गूज
लेखनविषय:
शिशिराची ती असो पानगळ
गदमद किंवा दाहवणारी
तुझ्या संगती कळे न काही
निशा नवी की ... मालवणारी
दूर राहता उमजत जाते
नात्याच्या विरहाची खोली
मनांसारखी उधाणलेली
देहांचीही असते बोली
सभोवताली निसर्गलीला
चराचराचे खेळ वेगळे
आज पाहता नसे स्वस्थता
कर्पूरासम चित्त पेटले
गंध स्मृतींचा होय अनावर
हसू सांडते दारी जाई
भूल घालतो तशात चाफा
हिवाळ्यातही चटका देई
शब्दासोबत अर्थ स्मरावा
सहवासाचे आठव तैसे
अंगोपांगी मोहरतो मी
गूज कुणा सांगावे कैसे !
-- अमेय
वाचने
4066
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
बोरकरांची आठवण का येतेय?
In reply to बोरकरांची आठवण का येतेय? by स्पंदना
बोरकरांची आठवण का येतेय?>>
....की मर्ढेकर ? कवितेची बांधणी मर्ढेकरांची आठवण करून देणारी आहे.. :)
कविता आवडली अमेयदा.. :)
मस्त मस्त मस्त
तुझ्या संगती कळे न काही
निशा नवी की ... मालवणारी
दूर राहता उमजत जाते
नात्याच्या विरहाची खोली
कर्पूरासम चित्त पेटले
गंध स्मृतींचा होय अनावर
हसू सांडते दारी जाई
शब्दासोबत अर्थ स्मरावा
सहवासाचे आठव तैसे
या ओळी खूप आवडल्यात! पु.ले.शु. :)
गंध स्मृतींचा होय अनावर
हसू सांडते दारी जाई
भूल घालतो तशात चाफा
हिवाळ्यातही चटका देई
स्सही रे स्सही.
-दिलीप बिरुटे
कविता आवडली.
कसं जमतं राव अस लिहायला.
आवडली कविता
आवडेश्स
कविता मस्तच आहे. आवडली आणि भावलीही.
उत्तम !!
>>>शब्दासोबत अर्थ स्मरावा
सहवासाचे आठव तैसे
अंगोपांगी मोहरतो मी
गूज कुणा सांगावे कैसे !
मस्तच!
नेमक्या शब्दात भावना पोचवण्याचं सामर्थ्य लाभलेल्या मोजक्या कवितांपैकी एक.
मिका नंतर एक समर्थ कवी मिसळपावला लाभलेला आहे.
बहोत खूब!
सुंदर कविता, अर्थ छान आणि वृत्तात बांधूनही कारागिरी वाटत नाही हे अजूनच छान!
कूल!!!!
आवडलीय राव.. जाम आवडलीय...
आहा!
बोरकरांची आठवण का येतेय?