नास्तिक आणि विकृती
In reply to विकृती कुठे दिसेना ? by सुहास..
In reply to आपली शंका रास्त आहे. विकृती by arunjoshi123
In reply to हे गाणे एका ...तोवर by सुहास..
In reply to उगा .. by सुहास..
In reply to आपणांस या विषयावर चर्चा by arunjoshi123
In reply to उगा .. by सुहास..
पण मिपावर जरा नवीन काहीतरी येवु द्या राव !!आपल्या स्वतःच्या प्रतिसादात तुम्ही येथल्या दोन पकाऊ चर्चा सांगीतल्या आहेत. १. देव कशाला म्हणावे? वा देव भेटला केव्हा म्हणावे? आणि २. देव आहे कि नाही? ------------------------- मी मांडलेला विषय वेगळा आहे. यात देव देव असे १०० जागी लिहिले असले तरी देव चर्चेच्या केंद्रस्थानी नाही. चर्चेच्या केंद्रस्थानी मानवी मूल्ये आहेत. तुमचं आणि माझं वागणं आहे. देव काय आहे आणि देव आहे की नाही (किंवा विश्व का आहे आणि कसं आहे) या तांत्रिक्/वैज्ञानिक्/अध्यात्मिक दोन प्रश्नांची उत्तरे न देता वा नीट न देता देव मानावा का नाही अशी चर्चा आहे. त्या पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं हा फार असंभव प्रकार आहे म्हणून थेट तिसरा प्रश्न - "आता मी देव मानावा का? (किंवा हे जग सप्रयोजन आहे कि अप्रयोजित)" हा पहिला प्रश्न केला आहे.
In reply to आपली शंका रास्त आहे. विकृती by arunjoshi123
In reply to मला पटलेले सूत्र असे .. by चौकटराजा
याला निसर्गाच्या पातळीवर फारसा काही अर्थ नसावा.असू शकतं. बर्याच तत्त्वज्ञानाला निसर्गाच्या पातळीवर अर्थ नसावा. उदाहरणार्थ अर्थशास्त्रामधे अनंत तत्त्वज्ञाने विकसित झाली आहेत. पण अर्थशास्त्रच मूळात मूळ मानवी भावनांचा आदर करण्यासाठी (to respect needs of humanity) झाला आहे. तर जेव्हा मानवी भावनांना तिलांजली दिली जाते तेव्हा आर्थिक तत्त्वज्ञाने आहेत असे वाटू लागते. असो. मात्र ईश्वरविषयक तत्त्वज्ञानात एक नैसर्गिकता मला दिसते. ती मी ईथे नमूद करणे गरजेचे मानतो. आपण जर ईश्वर (त्याच्या तम तम भाव वाचक विशेषणांसह) नाही असे मानले तर ब्रह्मांडात मनुष्य स्वतः एक भौतिक वस्तू बनून राहतो. इतर अनेक वस्तुंसारखी अजून एक वस्तू. काही सब्-अॅटोमिक पार्टिकल्स, काही अणू, काही रेणू. अशा अणूंचे बनलेले संयुग. अशी अनेक संयुगे एकत्र येतात तेव्हा एक केमिकल कॉप्लेक्स बनते. तर माणूस म्हणजे तसा एक काँप्लेक्स. अशा संयुगसंचाचे (माणसांचे) भौतिक, रासायनिक गुणधर्म एक यादी बनवून लिहून काढता