नवा भिडू..
लेखनविषय:
काव्यरस
मिपाकरांनी वसवलेला हा नेटका गाव..
घेतो आम्हा नेटसरुंच्या मनाचा ठाव..
इथे कोणासही नाही पावभाजी ची हाव..
सगळे मारतात फक्त मिसळीवरच ताव..
इथे सगळ्यांमधे दिसतोय आपुलकीचाच भाव..
नाही दिसत कुठे आत्मप्रौढीचा प्रभाव..
मझ्यासारख्या नवख्याला सांभाळून घ्या राव..
चुकलो माकलो तर घालू नका घाव..
मला बघायला आवडतील तुमचे हाव-भाव..
मला आपले म्हणा.. निखळानंद माझे नाव !
- मी इथे नवीन सभासद आहे. इथल्या कोणाशीही मझी ओळख नाही. इथल्या मोजक्याच गोष्टी वाचल्यायत. पण पहाताक्षणी प्रेमात पडतात तसे मी लगेचच इथला सभासद होण्याकडे ओढला गेलोय ! आशा आहे इथला प्रवास रम्यच होइल...
वाचने
5339
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
निखळानंद,निखळानंद,
सांगा बर तुम्हाला कसले कसले छंद
तुमच्या स्वर्गीय काव्याने झालो आम्ही धुंद
तुमच्या लेखणीतुन भेटो आम्हा राधा आणि मुकुंद
इथे उगा कचरा नका टाकु,नाहीतर प्रतिसाद होतील बंद
मिपा सदस्यांना समजू नका बावळट आणि मंद
(सगळाच आनंद )पैजारबुवा,
In reply to निखळानंद,निखळानंद, by ज्ञानोबाचे पैजार
ज्ञानोबाचे पैजार..
झालो मी बेजार..
तुमची ही प्रतिक्रीया..
कवतिक म्हणावी की मार ??
मिपावर स्वागत हो भौ! तुमच्या आगमनाची वर्दी आवडली. पैजारबुवांची प्रतिक्रिया प्रातिनिधिक आहे म्हणा! इथे काहीही 'दिल पे मत ले यार'! मिपाकरांचं कवीलोकांवर जास्त प्रेम आहे. चेष्टामस्करी तर होणारच, होऊ द्या खर्च, मिपा आहे घरचं! बघता काय, सामील व्हा, वगैरे वगैरे नेहमी लक्षात असू द्या म्हणजे झालं!
पैसा प्रसन्न झाला हे बरं झालं ! धीर चेपला ..
निखळानंद आपले मिपावर स्वागत ……. पै ताई म्हणाली त्याप्रमाणे इथे काही मनावर नाही घ्यायचे, जे क्षण अनुभवतो आनंदाचे, दुःखाचे, हास्याचे, चिडायचे, खादाडी आणि भटकंतीचे शब्दातुन मिपाचरणी वाहायचेआणि निश्चिंत व्हायचे … बाकी सब अपने भिडू लोग संभाल लेंगे… *new_russian*
लिल्याssssssssss. =)) .. =)) .. =))
In reply to लिल्याssssssssss. .. .. by अत्रुप्त आत्मा
चेहर्या वर अरे लब्बाडा कसा पकडला अशे भाव सपस्ठ दिसतात काय?
परकाया प्रवेश की नविन रे हा अवतार
लिल्या लोक तुला आता करतील बेजार
लीलाधर म्हणा किंवा निखळानंद,
काव्याच्या नावाने आनंदीआनंद !
येता निखळ वहिनी कट्ट्यावरी
चचा काव्य-साय-लीला धरी..
'लिल्याssssssssss' मधून मला झालेला अर्थबोधः
माझ्या कवितेचे एक एक कडवे म्हणजे जणू लिलि चे फूल !
आणि अशी अनेक सुन्दर कडवी पाहून सहज तोंडातून निघालेले आनंदोद्गार !
सगळे माझ्या कवितेतल्या काव्याला 'आनंदी-आनंद' म्हणू लागल्या मुळे मी हा अर्थ काढला !
त्यातून 'दिल पे मत ले यार' वगैरे मौलिक सल्ले मला मिळालेले असल्यामुळे मी ते लगेच अंमलात आणले.
असो.
मी माझ्या आगाऊ(आगमनपर)सूचनावजा चारोळ्यांना (किंवा आठ-दाहोळ्यांना) इथे 'काव्य' प्रकारात छापले ही माझीच चूक होती म्हणा..
माझ्या ओळखी बद्दलही काही गैरसमज झालेले दिसतायत.
मला लखोबा लोखंडे म्हणा हवं तर पण परकाया प्रवेश किंवा तत्सम लीला करणारा 'तो' मी नव्हेच !
पण वरील सगळ्याच प्रतिक्रीया वाचून मला निखळ आनंद मिळाला हे खरेच ! *smile*
ओल्ड वाईन इन न्यू बॉटल?? असो, जे काही असेल. स्वागत आहे. फक्त रोज रतीब घालू नका, जिलब्यांचे नजराणे देतात मग मिपाकर !! ;)
In reply to ओल्ड वाईन इन न्यू बॉटल?? असो, by सूड
आमचा रतीब आणि तुमच्या जिलब्या..
असे 'सूडा'चे राजकारण रंगले तर मजा येईल की *biggrin*
In reply to आमचा रतीब आणि तुमच्या जिलब्या by निखळानंद
लिल्या =)) बास आता!!! :p
In reply to लिल्या बास आता!!! by अत्रुप्त आत्मा
बुवा हा लिल्या वाटत नाही हो!! ह्या कोणतरी भलताच दिसताहां माका!! ;)
In reply to लिल्या बास आता!!! by अत्रुप्त आत्मा
मला आता प्रकट होण्याची इच्छा होतीये..
पण मी 'लीला'धर नसल्याने अश्या लीला झेपणार कश्या ?
In reply to गैर समज बास आता !! by निखळानंद
>>मला आता प्रकट होण्याची इच्छा होतीये..
व्हा बरं पट्टदिशी प्रकट !! *acute*
मिपावर स्वागत
निखळानंद महाराज, कशाला मिपा करांना जाग करता आहात. कोण आहात ते आमच्या गुरु़जीनी सांगितलेल आहे. ते बरोबर असेल तर बरोबर म्हणा व प्रकट व्हा व जर ते चुक असेल तर स्वताहुन प्रकट व्हा. उगाच मिपाकर जागे झाले तर तुमचा मोकलाया दाही दिशा करतील..........
निखळानंद,निखळानंद,