उंबरठा नसलेले घर - २
लेखनविषय:
काव्यरस
कां कोण जाणे पण परत
उंबरठा बांधायची हिंमतच
होत नाहीये
----
न जाणो ती अंगणातली
फुलदाणी घरात परत
आलीचं नाही तर?!
----
मग वाटतं बरं झालं
उंबरठा वाहून गेला
कच्चाच होता नाहीतरी
----
तुझी डायरी तेवढी
बाहेर काढून वाचायची
अनिवार इच्छा होतेय
किमान ती अलमारी तरी
शांत होईल... एकदाची !
----
देवघरासमोरच्या समईत
तेल घातले
वाटले
ज्योतीची घालमेल थांबेल
पण...
----
काल नाही समजले
पण
त्या उंबरठ्याबरोबर
"शुभ - लाभ" लिहीलेल्या
रांगोळीच्या ओळीही
वाहून गेल्या
हे आज लक्षात आले
----
पावसाची वाट बघतोय
काल रात्रीपासून
पडलाचं नाहीये
----
तुझी डायरी वाचतांना
कां कोण जाणे
सारखं धुक दाटतयं
डोळ्यांसमोर
----
बरं झालं
उंबरठा वाहून गेला
कच्चाच होता नाहीतरी
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०७/०७/२०१४)
उंबरठा नसलेले घर - १
वाचने
3616
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
हेलावून टाकणारी कविता
In reply to हेलावून टाकणारी कविता by एस
अगदी हेच आणि असच.
जब्र्यादस्त
तू लई बेक्कार हायेस मिक्या.
निशब्द !!!
....
पुन्हा एकदा अतिशय सुरेख.
कशाला रे असल काहीतरी जीव घेणं
सुंदर !
हुरहुर लावणारं....तरीही
चरचरतेय ही कविता.....
मस्त रे मिका
मस्त रे मिका
पहिल्या कवितेपेक्षा जास्त छान