मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नवा भिडू..

निखळानंद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मिपाकरांनी वसवलेला हा नेटका गाव.. घेतो आम्हा नेटसरुंच्या मनाचा ठाव.. इथे कोणासही नाही पावभाजी ची हाव.. सगळे मारतात फक्त मिसळीवरच ताव.. इथे सगळ्यांमधे दिसतोय आपुलकीचाच भाव.. नाही दिसत कुठे आत्मप्रौढीचा प्रभाव.. मझ्यासारख्या नवख्याला सांभाळून घ्या राव.. चुकलो माकलो तर घालू नका घाव.. मला बघायला आवडतील तुमचे हाव-भाव.. मला आपले म्हणा.. निखळानंद माझे नाव ! - मी इथे नवीन सभासद आहे. इथल्या कोणाशीही मझी ओळख नाही. इथल्या मोजक्याच गोष्टी वाचल्यायत. पण पहाताक्षणी प्रेमात पडतात तसे मी लगेचच इथला सभासद होण्याकडे ओढला गेलोय ! आशा आहे इथला प्रवास रम्यच होइल...

वाचने 5339 वाचनखूण प्रतिक्रिया 18

निखळानंद,निखळानंद, सांगा बर तुम्हाला कसले कसले छंद तुमच्या स्वर्गीय काव्याने झालो आम्ही धुंद तुमच्या लेखणीतुन भेटो आम्हा राधा आणि मुकुंद इथे उगा कचरा नका टाकु,नाहीतर प्रतिसाद होतील बंद मिपा सदस्यांना समजू नका बावळट आणि मंद (सगळाच आनंद )पैजारबुवा,

पैसा Sat, 06/28/2014 - 17:11
मिपावर स्वागत हो भौ! तुमच्या आगमनाची वर्दी आवडली. पैजारबुवांची प्रतिक्रिया प्रातिनिधिक आहे म्हणा! इथे काहीही 'दिल पे मत ले यार'! मिपाकरांचं कवीलोकांवर जास्त प्रेम आहे. चेष्टामस्करी तर होणारच, होऊ द्या खर्च, मिपा आहे घरचं! बघता काय, सामील व्हा, वगैरे वगैरे नेहमी लक्षात असू द्या म्हणजे झालं!

भावना कल्लोळ Sat, 06/28/2014 - 18:06
निखळानंद आपले मिपावर स्वागत ……. पै ताई म्हणाली त्याप्रमाणे इथे काही मनावर नाही घ्यायचे, जे क्षण अनुभवतो आनंदाचे, दुःखाचे, हास्याचे, चिडायचे, खादाडी आणि भटकंतीचे शब्दातुन मिपाचरणी वाहायचेआणि निश्चिंत व्हायचे … बाकी सब अपने भिडू लोग संभाल लेंगे… *new_russian*

निखळानंद Mon, 06/30/2014 - 10:57
'लिल्याssssssssss' मधून मला झालेला अर्थबोधः माझ्या कवितेचे एक एक कडवे म्हणजे जणू लिलि चे फूल ! आणि अशी अनेक सुन्दर कडवी पाहून सहज तोंडातून निघालेले आनंदोद्गार ! सगळे माझ्या कवितेतल्या काव्याला 'आनंदी-आनंद' म्हणू लागल्या मुळे मी हा अर्थ काढला ! त्यातून 'दिल पे मत ले यार' वगैरे मौलिक सल्ले मला मिळालेले असल्यामुळे मी ते लगेच अंमलात आणले. असो. मी माझ्या आगाऊ(आगमनपर)सूचनावजा चारोळ्यांना (किंवा आठ-दाहोळ्यांना) इथे 'काव्य' प्रकारात छापले ही माझीच चूक होती म्हणा.. माझ्या ओळखी बद्दलही काही गैरसमज झालेले दिसतायत. मला लखोबा लोखंडे म्हणा हवं तर पण परकाया प्रवेश किंवा तत्सम लीला करणारा 'तो' मी नव्हेच ! पण वरील सगळ्याच प्रतिक्रीया वाचून मला निखळ आनंद मिळाला हे खरेच ! *smile*

निश Tue, 07/22/2014 - 18:13
निखळानंद महाराज, कशाला मिपा करांना जाग करता आहात. कोण आहात ते आमच्या गुरु़जीनी सांगितलेल आहे. ते बरोबर असेल तर बरोबर म्हणा व प्रकट व्हा व जर ते चुक असेल तर स्वताहुन प्रकट व्हा. उगाच मिपाकर जागे झाले तर तुमचा मोकलाया दाही दिशा करतील..........