मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुधी कोफ्ता करी

सानिकास्वप्निल · · पाककृती
. साहित्यः १ कोवळा दुधी २ टोमॅटो बारीक चिरलेले १ कांदा बारीक चिरलेला ३-१/२ टेस्पून बेसन १ टेस्पून काजू २-३ लसूण पाकळ्या आल्याचा छोटा तुकडा १/२ मिरची १/२ टीस्पून जीरे १ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची १-१/२ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी - जास्त) १ टेस्पून धणेपूड १ टेस्पून पंजाबी गरम - मसाला (नसल्यास रोजचा गरम - मसाला वापरावा) मीठ चवीनुसार १ टीस्पून कसूरीमेथी बारीक चिरलेली कोथींबीर तेल . पाकृ: प्रथम दुधीचे साल काढून किसून घ्या. हलकेच पिळून रस काढून घ्या. दुधीच्या किसात आता बेसन, थोडा गरम - मसाला, थोडे लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ घालून कोफ्ते तयार करून घ्या. तुम्ही कोफ्ते डीप फ्राय करु शकता. मी आप्पेपात्रात कमी तेलात तळून घेतले आहे. . मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो, कांदा, आले + लसूण, मिरचीचा तुकडा आणी काजू घाला. थोडेच पाणी घालून मुलायम वाटून घ्या. कढईत तेल गरम करा व जीर्‍याची फोडणी करा. त्यात वाटलेला मसाला घालून चांगला परतून घ्या त्यात आता उरलेले लाल तिखट, गरम - मसाला, धणेपूड, मीठ, कसूरीमेथी चुरडून घाला व तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यात दूधीचा रस व थोडे पाणी घालून १०-१५ मिनिटे मंद गॅसवर शिजू द्या. ( ग्रेव्ही कितपत दाट / पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घाला.) . सर्व्ह करायच्या ५ मिनिटे आधी गरम ग्रेव्हीत तयार कोफ्ते घाला. खूप आधीपासून घातले तर कोफ्ते मऊ होऊन फुटू शकतात. वरून कोथींबीर पेरा व नान, रोटीबरोबर दुधी कोफ्ता करी सर्व्ह करा :) . दूधीचे कोफ्ते चटणीबरोबर ही नुसते खायला छान लागतात.

वाचन 17080 प्रतिक्रिया 0