सेकंड होम...
लेखनप्रकार
सह्याद्रीच्या सांदी कोपऱ्यात मोठमोठ्या वसाहती उभ्या राहतायत. निसर्गाने अंथरलेल्या हिरवाईचच मार्केटींग करून तिलाच छेदत, भेदत गुळगुळीत रस्ते बनतायत आणि टुमदार घरं वसतायत. सेकंड होम्स म्हणे...
मागे एक (उगाचच) इंग्रजाळलेली माझी मैत्रीण (?) मला कोण कौतुकाने सांगत होती. निसर्गाने नटलेल्या त्या परिसरात पूल साईडला त्यांचा ग्रुप कसा तर्र झाला होता, कसं चिल मारलं वगैरे वगैरे. मला याचंही विशेष वाटलं कि माझा स्पष्टवक्तेपणा (किंवा तुसडेपणा) माहित असूनही तिने मला हे सांगितलं. वर त्या बेहोशी का आलमचे फोटोही दाखवले. अपलोडहि केले असतील कदाचित. आणि करणाऱ्यांनी लाईक्स पण केले असतील...
मला ती ओळीने उभी असलेली घरं, ती हॉटेल्स अक्षरशः ओंगळवाणी वाटली. भडक रंगाच्या त्या इमारती, त्या कृत्रिम बागा. एखादया खानदानी शालीन सुंदरीवर अनावश्यक मेकअपची पुटं चढवून तिच्यावर लादलेल्या या कृत्रिम सौंदर्याचे प्रदर्शन मांडावे तशी...
अमुकच शांघाय करा, तमुकच व्हेनिस करा हि मनोवृत्तीच मला भिकारडी वाटते. उदाहरणार्थ मी मुळचा वाईकडला. वाई वाईच रहावी, मुळातच बारा महिने सौंदर्याने नटलेली ती विराटनगरी आणखी सुंदर व्हावी हे उत्तम, पण वाईचं झुरिच करू किंवा बर्न करू अशी कल्पना एखाद्या मेंढराच्या डोक्यात उद्या शिरली तर ती दरिद्रीच नव्हे का?
श्री सह्याद्री त्याची एखाद दुसरी भली थोरली सोंड एखाद्या जलाशयात सोडून बसला आहे.. त्यावर कैक प्रकारचे प्राणी पक्षी कवेत घेऊन गर्द वनराजी विसावली आहे.. आपण पहाटेला आणि सांजेला त्या जलाशयात तेजस्वी तपस्वी सह्याद्रीचे रूप पाहातो आहोत... पहाटेला खगांच्या कूजनानेच आपल्याला जाग येतेय.. जांभई नाही... आळस नाही... सारा थकवा कुठच्या कुठे नाहीसा झालेला... ज्या बसक्या घरात तुम्ही मुक्कामाला होतात त्या घरातली माऊली तुम्हाला भाजी भाकरी खाऊ घालते... कच्चा कांदा आणि जवसाची चटणी कदाचित.. रात्री एखादे तात्या, आण्णा किंवा भाऊसोबत बाजेवर डुकरा-सश्यांपासून ते मागच्या होळीला खालच्या रानातून आलेल्या डरकाळी बद्दल बोलत बसलाय.. ते भाऊ तात्या एक वाकळ काढून देतात आणि म्हणतात मी तीन म्हयण्याचा हुतो तवा माज्या पंजीनं शिवली व्हती.. तुम्ही निवांत पडलाय फेसाळलेलं निरभ्र आभाळ बघत.. शांत.. एकांत... नेमकं काय होतं ते तुम्हाला कळत नाही पण जडावलेले डोळे तुम्ही कसल्यातरी आंतरिक सुखाने झाकता आणि अलगद डोळ्यांच्या कडांमधून दोन थेंब ओघळून कानापाशी विसावतात.. उजाडल्यावर जडावलेल्या हृदयाने आणि पावलांनी तुम्ही निरोप घेता पुन्हा भेटू म्हणता...