यावेत. (आज माहित नाहीत, पण कधी व्हायची शक्यता नाकारता येत नाही.). मग ज्याला आपण आपले सजीवत्व म्हणतो, जाणिव म्हणतो वा भावना म्हणतो त्या वास्तवात या किचकट गुणधर्मांना दिलेली सोपी नावे आहेत असे होते. त्यांना या जड गुणधर्मांपलिकडे अर्थ नाही. या सगळ्याचा स्रोत काय? तर निसर्गाचे नियम. सगळे लागलेले न लागलेले शोध. ते कसे ठरले? तर निसर्गाच्या नियमांनी. पुन्हा ते कसे बनले? तर निसर्गाच्या नियमांनी(देवानी जग बनवलं तर देवाला कोणी बनवलं चा सायंटिफिक इक्विवॅलेंट). भौतिकशास्त्रात ज्याला ऑब्जेक्ट म्हणून पाहतात तसे माणसाकडे पाहिले जाऊ शकते. ईथे मला नीट वाक्यरचना करता येत नाहीय, पण मनुष्याला अन्य वस्तुंप्रमाणेच एक वस्तु मानणे (तिचे केवळ गुणधर्म वेगळे) हे त्याला एक प्रकारे मृत ठरवल्यासारखं आहे. मग ईश्वराच्या (त्याच्या विशेषणांसहित) असण्यानं/मानण्यानं माणसाच्या अस्तित्वाला सजीवत्व येतं. अर्थ प्राप्त होतो. ईश्वराचं नक्की स्वरुप काय हे एक मिनिट बाजूला ठेऊ. पण ईश्वरनिर्मित मनुष्य हा 'आईबापांनी जन्म दिलेला पोर' वाटतो जेव्हा कि ईश्वरहिन विश्वातला मनुष्य हा 'कोण कोठल्या पर्वतावरून वाहत आलेला मनुष्याकृती दगड' वाटतो. आपण आज आपलं ऐहिक स्वरुप काय आहे हे अधिकाधिक उत्तमपणे जाणून घेऊ लागलो आहोत. परंतु, मूल:स्वरुपाचा प्रश्न हा स्रोताचा शोध घेतल्याशिवाय सुटणार नाही. आणि स्रोत निर्जीव असेल तर त्यात का म्हणून सजीवत्व यावे?
In reply to याला निसर्गाच्या पातळीवर by arunjoshi123
In reply to स्त्रोत निर्जीवच आहे, यावर by नानासाहेब नेफळे
In reply to त्या लिंकमधे जाणिवेच्या by arunjoshi123
In reply to निर्जीवातून सजीव उत्पन्न होऊ by बॅटमॅन
In reply to ठिक आहे. मी पटवून घेतो. तू by arunjoshi123
In reply to ठिक आहे. मी पटवून घेतो. तू by arunjoshi123
In reply to पेशींचे कार्य प्रोटीन by नानासाहेब नेफळे
In reply to पेशींचे कार्य प्रोटीन by नानासाहेब नेफळे
In reply to ता. क- पेशी जीवंत वा मृत नसते by नानासाहेब नेफळे
In reply to पेशींचे कार्य प्रोटीन by नानासाहेब नेफळे
जर पेशी दुरुस्त करता आली तर परत प्रोटीन सिँथेसीस सुरु होऊ शकते.अशी ब्रह्मवाक्ये म्हणजे गंमत आहे. दुरुस्त करणे वेगळे आणि जिवंत करणे वेगळे. मी बॅटमॅनला जो मूळ प्रशन विचारला तो सुलभ असावा म्हणून पेशीवर विचारला. जीत व मृत देहात काय फरक आहे असा तो प्रश्न आहे.
