मनमोहक बाली : ०२ : उलुवातु मंदिर आणि केचक नृत्यनाट्य
... आम्ही दोन एक तासाने सुरू होणार्या भटकंतीआधी थोडा आराम करायला आडवे झालो!
ताजेतवाने होऊन हॉटेलच्या स्वागतकक्षात आलो. कार्तिक तयारच होता. आम्ही फेरफटक्यासाठी बाहेर पडलो. पाच मिनिटांचा प्रवास झाला असेल नसेल, या कलाकृती दिसल्या आणि थांबून फोटो काढल्याशिवाय राहवले नाही...
एका प्रवेशव्दाराजवळच्या कलाकृती
गरूडावर आरूढ विष्णू
असुर
पुरा उलुवातु (उलुवातु मंदिर)
बालीच्या दक्षिणेला अंड्याच्या आकाराचा एक छोटा भूभाग जिंबारन नावाच्या जमिनीच्या चिंचोळ्या पट्टीने मुख्य बेटाला जोडलेला आहे. हे दोन्ही भूभाग मिळून बुखित व्दीपकल्प बनलेले आहे. बुखितच्या पूर्व टोकावर भारतीय महासागराच्या किनार्यावर पुरा उलुवातु उर्फ उलुवातु मंदिर आहे. हे मंदिर बाली बेटाच्या किनार्यांवर असलेल्या मुख्य नऊ दिशादर्शक मंदिरांपैकी एक आहे. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या या मंदिराचा एंपू कुतुरान नावाच्या जावातल्या एका ऋषीने अकराव्या शतकात जीर्णोद्धार केला. त्यानंतर १४८९ मध्ये पूर्व जावावरून आलेल्या डांग ह्यांग निरर्थ या नावाच्या ऋषीने तेथे पद्मासन देवळांची स्थापना केली. याच ऋषीने बालीतील देवळांत पद्मासन (निराकार "संघयांग विदी वसा" किंवा "अचिंत्य" या देवासाठी कलापूर्ण दगडी कोरीवकाम असलेले कमलासन) स्थापन करण्याची प्रथा पाडली. निरर्थ ऋषीला उलुवातुमध्ये मोक्षप्राप्ती झाली असे सांगितले जाते. बालीत जागोजागी असलेल्या पद्मासनांना धार्मिक महत्त्व तर आहेच. पण त्यांच्यावरील कलापूर्ण कोरीवकामांमुळे ती कलाकृती म्हणूनही प्रेक्षणीय आहेत...
...
...
पद्मासनांचे विविध प्रकार
वानरसेना
मंदिराजवळचा कडा, सफेद वाळूचा किनारा आणि त्याच्या पायथ्याला धडका देणारा भारतीय दुग्ध-महासागर
व्दारपाल गणेश
अजून एक गणेशमूर्ती आणि इतर कोरीवकाम
असुर व्दारपाल
अंतःपुराचे व्दार
मंदिराच्या चौथर्याचा वाहक आणि रक्षक
खांबावरचे कोरीवकाम
दगडी खिडकीवरचे कोरीवकाम
कड्यालगत असलेली एक पायवाट
पायवाटेवरून दूरवरून दिसणारे उलुवातु मंदिर आणि त्याचा कडा
मंदिराच्या कुसापर्यंत झीजलेला कडा
समुद्रात गिळंकृत होत जाणारा किनारा
केचक नृत्यनाट्य
उलुवातु मंदिराला संध्याकाळी भेट देण्याने अजून एक मोठा उद्देश सफल होतो. तो म्हणजे तेथे होणार्या केचक नृत्यनाट्याचा कार्यक्रम पाहणे. मंदिराशेजारच्या एका खड्या कड्याच्या टोकावर, वर मोकळे आकाश, मागे अथांग हिंदी महासागर आणि मावळतीला जाणारा सूर्य अशी जगावेगळी "नेपथ्य आणि प्रकाशयोजना" असलेल्या खुल्या रंगमंचावर हा कार्यक्रम सादर केला जातो!...
केचकचा खुला रंगमंच
खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहाचा एक भाग
व्दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात
सहकलाकार + वाद्यवृंद : एकावर एक फुकट ;)
वनवासात सीता आणि राम
सुवर्णमृगाच्या रूपातला मारीच दैत्य आणि राम
सीता लक्ष्मणाला रामाच्या मदतीला जायला सांगते
सीताहरण
जटायूवध
राम-लक्ष्मणाचा शोक
'आनोमान'चे (हनुमानाचे) आगमन
अशोकवनातील सीता
हनुमानाच्या मर्कटलीला
अशोकवनातील सीता-हनुमान भेट
सूर्याने योग्य टायमिंग साधून घेतलेला एक्झिट
वा!
