चांदणचकवा
काट्यांत हरवली वाट
संदिग्ध पावले माझी
वळणावर एका अवचित
अबोल होऊनी गेली....
वस्ती ही आता दूर
वळ्ण्याचा नाही धीर
एकाकी निर्जन रानी
हे श्वास ही होती तीर....
जगण्याचे वादळ शमले
मृत्युची ओढ न उरली
निस्तब्ध शांत या रात्री
ओझेच सावली होई....
भिरभिरतो रानी आता
दिशाहीन जणू रावा
जगण्याच्या आवर्ताला
मरणाचा चांदणचकवा...
पद्मश्री चित्रे (फुलवा)
वर्गीकरण
आवडली.
कविता आवडली
In reply to कविता आवडली by पैसा
ओझेच सावली झाली हे
In reply to ओझेच सावली झाली हे by यशोधरा
अर्थ बदलतो
In reply to अर्थ बदलतो by पैसा
बरोबर. पद्मश्रीच सांगू शकेल
कविता आवडली.
आवडली कविता! येउ देत अजून.
छान!
आवडली!
भावना कळल्या!
कविता आवडली
आवडली
यमकाकडे दुर्लक्ष केलं तर
सुंदर... आवडली. वर एक दोघांनी
खोल जातेय कविता. सुंदर
In reply to खोल जातेय कविता. सुंदर by कवितानागेश
+१ माऊ
खूप छान
सुंदर !
आवडली
छान.