समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा..
(रस्त्याच्या खालून तर चालत नाहीये ना मी?)
बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय...
(`कशाला मारली झक' असं आता वाटतंय... पण काय उपयोग?)
मी जात आहे..की येत आहे ?
(आयचा घो! रिवर्समधे चालतोयं की काय?)
..आता संपेल , मग संपेल असे वाटणारा हा बोगदा संपत तर नाहीच..पण आणखी आणखी अरुंद होत चाललाय. डोळे उघडले काय अन मिटले काय, सारखेच..!
(माझे डोळे उघडे आहेत का बंद? पण आता हे सांगणार तरी कोण?)
वाटचाल अवघड म्हणता म्हणता अशक्य होत चाललीय...मघापर्यंत पाउल तरी पुढे (की मागे ?) पडत होतं ! पण आता तर बोटही हलवणं अशक्य झालंय...
(बहुतेक माझी एमाराय चाललीये ! अजिबातच हालता येत नाहीये)
ओह. काय करू ? किंबहुना काही करण्याचा ऑप्शन मला आहे का ?
(एमाराय कुणी करायला सांगितली होती बरं?)
..आतापर्यंत तरी जे केलं ते ‘मी’च केलं का ? मला काही पर्याय होता का ?
( `ऐकावे डॉक्टरचे आणि करावे मनाचे' हेच खरं!)
माझी वाट चुकली आहे का ?
(यालाच `वाट लागली' म्हणतात का? पण आता `वाट पाहाण्याशिवाय' हातात काये ?)
किती काळ गेला समजत नाही. काळ ही संकल्पनाच या बोगद्यात अर्थशून्य ठरली आहे...
(पुन्हा तोच प्रश्न डोळे उघडेत का बंद? आणि ते सुद्धा कोण ठरवणार, मी की बोगदा?)
....अं ? हा आवाज कसला ? खरंच आवाज येतो आहे की चाहुलीला आसावलेल्या माझ्या कानांना भास होतो आहे ?
कोण ते हसतंय ? हे सुपरिचित असे मंद शांत सूर कुठून ऐकू येताहेत ?
(हल्ली पेशंटला एमारायमधे बासरी ऐकवतात असं दिसतंय!)
कुणाचं तरी निकट सान्निध्य जाणवतंय ... फार फार पूर्वी लहानपणी, स्मृती पोचते तिथपासून, अगदी श्वाससुद्धा घेता येत नव्हता तेव्हापासून माझा प्रेमानं सांभाळ करणारं कुणीतरी...तोच का तू ?
(का मीच तो? आयला, काय लफडा आहे हा? `मी' तू आहेस की `तू' मी आहेस? कोण कुणाशी बोलतंय?)
अन इथे कसा अवचित समोर आलास ?
(तू समोरून आलास का मागून हा खरा प्रश्न आहे! ....पण तो नंतर सोडवू.)
...ओह आता मी तुला ओळखले आहे..तू तो अंती असणारा आहेस..सगळं काही अखेर ज्याच्याकडेच जातं तो..
..नाही, नाही, पण तू तर सुरुवातीला पण होतास..! ..जेव्हा मी एक बिंदूसुद्धा नसेन, तेव्हापासून तूच तर सोबत होतास..! म्हणजे तू अंती नव्हे तर आदि...!
(अरे, आता आलं लक्षात तू आदी उर्फ अॅडी (किराणावाला)! आणि मी आँटी!)
हसू नको..मी ओळखलंय तुला. तूच तो ! तू..माझ्या अंतर्यामी राहून दिशा देणारा, माझे चलन वलन, वहन-भरण करणारा ...योगक्षेम चालवणारा आत्मन ! माझेच शुद्ध केवल स्वरूप..!
(येस, अॅड्या वाणी! कडकीत सुद्धा वाणसामान देणारा आणि मला शुद्ध डालडा देणारा तो तूच!)
..जनधिक्काराच्या अंधारात चाचपडताना थेंबाथेंबाने मी गलितगात्र होताना, मति तर्क अन मार्ग सारे खुंटले होते तेव्हा, विजेसारख्या क्षुल्लक गोष्टीचे बील थकले होते तेव्हा, तूच ना नवा मार्ग सुचवलास ?
(`आज उधार उद्या रोख' हाच तो वाणसामानाचा मार्ग आणि शेजार्याकडून टेंपरवारी कनेक्शन घेऊन घर उजळवून टाकलं होतस, आठवतंय?)
..होय. आता माझ्या थोडं थोडं लक्षात येऊ लागलंय...मागे वळून पाहताना काही काही उमज पडू लागला आहे.
