मनमोहक बाली : ०१ : प्रस्तावना
===================================================================
मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)...
===================================================================
इंडोनेशिया
इंडोनेशिया हा एक जगावेगळा देश आहे... ५० लाख चौ किमी पाण्याच्या क्षेत्रात सर्व मिळून २० लाख चौ किमी जमिनीचे क्षेत्रफळ असलेल्या १७,००० पेक्षा जास्त बेटांनी तो बनलेला आहे. त्यातले सर्वात मोठे बोर्निओ नावाचे ७,४३,३३० चौ किमी क्षेत्रफळाचे आणि दोन कोटी लोकवस्ती असलेले जगातले तीन क्रमांकाचे बेट आहे तर अनेक लहान बेटे म्हणजे केवळ समुद्राच्या पाण्यातून जेमतेम काही सेंटिमीटर वर डोके काढणारी प्रवाळ बेटे आहेत. इंडोनेशियाच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या आचे प्रांताची (तोच तो, जो २६ डिसेंबर २००४ ला तेथे झालेल्या भूकंपामुळे आणि भारतच नव्हे आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलेल्या त्सुनामीच्या लाटांमुळे कुप्रसिद्ध झालेला भूभाग) सीमा भारतातील निकोबार बेटसमूहापासून केवळ २०० किलोमीटरच्या आसपास आहे तर पूर्वेकडच्या पापुआ या प्रांताची सीमा रेखांशांत पाहिली तर जपानच्या पूर्व सीमेच्या बरोबरीने उभी आहे ! हे पूर्वपश्चिम अंतर साधारण ५००० किमी चे आहे आणि त्यामुळे या देशात तीन स्थानीक प्रमाणवेळा आहेत. इंडोनेशियाच्या उत्तरेला असलेल्या समुद्रापलीकडे ब्रह्मदेश, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, चीन, दोन कोरिया, जपान, इत्यादी देशांची साखळी आहे; तर दक्षिणेकडे भारतीय महासागर आणि ऑस्ट्रेलिया खंडाचा जवळ जवळ दोन तृतियांश भाग आहे. इतका या देशाचा पूर्व ते पश्चिम आवाका आहे !
इंडोनेशिया (मूळ नकाशा जालावरून साभार)
गणेशाचे चित्र असलेली २०,००० इंडोनेशियन रुपियाची नोट (जालावरून साभार)
भारतिय नागरिकांना इंडोनेशियाच्या विमानतळावर अथवा बंदरावर पोहोचल्यावर ३० दिवसांचा पर्यटक "व्हिसा ऑन अरायव्हल" मिळतो. त्यासाठीच्या आवश्यक अटींची इंडोनेशियाच्या सरकारी संस्थळावरची माहिती खालीलप्रमाणे:
१. आगमनाच्या तारखेपासून कमीत कमी ६ महिने वैध असलेले पारपत्र.
२. परतीचे तिकीट
३. रोख व्हिसा फी: USD 25
टीपः व्हिसाचे नियम बदलू शकतात. प्रवासापूर्वी एंबॅसीत अथवा त्यांच्या संस्थळावर चौकशी करून त्यावेळेचे नियम माहीत करून घेणे आवश्यक आहे, हेवेसांन.
बाली
इंडिनेशीयाच्या बाली प्रांताचे अनेक विशेष आहेत, त्यातील काही महत्त्वाचे खालीलप्रमाणे: १. बालीच्या चाळीस लाख लोकसंख्येपैकी ८५% जनता हिंदू आहे. २. इंडोनेशियाच्या पर्यटन व्यवसायाच्या उत्पन्नात या छोट्या बेटाचा सिंहाचा वाटा आहे. ३. बाली बेट त्याचे नैसगिक सौंदर्य, सुंदर सागरकिनारे, प्रवाळ बेटे, प्राचीन हिंदू मंदिरे, पारंपरिक नृत्यकला, दगड-लाकूड-कातडे-धातूंवरची कलाकुसर यामुळे जगातल्या सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये गणले जाते...
