मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तिची साधीशी कविता

प्रसाद गोडबोले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तिची साधीशी कविता माझा अर्थाचा गोंधळ काळेसावळे ते ढग तिचा सखा घननीळ | तिची साधीशी कविता शोध अंतरीचा घेई खोल विरहाचे दु:ख अलगद वर येई | तिची साधीशी कविता म्हणे तुझी माझी भेट आज वसंत बहर पुढे वैशाखाची वाट | तिची साधीशी कविता थोडे डोळे पाणावती दोन मोतियांचे अश्रु तिच्या गाली ओघळती | तिची साधीशी कविता माझ्या गळा एक मिठी शब्द विरुनिया गेले अर्थ एक दोघा ओठी !! ( पुर्वप्रकाशित )

वाचने 5536 वाचनखूण प्रतिक्रिया 30

गणेशा Tue, 11/25/2014 - 20:10
सखा घननीळ
अ हा हा.. काय मस्त शब्द . या दोन शब्दांनीच मस्त वाटले. संपुर्ण कविताही छान. एखादी माझी पण पुर्वप्रकाशीत कवितादेवु म्हणतो.. हि कविता वाचल्याने आठवण झाली जुन्या कवितांची

नाखु Wed, 11/26/2014 - 10:02
तिची साधीशी कविता
थोडे डोळे पाणावती दोन मोतियांचे अश्रु तिच्या गाली ओघळती |
हे खास जबराट

In reply to by सस्नेह

आधी कविता सुचायची... रादर आधी बरेच काही सुचायचे डु आयडी १ ने लेखन डु आयडी २ ने लेखन पण नंतर नंतर लोकं माझे डु आयडी अगदी सहज पकडायला लागली म्हणुन मग लेखन कमी केलं :D

नीलमोहर Mon, 11/02/2015 - 15:19
प्रगोंचे मानसशास्त्राशी संबंधित लेखन आवडते, हा पैलूही आवडला. नवीन रचनेच्या प्रतिक्षेत..