चांदणचकवा
लेखनविषय:
काव्यरस
काट्यांत हरवली वाट
संदिग्ध पावले माझी
वळणावर एका अवचित
अबोल होऊनी गेली....
वस्ती ही आता दूर
वळ्ण्याचा नाही धीर
एकाकी निर्जन रानी
हे श्वास ही होती तीर....
जगण्याचे वादळ शमले
मृत्युची ओढ न उरली
निस्तब्ध शांत या रात्री
ओझेच सावली होई....
भिरभिरतो रानी आता
दिशाहीन जणू रावा
जगण्याच्या आवर्ताला
मरणाचा चांदणचकवा...
पद्मश्री चित्रे (फुलवा)
वाचने
4054
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
आवडली.
कविता आवडली. एकदोन जागी यमक जुळवता आलं असतं. ते राहिलं आहे.
वळणावर एका अवचित
अबोल होऊनी गेली....
इथे काहीतरी वेगळा शब्द हवा होता असं वाटलं.
तसंच
निस्तब्ध शांत या रात्री
ओझेच सावली होई....
याऐवजी
ओझेच सावली झाली..
असं जास्त चांगलं वाटलं असतं का?
In reply to कविता आवडली by पैसा
ओझेच सावली झाली हे व्याकरणदृष्ट्या योग्य वाटत नाही. चूभू.
In reply to ओझेच सावली झाली हे by यशोधरा
ओझ्याची सावली झाली का सावलीचे ओझे झाले यावर अवलंबून आहे.
In reply to अर्थ बदलतो by पैसा
बरोबर. पद्मश्रीच सांगू शकेल तिला काय म्हणायचंय ते.
कविता आवडली.
आवडली कविता! येउ देत अजून.
छान!
छान आहे.
भावना कळल्या! मनातील सल कवितेत उत्तम रीतीने उतरला आहे.
जीवनात काही ध्येय/मंझील/goals नाही, हाच खरा चकवा आहे!
त्यामुळेच मला ह्या असल्या कविता आवडत नाहीत(its my problem!).
एक आवडलेले गाणे : मंझिले अपनी जगह है
कविता आवडली
सुरेख...
यमकाकडे दुर्लक्ष केलं तर कविता छान आहे.
सुंदर... आवडली. वर एक दोघांनी म्हटल्याप्रमाणे यमक अजून प्रभावी करता आलं असतं. पण तरीही; छान जमलीय...
खोल जातेय कविता. सुंदर अभिव्यक्ती. :)
In reply to खोल जातेय कविता. सुंदर by कवितानागेश
+१ माऊ
आवडली कविता.
सुंदर !
पण थोडी निगेटीव्ह वाटली. हे खूप आवडलं,
"हे श्वास ही होती तीर...."
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
आवडली.