मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सिंटॅक्स- मिपावरील शब्द

राजेंद्र मेहेंदळे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मिपावर प्रतिसाद देताना ठराविक शब्द वापरले जातात आणि ते पुन्हा पुन्हा वाचायला मिळतात.त्यांचा संदर्भ माहीत नसल्याने नवखा माणुस ते वाचुन प्रथम गोंधळतो,मग हळुहळु चाचपडत का होईना त्याला थोडेथोडे शब्द कळु लागतात.आणि मग तोही या दंग्यात सामील होउन जातो. मला सापडलेले काही शब्द असे चोप्य पस्ते (कॉपी पेस्ट) चानचान (छानछान) जौदे बै (जाउ दे बाई) चेपु,तुनळी (फेसबुक,युट्युब) जिलब्या (लेख) पिंक (प्रतिक्रिया) हहपुवा (हसुन हसुन पुरेवाट) ह्घ्या (हलके घ्या) या शिवाय काही महान लोकांच्या स्मरणार्थ चेसुगु,जीवनभौ वगैरे तर समस्त मिपाकरांना आवाहन कि नवख्या मिपाकरांच्या सोयीसाठी असे अजुन शब्द सांगावे.

वाचने 68857 वाचनखूण प्रतिक्रिया 118

बॅटमॅन Tue, 12/03/2013 - 17:32
प्रकाटाआ= प्रतिसाद काढून टाकला आहे. हेवेसांनल= हे वेगळे सांगणे न लगे. खफ= खरडफळा., खव= खरडवही, व्यनि= व्यक्तिगत निरोप. अच्रत बव्लत= आचरट बावळट.

In reply to by परिंदा

मुक्त विहारि Tue, 12/03/2013 - 21:35
हे एक जालीम चूर्ण आहे.... सध्या गहन विचार करणारे एक जण आहेत.... ते घेत आहेत ते औषध...म्हणूनच आजकाल ते जास्त पिंका टाकत नाहीत..

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सोत्रि Tue, 12/03/2013 - 18:36
मला नाही माहित ब्वॉ!
'विठ्ठला' कोणता झेंडा घेऊ हाती.... किती तो विनय... पण ह्याला आमच्यात 'वेड पांघरुण....' असे म्हणतात बरं का! ;) - ('विठ्ठला'चा बडवा) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्यारे१ Tue, 12/03/2013 - 18:44
अरे आत्ताच हजर सभासदांमध्ये दर्शन झालं होतं की... शप्पथ! आठवण आली की हजर होईन असं आश्वासन दिलंय काय कुणास ठाऊक. ;)

In reply to by सोत्रि

पैसा Tue, 12/03/2013 - 23:49
नीलकांत विट्ठल अन संपादक बडवे अशी महान पदवी एकदा आम्हाला मिळाली होती. हल्ली तसे कोणी म्हणत नसल्याने प्रा. डॉ. बिरुटे मिपावर कमी प्रमाणात येऊ लागले आहेत! या आठवणीने अं.ह.झा. आणि ड्वाले पाणावले!

In reply to by पैसा

हो ना. मीही अंमळ हळवा झालो. आता फेसबुक वर अपडेट्स टाकणं आलं की मिपा म्हणजे कै जग नाही. पै, तेवढं लाईक वर क्लीक करुन... दोन शब्द तिथे लिहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसा Wed, 12/04/2013 - 12:43
चेपुवर तुम्ही कै पोस्ट केलंय ते न बघताच मी लैक करून टाकते! कल्जी नसावी!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पैसा गुरुवार, 12/05/2013 - 17:02
खरंच की! आणि कसल्या कसल्या आठवणी करून दिल्यास विमे! समुद्र काय अन विहीर काय! विहिरीतले बेडूक काय! देवा रे देवा!!

