संकल्पना:
नास्तिक म्हणजे कोण? तर मूलतः ईश्वर न मानणारे. म्हणजे हे जग निर्मिणारी, चालवणारी कोणी शक्ती नाही नि तिला अभिप्रेत असे कोणते संकेत जगात नाहीत असे मानणारे लोक. हे लोक बाकी काही मानोत न मानोत, इतके तत्त्वज्ञान तरी जरूर मानतात.
आता अस्तिक म्हणजे कोण? तर देव म्हणून कोण्या शक्तीने जग निर्माण केले, ती ते चालवत आहे, ते कसे चालावे याचे तिला अभिप्रेत असे संकेत आहेत असे मानणारे लोक. हा देव नक्की काय आहे, कसा आहे आणि हे संकेत कोणते आहेत याबद्दल अस्तिकांत प्रचंड घोळ आहेत, भांडणे देखिल आहेत. पण असे काही ना काही देव नावाचे प्रकरण आहे हे मात्र नि:संशय आहे.
दोन भिन्न प्रकारच्या अस्तिकांमधील भांडणांचे स्वरुप मुख्यतः माझा देव, धर्म जास्त चांगला कि तुझी जास्त अशा प्रकारचे असते. परंतु तरीही सर्वसाधारणपणे ईश्वर हा अनादि आहे, अनंत आहे, दयाळू आहे, त्याचे नियंत्रण असते, इ इ ते मानतात. प्रत्येक गोष्टीचा संदर्भ ते ईश्वरामधे देतात. असं का, तसं का तर देवाला अभिप्रेत आहे म्हणून. देवाचा स्रोत, त्याच्या गुणधर्मांचा स्रोत इत्यादिंबद्दल नास्तिकांनी विचारले असताना ते सार्या भौतिक संकल्पना ईश्वरास गैरलागू आहेत म्हणून त्यांची बोळवण करतात वा वर्तुलीय संदर्भ देतात. आजपावेतो जगात हमेशा बहुतांश लोक अस्तिक राहिले आहेत नि त्यांचे वर्तन संतोषजनक राहिले आहे काय याचे उत्तर प्रत्येकजण भिन्नपणे देऊ शकतो. ते एक असो.
मूल्यांचा स्रोतः
परंतु सांप्रत (चांगल्या) मानवी मूल्यांचा स्रोत काय असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर पटकन देणे थोडे कठीण वाटते. गुणसूत्रे? ईश्वर? गुणसूत्रे ही मानवी सन्मूल्यांचा आधार मानायला जावीत तर एक दोन समस्या येतात. पहिली म्हणजे मूल्ये जितकी धडाधड बदलत आहेत तितक्या वेगाने जीन्स बदलत नाहीत. गेल्या शतकात प्रचंड वेगाने मूल्ये बदलली आहेत. अगदी व्यक्तिची चांगली मूल्ये म्हणजे काय ते त्याचं चांगुलपण किती हे देखिल खूप बदललं आहे. पण गेल्या शतकात मानवाचे जैविक म्यूटेशन्स होऊन ही मूल्ये बदलली आहेत म्हणणे धाडसाचे ठरेल. दुसरे म्हणजे मानवाची गुणसूत्रे काही लाख वर्षांपासून तीच आहेत. त्यांत मूल्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समाविष्ट आहेत असे म्हणायचे झाले तर मग मानवाची बरीच मूल्ये ही सनातन आहेत हे मान्य करावे लागेल. ही मूल्ये कोणती हे शोधावे लागेल आणि आपण स्वतःत जो मूल्यबदल करवून घेत आहोत तो प्राकृतिक आहे वा नाही हा प्रश्न अभ्यासावा लागेल. कोणता एखादा मूल्यबदल प्राकृतिक नसल्यास तो इष्ट आहे वा नाही याबद्दल समाजात (जसे जी एम फूडबद्दल होते तशी) चर्चा व्हायला हवी. ईश्वराचे म्हणाल तर अस्तिकांचे हे सोपे उत्तर आहे. नास्तिकांसाठी मात्र तो पर्याय नाही.
नास्तिकांसमोरची समस्या:
अस्तिक लोकांसाठी मूल्यस्रोत ही समस्या तितकीशी कठिण नाही, कारण ईश्वर नि ईश्वरप्रणित मूल्ये सनातन नि शाश्वत आहेत असे ते मानतात. कोणत्याही का चे उत्तर ते प्रचंड गोलगोल देतात. सन्मूल्यांचा स्रोत निश्चित माहित असला तरी त्याचा अर्थ अस्तिकांना नेहमी नीट लावता येत नाही. पण त्याची आवध्यकता क्वचित पडते.