...पुष्कळदा मला वाटत होतं मला निर्णय घ्यायचा आहे..
(आता तरी बीलं भरु का नको? चालललंय ते काय वाईट आहे?)
पण आता उमगतंय, ..निर्णय घेतले ते ‘मी’ नाही, तर माझ्या पूर्वकर्मांनी, ... त्या कर्मांच्या वेळोवेळी समोर ठाकलेल्या परिणामस्वरूप परिस्थितीने...
(ज्ञानीजनांनी पूर्वीच सांगितलंय `नाईलाज को क्या इलाज? आणि सिनियर सिटिझन्स म्हणतात ते, `कर्म माझं!' म्हणजे हेच असावं)
निर्णयाचे योग्य पर्याय अर्थात होते..पण अज्ञानाच्या धुक्यामुळे मी ते जाणले नाहीत. ...केवळ घेतले म्हणून काही निर्णय अंमलात आणले...कधी स्वत;च्या कधी इतरांच्या मतानं कर्म पार पाडले.
(आयला, संपतेयं का नाही ही एमाराय?)
होय.. तुझ्यासाठीच केली सर्व कर्मे..कधी भली कधी बुरी..कृष्ण अन धवल..सुचेल तसं केलं. आल्या क्षणाला साजरं केलं त्या कर्माच्या आहुतीनं
(अरे, गॅस कोण फुकटात देणार? तिथे पैशाची आहुती द्यावीच लागली)
कधी तू समोर असायचास, कधी वळणापलीकडे ! तुझे इशारे कधी कधी समजलेच नाहीत. कधी समजूनसुद्धा दुर्लक्ष केलं मी ! पण परिणाम भोगायला अन उपभोगायला लागले मात्र आपणा दोघांना ! एकत्रित..
(म्हणजे बीलं थकवायची मी आणि परिणाम मात्र `एकत्रित'! दैवी चमत्कार म्हणतात तो हाच)
या काळोख्या बोगद्यातला प्रवेश ही त्याचीच तर परिणीती नव्हे ?
(तू बोगद्यात आहेस का बाहेर? आणि एकावेळी दोघांचा एमाराय कसा चालूये?)
..यावेळी तुझे हास्य मघासारखे मुक्त नाही...!
(बील वाढलं की काय?)
...समजलं ! कधीतरी काहीतरी चुकलंय. नाही समजत, नक्की कधी अन कुठं...पण चुकलंय खरं ! पश्चात्ताप.. ? हं..चूक समजेल तर ना पश्चात्ताप ?
(छे, छे, रामराया, सोडव रे या हिवतापातून)
पण खोल तळाशी एक खात्री आहे रे..रस्ते चुकले असतील पण इरादे नक्कीच चुकीचे नव्हते. जन्म घेणं हातात नव्हतं पण जन्म घेतल्यावर जमेल तितके हातपाय हलवले, काही दिशा ठरवून मार्ग शोधण्याचा प्रयत्न तरी प्रामाणिकपणे केला रे !
(जन्म घेतला का दिला? हातपाय हालायचे थांबून आता, डोक्यात विचारांना सुद्धा हालायला जागा राहिली नाही. टोटल ज्याम!)
आणि हे सर्व तुझ्यासाठीच रे आत्मन, तुझ्यासाठी ! ना त्या आईवडिलांसाठी, ना बायको-मुलांसाठी, ना सख्या-जिवलगांसाठी. सगळं काही स्वत:साठीच बरं.
.( अॅडया, गैरसमज नको बरं, `आत्मन' म्हणजे संस्कृतमधे `ग्रोसर', ज्याच्याशिवाय `आत्मा चालत नाही' तो)
आज या अंधाऱ्या बोगद्याच्या अंतर्गृहात जणू माझी प्रज्ञा शुद्ध व्हावी तसे सर्व काही स्वच्छ दिसते आहे मला ! आता या ज्ञानाच्या क्षणी मला निवळलेल्या मानससरोवराचा तळ अगदी स्पष्ट दिसतो आहे.
(एमारायच्या पाईपात ही बिसलेरीची बाटली कुठून आली?)
अन हेही समजतंय की ही अनुभूती या ज्ञानासाठीच ! तुझीच योजना ही ! तुझ्या-माझ्यातले अंतर शून्य करण्यासाठी ! जिवा-शिवाची भेट घडवण्यासाठी ! द्वैताला अद्वैत करण्यासाठी !
(आयचा घो, जीवाला शिवायचा अनुभव यावा म्हणून मला या पाईपात घातलं?)
अन मग आता वेळ का लावतो आहेस जिवलगा ?
(त्यापेक्षा साईडनं पाईप खोल!)