In reply to देव ही मानवनिर्मीत संकल्पना by विजुभाऊ
In reply to देव ही मानवनिर्मित संकल्पना by arunjoshi123
In reply to देव ही मानवनिर्मीत संकल्पना by विजुभाऊ
In reply to आणि by प्रसाद गोडबोले
In reply to कुठेतरी एखाद्या आम्लिय तळ्यात by नानासाहेब नेफळे
In reply to अशा एकूण सात थेर्या आहेत. by arunjoshi123
In reply to रिचर्ड डॉकिन्स यांचे "द by नानासाहेब नेफळे
In reply to कुठेतरी एखाद्या आम्लिय तळ्यात by नानासाहेब नेफळे
In reply to नेफळे , by प्रसाद गोडबोले
In reply to सहमत आहे. by arunjoshi123
In reply to तुम्ही इंटेलिजन्ट डीझाईनचे by नानासाहेब नेफळे
In reply to ईंटेलिजेंट डिजाईन म्हणजे काय by arunjoshi123
In reply to तुमचे रॉ सत्य कुठल्या ईझमकडे by नानासाहेब नेफळे
In reply to तुमचे रॉ सत्य कुठल्या ईझमकडे by नानासाहेब नेफळे
In reply to नानासाहेब, by arunjoshi123
In reply to ह्म्म. by नानासाहेब नेफळे
In reply to ह्म्म. by नानासाहेब नेफळे
अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन वा बौद्ध देव मानत नाहीत, तरीही त्या धर्माचे लोक फारच प्रगत आहेत.धर्माचे आणि अर्थिक प्रगतीचे कोणते कोरीलेशन नसावे. आर्थिक प्रगती वेगळ्याच कारणांनी ठरते. इतिहासात कधी काळी उलट अवस्था होती. अस्तिक भारत सगळ्या बौद्ध पौर्वात्य देशांपेक्षा प्रगत होता. --------------- जैन व बुद्ध धर्माच्या प्रस्थापकांनी कोणत्या आधारावर अनुयायांसाठी इष्ट मूल्ये ठरवली? निसर्गात कुठे शांती, भूतदया, क्षमा असते म्हणून ती पाहून गौतम बुद्धाने आपल्या अनुयायांना तसे वागायला सांगीतले? रँडमली? रँडमलीच असेल उद्या दुसरा एखादा नास्तिकी भलतेच काही तत्त्व सांगू शकतो. लेखात म्हटल्याप्रमाणे पापिलवार नास्तिकवादाचा शोधच मुळी अस्तिकांचे गैरवर्तन नियंत्रित करायला झाला. अस्तिकांना जगाचा स्रोत (देव) आणि मानवी मूल्ये यांच्यापैकी एकाचे चयन करायचा प्रसंग आला (वास्तविक यायला नको, पण माणसाचं खुरापाती डोकं आणतं असले प्रसंग) तेव्हा त्यांनी स्रोताचे चयन केले आणि मूल्ये धाब्यावर बसवली. त्यातून समाजात अनिष्टता माजली. तेव्हा या युगप्रवर्तक लोकांनी स्रोत नावाची संकल्पना फेकून देऊन फक्त मूल्ये असलेला समाज बनवायचा प्रयत्न केला. पण या सगळ्याने ज्या मूळ समाजात चांगली मूल्ये आली ती ईश्वर या संकल्पने मुळेच/पासूनच आली हे सत्य बाद होत नाही. उद्या (१००-२०० वर्षांनी) हा सारा इतिहासच मिटवला वा त्याचे उपयोजन मूल्ये शून्यवत मानले वा हे सगळं इरिलेवंट मानलं तर अस्तिक लोक पुन्हा तीच मूल्ये स्वीकारतील. अस्तिक लोकांचे इंटरप्रिटेशन चुकते, पण त्यांचा भाव बरोबर