प्रश्न उरतो नास्तिकांचा, त्यांची मूल्ये काय असावीत आणि का? मानवी शरीराची आणि मनाची एक जैविक घडण आहे. त्यातून (तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिली आहे त्यापलिकडे) सुटका नाही. मग उरते ते उत्स्फूर्त वर्तन. ते कोणत्या दिशेने असावे? मास्लोच्या पिरॅमिडचा पाया जैविक गरजांचा आहे. त्या पूर्ण करताना कोणती सीमा बाळगायची? कोणती नाही? मास्लोचे वरचे मनोरे जैविक आहेत कि नाहीत? ते पूर्ण करायचे कि नाही? आणि त्यासाठी कोणत्या स्तराला जायचं? त्याच्या सीमा स्वतःच आखायच्या? कोणत्या सूत्रांनी? हे वर्तन अस्तिकांचे मते "अग्राह्य (and in extreme case pervert)" ठरले तर?
अपवादः
अगदी अस्तिकवाद्यांच्या कळपात, ते ज्या इतक्या दयाघन इश्वराला मानतात, तिथे ईश्वरप्रणित संकेताप्रमाणे वागण्याचा अतिरेकी अट्टाहास आणि चूकीचा अन्वयार्थ, भलत्याच विकृती घेऊन आला आहे. मग जेव्हा पृथ्वीवर मूळातच ज्या तत्त्वज्ञानाचा आधारच "निर्मूल्यावस्था" आहे, ते किती विकृती घेऊन यायची संभावना आहे? अस्तिकांमधे आपले राजकीय, आर्थिक स्वार्थ साधणारे नास्तिक लपून बसलेले असतात. त्यांचा स्वतःचा देवावर, पापपुण्यावर विश्वास नसतोच, पण ते देवाच्या नावाखाली लोकांना नाडतात. नास्तिकांतही बरेच नास्तिक खरे नास्तिक नसतात. देव नाही तर मग जग कसं आहे याच्यावर त्यांची ४-५ वाक्यांनंतर ततपप होऊ लागते. स्वतःस नास्तिक भासवणारे लोक स्वतःच्या वाणिज्यिक हितांसाठी समाजास नास्तिक बनवत असू शकतात. उदाहरणार्थ, मुसलमानाची धर्मातली श्रद्धा गेली तरी तो (बाजारातली) दारू प्यायची जास्त असते. या चर्चेत मला हे अपवाद चर्चिणे टाळायचे आहे. (कोणाला हीच चर्चा करायची असेल तर अशुद्ध अस्तिकता वि शुद्ध नास्तिकता अशी करू नये. व्यवहारातल्या अशुद्ध नास्तिकता आणि अशुद्ध अस्तिकता यांचीच तुलना करावी) बहुतांश लोक त्यांचे त्यांचे तत्त्वज्ञान सरल, लौकिक अर्थाने पाळतात. या पार्श्वभूमीवर "सामान्य नास्तिक" इतर सामान्य व्यक्तिपेक्षा (आता आजच्या मूल्यांच्या परिप्रेक्ष्यात म्हणावे लागेल)गैरवर्तन करण्याची अधिक संभावना आहे का असे विचारले तर उत्तर सत्कृतदर्शनी हो असे दिसते.
इतिहासः
नास्तिकांचा, स्वतःस तसे म्हणवणार्या वा न म्हणवणार्या, इतिहास अस्तिकांपेक्षा खूप महान राहिला आहे. अगदी बौद्धिक, यशाच्या संबंधित बाबी वगळल्या तरी नास्तिक लोक इतिहासात केवळ वर्तनाच्या बाबतीत महान राहिले आहेत. बाबा आमटे यांचे उदाहरण घेता येईल. पण अशा नास्तिकांचे सृजन हे आजपावेतो अस्तिकांच्या व्यवस्थेतील अनर्थांना कंटाळून किंवा खास त्याला विरोध करण्यासाठी झाले आहे. पश्चिमेतही नास्तिकांनी केलेली लोकसेवा वाखाणण्यासारखी आहे. त्याला टेक्निकल अँगल कमी आणि सामाजिक अँगल जास्त राहिला आहे. नास्तिक राहिलेच आहेतच अत्यल्प. त्यामुळे नास्तिक म्हणजे "ईश्वर मानणारांच्या मांदियाळीतली लूट पाहून निषेध करणारा" इतकेच समजते. कधी कधी असे वाटते या लोकांना केवळ या लूटीविरोधात ओरडायचे होते, त्यात त्यांना ईश्वर आहे कि नाही या टेक्निकल आर्ग्युमेंट मधे काही रस नव्हता. पण समजा उद्या नास्तिकच जगात ९०-९५% झाले तर?
