Skip to main content

तिची साधीशी कविता

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 25/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
तिची साधीशी कविता माझा अर्थाचा गोंधळ काळेसावळे ते ढग तिचा सखा घननीळ | तिची साधीशी कविता शोध अंतरीचा घेई खोल विरहाचे दु:ख अलगद वर येई | तिची साधीशी कविता म्हणे तुझी माझी भेट आज वसंत बहर पुढे वैशाखाची वाट | तिची साधीशी कविता थोडे डोळे पाणावती दोन मोतियांचे अश्रु तिच्या गाली ओघळती | तिची साधीशी कविता माझ्या गळा एक मिठी शब्द विरुनिया गेले अर्थ एक दोघा ओठी !! ( पुर्वप्रकाशित )
लेखनविषय:

वाचने 5539
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

सखा घननीळ
अ हा हा.. काय मस्त शब्द . या दोन शब्दांनीच मस्त वाटले. संपुर्ण कविताही छान. एखादी माझी पण पुर्वप्रकाशीत कवितादेवु म्हणतो.. हि कविता वाचल्याने आठवण झाली जुन्या कवितांची

छान. भावना आणि लय, दोन्ही छान

तिची साधीशी कविता
थोडे डोळे पाणावती दोन मोतियांचे अश्रु तिच्या गाली ओघळती |
हे खास जबराट

सुरेख कविता... आवडली...

साध्या शब्दांतली पण अर्थपूर्ण आणि भावगर्भ कविता... खूप भावली !

In reply to by सस्नेह

आधी कविता सुचायची... रादर आधी बरेच काही सुचायचे डु आयडी १ ने लेखन डु आयडी २ ने लेखन पण नंतर नंतर लोकं माझे डु आयडी अगदी सहज पकडायला लागली म्हणुन मग लेखन कमी केलं :D

सुंदर.. __/\__!

सुंदर कविता आवडली

प्रगोंचे मानसशास्त्राशी संबंधित लेखन आवडते, हा पैलूही आवडला. नवीन रचनेच्या प्रतिक्षेत..