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन Tue, 12/03/2013 - 18:27
धान्याचे काश्मिर होणे
कुठल्या हो कुठल्या धान्याचे काश्मीर ;) अन इंचा-इंचाने माघार घेणे वैग्रेही त्यातच आले =))

सूड Tue, 12/03/2013 - 18:59
चानचान (छानछान)= चूक. हे छान छानचे उपहासात्मक रुप आहे. कमीत कमी शब्दात खवचटपणा दाखवण्यासाठी याचा वापर होतो. जिलब्या (लेख)= पुन्हा चूक. अशी कोणतीही साहित्यकृती (ज्यात लेख, काव्य, छायाचित्रे यांचा समावेश होतो) तिचा कर्ता/ कर्ती सतत, वाचकांना वीट येईस्तवर करीत/ लिहीत असेल तर त्यास जिल्बी म्हणतात. पिंक (प्रतिक्रिया)= हे आता मी केलं ते!!

रेवती Tue, 12/03/2013 - 19:05
पुलेशु. हे पुढील लेखनास शुभेच्छा यासाठी असून जर लेख जिल्बीष्टाईल असेल पुवाशु. म्ह्ण्जे पुढील वाचकांस शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणी दिल्यास आनंद होऊ देऊ नका. ;) त्याचा अर्थ वेगळा आहे. थोडक्यात म्हणजे "मसणात जावा" हा अर्थ सांगतीये. उगीच रागावू नका.

सुहास.. Tue, 12/03/2013 - 19:39
आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर ही सुधरला/ली नाही तर ... मग दिवाळीच्या आणि नववर्षाच्या पण शुभेच्छा ( सौजन्य: आंनदयात्री ) एक आयडी ला आम्ही विमे होताना पाहिले ...आता तुम्ही रामे

In reply to by सुहास..

सूड Tue, 12/03/2013 - 19:53
>>एक आयडी ला आम्ही विमे होताना पाहिले...आता तुम्ही रामे बरं आठवलं. ते विमेकाका तुमच्या नात्यात आहेत आहेत का हो रामे ?? :#

In reply to by अत्रुप्त आत्मा

शैलेन्द्र गुरुवार, 12/05/2013 - 10:57
तुमचं सोडा हो बुवा, तुमच्या पाना-फुलांच्या-देठांच्या रांगोळ्या जगप्रसिद्ध आहेत, मी काकांना विचारलेलं.. :)

In reply to by शैलेन्द्र

मृत्युन्जय गुरुवार, 12/05/2013 - 11:38
तुमच्या पाना-फुलांच्या-देठांच्या रांगोळ्या जगप्रसिद्ध आहेत, माताय निर्वाण पावलो ;)

In reply to by शैलेन्द्र

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/05/2013 - 19:02
@ तुमच्या पाना-फुलांच्या-देठांच्या रांगोळ्या जगप्रसिद्ध आहेत, मी काकांना विचारलेलं.. >>> अस्सं!!! :-/

विजुभाऊ Tue, 12/03/2013 - 20:19
पूजाशी बाडीस. मिपावरचे काही वाक्प्रचार "इनो घेणे" "फाट्यावर मारणे" " आमचा हिच्यावर भारी जीव" :-

सोत्रि Tue, 12/03/2013 - 21:43
अरेच्चा! सर्वात महान वाक्प्रचार कोणी सांगितलेच नाहीत अजून, १. अभ्यास वाढवा! २. मोठे व्हा! - (मिपाकर) सोकाजी

सुहास.. Tue, 12/03/2013 - 22:42
सोक्या !! अरे ते " भरपुर कॉम्प्लॅन प्या , मोठ्ठे व्हा " असे आहे. ( नको आठवण काढुस रे प्लीज :( )

In reply to by पैसा

बॅटमॅन Wed, 12/04/2013 - 15:18
सर्वप्रथम: बुके आमची नाहीत त्यामुळे व्हिरीत बुके तिची घाला =)) नोबॉल तर पडलाय पण मान्य करवेना =)) बाकी पाटीपेणसल द्या, यल्ल यम्म काय क्ष्ळ त्र्प्फ ज्ग्द्ड पर्यंत सर्व अक्शरे काधुन दाखवतो.

In reply to by बॅटमॅन

पैसा गुरुवार, 12/05/2013 - 16:36
पाटीपेणसल द्या मज आणुनी त्यावर गिर्वीन अश्शी अक्षरे मास्तर म्हणती कोंबड्या-पाय बरे आणिक जुळवीन भलती गणिते बघुनी पब्लिक बेशुद्ध पडते पाटीपेणसल द्या मज आणुनी