... काही वर्षे जातात.. विद्युतवेगाने कसलीशी ओटू किंवा एचटूओ अश्या नावाची सिटी वसते... आणि ते घर, ते रान, ती होळी, ती डरकाळी, ती पायवाट, ते ताट, ती ‘वाकाळ’ आणि ती सकाळ... सारं सारं हरवून जातं... सह्याद्रीची ती भारदस्त सोंड हवी तशी कोरली जाते... चक्क पंचतारांकित रेस्तराँ उभे रहातात.. पूल.. क्लब... हॉटेल्स.. बंगले, व्हिलाज... कित्येक प्राणी पक्ष्यांना त्यांच्या फर्स्ट होम मधून बेघर करून सेकंड होम्स उभी राहतात.. सांगण्यात येतं कि अमुक गडावरची हि वाट बंद झाली आहे वळसा घालून जा.. हि अमुकची प्रॉपर्टी आहे... इथे पण प्रोजेक्ट येणार आहे... वगैरे वगैरे... याही वेळेला तुमची पावलं जड होतात.. कुठतरी तरी पूर्वीची एखादी खुण सापडेल का?...
... मी मैत्रिणीचं “कौतुक” करण्याऐवजी “डोंगर पोखरल्यागेल्याचं” दुख: झालं म्हणतो...
तिला विचारतो, “...कधी दिवाळीच्या सुट्टीत गावी घराबाहेर ओट्यावर चांदणं मोजता मोजता तुझा डोळा लागलाय?”
ती म्हणते “मला गाव नाही...”
मी वरमतो... तिला सॉरी म्हणतो...
ती “का” विचारते..
मी “काही नाही” म्हणतो...
आणि त्या रात्री कसल्याश्या अस्वस्थतेने गाडगीळांच्या आणि कस्तुरीरंगनांच्या अहवालाची तुलना करत बसतो...
@ सौमि - २९ मे २०१४
वाचने
10399
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
कोल्ह्याला द्राक्ष आंबट ह्या
In reply to कोल्ह्याला द्राक्ष आंबट ह्या by प्रसाद१९७१
अडाणी कोल्हा..
In reply to अडाणी कोल्हा.. by saumitrasalunke
कोल्ह्याला दाक्षाच्या मळ्यातच
In reply to कोल्ह्याला द्राक्ष आंबट ह्या by प्रसाद१९७१
भडकाउ पणा का करून राहिला वो?
कोल्ह्याला द्राक्ष आंबट ह्या
In reply to कोल्ह्याला द्राक्ष आंबट ह्या by प्रसाद१९७१
किती कोल्हे पाळलेत?
नेमका नेम कशावर?
सर्वत्र विकासाच्या नावाने
In reply to सर्वत्र विकासाच्या नावाने by सुबोध खरे
थांबवावं लागेल.
In reply to सर्वत्र विकासाच्या नावाने by सुबोध खरे
महानगरात बसून सर्व सुखसुविधा
In reply to महानगरात बसून सर्व सुखसुविधा by बॅटमॅन
विकास आणि जीवनशैली
In reply to विकास आणि जीवनशैली by saumitrasalunke
छप्पर जाऊन स्लॅब येणं म्हणजे
विश्वास पाटीलांची झाडाझडती या कादंबरीची आठवण झाली.
