कालच्या दिवसाच्या निमित्ताने!
नेहमी कामानिमितानी
शिवरात्रीला आणि श्रावणातही, निरनिराळ्या शंकराच्या देवळात जाणे होते. भक्त मंडळी शंकराच्या गाभार्याला जी काहि "कळा" आणवतात. ते साहून हे लेखन घडत आहे. मी अनेकदा अनेक देवळात देवळांच्या काम पहाणार्या मंडळींना या बद्दल सूचना आणि सहकार्य करायचा प्रयत्न केला आहे. पण हाती आले फक्त दारुण अपयश. मंदिरवाल्यांना "ग्राहक" वाढतील या दृष्टीनी काहि सुचवलं तर तेच हवं असतं..तीथे आंम्ही स्वच्छतेचा नारा लावलेला कुणा ऐकू जावा?
सकाळी देऊळ उघडल्यापासून भक्त मंडळी शंकराचा जो काही महा-देव करतात तो पहाण्यासारखा असतो! एकानी कडेनी दुध ओतावे..आणि कुणी दुसर्यानी पंचामृत टाकावे..त्यातच अजुन साखर/शेंगादाणे/गूळ/धान्य/मध केळी ... अरारारारा... अहो आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी कुणी खुर्चीत बसवून अंगभर मिठाईमर्दन करून त्यातली थोडी थोडी तोंडात भरवून ह्याप्पी बर्थ डे केलं तर कसं वाटेल? भक्तिमार्गात स्वच्छतेची भावना लोप पावलीच पाहिजे असा काही संकेतच आहे का?
या मंदिरवाल्यांचं तर सोडा,पण ज्या संघटना हल्ली स्वतःला धर्माभिमानी म्हणवतात,त्यांनी तरी आंम्हाकारणी सहकार्या यावे. पण त्यांनाही "हे" नको आहे. त्यांचा सारा आवेश गाभार्यात सोवळी-घालुन शिरावे का शिरू नये! असल्या फालतू कारणातच संपतो. नाहि म्हणता गेली ५ वर्ष ठणाणा केल्याचे फलित म्हणजे- फक्त एका मंदिराने..भक्त मंडळींना नीट मॅनेज करायचा प्रयत्न या वर्षी केला आणि मी सुचवलेली "गाभार्याबाहेर धान्य/दुधासाठी-बादल्या-भांडी योजना" एका निरिक्षक माणसासह राबवायला सुरवात केली. (तरी काल आमचा लघुरुद्र संपेपर्यंत लोकांना थोपवणं जड गेलच!) एरवी दुसर्या दिवशी अनेक मंदिरात शंकराची पिंडी आणि भोवतीचा परिसर नारळाच्या घासण्या घेऊन साबणसोड्यानी धुवायची वेळ येते. मला नेहमी प्रश्न पडतो,की जगातल्या प्रत्येक समाजाला आपल्या धर्मातली ही अश्या प्रकारची घाण साफ करायचा कंटाळा का??? वास्तविक याच कामात या धार्मिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्या समाजातल्या सज्जनांन्नी (मग ते धार्मिक असोत,अथवा नसोत!) या संघटनांच्या मागे यासाठी तगादा लावायला पाहिजे. माझ्या मते "हे" घडेल तो खरा सुदिन!
शिवरात्र जागवोनी जन शांत झोपलेले
कावून रात्र सारी पोळतो शंभू...स्व-भावे॥धृ॥
देवळात भोवती त्या पडलाच बेल सारा
दहिभात ही सुखाने करी पिंडि पाशी राडा
किती घाण अंतरी या,तरि शंभू शांत आहे॥१॥
भरला नाकात त्याच्या पन्हाळीतला सुगंध
माश्या.. तिथे भणाणा करितात अंदा-धुंद
गोमुखा समोर पुढती साक्षात गटार आहे॥२॥
काहूर अंतरीचे स्वमनात चोप देई
भक्तांसी सांगताना मन हे दमून जाई
भक्तीत माज सारा हे दिव्य(?) रूप आहे.॥३॥
================
मूळ रचना:-मधुकर जोशी
"आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे"
==========================
वाचने
17355
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
योग्य!
पटतंय.
पूर्णपणे सहमत.
रास्त विचार
याच्याशी १००० वेळा सहमत. हे
खूप छान विचार आहेत.
चांगले विचार
+ १
In reply to चांगले विचार by पैसा
मी मंदिरांत फक्त नमस्कार करायलाच जातो.
@आणि ते परत माझ्यापाशीच ठेवतो
In reply to मी मंदिरांत फक्त नमस्कार करायलाच जातो. by मुक्त विहारि
तसे वागू नका सांगणार्यावर डाफरायचं
In reply to @आणि ते परत माझ्यापाशीच ठेवतो by अत्रुप्त आत्मा
धर्म पाळणे
१००% सहमत
सहमत.
मस्त विचार ...देवाला दोन
हम्म....
अआंच्या भावनेशी १,०००% सहमत !
सहमत
अगदी बरोबर
In reply to सहमत by मधुरा देशपांडे
सहमत
In reply to अगदी बरोबर by अत्रन्गि पाउस
सहमत.