पुरे झालं आता ! नको अंत पाहूस ! नको दुरून दुरून ते विलक्षण मोहक हास्य फेकूस ! भरून जाऊदे तुझ्या प्रकाशमय चैतन्याने माझा रिकामा गाभारा ! उजळून जाऊदे हे तमोमय कृष्णविवर तुझ्या दैदिप्यमान सान्निध्याने !
(लावा रे कुणी तरी लाईट लावा!)
.....या अज्ञान-बोगद्याचा अंत करणारे हे पाउल, मी शिल्लक राहिलेले सर्व बळ एकवटून हे पहा उचलले !
(मायला, आणि पुन्हा नवा बोगदा लागला!)
______________________________
(मूळ बोगदा इथूनच साभार!)
वाचने
23761
प्रतिक्रिया
91
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम रसग्रहण.:):)
कठीण आहे !
ह्म्म...
विटेकरबुवा!
In reply to ह्म्म... by विटेकर
.
In reply to ह्म्म... by विटेकर
हा लेख प्रकाशित होईल की नाही आणि झाला तरी इथे राहिल का?
उत्तम प्रतिसाद.
In reply to हा लेख प्रकाशित होईल की नाही आणि झाला तरी इथे राहिल का? by संजय क्षीरसागर
वाहव्वा!
In reply to हा लेख प्रकाशित होईल की नाही आणि झाला तरी इथे राहिल का? by संजय क्षीरसागर
हाणा!! मारा!! तोडा!!
In reply to हा लेख प्रकाशित होईल की नाही आणि झाला तरी इथे राहिल का? by संजय क्षीरसागर
मेलो...
In reply to हाणा!! मारा!! तोडा!! by स्पंदना
मला देखील कायच आकलन झालेले
मूळ लेखच केमिकल लोच्या आहे,
In reply to मला देखील कायच आकलन झालेले by स्पा
हे ही कळलं नाही...
In reply to मूळ लेखच केमिकल लोच्या आहे, by संजय क्षीरसागर
ओके,
In reply to मूळ लेखच केमिकल लोच्या आहे, by संजय क्षीरसागर
क्या बात है!
In reply to ओके, by ज्ञानोबाचे पैजार
असच्च माझं ही वरील सदर
In reply to मला देखील कायच आकलन झालेले by स्पा
वरीलसदर प्रतिसादाबद्दल झालयसंक्षी... कोडि घालु नकात,..
कोडं सुटत नाही बुवा!! अगदी
म्हणजे `मूळ बोगदा' काय असेल त्याची कल्पना करा!
In reply to कोडं सुटत नाही बुवा!! अगदी by बाळ सप्रे
साक्षात्कार झाला!!
In reply to म्हणजे `मूळ बोगदा' काय असेल त्याची कल्पना करा! by संजय क्षीरसागर
बेशर्त स्वीकृती करूनही आकलन
समजलं....
आणि नाही आवडलं....
In reply to समजलं.... by पिलीयन रायडर
मूळात `बोगदा' हा मानसिक लोच्या आहे
In reply to आणि नाही आवडलं.... by पिलीयन रायडर
तुम्हाला एमाराय ची भिती वाटते
In reply to मूळात `बोगदा' हा मानसिक लोच्या आहे by संजय क्षीरसागर
एमारायच्या भीतीचा प्रश्न नाहीये ओ!
In reply to तुम्हाला एमाराय ची भिती वाटते by कवितानागेश
पण मी भितीबद्दल विचारले होते.
In reply to एमारायच्या भीतीचा प्रश्न नाहीये ओ! by संजय क्षीरसागर
तुम्हाला दिसतोयं अनुभव
In reply to पण मी भितीबद्दल विचारले होते. by कवितानागेश
मी नेणार नाही हो तुम्हाला
In reply to तुम्हाला दिसतोयं अनुभव by संजय क्षीरसागर
वा!
In reply to मी नेणार नाही हो तुम्हाला by कवितानागेश
विटेकर...ओ विटेकर....उठा!!!!
In reply to वा! by विटेकर
अवघड आहे.
'एका मळ्यात होती' चे पडसाद
सप्रे, धीस इज वेरी इंटरेस्टींग
In reply to 'एका मळ्यात होती' चे पडसाद by बाळ सप्रे
मुद्देसूद आणि चपखल.
In reply to सप्रे, धीस इज वेरी इंटरेस्टींग by संजय क्षीरसागर
सहमत
In reply to मुद्देसूद आणि चपखल. by कवितानागेश
लिमाऊजेट ...
सहमत
In reply to लिमाऊजेट ... by विटेकर
हे मला काही कळलं नाही पण ..
हे बाकी करेक्टायं!
