मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गूज

अमेय६३७७ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
शिशिराची ती असो पानगळ गदमद किंवा दाहवणारी तुझ्या संगती कळे न काही निशा नवी की ... मालवणारी दूर राहता उमजत जाते नात्याच्या विरहाची खोली मनांसारखी उधाणलेली देहांचीही असते बोली सभोवताली निसर्गलीला चराचराचे खेळ वेगळे आज पाहता नसे स्वस्थता कर्पूरासम चित्त पेटले गंध स्मृतींचा होय अनावर हसू सांडते दारी जाई भूल घालतो तशात चाफा हिवाळ्यातही चटका देई शब्दासोबत अर्थ स्मरावा सहवासाचे आठव तैसे अंगोपांगी मोहरतो मी गूज कुणा सांगावे कैसे ! -- अमेय

वाचने 4065 वाचनखूण प्रतिक्रिया 13

In reply to by स्पंदना

निवांत पोपट गुरुवार, 11/28/2013 - 15:06
बोरकरांची आठवण का येतेय?>> ....की मर्ढेकर ? कवितेची बांधणी मर्ढेकरांची आठवण करून देणारी आहे.. :) कविता आवडली अमेयदा.. :)

राघव Tue, 11/26/2013 - 23:48
तुझ्या संगती कळे न काही निशा नवी की ... मालवणारी दूर राहता उमजत जाते नात्याच्या विरहाची खोली कर्पूरासम चित्त पेटले गंध स्मृतींचा होय अनावर हसू सांडते दारी जाई शब्दासोबत अर्थ स्मरावा सहवासाचे आठव तैसे या ओळी खूप आवडल्यात! पु.ले.शु. :)

प्यारे१ गुरुवार, 11/28/2013 - 02:29
>>>शब्दासोबत अर्थ स्मरावा सहवासाचे आठव तैसे अंगोपांगी मोहरतो मी गूज कुणा सांगावे कैसे ! मस्तच! नेमक्या शब्दात भावना पोचवण्याचं सामर्थ्य लाभलेल्या मोजक्या कवितांपैकी एक. मिका नंतर एक समर्थ कवी मिसळपावला लाभलेला आहे. बहोत खूब!

पैसा गुरुवार, 11/28/2013 - 10:54
सुंदर कविता, अर्थ छान आणि वृत्तात बांधूनही कारागिरी वाटत नाही हे अजूनच छान!