गुलाम
लेखनविषय:
डोळ्यात आज माझ्या
मूर्ती तुझीच आहे
ओलावल्या कडांची
आरास त्यास आहे ॥
ह्रद्यात ठाव माझ्या
तुजविण कोण नाही
आसूसल्या मनाला
आधार कोण नाही ॥
व्याकूळता उराशी
अन् एकटाच आहे
या यातना मनीच्या
शब्दांत मांडत आहे ॥
तू भेटशील स्वप्नी
आशा ऊगाच आहे
जागेपणी झोपण्याला
राजा गुलाम आहे ॥
सुर्या...
वाचने
2541
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
कविता उत्तम आहे..
'गजरा', 'चांदणी' आणि आता 'गुलाम'. सगळ्याच प्रेमकविता.. प्रेमकवी आहात का..?
जरा बाकी भावनांकडे पण लक्ष असू द्या.
ही कविता खरंच उत्तम...
आवड्ली !!
छान आहे कविता, आवडली !
(( ओलावल्या कडांची
आरास त्यास आहे ))
मस्त ओळी !!
कविता छान आहे. काही काही ओळी विजेप्रमाणे चमकून जातात. काही ठिकाणी कालिफ सुधारण्यास वाव आहे. तिकडे थोडे लक्ष द्यावे असे सुचवतो.
In reply to कविता छान आहे. काही काही ओळी by एस
कालिफ म्हणजे?
कविता
सुरेख लिहीता भाऊ तुम्ही.
छान आहे कविता
नाद खुळा सूर्या....
भावनांनी भारलेले
काव्य तुमचे छान आहे :)
फ़क्त काही बदकांना
कावळ्याची मान आहे! ;-)
ओलावल्या कडांची
आरास त्यास आहे
मस्त ओळी..
तू भेटशील स्वप्नी
आशा ऊगाच आहे....
उद्या कळेलच, भेटणार कि नाही.....
In reply to तू भेटशील स्वप्नी by विवेकपटाईत
तू भेटशील उद्या
आशा ऊगाच आहे....
तूझ्या माझ्या मिलनाला
फक्त "घडी" लगाम आहे ।। :'-(
In reply to तू भेटशील उद्या by सुर्या गार्डी
+१
उत्तम