मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नवा भिडू..

निखळानंद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मिपाकरांनी वसवलेला हा नेटका गाव.. घेतो आम्हा नेटसरुंच्या मनाचा ठाव.. इथे कोणासही नाही पावभाजी ची हाव.. सगळे मारतात फक्त मिसळीवरच ताव.. इथे सगळ्यांमधे दिसतोय आपुलकीचाच भाव.. नाही दिसत कुठे आत्मप्रौढीचा प्रभाव.. मझ्यासारख्या नवख्याला सांभाळून घ्या राव.. चुकलो माकलो तर घालू नका घाव.. मला बघायला आवडतील तुमचे हाव-भाव.. मला आपले म्हणा.. निखळानंद माझे नाव ! - मी इथे नवीन सभासद आहे. इथल्या कोणाशीही मझी ओळख नाही. इथल्या मोजक्याच गोष्टी वाचल्यायत. पण पहाताक्षणी प्रेमात पडतात तसे मी लगेचच इथला सभासद होण्याकडे ओढला गेलोय ! आशा आहे इथला प्रवास रम्यच होइल...

वाचन 5339 प्रतिक्रिया 0