गूज
लेखनविषय:
शिशिराची ती असो पानगळ
गदमद किंवा दाहवणारी
तुझ्या संगती कळे न काही
निशा नवी की ... मालवणारी
दूर राहता उमजत जाते
नात्याच्या विरहाची खोली
मनांसारखी उधाणलेली
देहांचीही असते बोली
सभोवताली निसर्गलीला
चराचराचे खेळ वेगळे
आज पाहता नसे स्वस्थता
कर्पूरासम चित्त पेटले
गंध स्मृतींचा होय अनावर
हसू सांडते दारी जाई
भूल घालतो तशात चाफा
हिवाळ्यातही चटका देई
शब्दासोबत अर्थ स्मरावा
सहवासाचे आठव तैसे
अंगोपांगी मोहरतो मी
गूज कुणा सांगावे कैसे !
-- अमेय
वाचने
4065
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
बोरकरांची आठवण का येतेय?
In reply to बोरकरांची आठवण का येतेय? by स्पंदना
>
मस्त मस्त मस्त
आवडली कविता!
क्या बात है.
सुरेख रचना
मस्तच
आवडेश्स
सुरेख रचना
उत्तम !!
>>>शब्दासोबत अर्थ स्मरावा
सुंदर!
कूल!!!!