तिला विचारतो, “...कधी
तिला विचारतो, “...कधी दिवाळीच्या सुट्टीत गावी घराबाहेर ओट्यावर चांदणं मोजता मोजता तुझा डोळा लागलाय?” ती म्हणते “मला गाव नाही...” मी वरमतो... तिला सॉरी म्हणतो... ती “का” विचारते.. मी “काही नाही” म्हणतो...आमचे गाव कोकणात, जिल्हा सिंधुदुर्ग. निसर्गाची पुरेपूर देणगी. दुर्दैवाने स्वताचे हक्काचे घर नाही. चुलतचुलत काकांचे आहे पण ते दोनचार वर्षांनी सणासुदीला (अर्थात गणपतीला) एखाद दिवस जावे इतकेच. मात्र त्याची भरपाई करायला कोकणातल्या कित्येक मित्रांची गावे भटकलोय. आजोळी (कणकवलीला) सुद्धा मुक्कामाला जाणे होते. तरीही गावाला आपले घर नाही हि सल आहेच. त्यामुळे मला कोणी गाव विचारल्यास आमच्या गावाबरोबर मुद्दामहून आईच्या गावाचे नावही सांगतो कारण तिथे जास्त वेळा जाणे झालेय. हेतू एवढाच की गावाशी नाळ अजून जोडली आहे हे कुठेतरी सुखावते आणि त्याचा अभिमानही वाटतो. (भले जन्मापासून मुंबईकर का असेना) सध्या घर बांधायचे प्रयत्न चालू आहेत आणि काही अडचण नाही आली तर इन्शाल्ला माझ्या मुलांच्या मनात ती सल राहणार नाही. अर्थात त्यांची आवड कशी असेल ते आता सांगता येत नाही. असो, तर मलाही जेव्हा कोणी गाव नसलेला भेटतो तेव्हा त्याच्याबद्दल सॉरी फील होते. समदुखी वाटतो. भले त्याला काही वाटत असेना नसेना..लिखाण आवडलं.
In reply to लिखाण आवडलं. by पैसा
अनुमोदन
In reply to लिखाण आवडलं. by पैसा
खरंच..
मस्त.
खरय,शाश्वत विकास हवा. मी
विकास
In reply to विकास by jaydip.kulkarni
मनातलं
लेखन आवडले.
बरं मग ?
स्पष्टीकरण:
In reply to स्पष्टीकरण: by saumitrasalunke
रोचक.
In reply to स्पष्टीकरण: by saumitrasalunke
तुम्ही कूठे रहाता सौमित्रभाउ?
In reply to तुम्ही कूठे रहाता सौमित्रभाउ? by प्रसाद१९७१
वैयक्तिक शेरेबाजी...
In reply to वैयक्तिक शेरेबाजी... by saumitrasalunke
विषयानुंशंगाने काही प्रश्न वैयक्तीक बाब बनु शकतात
In reply to विषयानुंशंगाने काही प्रश्न वैयक्तीक बाब बनु शकतात by आत्मशून्य
"कोल्ह्याला द्राक्ष आंबट",
In reply to "कोल्ह्याला द्राक्ष आंबट", by saumitrasalunke
माझ्या प्रत्येक वाक्याला
In reply to वैयक्तिक शेरेबाजी... by saumitrasalunke
मला ती ओळीने उभी असलेली घरं,
In reply to स्पष्टीकरण: by saumitrasalunke
आधुनिकीकरणाची बळी - मुंबई.
In reply to आधुनिकीकरणाची बळी - मुंबई. by प्रभाकर पेठकर
उत्कृष्ट प्रतिसाद..
In reply to आधुनिकीकरणाची बळी - मुंबई. by प्रभाकर पेठकर
भारी.
In reply to आधुनिकीकरणाची बळी - मुंबई. by प्रभाकर पेठकर
स्साला!!! ह्याच्यासाठी मिपा हे आमचं सेकंड होम आहे!!!
In reply to आधुनिकीकरणाची बळी - मुंबई. by प्रभाकर पेठकर
हांग आश्शी ! आता बोला !!
In reply to आधुनिकीकरणाची बळी - मुंबई. by प्रभाकर पेठकर
पेठकर साहेब,
In reply to पेठकर साहेब, by सुबोध खरे
संतुलीत विकास हवा....
In reply to संतुलीत विकास हवा.... by प्रभाकर पेठकर
+१००
पेठकर साहेब - प्रतिसाद आवडला.
छान वाटतय प्रतिसाद वाचताना.
मोठा आणि गहन विषय आहे.
In reply to मोठा आणि गहन विषय आहे. by आयुर्हित
यावरून सुचलेली एक कविता
दोनपेक्षा जास्त मूले झाल्यास