मार्केट
@अहो आत्मुबाबा, असे वादळात
In reply to मार्केट by विनायक प्रभू
चांगला मुद्दा उपस्थित केलात
आत्मुस तुमच्याबद्दल अगदी
क्या बात है. सहमत.
In reply to आत्मुस तुमच्याबद्दल अगदी by स्पंदना
आत्मूस बाबाचे अनेक पैलू .....
In reply to आत्मुस तुमच्याबद्दल अगदी by स्पंदना
घोडा घाससे दोस्ती करेगा तो फिर खायेगा क्या?
यापेक्षा देव ही निव्वळ कल्पना
In reply to घोडा घाससे दोस्ती करेगा तो फिर खायेगा क्या? by संजय क्षीरसागर
च्यायला!
In reply to यापेक्षा देव ही निव्वळ कल्पना by बॅटमॅन
नक्की मुद्दा काय आहे तो
In reply to च्यायला! by संजय क्षीरसागर
मुद्दा तुम्हाला कळेल तर नशीब!
In reply to नक्की मुद्दा काय आहे तो by बॅटमॅन
धृतराष्ट्र म्हाराज की जय!!!!!
In reply to मुद्दा तुम्हाला कळेल तर नशीब! by संजय क्षीरसागर
आपण साक्षात शॅटमॅन आहात
In reply to धृतराष्ट्र म्हाराज की जय!!!!! by बॅटमॅन
धृतराष्ट्र महाराज की जय!!!
In reply to आपण साक्षात शॅटमॅन आहात by संजय क्षीरसागर
@देव ही भंकस बंद करा असं मी
In reply to घोडा घाससे दोस्ती करेगा तो फिर खायेगा क्या? by संजय क्षीरसागर
तुमचा ज्योक आवडला!
In reply to @देव ही भंकस बंद करा असं मी by अत्रुप्त आत्मा
संक्षी, मोठे व्हा!
In reply to तुमचा ज्योक आवडला! by संजय क्षीरसागर
@मोठे व्हा! >>> प्रशांत..तुझा
In reply to संक्षी, मोठे व्हा! by प्यारे१
आत्मासाहेबांशी पूर्णपणे सहमत.
ह्येच बोलतो....
In reply to आत्मासाहेबांशी पूर्णपणे सहमत. by बॅटमॅन
मी अस ऐक्लय की दक्शिनेकडे
उत्तम विचार.
बास धन्या...माझं काम केलस..
In reply to उत्तम विचार. by धन्या
बुवा
In reply to बास धन्या...माझं काम केलस.. by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to बुवा by नाखु
"देव देवळात, मंदीरात नाही"
In reply to उत्तम विचार. by धन्या
अंबाबाईच्या देवळात...
मला जे काही द्यायचय ते घरी येऊन कामवालीला देते.
In reply to अंबाबाईच्या देवळात... by अनन्न्या
काय त्रास आहे
In reply to मला जे काही द्यायचय ते घरी येऊन कामवालीला देते. by संजय क्षीरसागर
रामपुरी दादा..
In reply to काय त्रास आहे by रामपुरी
मृत्युंजय मंदिर ,कोथरुड
परवा कमला नेहरू पार्क जवळच्या
+१
In reply to परवा कमला नेहरू पार्क जवळच्या by पिलीयन रायडर
छान लिहिलंस
In reply to परवा कमला नेहरू पार्क जवळच्या by पिलीयन रायडर
आणि हा अशिक्षीत?
In reply to छान लिहिलंस by पैसा
"आपण देवासमोर दिवा लावतो.
In reply to छान लिहिलंस by पैसा
"आपण देवासमोर दिवा लावतो. दगडाच्या देवाला काय आणि मनातल्या देवाला काय, दिव्याची आवश्यकता नसते. दिव्याची आवश्यकता आपल्यालाच असते, काळोखात देव दिसावा म्हणून."मानवी स्वभावाचं खरेपण उघड करणारं वाक्य ! हा माणूस "लोकमान्यतेने अल्पशिक्षित" असला तरी "खरा सुशिक्षित आणि बुद्धिमान" आहे.हो खरंच!
In reply to "आपण देवासमोर दिवा लावतो. by डॉ सुहास म्हात्रे
अन उदबत्तीचा ब्रॅन्ड ..
In reply to हो खरंच! by पैसा
अतिशय जब्री प्रतिसाद. आवडला
In reply to परवा कमला नेहरू पार्क जवळच्या by पिलीयन रायडर
+१
In reply to परवा कमला नेहरू पार्क जवळच्या by पिलीयन रायडर
उत्तम लेख. महाराष्ट्रा एवढी
सहमत.
दंडवत!
In reply to सहमत. by भ ट क्या खे ड वा ला
+++१११
In reply to दंडवत! by साती
+१००
In reply to दंडवत! by साती
असं होण्याचं कारण
नुसत्या काव्यात्मक डायलॉग्जचा वाचण्यापलिकडे उपयोग नाही!
अरे हो, एका महत्त्वाच्या मुद्याबद्दल लिहायचं राहिलं