मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उंबरठा नसलेले घर - २

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कां कोण जाणे पण परत उंबरठा बांधायची हिंमतच होत नाहीये ---- न जाणो ती अंगणातली फुलदाणी घरात परत आलीचं नाही तर?! ---- मग वाटतं बरं झालं उंबरठा वाहून गेला कच्चाच होता नाहीतरी ---- तुझी डायरी तेवढी बाहेर काढून वाचायची अनिवार इच्छा होतेय किमान ती अलमारी तरी शांत होईल... एकदाची ! ---- देवघरासमोरच्या समईत तेल घातले वाटले ज्योतीची घालमेल थांबेल पण... ---- काल नाही समजले पण त्या उंबरठ्याबरोबर "शुभ - लाभ" लिहीलेल्या रांगोळीच्या ओळीही वाहून गेल्या हे आज लक्षात आले ---- पावसाची वाट बघतोय काल रात्रीपासून पडलाचं नाहीये ---- तुझी डायरी वाचतांना कां कोण जाणे सारखं धुक दाटतयं डोळ्यांसमोर ---- बरं झालं उंबरठा वाहून गेला कच्चाच होता नाहीतरी |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०७/०७/२०१४) उंबरठा नसलेले घर - १

वाचने 3616 वाचनखूण प्रतिक्रिया 14