Skip to main content

चांदणचकवा

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शनिवार, 01/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
काट्यांत हरवली वाट संदिग्ध पावले माझी वळणावर एका अवचित अबोल होऊनी गेली.... वस्ती ही आता दूर वळ्ण्याचा नाही धीर एकाकी निर्जन रानी हे श्वास ही होती तीर.... जगण्याचे वादळ शमले मृत्युची ओढ न उरली निस्तब्ध शांत या रात्री ओझेच सावली होई.... भिरभिरतो रानी आता दिशाहीन जणू रावा जगण्याच्या आवर्ताला मरणाचा चांदणचकवा... पद्मश्री चित्रे (फुलवा)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4054
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

कविता आवडली. एकदोन जागी यमक जुळवता आलं असतं. ते राहिलं आहे. वळणावर एका अवचित अबोल होऊनी गेली.... इथे काहीतरी वेगळा शब्द हवा होता असं वाटलं. तसंच निस्तब्ध शांत या रात्री ओझेच सावली होई.... याऐवजी ओझेच सावली झाली.. असं जास्त चांगलं वाटलं असतं का?

छान!

भावना कळल्या! मनातील सल कवितेत उत्तम रीतीने उतरला आहे. जीवनात काही ध्येय/मंझील/goals नाही, हाच खरा चकवा आहे! त्यामुळेच मला ह्या असल्या कविता आवडत नाहीत(its my problem!). एक आवडलेले गाणे : मंझिले अपनी जगह है

पण थोडी निगेटीव्ह वाटली. हे खूप आवडलं, "हे श्वास ही होती तीर...."

आवडली कविता. -दिलीप बिरुटे