नाते:
अस्तिक लोक सारे काही(सजीव, निर्जीव) ईश्वरापासून आले आहे असे मानतात. साधारणतः त्यांना जगात सर्व गोष्टींत एक 'इंटेंडेड' कनेक्ट आहे असे म्हणायचे असते. अशा कनेक्टचे जे काही रुप आहे त्याचा त्यांना आदर असतो. नास्तिकाचे काय म्हणणे असते? एकूण जगच एक रँडम उद्भव आहे नि आपण त्यात एक रँडम घटक आहोत. आपण, आपले अस्तित्व, आपले गुणधर्म, मानवी देहामनाचे, जीवनांचे स्वरुप, हे सगळे रँडम ठरले आहे. हेच असंच सगळ्या आजूबाजूंच्या सगळ्या सजीव निर्जीव गोष्टींचं आहे. निसर्गाचे काही कारणांनी काही नियम आहेत आणि त्यामुळे हे सगळं असं आहे. मग नास्तिकाचं अशा इतरांशी ममत्व कोणत्या स्वरुपाचं असेल? असेल का? आत्मोन्नती, अव्याहत आत्मोन्नती हीच मानवी प्रेरणा असेल तर तिच्या आपूर्तिसाठी काही करताना कुठे थांबावं हे कसं ठरवावं?
भविष्यः
समजा नास्तिक लोकच (९०-९५%) जगात सर्वत्र आहेत. (असं मानणं फार अग्राह्य नाही. आजच लोक देव, धर्म फार नॉमिनल लेवलवर मानतात. त्यांना फार जास्त विचार करायला वेळ नाही. केवळ लेगसी आहे म्हणून स्वतःस अस्तिक म्हणतात. पण अस्तिकत्वाचे/धर्माचे तत्त्वज्ञान, नियम, अटी, इ इ शी लोकांचे नाते तुटत चालले आहे. एक-दोन पिढींनंतर देव मानतो म्हणणाराची मते देखिल अगदी उथळ असतील. काळाप्रमाणे आपल्या वर्तनात ईश्वराला जर कोणी नेहमी बाजूला ठेवत असेल तर त्याला ठिकपणे अस्तिक म्हणता येणार नाही.) समजा अस्तिक फार कमी आहेत, नाहीत किंवा असले तरी भाष्य करावं असं काही गैर वागत नाहीत. मग नास्तिकांची पहिली प्रेरणा -अस्तिकांचे जे काही वाइट आहे त्याचा विरोध करत राहणे - ती नसेल. त्यानंतर दुसरी प्रेरणा म्हणजे समाज, त्याचे वर्तन, त्याचा इतिहास. आता ते देखिल अभ्यासाचा विषय झाले, प्रश्नांकित झाले, तर काय होणार? नास्तिकांना आपल्या स्वतःच्या अशा मूल्यांची गरज पडणार. त्यातले पहिले मूल्ये येते वैज्ञानिक सत्ये! पण वैज्ञानिक सत्ये प्रत्यक्ष जीवनात सारे मार्गदर्शन करण्यासाठी पुरेशी नसतात.
वाचने
27671
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
विकृती कुठे दिसेना ?
आपली शंका रास्त आहे. विकृती
In reply to विकृती कुठे दिसेना ? by सुहास..
हे गाणे एका ...तोवर
In reply to आपली शंका रास्त आहे. विकृती by arunjoshi123
उगा ..
In reply to हे गाणे एका ...तोवर by सुहास..
आपणांस या विषयावर चर्चा
In reply to उगा .. by सुहास..
होय !!
In reply to आपणांस या विषयावर चर्चा by arunjoshi123
पण मिपावर जरा नवीन काहीतरी
In reply to उगा .. by सुहास..
हा हा हा..
In reply to आपली शंका रास्त आहे. विकृती by arunjoshi123
कॉलिन्ग स्पा!