In reply to वा! by नंदन
धन्यवाद !
अप्रतिम!!!!
वर्णन व फोटू सुंदर आहेत. येथे
In reply to वर्णन व फोटू सुंदर आहेत. येथे by रेवती
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
हां, मग ठीक आहे.
खूपच छान माहीती आणि फोटो.
नेहमी प्रमाणेच म्हणतो... झ-का
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बगदाद धोक्यातनेहमी प्रमाणेच म्हणतो... झ-का
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बगदाद धोक्यातफोटो आणि वर्णन दोन्ही आवडले.
मस्त फोटो. लन्कादहनाचा फोटो
मस्त....
खुप छान माहिती.
व्वा.
व्वा ! सध्या प्रवासवर्णनांची
आहाहाहाहाहाहाहा........! काय
In reply to आहाहाहाहाहाहाहा........! काय by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद !
अप्रतिम
केचक नाचाचे वर्णन पुर्वी
खूप छान लिहिलय..आम्ही काही
धन्यवाद !
अफाट!
मस्तच !! पुभाप्र.
सुरेख सहल.
इक्का, निव्वळ अप्रतिम प्रवास वर्णन आणि
काय सुंदर फोटो आहेत!!! आता तर
पूर्वरंगची हटकून आठवण आली.
उलुवातु मंदिर, केचक नृत्य,
In reply to उलुवातु मंदिर, केचक नृत्य, by प्रचेतस
धन्यवाद !
तिथले द्वारपालांचे चेहरे हे मला सिंहमुखाशी साधर्म्य असलेले वाटत आहेत. कदाचित इथल्या किर्तीमुखांवरून प्रेरणा घेऊन अशी शिल्पे घडवली जात असावीत.आमच्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरावरची ही कोरीव दगडी खिडकी बघा. किती सारखी.दक्षिणपूर्व आशियाच्या सगळ्याच देशांवर भारतिय संस्कृतीचा खोलवर प्रभाव आहे. हे केवळ विचारांचे आदानप्रदान किंवा व्यापारी संबद्ध नव्हते तर त्याकाळात तेथे जाऊन धर्म, राजसत्तेचा आणि कलेचा वारसा घेऊन जाणार्या दर्यावर्दी भारतियांचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्या देशांतील सर्व धर्मांना छेद देत जाणारा लोकजीवनात असलेला रामायण-महाभारताचा आणि संस्कृत भाषेचा प्रभाव असेच नाही तर तिथल्या जनतेत असलेले १०-१५% भारतीय Y-क्रोमोसोम्स हा पण त्या वस्तुस्थितीचा ठाम शास्त्रिय पुरावा आहे. या सर्व गोष्टी त्या देशांत, अगदी सद्या मुस्लीम असलेल्या देशांमध्येसुद्धा, ऐतिहासिक वारसा म्हणून सहजपणे आणि अभिमानाने सांगितल्या जातात आणि संग्रहालयांत जपून ठेवल्या जातात. स्वार्थी राजकारण, स्वतःबद्दलची कमीपणाची भावना (लो सेल्फ एस्टीम) किंवा तद्दन अज्ञान यामुळे भारतात दुर्दैवाने अगदी याविरुद्ध अवस्था आहे ! पंधराव्या शतकापासून भारतात व तेथे झालेल्या मुस्लीम आक्रमणांमुळे आणि नंतर पाश्चिमात्य वसाहतवादामुळे ही प्रक्रिया खंडली. वसाहतवाद संपल्यावर बदललेल्या समिकरणांमुळे ती प्रक्रिया पुनःस्थापीत करण्यात कोणालाच रस राहिला नव्हता. तरीसुद्धा तेथिल जनमानसावरचा तो ठसा अजूनही कायम आहे हे विशेष.In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद.
In reply to उलुवातु मंदिर, केचक नृत्य, by प्रचेतस
क्या बात है! बाली आणि
In reply to उलुवातु मंदिर, केचक नृत्य, by प्रचेतस
आपल्याकडे ..
In reply to आपल्याकडे .. by चौकटराजा
तसे बरेच ठिकाणी दिसते. अगदी
In reply to उलुवातु मंदिर, केचक नृत्य, by प्रचेतस
हे एक अजून अशक्य कोरीव काम.
आह्ह्हाहा अतिशय सुंदर फोटो
धन्यवाद !
जबरा प्रवासवर्णन तितक्याच
अप्रतिम!
मस्तच!
धन्यवाद !
सुंदर , मस्त , अप्रतिम .
In reply to सुंदर , मस्त , अप्रतिम . by म्हैस
धन्यवाद !
आत्ता जो भारत आहे तो
कड्यावरच्या मंदीराचा फोटो
वाचते आहे ही पण मालिका. अतिशय