असतो. देवाला आहुती द्या. का? देव खुश व्हावा म्हणून. का? त्याची आमच्यावर दया असेल? का पाहिजे दया? कारण तो आमचे कल्याण करेल, आम्हाला सुखी ठेवेल. सुखी म्हणजे कसे? अन्न, पाणी, घर, धन, सुरक्षा, मनःशांती, कुपित होऊन नुकसान करणार नाही, इ. इ. नास्तिक लोकांचे इंटरप्रिटेशन अचूक असते. म्हणजे त्यांना माहित असलेली सत्ये ते सुसूत्र, सुसंगत जोडतात. पण त्यांचा भाव हा घोळाचा विषय आहे. त्यामुळे ते जी नविन व्यवस्था आणतील ती "आजच्या चष्म्याने" कशी दिसेल हे चिंताजनक आहे. -------------------
देवाच्या भीतीने लोक चांगले वागतात वा तिथुन नैतिक मुल्ये उचलतात हा फार भाबडा विचार तुम्ही करत आहात.आज जगात केवळ अस्तिकवादच आहे. आपण ईथे चांगले चांगले म्हणून दिलेल्या देशांची लोकसंख्या जगाच्या २०-२५% असावी. पण जगात नास्तिक आहेतच १०%. (ते ही सगळे पश्चिमेत.) आज अस्तिकांचं विकृतीकरण प्रचंड झालं आहे हे वास्तव आहे. ते कोणी अमान्य करू नये. पण याला पर्याय म्हणून येणारी नास्तिकी व्यवस्था जसजशी मोठमोठी होत जाईल, तसतशी त्यातही विकृतीकरण येणार. ते नैसर्गिक, टाळता न येणारं आहे. पण विषय तो नाही. आज अस्तिकांपेक्षा आम्ही कसे श्रेष्ठ, चांगले हे दाखवायच्या स्पर्धेत नास्तिक लोक जास्त चांगली मूल्ये पाळतात. पण माझा मुद्दा असा आहे कि जेव्हा असे प्रेशर नसेल, तेव्हा (जी नैसर्गिक अल्पशी विकृती असते ती दुर्लक्षिली तर) केवळ मूळ तत्त्वज्ञानच वांझोटे आहे म्हणून नास्तिकी व्यवस्था प्रचंड प्रमाणात विकृत निघू शकतात. कारण या लोकांना विचार करायला स्टार्टिंग पॉईंट (देव) नाही, स्टार्टिंग फिलॉसॉफी (शाश्वत मूल्यांची संकल्पना, निसर्गाच्या सर्व घटकांतील कनेक्ट, जीवनाचे काहीतरी प्रयोजन, फलानं, ढिमकानं.)नाही. मग ते लोक सृष्टीत कसं वागायचं हे स्वतः ठरवणार. आता मग अशा नास्तिक लोकांची एक कलेक्टिव फिलॉसोफी असेल का? तर हो. ती काय? देव नाही...बिग बँग्...उत्क्रांती...मास्लो...भौतिकशास्त्राचे नियम...सार्या शास्त्रांचे सारे नियम्...स्वतः केलेली सारी निरीक्षणे...त्यातून काढलेले अर्थ. इतकं जगण्यासाठी पुरेसं आहे का? नाही (नाही मधला ही ठेक्यात!)! कारण कितीही माहिती असली तरी काही निर्णय/मते पूर्णतः स्वयंभू ("व्यक्तिवर सोडलेले") उरतात. तांत्रिक दृष्ट्या ते निर्णय चूक वा बरोबर म्हणता येत नाहीत. मौलिक दृष्ट्या फटकन सांगता येतात. देवाच्या भितीनं लोक कसे वागतात याचं उदाहरण देण्यापूर्वी लोक स्वतः काय आहोत याचं असेसमेंट कसं करतात हे पाहणं औचित्यपूर्ण ठरेल. देव आहे नि असा असा आहे नि आपलं नि त्याचं नातं असं असं आहे हे मानल्यावर एक काँट्रक्ट निर्माण होतं. या कराराचा शक्यतो