गुलाम

सुर्या गार्डी जे न देखे रवी...
डोळ्यात आज माझ्या मूर्ती तुझीच आहे ओलावल्या कडांची आरास त्यास आहे ॥ ह्रद्यात ठाव माझ्या तुजविण कोण नाही आसूसल्या मनाला आधार कोण नाही ॥ व्याकूळता उराशी अन् एकटाच आहे या यातना मनीच्या शब्दांत मांडत आहे ॥ तू भेटशील स्वप्नी आशा ऊगाच आहे जागेपणी झोपण्याला राजा गुलाम आहे ॥ सुर्या...
वर्गीकरण
लेखनविषय:

14 टिप्पण्या 2,541 दृश्ये

Comments

स्वप्नज नवीन

कविता उत्तम आहे.. 'गजरा', 'चांदणी' आणि आता 'गुलाम'. सगळ्याच प्रेमकविता.. प्रेमकवी आहात का..? जरा बाकी भावनांकडे पण लक्ष असू द्या. ही कविता खरंच उत्तम...

एस नवीन

कविता छान आहे. काही काही ओळी विजेप्रमाणे चमकून जातात. काही ठिकाणी कालिफ सुधारण्यास वाव आहे. तिकडे थोडे लक्ष द्यावे असे सुचवतो.

अत्रुप्त आत्मा नवीन

भावनांनी भारलेले काव्य तुमचे छान आहे :) फ़क्त काही बदकांना कावळ्याची मान आहे! ;-)