मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साल्याने पेपर टाकलाय.......

सार्थबोध · · जे न देखे रवी...
आय टी मध्ये राजीनामा देणे, या क्रियेला पेपर टाकणे असे म्हणतात, त्यावर हि कविता. साल्याने पेपर टाकलाय................... तो रोज ऑफिसला येतो वेळेत येतो; वेळेत जातो नऊ तास भरले नाहीत; तर चिंता करतो कमी भरले तास; तर नंतर भरून काढतो साहेबाने काम दिले; तर नाश्त्याला पण जात नाही साहेब जागेवर असताना; जागचा उठत नाही कितीपण महत्वाचे काम असो; साहेब गायब झाल्याशिवाय हा जागचा हालत नाही साहेब खुर्चीत यायच्या आत, जागेवर यायची सवय काही जात नाही जास्त सुट्या घेत नाही, घेतली तरी अप्रुव्हल घेतल्याशिवाय; कलटी टाकत नाही ओव्हर टाइम कधी मागत नाही कॉम्प-ऑफ कधी घेत नाही. मोबाईल वर फोन आला; तर साहेबासमोर बोलत नाही लँडलाईनचा वापर; साहेबासमोर करत नाही साहेबाची नजर चुकवून; एक्सेल मध्ये गेम खेळत नाही आणि काम संपवले तरी; टाईमपास करत नाही तक्रार न करता; साहेब टाकेल तेवढे काम करतो सरकारी रिपोर्ट पण; मागीतल्या मागीतल्या बनवतो टीम मेंबर आला नाही; तर त्याची पण हमाली करतो काम संपले तरी; भूरसटलेली ट्रेनिंग करत बसतो इतका बिचारा साहेबाला घाबरतो कालपासून एकदम; बदलला आहे उशिरा येऊन लवकर; जायला लागला आहे न सांगताच सारखा; फिरायला लागला आहे नेमका पाहिजे तेंव्हा; गायब व्हायला लागला आहे साहेबाने काम दिले तर; "आय विल ट्राय" म्हणतोय कुणाचा फोन आला तर; निवांत आहे म्हणतोय मित्राला फोन करून; चहा मारू म्हणतोय "प्रोजेक्ट माझा जाम बोर आहे” असे; बसल्या जागेवर म्हणतोय साहेब जागेवर आला कि; मुद्दाम उठून बाहेर जातोय फोन वर; "काही नाही रे टाईमपास चाललाय" म्हणतोय प्रत्येक मिटिंगला; उशिरा येतोय मधेच फोन आला तर; बिनधास्त उठून जातोय त्याच्या प्रत्येक कृतीत; "दिवारमधला" अमिताभ दिसतोय "खान चाचा; अगले हप्ते और एक कुली; हप्ता देनेसे इन्कार करेगा"; असे सगळे वाटतेय मला वाटले दोस्त आपला; टेन्शनमधे बसलाय विचारले तर कळले साल्याने; पेपर टाकलाय मूळ लिंक - http://www.saarthbodh.com/2011/04/blog-post_29.html -सार्थबोध www.saarthbodh.com

वाचन 11212 प्रतिक्रिया 48