अव्हेर न करणारा माणूस तोच अस्तिक मानला पाहिजे. मी देव तर मानतो पण मी वागणार माझ्या मनाप्रमाणे, माझ्या स्वार्थासाठी, करार गेला तेल लावत म्हणणारास अस्तिक म्हणावे का? आज जगातले बरेच लोक स्वतःस अस्तिक मानतात, पण त्यांचा अस्तिकत्वाचा फार वेगळा असतो. देव या संकल्पनेच्या नावाखाली चार प्रथा पाळून हवे तसे वागणारास अस्तिक म्हणता येणार नाही. हस्तिदंती मनोर्यातील पिवळेधम्मक ब्रह्मतत्त्व खाली येऊन कोण्याच्या हातात पडेपर्यंत त्याचे गढूळ पाणी झालेले असते. तीच गत नास्तिकांची देखिल आहे. केवळ देव नाही म्हटल्याने पुरे होत नाही. पुढे काय? तुम्ही इतकी तत्त्वे, नियम, मूल्ये पाळता ते का? बिग बँग ते तुम्ही असा प्रवास झाला असेल, आणि आज एक भौतिक पदार्थ म्हणून तुमचे काही गुणधर्म असतील, तर ऐष करून घ्या ना. काय मागे पुढे बघता? तुम्हाला काय थांबवते? चोरी करू नये. का? तो एक पदार्थ, तुम्ही एक पदार्थ. आणा ना घरी. घ्या ना भोग. कायदा पाळावा. का? कायदा पाळावा असे दाखवावे. प्रत्यक्ष कधी पाळू नये. शेवटी आपण या जगातली आपापले गुणधर्म (म्हणजे भावना, वासना, इच्छा, इइ)असणारी एक इंडेपेंडेंट बाब आहोत. लक्षात घ्या, बरेच अस्तिक लोक दांभिक आहेत आणि त्यांची व्यवस्था वाईट आहे हे मला मान्यच आहे. पण लवकरच हे अस्तिकी दांभिकही नास्तिक होत आहेत (दांभिक लोक नास्तिक होणे सोपे असते, किंबहुना ते अलरडी नास्तिकच असतात.) नि उरलेले सगळे सामान्य लोकही हळूहळू नास्तिक होऊ लागले आहेत. -------------- मी मूळ लेखात दिलेला ईश्वरप्रणित "इंटेंडेड कनेक्टेड" कनेक्ट शब्द वापरला आहे. तो नसला तर (विचारी, विवेकी मनाचे) काय होते त्याचे उदाहरण द्यायचा प्रयत्न करतो. समजा एका नास्तिक स्त्रीसमोर बाळाला दूध पाजायचा प्रश्न आहे. ती काय काय विचार करू शकते पहा - १. बाळाला दूध पाजल्याने फिगर खराब होते का? झाली तर पुन्हा सामान्य होणे सोपे आहे का? २. बाळा सहा महिनेच दूध पाजवावे का? (१८० व्या दिवशी बटन बंद केल्यासारखे, सुस्कारा सोडत दूध बंद करणे.) ३. बाळाला पहिले सहा महिने देखिल दूध नाही पाजवले तर चालते. पावडर मिल्कवर अनेक बाळे वाढतातच. ४. माझे सौंदर्य जास्त महत्त्वाचे का बाळाला नैसर्गिक दूध देणे? ५. बाळाला नैसर्गिक रोग प्रतिकार क्षमता आईचे दूध न दिल्याने कमी होईल का? पण इतर आईचे दूध न मिळालेली बालके देखिल चिकार आजारी पडताना दिसतात. ६. बाळाला कोणते दूध दिले आहे याचा ५ वर्षांनी फरक पडत नाही. दहा वर्षांनी तर फार कमी. केवळ (ती ही फार अल्प) रिस्क आहे, म्हणू किती काळजी घ्यावी. ७. बाळाच्या दूधाच्या पावडर्स बाजारात परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत. मग