<लवंग>
लेखनविषय:
प्रेरणा
माझाच आवाज
सतत हरवतो
तुझ्या दुकानी
.
.
.
कोसळणारे
लाल धबधबे
चारीठायी
.
.
.
झटणारा मी
तांबुल-इच्छुक
गर्दीमधला
.
.
.
सुपारी कातर
चुना पानभर
किमाम दरवळी
.
.
.
बंद करण्या
लवंग टिचभर
अडकवलेली
.
.
.
लाल भडक
तृप्तीचे वैभव
मन आनंदी.
वाचने
7025
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
__/\__!
सुरेख
मस्त :)
सुपारी कातर
चुना पानभर
किमाम दरवळी
मस्त ! फक्त एक सांगावेसे वाटते की ते किमाम नसुन किवाम {Qiwam} आहे .
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्कIn reply to सुपारी कातर by मदनबाण
मी किमाम असाच वापरतो शब्द. आमचा पानवालादेखील.
In reply to मी किमाम असाच वापरतो शब्द. by अनुप ढेरे
आमचा पानवालादेखील.
तरी देखील ते चूक आहे,मी कधी लहर आली गोड पाण खाल्ले तर त्याला थोडासा नवरतन किवाम लावाला सांगतो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुख्यमंत्र्यांकडूनच सरकारच्या भ्रष्टाचाराची कबुली!In reply to आमचा पानवालादेखील. by मदनबाण
तो शब्द 'किवाम' असाच आहे.
'किवाम' चा अर्थ 'अवलेह' म्हणजे आयुर्वेदातील 'चाटण' (आंतरजालावरून साभार). एखाद्या औषधीचा संपृक्त द्राव. पानातल्या 'किवाम' मध्ये औषधी कांही नसते पण तो सुगंधीत काथ असतो.
पान खात नसलो तरी 'मालती किवाम' हा माझा फेवरीट्ट आहे.
In reply to किवाम(च) by प्रभाकर पेठकर
तेरे बातोमे किमामकी खुशबू है अशी गाण्यातली ओळ आहे की. गुलजारनी लिहिलेल्या 'कजरा रे'मध्ये
In reply to तेरे बातोमे किमामकी खुशबू है by अनुप ढेरे
तेरे बातोमे किमामकी खुशबू है अशी गाण्यातली ओळ आहे की. गुलजारनी लिहिलेल्या 'कजरा रे'मध्ये
हो... तसं आहे खरं... बाकी कजरा रे या गाण्याचे माझ्या पाहण्यातले २ व्हर्जन आहेत. एकात ऐश्वर्याची एक स्टेप कट केली आहे.
असो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपणह्ही ह्ही ह्ही!
मस्त विडंबन!
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार!
आम्हाला ही कविता समजली... पण मग तीच कविता का नाही समजली?
असो,
आमचे अनुभव विश्र्वच वेगळे... त्यांचे वेगळे...
क्या बात है ! जमलंय पान!
__/\__!