मला पटलेले सूत्र असे ..
याला निसर्गाच्या पातळीवर
In reply to मला पटलेले सूत्र असे .. by चौकटराजा
स्त्रोत निर्जीवच आहे, यावर
In reply to याला निसर्गाच्या पातळीवर by arunjoshi123
त्या लिंकमधे जाणिवेच्या
In reply to स्त्रोत निर्जीवच आहे, यावर by नानासाहेब नेफळे
निर्जीवातून सजीव उत्पन्न होऊ
In reply to त्या लिंकमधे जाणिवेच्या by arunjoshi123
ठिक आहे. मी पटवून घेतो. तू
In reply to निर्जीवातून सजीव उत्पन्न होऊ by बॅटमॅन
अणुरेणू सोडून माणसात नक्की
In reply to ठिक आहे. मी पटवून घेतो. तू by arunjoshi123
पेशींचे कार्य प्रोटीन
In reply to ठिक आहे. मी पटवून घेतो. तू by arunjoshi123
अगदी अगदी....
In reply to पेशींचे कार्य प्रोटीन by नानासाहेब नेफळे
ता. क- पेशी जीवंत वा मृत नसते
In reply to पेशींचे कार्य प्रोटीन by नानासाहेब नेफळे
१. प्रोटीन सिंथेसिस आणि पेशी
In reply to ता. क- पेशी जीवंत वा मृत नसते by नानासाहेब नेफळे
जर पेशी दुरुस्त करता आली तर
In reply to पेशींचे कार्य प्रोटीन by नानासाहेब नेफळे
डोक्याचा 'उपक्रम' झाला राव!
देव ही मानवनिर्मीत संकल्पना
देव ही मानवनिर्मित संकल्पना
In reply to देव ही मानवनिर्मीत संकल्पना by विजुभाऊ
चला.
In reply to देव ही मानवनिर्मित संकल्पना by arunjoshi123
आणि
In reply to देव ही मानवनिर्मीत संकल्पना by विजुभाऊ
कुठेतरी एखाद्या आम्लिय तळ्यात
In reply to आणि by प्रसाद गोडबोले
अशा एकूण सात थेर्या आहेत.
In reply to कुठेतरी एखाद्या आम्लिय तळ्यात by नानासाहेब नेफळे
रिचर्ड डॉकिन्स यांचे "द
In reply to अशा एकूण सात थेर्या आहेत. by arunjoshi123
या पुस्तकात काय आर्गुमेंट आहे
In reply to रिचर्ड डॉकिन्स यांचे "द by नानासाहेब नेफळे
नेफळे ,
In reply to कुठेतरी एखाद्या आम्लिय तळ्यात by नानासाहेब नेफळे
सहमत आहे.
In reply to नेफळे , by प्रसाद गोडबोले
तुम्ही इंटेलिजन्ट डीझाईनचे
In reply to सहमत आहे. by arunjoshi123
ईंटेलिजेंट डिजाईन म्हणजे काय
In reply to तुम्ही इंटेलिजन्ट डीझाईनचे by नानासाहेब नेफळे
तुमचे रॉ सत्य कुठल्या ईझमकडे
In reply to ईंटेलिजेंट डिजाईन म्हणजे काय by arunjoshi123
ते सत्यवादी आणि तर्कवादी आहेत
In reply to तुमचे रॉ सत्य कुठल्या ईझमकडे by नानासाहेब नेफळे
नानासाहेब,
In reply to तुमचे रॉ सत्य कुठल्या ईझमकडे by नानासाहेब नेफळे
ह्म्म.
In reply to नानासाहेब, by arunjoshi123
हे बघा, नैतिकता कुठुन येते ते
In reply to ह्म्म. by नानासाहेब नेफळे
अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन
In reply to ह्म्म. by नानासाहेब नेफळे
जैन व बुद्ध धर्माच्या
In reply to अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन by arunjoshi123
(No subject)
In reply to जैन व बुद्ध धर्माच्या by सुहास..
+१
In reply to (No subject) by प्रसाद गोडबोले
ही सीमा फायनल?
In reply to जैन व बुद्ध धर्माच्या by सुहास..
नाही मुद्दा रेटायचाच असेल तर
In reply to ही सीमा फायनल? by arunjoshi123
.ढेकुण चावत असला तर त्याला
In reply to नाही मुद्दा रेटायचाच असेल तर by सुहास..