बाली (जालावरून साभार)
"अचिंत्य"चे सिंहासन
बालीचे प्रथमदर्शन : ०१ : देनपसारचे विहंगम दृश्य
बालीचे प्रथमदर्शन : ०२ : देनपसारचे विहंगम दृश्य
बालीचे प्रथमदर्शन : ०३ : देनपसारचे विहंगम दृश्य
बालीचे प्रथमदर्शन : ०४ : देनपसारचा आंतरराष्ट्रीय विमानतळ
आमचा मार्गदर्शक कार्तिक, त्याच्या नेहमीच्या स्मितहास्यासह
बालीचे पारंपरिक व्दार
बालीचा रस्ता
पुरी सरोन, सेमिनयाक : स्वागतकक्ष
पुरी सरोन, सेमिनयाक : आवाराचे प्रथमदर्शन
वाचने
25906
वाचनखूण
प्रतिक्रिया
61
अरे वा!
(No subject)
मज्जा येणार...
In reply to मज्जा येणार... by मुक्त विहारि
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
@ मुवि थायलंडला सुद्धा ऑन अरायव्हल व्हिसा मिळतो
In reply to @ मुवि थायलंडला सुद्धा ऑन अरायव्हल व्हिसा मिळतो by दिपक.कुवेत
खरच की !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
थायलंडला पण ओन
मस्त !
भारी आहे. पुढील भागांची वाट
बालीला ऑन अरायव्हल विसा मिळतो
In reply to बालीला ऑन अरायव्हल विसा मिळतो by मनुराणी
धन्यवाद !
चला
In reply to चला by चाणक्य
हेच बोल्तो
भाते क्या सही बोलते...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरे Dil Ka तुमसे Hai केहना... ;) { Armaan }In reply to भाते क्या सही बोलते... by मदनबाण
धन्यवाद !
आपली प्रवासवर्णन लिहिण्याची
In reply to आपली प्रवासवर्णन लिहिण्याची by सुबोध खरे
धन्यवाद !
In reply to आपली प्रवासवर्णन लिहिण्याची by सुबोध खरे
+१
बालीच्या लिखाणाची वाट पाहातच
In reply to बालीच्या लिखाणाची वाट पाहातच by प्रचेतस
धन्यवाद !
बालीचे अजून वर्णन लिहालच ना?
In reply to बालीचे अजून वर्णन लिहालच ना? by यशोधरा
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
हो, हो लिहा पटापट.
धन्यवाद !
पावलो ...
In reply to पावलो ... by चौकटराजा
धन्यवाद !
जब्बरदस्त! वाट पहातो आहे.
.........
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि
पु. भा. प्र.
बाली (उमर) को सलाम!
In reply to बाली (उमर) को सलाम! by आयुर्हित
+१... असेच म्हणतो.
चला! अजून एक मेजवानी सुरू होत
नेहमीप्रमाणेच अफलातून सफर
In reply to नेहमीप्रमाणेच अफलातून सफर by रेवती
धन्यवाद !
आदूबाळ, अत्रुप्त आत्मा, मधुरा
अहाहा बाली
In reply to अहाहा बाली by दिपक.कुवेत
धन्यवाद !
वाह..
नुकतेच मायबोलीवर बालीच्या
वाह
पुभाप्र...
धन्यवाद !
झकास
झकास !!!
नेहमीप्रमाणे सुरेख.
व्वा...मस्त!! एकदम छान सुरवात
नेहेमीप्रमाणेच सुंदर फोटो आणि
बालीची ट्रिप करायची डोक्यात
नेहमीप्रमाणे मस्तच!
बालीची निवड यथार्थ आहे.
वा..
धन्यवाद !
झक्कास...
वा!
भटकंती.
In reply to भटकंती. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद !
धन्यवाद !
मस्त भाग आणि फोटो.
अप्रतिम
धन्यवाद !