माझे सौंदर्य महत्त्वाचे कि ...? ८. बाळाला दूध पाजवायला मला हरकत नाही. पण त्यासाठी नेहमी त्याच्याजवळ असावे लागते. मग मी माझे करीयर, इ काँप्रोमाईज करू का? का करू? ९. मी बाळापासून दूर राहिले तर त्याच्या मानसिक सौख्याचे काय? आई म्हणजे बाळाचा होलसोल फ्रेंड. १०. बाळ एकलकोंडे इ राहिले तर तो परिणाम नंतर इलाज करून काढून टाकता येतो का? ११. बाळाला दूध आणि दूधामुळे द्यावी लागणारी सोबत हे इतके क्लिष्ट प्रश्न आहेत कि त्यांच्यासाठी आयुष्यात बाळच नको हा पर्याय निवडावा का? १२. आता मी कमिट केले कि आवश्यक तितके काँप्रोमाइज करू तर माझी कमिटमेंट तितक काळ टिकेल काय? मंजे कोणी इतका पाँइंट बाय पाँइंट विचार करत नाही, पण सबकाँशस मनात हे सगळं चालतच असतं. In the United States, breastfeeding durations fall far short of these guidelines.5 In 2005, 74.2% of US infants were breastfed at least once after delivery, but only 31.5% were exclusively breastfed at age 3 months, and just 11.9% were exclusively breastfed at age 6 months. अमेरिकेत जगात सर्वात जास्त प्रमाणात नास्तिक आणि तत्सम लोक आहेत. ६ महिने फक्त ब्रेस्ट फीडींग करावे असे "मेडिकल कम्यूनिटी" म्हणते. वरचे आकडे काय सांगत आहेत? फक्त १२% केसेसमधे हा सल्ला मानला जातो (तरी अलिकडे या विषयावर तिकडे प्रचंड जनजागृती झाली आहे त्यानंतर). दुसरीकडे अस्तिक स्त्री काय विचार करेल? देवानं हे दूध बाळासाठी दिलं आहे. एक आई म्हणून मी ते त्याला पाजलं पाहिजे. तर मुद्दा ब्रेस्टफिडींगचा नाही, नास्तिक लोक जेव्हा "स्वनिर्णय" घेतात तेव्हा तो कितीतरी प्रकारचा आणि म्हणून पॉसिबली डेंजरस असू शकतो. इथे अत्यंत नाजूक विषय घेतला आहे, लहान बाळाचे अन्न, म्हणून निर्णय सारे योग्यच भासू शकतात. पण जेव्हा विषय वेगळे असतील तेव्हा निर्णय अधिक क्रूर भासू शकतील.
In reply to अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन by arunjoshi123
In reply to जैन व बुद्ध धर्माच्या by सुहास..
In reply to (No subject) by प्रसाद गोडबोले
In reply to जैन व बुद्ध धर्माच्या by सुहास..
In reply to ही सीमा फायनल? by arunjoshi123
In reply to नाही मुद्दा रेटायचाच असेल तर by सुहास..
.ढेकुण चावत असला तर त्याला मारलेच पाहिजे , असे दया क्षमा आणि शांती शिकविणार्या बौध्द धम्मातही लिहिलेले आहेहे कूठे लिहिले आहे ? धम्मपद मध्ये ? ह्याचा रेफरन्स मिळेल का ?
In reply to .ढेकुण चावत असला तर त्याला by प्रसाद गोडबोले
In reply to त्रिपिटिका >> कुंदक निकाय>> by सुहास..
In reply to जैन व बुद्ध धर्माच्या by सुहास..
