तिची साधीशी कविता
लेखनविषय:
तिची साधीशी कविता
माझा अर्थाचा गोंधळ
काळेसावळे ते ढग
तिचा सखा घननीळ |
तिची साधीशी कविता
शोध अंतरीचा घेई
खोल विरहाचे दु:ख
अलगद वर येई |
तिची साधीशी कविता
म्हणे तुझी माझी भेट
आज वसंत बहर
पुढे वैशाखाची वाट |
तिची साधीशी कविता
थोडे डोळे पाणावती
दोन मोतियांचे अश्रु
तिच्या गाली ओघळती |
तिची साधीशी कविता
माझ्या गळा एक मिठी
शब्द विरुनिया गेले
अर्थ एक दोघा ओठी !!
( पुर्वप्रकाशित )
वाचने
5538
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
सखा घननीळअ हा हा.. काय मस्त शब्द . या दोन शब्दांनीच मस्त वाटले. संपुर्ण कविताही छान. एखादी माझी पण पुर्वप्रकाशीत कवितादेवु म्हणतो.. हि कविता वाचल्याने आठवण झाली जुन्या कवितांची
आवडली...
झक्कास...! ए१
मस्तच रे प्रगो
अतिशय सुंदर!
वा रे डॉन. लयच भारी!
छान. भावना आणि लय, दोन्ही छान
सुरेख कविता.आवडली.
सुंदर कविता !!!
सुंदर!
तिची साधीशी कविता
थोडे डोळे पाणावती दोन मोतियांचे अश्रु तिच्या गाली ओघळती |हे खास जबराट
किती गोड लिहिलय....
सुरेख कविता... आवडली...
लोटे, तांब्ये, धोतरांच्या भाऊगर्दीत ही अतिशय सुंदर कविता बघून बरं वाटलं. :)
साध्या शब्दांतली पण अर्थपूर्ण आणि भावगर्भ कविता... खूप भावली !
खूप सुंदर लिहिलंय!
साधीशी आहे म्हणूनच आवडली.
गिर्जातै कवितापण करतात वाट्ट !
In reply to साधीशी आहे म्हणूनच आवडली. by सस्नेह
आधी कविता सुचायची... रादर आधी बरेच काही सुचायचे
डु आयडी १ ने लेखन
डु आयडी २ ने लेखन
पण नंतर नंतर लोकं माझे डु आयडी अगदी सहज पकडायला लागली म्हणुन मग लेखन कमी केलं :D
In reply to साधीशी आहे म्हणूनच आवडली. by सस्नेह
राष्ट्रकाकू आहेत त्या !! 'राष्ट्रकाकू गिर्जा' ;)
सुंदर.. __/\__!
सुंदर कविता आवडली
http://www.misalpav.com/node/33499#comment-763651
पण ही साधीशीच कविता खूप छान वाटते
हायला गिर्जा भारी लिव्हतो.
मला वाटले नुसताच भांडतो. ;)
Kiti surekh lihile Aahes Prago!! Sundar!!
मस्त! पुन्हा लिहा कविता!
फार हळवी कविता!
किती आठवणी परतून आल्या !
या एका कवितेसाठी, १००अपराध(चुकून कधी जर केले तर)माफ व्हावेत!
मस्तच!
प्रगोंचे मानसशास्त्राशी संबंधित लेखन आवडते, हा पैलूही आवडला.
नवीन रचनेच्या प्रतिक्षेत..
साधी सुंदर रचना
सुरेख शेवट...
मस्त.
सखा घननीळ