त्रिपिटिका >> कुंदक निकाय>>
In reply to .ढेकुण चावत असला तर त्याला by प्रसाद गोडबोले
ओके
In reply to त्रिपिटिका >> कुंदक निकाय>> by सुहास..
माणसाला निस्वार्थी बनवणारे
In reply to जैन व बुद्ध धर्माच्या by सुहास..
तद्दन निरर्थक नास्तिकद्वेष्टा
In reply to अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन by arunjoshi123
ब्रेस्टफिडींगमुळे फिगर खराब
In reply to अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन by arunjoshi123
तुमची फिगरची व्याख्या काय आहे
In reply to ब्रेस्टफिडींगमुळे फिगर खराब by टवाळ कार्टा
नास्तिक = हरामखोर, चु*,
In reply to तुमची फिगरची व्याख्या काय आहे by प्रसाद गोडबोले
हे मात्र खरंय
In reply to नास्तिक = हरामखोर, चु*, by बॅटमॅन
अगदी अगदी...जे प्रूव्ह करायचे
In reply to हे मात्र खरंय by प्रसाद गोडबोले
कृपया खाली अंतरा आनंद यांना
In reply to हे मात्र खरंय by प्रसाद गोडबोले
बादरायण संबंध आहे खरा. पण
In reply to कृपया खाली अंतरा आनंद यांना by arunjoshi123
तुमचं म्हणणं बरोबर आहे. दूध
In reply to ब्रेस्टफिडींगमुळे फिगर खराब by टवाळ कार्टा
म्हणजे नास्तिक बायकांना पोरे
In reply to तुमचं म्हणणं बरोबर आहे. दूध by arunjoshi123
माझ्या सबब प्रतिसादातले
In reply to अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन by arunjoshi123
१)
In reply to अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन by arunjoshi123
>>म्हणजे मूल्ये जितकी धडाधड
@अजो - भारतात तर ९९% आस्तिक
आस्तिकत्व आणि नीतिमत्ता यात
णॉट अगेण!
In reply to आस्तिकत्व आणि नीतिमत्ता यात by नगरीनिरंजन
चर्चा शुद्ध वैज्ञानिक ठेवायचा
In reply to णॉट अगेण! by पैसा
मला भारतात ९९% टक्के अस्तिक
म्हणजे लौकिक अर्थाने तुमचे
In reply to मला भारतात ९९% टक्के अस्तिक by arunjoshi123
नाय हो साहेब. ठरवणार तुम्हीच.
In reply to म्हणजे लौकिक अर्थाने तुमचे by प्रसाद१९७१
नास्तिक म्हणजे हरामखोर
नास्तिक म्हणजे हरामखोर
In reply to नास्तिक म्हणजे हरामखोर by बॅटमॅन
सनातनी भाषेत सांगायचे तर
In reply to नास्तिक म्हणजे हरामखोर by विजुभाऊ
पण मग अंनिसवाले सगळे नास्तिक
In reply to नास्तिक म्हणजे हरामखोर by विजुभाऊ
कॉलिंग ऐंशीएंट एलियन्स टीम
In reply to नास्तिक म्हणजे हरामखोर by बॅटमॅन
काय योगायोग आहे!
बापरे प्रतिसादच वाचून डोकं गरगरतय
@ दीपक : बरे केलेत. तसाही तो
In reply to बापरे प्रतिसादच वाचून डोकं गरगरतय by दिपक.कुवेत
मला वाचून समजला नाही. आता काय
द्यायचा सोडून.
In reply to मला वाचून समजला नाही. आता काय by प्यारे१
ईतका विचार करणं हेच
असं नस्तंय वो आक्का.
In reply to ईतका विचार करणं हेच by स्वप्नांची राणी
पण
कोणत्या संदर्भात चर्चा करायची
In reply to पण by तिमा
फार क्लिष्ट लेख होता समजला नाही.
अनेको शतके धर्ममार्तंड स्वत
+१
In reply to अनेको शतके धर्ममार्तंड स्वत by मृत्युन्जय
नक्की प्रश्न काय आहे ?
लेखाच्या मर्माला हात घालणारा
In reply to नक्की प्रश्न काय आहे ? by अंतरा आनंद
अगदी बरोबर ..
In reply to नक्की प्रश्न काय आहे ? by अंतरा आनंद
>>मानव हा फार दुतोंड्या
In reply to अगदी बरोबर .. by चौकटराजा