In reply to हे मला काही कळलं नाही पण .. by चौकटराजा
पाकृचा फोटो नसल्याने बाद ठरली
हीच पाकृ
In reply to पाकृचा फोटो नसल्याने बाद ठरली by सूड
@अंडी-घालून कशी करता येईल?>>
In reply to हीच पाकृ by पैसा
ओ बुवा
In reply to @अंडी-घालून कशी करता येईल?>> by अत्रुप्त आत्मा
'ब्रह्मांड' आठवले.
In reply to ओ बुवा by पैसा
(No subject)
In reply to ओ बुवा by पैसा
अंडीच तर घातलीयेत की गं...
In reply to हीच पाकृ by पैसा
जरा बोगद्यातुन बाहेर आलात की
तू तुझ्या चौकटीत जगत नसलास
In reply to जरा बोगद्यातुन बाहेर आलात की by सुहास..
अप्रतिम ठिकाण
शेवटून दुसर्या फोटोचा एक्सिफ
In reply to अप्रतिम ठिकाण by स्पा
नवीन भयकथा?
In reply to शेवटून दुसर्या फोटोचा एक्सिफ by सूड
शिवाय १७ व्या फोटोतला
In reply to शेवटून दुसर्या फोटोचा एक्सिफ by सूड
चांगलं लिहिताय
In reply to शिवाय १७ व्या फोटोतला by बॅटमॅन
एक प्रश्न!!
In reply to चांगलं लिहिताय by पैसा
चांगला प्रश्न विचारलास
In reply to एक प्रश्न!! by सूड
पाणिग्रहणाविषयीही असेच म्हणता
In reply to चांगला प्रश्न विचारलास by पैसा
म्हणा हवें तर
In reply to पाणिग्रहणाविषयीही असेच म्हणता by बॅटमॅन
पैसातै, साक्षात
In reply to म्हणा हवें तर by पैसा
अर्रर्र!
In reply to पैसातै, साक्षात by हाडक्या
चानीचो वाटो
In reply to अर्रर्र! by पैसा
काय झेपलं नाही.
In reply to म्हणा हवें तर by पैसा
मराठीत सांगू?
In reply to काय झेपलं नाही. by बॅटमॅन
हा हा हा, ओक्के. धन्स!
In reply to मराठीत सांगू? by पैसा
असहमत.
In reply to मराठीत सांगू? by पैसा
दुरुस्ती...
In reply to असहमत. by प्रभाकर पेठकर
हां, रैट्ट.
In reply to असहमत. by प्रभाकर पेठकर
ओ काका
In reply to असहमत. by प्रभाकर पेठकर
काय झेपलं नाही.
In reply to काय झेपलं नाही. by बॅटमॅन
अहो, अधनंमधनं होतं असं. सारखं
In reply to काय झेपलं नाही. by हाडक्या
भा. पो.
In reply to अहो, अधनंमधनं होतं असं. सारखं by बॅटमॅन
कधी संपणार हा बोगदा ?
भलताच इंटरेस्टींग प्रश्न आहे!
In reply to कधी संपणार हा बोगदा ? by जेपी
थोडं अधिक बोलतोय पण ..
In reply to भलताच इंटरेस्टींग प्रश्न आहे! by संजय क्षीरसागर
जर फक्त विडंबन बघितलं तर ते लेखाच्या वीस टक्के सुद्धा नसेल
In reply to थोडं अधिक बोलतोय पण .. by सुहास..
आला आला ! सुगंध आला एकदाचा.
In reply to भलताच इंटरेस्टींग प्रश्न आहे! by संजय क्षीरसागर
व्वा! काय छानर सग्रहण आहे!
संजय जी एक विचारु का ? इफ यु रीअली डोन्ट माइंड
विचारा
In reply to संजय जी एक विचारु का ? इफ यु रीअली डोन्ट माइंड by मारवा
संजय जी
मारवा.
In reply to संजय जी by मारवा
__/\__
In reply to मारवा. by अर्धवटराव
काय झाल? आता आणि एक स्वपिडन
In reply to संजय जी by मारवा
छे!
In reply to संजय जी by मारवा
माझा गैरसमज झाला !
In reply to छे! by संजय क्षीरसागर
मुक्तपीठवर अमेरिकेचा लेख आणि
"प्रगाढ" आणि "दीर्घकालीन" अभ्यास!!"
.. smileys/smiley
In reply to "प्रगाढ" आणि "दीर्घकालीन" अभ्यास!!" by निराकार गाढव
सन्माननीय मिपाकर्स
जाऊ द्या हो ताई, फार मनाला
In reply to सन्माननीय मिपाकर्स by सस्नेह