Skip to main content

गुलाम

लेखक सुर्या गार्डी यांनी शनिवार, 08/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्यात आज माझ्या मूर्ती तुझीच आहे ओलावल्या कडांची आरास त्यास आहे ॥ ह्रद्यात ठाव माझ्या तुजविण कोण नाही आसूसल्या मनाला आधार कोण नाही ॥ व्याकूळता उराशी अन् एकटाच आहे या यातना मनीच्या शब्दांत मांडत आहे ॥ तू भेटशील स्वप्नी आशा ऊगाच आहे जागेपणी झोपण्याला राजा गुलाम आहे ॥ सुर्या...
लेखनविषय:

वाचने 2543
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

कविता उत्तम आहे.. 'गजरा', 'चांदणी' आणि आता 'गुलाम'. सगळ्याच प्रेमकविता.. प्रेमकवी आहात का..? जरा बाकी भावनांकडे पण लक्ष असू द्या. ही कविता खरंच उत्तम...

कविता छान आहे. काही काही ओळी विजेप्रमाणे चमकून जातात. काही ठिकाणी कालिफ सुधारण्यास वाव आहे. तिकडे थोडे लक्ष द्यावे असे सुचवतो.

भावनांनी भारलेले काव्य तुमचे छान आहे :) फ़क्त काही बदकांना कावळ्याची मान आहे! ;-)

तू भेटशील स्वप्नी आशा ऊगाच आहे.... उद्या कळेलच, भेटणार कि नाही.....