In reply to अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन by arunjoshi123
In reply to अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन by arunjoshi123
In reply to ब्रेस्टफिडींगमुळे फिगर खराब by टवाळ कार्टा
In reply to तुमची फिगरची व्याख्या काय आहे by प्रसाद गोडबोले
In reply to नास्तिक = हरामखोर, चु*, by बॅटमॅन
In reply to हे मात्र खरंय by प्रसाद गोडबोले
In reply to हे मात्र खरंय by प्रसाद गोडबोले
In reply to कृपया खाली अंतरा आनंद यांना by arunjoshi123
In reply to ब्रेस्टफिडींगमुळे फिगर खराब by टवाळ कार्टा
In reply to तुमचं म्हणणं बरोबर आहे. दूध by arunjoshi123
In reply to अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन by arunjoshi123
In reply to अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन by arunjoshi123
दुसरीकडे अस्तिक स्त्री काय विचार करेल? देवानं हे दूध बाळासाठी दिलं आहे. एक आई म्हणून मी ते त्याला पाजलं पाहिजे.माणूस हा गाय, म्हैस, ई. प्राण्यांचे दुध काढून वापरतो. हे योग्य आहे कि अयोग्य यावर आस्तिक वादाचे काय मत आहे हे जाणून घ्यायला आवडेल. २) एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर आस्तिक वाद्यात मतभिन्नता असेल तर कसे वागायचे हे कोण ठरविणार? सर्व प्रश्नाची उत्तरे धार्मिक ग्रंथांत नसतात किंवा वेगवेगळ्या ग्रंथांत वेगळी असतात. तेंव्हा काय करावयाचे? उदा. घटस्फोट, भोजन, ई. प्रश्नांवर आस्तिक वाद्यात प्रचंड मतभिन्नता आहे.
In reply to आस्तिकत्व आणि नीतिमत्ता यात by नगरीनिरंजन
In reply to णॉट अगेण! by पैसा
In reply to मला भारतात ९९% टक्के अस्तिक by arunjoshi123
म्हणजे लौकिक अर्थाने तुमचे विधान खरे आहे, पण तांत्रिक अर्थाने नाही. केवळ मायबाप, समाज मानतो म्हणून ते कॉपी करतात. जे विश्वकारणाचा विचार करून अंततः देव मानतात ते अस्तिकआयला हे भारीच आहे. तुम्हीच ठरवणार की कोण आस्तिक आणि कोण नाही.
In reply to म्हणजे लौकिक अर्थाने तुमचे by प्रसाद१९७१
In reply to नास्तिक म्हणजे हरामखोर by बॅटमॅन
नास्तिक म्हणजे हरामखोर क्रिमिनल्स असे एकदा अगोदर मानले की पुढे तर्कटे काहीही लावता येतात हो.अगदी बरोब्बर. बहुतेक आस्तिक स्वतःची मते इतराम्वर लादत असतात. त्यांना देवादिकांबद्दल बिनतोड तर्कट सांगितले की ते देवाबद्दल वाईट ऐकायचे नाही . असे ऐकणे हे सुद्धा पाप आहे या नावाखाली स्वतःचा पराभव लपवतात. आणि पलायन करतात. सनातनी भाषेत सांगायचे तर पिषाच्चे साधकांना भक्तिमार्गात अडथळे आणण्यासाठी नास्तिकाना पाचारण करतात.
In reply to नास्तिक म्हणजे हरामखोर by विजुभाऊ
सनातनी भाषेत सांगायचे तर पिषाच्चे साधकांना भक्तिमार्गात अडथळे आणण्यासाठी नास्तिकाना पाचारण करतात.आणि हा उत्तुंग षटकार..! ;)
In reply to नास्तिक म्हणजे हरामखोर by विजुभाऊ
In reply to नास्तिक म्हणजे हरामखोर by बॅटमॅन
मी होईन नास्तिक तुम्ही व्हायचे आस्तिक एकमेकांना यथेच्छ ओरबाडायचे संस्थळाचा टीआरपी वाढवायचेसौजन्य - (चला ऑफीस आले आता...) बाय ऋषिकेश
In reply to बापरे प्रतिसादच वाचून डोकं गरगरतय by दिपक.कुवेत
In reply to मला वाचून समजला नाही. आता काय by प्यारे१
In reply to ईतका विचार करणं हेच by स्वप्नांची राणी
In reply to पण by तिमा
In reply to अनेको शतके धर्ममार्तंड स्वत by मृत्युन्जय
In reply to नक्की प्रश्न काय आहे ? by अंतरा आनंद
In reply to नक्की प्रश्न काय आहे ? by अंतरा आनंद
In reply to अगदी बरोबर .. by चौकटराजा
विकृती कुठे दिसेना ?