हालत नाही
साहेब खुर्चीत यायच्या आत, जागेवर यायची सवय काही जात नाही
जास्त सुट्या घेत नाही,
घेतली तरी अप्रुव्हल घेतल्याशिवाय; कलटी टाकत नाही
ओव्हर टाइम कधी मागत नाही
कॉम्प-ऑफ कधी घेत नाही.
मोबाईल वर फोन आला; तर साहेबासमोर बोलत नाही
लँडलाईनचा वापर; साहेबासमोर करत नाही
साहेबाची नजर चुकवून; एक्सेल मध्ये गेम खेळत नाही
आणि काम संपवले तरी; टाईमपास करत नाही
तक्रार न करता; साहेब टाकेल तेवढे काम करतो
सरकारी रिपोर्ट पण; मागीतल्या मागीतल्या बनवतो
टीम मेंबर आला नाही; तर त्याची पण हमाली करतो
काम संपले तरी; भूरसटलेली ट्रेनिंग करत बसतो
इतका बिचारा साहेबाला घाबरतो
कालपासून एकदम; बदलला आहे
उशिरा येऊन लवकर; जायला लागला आहे
न सांगताच सारखा; फिरायला लागला आहे
नेमका पाहिजे तेंव्हा; गायब व्हायला लागला आहे
साहेबाने काम दिले तर; "आय विल ट्राय" म्हणतोय
कुणाचा फोन आला तर; निवांत आहे म्हणतोय
मित्राला फोन करून; चहा मारू म्हणतोय
"प्रोजेक्ट माझा जाम बोर आहे” असे; बसल्या जागेवर म्हणतोय
साहेब जागेवर आला कि; मुद्दाम उठून बाहेर जातोय
फोन वर; "काही नाही रे टाईमपास चाललाय" म्हणतोय
प्रत्येक मिटिंगला; उशिरा येतोय
मधेच फोन आला तर; बिनधास्त उठून जातोय
त्याच्या प्रत्येक कृतीत; "दिवारमधला" अमिताभ दिसतोय
"खान चाचा; अगले हप्ते और एक कुली; हप्ता देनेसे इन्कार करेगा"; असे सगळे वाटतेय
मला वाटले दोस्त आपला; टेन्शनमधे बसलाय
विचारले तर कळले साल्याने; पेपर टाकलाय
मूळ लिंक - http://www.saarthbodh.com/2011/04/blog-post_29.html
-सार्थबोध
www.saarthbodh.com
वाचन
11212
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
वाह वाह... लयं भारी !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वेलय भारी....दिल को छू लिया आज
हा हा हा
सही रे.
चेपु / व्हॉटस अॅप
In reply to चेपु / व्हॉटस अॅप by कपिलमुनी
होय कपिलमुनी
लै भारी
मस्त जमलीय
ऐला
In reply to ऐला by तिमा
राजीनामा वरच्या खिशांत तयारच
In reply to राजीनामा वरच्या खिशांत तयारच by हाडक्या
अवो
In reply to अवो by तिमा
बर्रर्र .. अशेल अशेल..
In reply to बर्रर्र .. अशेल अशेल.. by हाडक्या
साहेबाकडे डोळे रोखून त्याच्या
मस्तं हो.
In reply to मस्तं हो. by यसवायजी
णक्की
आवडल : )
मस्त हो..
मस्त हो....
चांगलंय !! आम्ही बाबा पेपर न
मस्त
सर्वांचे मन:पूर्वक आभार
झकास!!!
In reply to झकास!!! by समीरसूर
राहणारे त्यांच्याकडे
In reply to राहणारे त्यांच्याकडे by विश्वनाथ मेहेंदळे
परिस्थिती
In reply to परिस्थिती by समीरसूर
अपरिहार्य परिस्थिति ही क्वचित
In reply to राहणारे त्यांच्याकडे by विश्वनाथ मेहेंदळे
हा प्रतिसाद खुप आवडला.
वा आवडली
कंपनी सोडण्याबाबत एक अतिशय
In reply to कंपनी सोडण्याबाबत एक अतिशय by वेल्लाभट
you don't leave the company;
In reply to you don't leave the company; by खटपट्या
हे वाक्य
In reply to हे वाक्य by vikramaditya
एकाच ठिकाणी फार काळ काम करणे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे.In reply to एकाच ठिकाणी फार काळ काम करणे by मदनबाण
एकदा अनुभव १५ वर्षांच्या वर
In reply to एकदा अनुभव १५ वर्षांच्या वर by खटपट्या
एकदा अनुभव १५ वर्षांच्या वर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- RJ Dhvanit on Guitar Guruwar Ahmedabad with Aishwarya Majmudar { Cool Video,Must Watch }In reply to एकदा अनुभव १५ वर्षांच्या वर by खटपट्या
मॅनेजरपदाचे डोहाळे
In reply to मॅनेजरपदाचे डोहाळे by कपिलमुनी
अगदी अगदी....
In reply to मॅनेजरपदाचे डोहाळे by कपिलमुनी
माझ्या मते त्याला वेरीएबल पे
In reply to माझ्या मते त्याला वेरीएबल पे by थॉर माणूस
असे काही नाही हो. नोन
मी अठरा वर्षे सरकारी नोकरी
बॉसच्या तोंडावर राजीनामा फेकणे
attrition आणी recession
In reply to attrition आणी recession by सिरुसेरि
recessionproof
हनीमून पिरियड
बाकी या धाग्यामुळे मला ही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)मलाही हेच आठवले :).
मस्त कविता ..
भूमिकेतील बदल.
त्याचे अभिनंदन!
सुन्दर