दुधी कोफ्ता करी
मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो, कांदा, आले + लसूण, मिरचीचा तुकडा आणी काजू घाला.
थोडेच पाणी घालून मुलायम वाटून घ्या.
कढईत तेल गरम करा व जीर्याची फोडणी करा.
त्यात वाटलेला मसाला घालून चांगला परतून घ्या
त्यात आता उरलेले लाल तिखट, गरम - मसाला, धणेपूड, मीठ, कसूरीमेथी चुरडून घाला व तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
त्यात दूधीचा रस व थोडे पाणी घालून १०-१५ मिनिटे मंद गॅसवर शिजू द्या. ( ग्रेव्ही कितपत दाट / पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घाला.)
सर्व्ह करायच्या ५ मिनिटे आधी गरम ग्रेव्हीत तयार कोफ्ते घाला. खूप आधीपासून घातले तर कोफ्ते मऊ होऊन फुटू शकतात.
वरून कोथींबीर पेरा व नान, रोटीबरोबर दुधी कोफ्ता करी सर्व्ह करा :)
वाचने
17081
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
आहा!
सरस!! काय फोटोज आहेत!!
दिल कोफ्ता-नान हो गया!!
In reply to आहा! by स्पंदना
+१०००
शब्द संपले.....
नेहमी नेहमी वेगळी प्रतिक्रिया काय द्याची. ते नान ची पण रेसिपी दे ना.
झकास्स्स्स्स्स...चं!!! जिभल्या चाटणारी स्मायली कल्पावी>
In reply to झकास्स्स्स्स्स...चं!!! by शिद
जिभल्या चाटणारी स्मायली कल्पावी
वाह! सुरेख फोटू. पाकृ माझ्याकडेही अशीच आहे पण मनासारखे कधी झाले नाहीत गं. आता अगदी हेच प्रमाण घेऊन करून बघते.
आजच करणेत येईल. खूप दिवस तुमच्या पाक्रुची वाट बघत होतो ! नेहमीप्रमाणेच भारी :)
कत्रिना कैफ सुंदर दिसतेच्च्च्च.
सानिका ची पाकृ नेटकी नि देखणी असतेच्च्च्च्च.
नथिंग न्यू.
>>>मी आप्पेपात्रात कमी तेलात तळून घेतले आहे.
हा बदल आवडला. :)
आयडीया एकदम झक्कास...
फोटो नेहेमीप्रमाणे भारी !! :)
सानिका,आजच केली होती. मस्त झाली. तुझे प्रमाणही अगदी परफेक्ट आहे! फोटोसाठी कॅमेरा आणेपर्यंत लेकाने कोफ्ते गट्टम करायला सुरुवात केली,त्यामुळे फोटो बाजुलाच रहिला,कोफ्ते वाचवता,वाचवता!!
In reply to सानिका,आजच केली होती. मस्त by अजया
बनवून बघीतलीस आणी आवडली पाकृ म्हणून धन्यवाद ग :)
वा वा.... सहिच.. मस्त दिसतायत कोफ्ते. :)
मिपावर नवीन आहे परंतु याआधीच्या तुमच्या काही पाककृती करून पहिल्या आहेत. त्यामुळे ही प्रतिक्रिया सर्वच पाककृतींसाठी. कोफ्ते करून बघेन नक्की.
खतरा फोटो आलाय शेवटचा.मस्त दिसतेय डिश अगदी.
करून पहायची आहे.
:)
नुसत्या रेसेप्या काय दाखवतेस ग ? कधी तरी आमंत्रण तरी दे जेवणाच ;)
मस्त रेसेपि !
In reply to नुसत्या रेसेप्या काय दाखवतेस by पियुशा
अग्गो बाई!! तूला आता आमंत्रण हवे होय...यायचे की कधीही :)
धन्स..
तोंपासु !
विकांताला करण्यात येईल ..
लाळेचा झरा सुरु झाल... :)
काल दुधी घेऊन आलीये. सानिके, तू वापरलेल्या दुधीचे वजन किती असेल? हनुमानाची गदा असावी तसा मला मिळालाय.
In reply to काल दुधी घेऊन आलीये. सानिके, by रेवती
दुधीचे वजन जवळ - जवळ ४०० ग्रॅ होतं.
In reply to दुधीचे वजन by सानिकास्वप्निल
ओक्के. आता करते ही पाकृ.
In reply to ओक्के. आता करते ही पाकृ. by रेवती
दुधी उरला तर दुधी हलवा करा.
पिस्ता बर्फी न घालता.
कुठे गेले आद्य बल्लवाचार्य श्री श्री गणपा जी ठाकूर?
माझ्या लक्षात बिचार्याची तीच पा कृ राहिली आहे.
In reply to दुधी उरला तर दुधी हलवा करा. by प्यारे१
अहो प्यारेश्वर, दोन गदा आणाल्या होत्या दुधीच्या. एकाचा हलवा केलाय, पिस्ताबर्फी न घालता. दुसर्याची कोफ्ताकरी केली. गणपा सध्या सुट्टीवर असला म्हणून काय झालं, तो मिपा बघत असणारच! ;)
दुधीची खीर नाहीतर गोड भाजी एवढेच करत आले इतकी वर्षे. हे कोफ्ते एकदा करून बघितले पाहिजेत!
कालच ही करी करून बघितली. पहिल्यांदा मला दुधी कोफ्ते जमले आणि एकूणच पाकृ छान झाली. नुसते कोफ्ते खायला चांगले लागले. आता येकदम कान्फिडन्स आलाय जणु!
In reply to कालच ही करी करून बघितली. by रेवती
धन्यवाद रेवती :)
In reply to कालच ही करी करून बघितली. by रेवती
तुमच्या कडच्या करीचा फोटू
झकास................ :)
कोफ्ते करुन पाहीन, तळून होईस्तवर र्हायलेच शिल्लक तर करीचं बघावं ;)
भोपळ्याशी शालेय जीवनापासुन घट्ट नाते असल्याने भोपळा कधीच आवडला नाही ;)
हा प्रकार मात्र मस्त आहे ..करके देखेंगे :)
मला दुधी अजिबात आवडत नाही त्यामुळे पास !
दुधि चे कोफ्ते करताना ते गोल गोल करणे ही एक कलच आहे ...अत्त आपे पात्र वपरुन मस्त गोल गोल करत आले ....मस्त आयडियाची कलपना ...:) :)
आमच्या सौं नी आज केली होती.

आहा!