आनंद - कार्लसन डाव ५

चतुरंग जनातलं, मनातलं
एक डोळा तिकडे मुंबईत आणि दुसरा चेन्नै अशी अवस्था झाली होती. त्यापैकी आता फक्त चेन्नैत जीव अडकला आहे!बहुप्रतीक्षित असा डाव क्र. ५ सुरु होतोय.
वर्गीकरण
लेखनप्रकार

215 टिप्पण्या 36,123 दृश्ये

Comments

आतिवास नवीन

'मुंबईत जीव आता अडकला नसल्याच्या' भावनेशी पूर्ण सहमत :-)

चतुरंग नवीन

ई ६, डी४, डी ५, घोडा सी ३, सी ६ खेळ्या सुरु झाल्यात सेमी स्लाव

चतुरंग नवीन

तर मॅग्नुस घोड्याने प्यादे घेता येईल पण मग ई५ असे प्यादे आले तर मग घोड्याला परत जावे लागेल आणि वजिरावजिरी झाली तर राजानेच वजीर घ्यायला लागून राजाचे कॅसलिंग जाते. पण आनंदने घोडा एफ६ खेळला.

आतिवास नवीन

पहिल्या ७ खेळ्या वेगात झाल्या. मॅग्नुसने घोडा एफ ३ मध्ये आणल्यावर आनंदने थोडा वेळ घेतला आणि घोडा एफ ६ मध्ये आणला. आता पहिली - सुरुवातीची - झटापट संपलेली दिसतेय!

चतुरंग नवीन

'क्रोसीन' असं लिहिलेला ब्लेझर घालून आला होता आज गडी पुन्हा 'एनायायटी' शर्टात दिसतोय. पुसट गंध आहे कपाळाला. आणि यावेळी सुरुवातीपासूनच चहाचा कप हातात आहे!

चतुरंग नवीन

पुढे काढला आनंदने! मॅग्नुसचा वजीर सी २ आणि हत्ती डी १ असा विचार असावा.

चतुरंग नवीन

In reply to by आतिवास

आता आनंदने त्याची मोहोरी विकसित करणे जरुरीचे आहे. विशेषतः पांढरा उंट आ।इ हत्ती डावात यायला हवेत.

चतुरंग नवीन

वजीर डी३! मॅग्नुस एकदम वेगळा खेळलाय. आनंदच्या घोड्याची ई४ अशी शक्य असलेली उडी रोखली. आता बहुदा आनंद कॅसल करुन घेईल. त्यानंतर हत्ती डी१?

रमताराम नवीन

In reply to by चतुरंग

घो बी-४ एक चांगला हल्ला आहे वजीरावर. पुन्हा वजीराला मागे ढकलता येईल.

चतुरंग नवीन

In reply to by रमताराम

तो उंट आहे, वजीर अजून त्याच्या महालातून निघाला नाहीये. तुम्ही बहुदा अ‍ॅनालिसिस चा बोर्ड बघताय!

चतुरंग नवीन

डाव आनंदच्या राजाच्या बाजूला हल्ला करायचा दिसतोय. त्याला घोडा जी ५ किंवा उंटाची खेळी शक्य आहे. ओह्..प्याद्यांची मारामारी झाली घोड्याने प्यादे घेतले. पटाच्या मध्यात पांढर्‍या मोहोर्‍यांची सभा भरवली आहे मॅग्नुसने! :)

चतुरंग नवीन

घोडा ई ३ मधल्या ऊंतावर घातला, आता आनंदचा एक घोडा आणि वजीर डी३ मधल्या घोड्यावर मोर्चा लावून असल्याने ई३ मधला ऊंट हलू शकत नाही.

केदार-मिसळपाव नवीन

In reply to by केदार-मिसळपाव

राजाचा किल्लेकोट धोक्यात येतो, फ२ प्याद्याला हालचाल करावे लागली तर..

अग्निकोल्हा नवीन

विशि दुर्दैवाने कधीच आक्रमण प्रथम करत नाही. विशी विशितल्या पोराचे दडपण घेतो हे योग्य नही.

अग्निकोल्हा नवीन

In reply to by चतुरंग

त्यामानाने कार्लने मध्यावर जी सभा लावली आहे ती त्याचीआक्रमकता जास्त स्पष्ट करतेय. तसेच आतापर्यंतच्या 4 सामन्यात आनंदने आक्रमक चाली रचून पटावर नियत्रण ठेवलय असेही दिसले नाही त्यामानाने कार्लच्या खेळी रोचक आहेत. आपण म्हणता तसे आनंदने आक्रमक घोड़ा वापरून कार्लचा ऊंट प्रथम घेतला आहे हे आक्रमण वाटेलही परंतु अजूनही ही चाल पुरेसा दबाव निर्माण करती आहे असे मला जाणवत नाही. थोडक्यात आनंद स्लो बट स्टडी तर कार्ल अग्रेसिव जास्त वाटतो. आनंदचे बरोबरीचे प्रस्ताव योग्य असुनही कार्लने आनंदची टाईम लिमिट संपेपर्यंत डाव ताणले हा सुध्दा आक्रमकतेचा भाग वाटतो

रमताराम नवीन

In reply to by अग्निकोल्हा

विशीतलं पोरगं आज वर्ल्ड नं. १ आहे आणि आनंद नं. ८. दोघांच्या एलो रेटिंगमधे १०० गुणांचा फरक आहे!! आणि मुळात आनंद दडपण घेतोय असंही नाही.

चतुरंग नवीन

In reply to by रमताराम

फ्लँबोयंट आहे. त्यामुळे तो एकदम चमकदार आक्रमणात वाटतो बर्‍याचदा. पण मी कालच्या डावाच्या शेवटी म्हणालो तसा आनंद त्याची बेसिक्स घट्ट धरुन असतो तो एकदम चमकधमकच्या मागे जात नाही. पण त्याचवेळी तो पुरेसे नाविन्य आणता येईल का तेही बघत असतो.

चतुरंग नवीन

आत्तापर्यंत जाणवलेली गोष्ट अशी की आनंद स्टँडर्ड लाईनच्या बाहेर जायचा प्रयत्न करतोय. जो मॅग्नुसचा कंफर्टेबल एरिया आहे. मॅग्नुस जर कंफर्टेबल झाला तर तो किंचित ढिला पडू शकतो अशी अटकळ!!

चतुरंग नवीन

लाँग कॅसल!! ओपन झालेल्या क्वीन साईडला कॅसल झाला. आता आनंदने राजाच्या बाजूला कॅसल केला तर दुसर्‍या डावाप्रमाणे भन्नाट डाव बघायला मिळणार!

केदार-मिसळपाव नवीन

In reply to by चतुरंग

कार्ल्सन चा इथे नाहितर आनंद च्या किल्लेकोट नंतर राजा धोक्यात येइल त्याचा

चतुरंग नवीन

ई ४ असे प्यादे पुढे टाकले तर काय असा विचार करतोय. घोडा कुठे जाऊ शकेल?

चतुरंग नवीन

त्या घोड्याला उचकवण्यात अर्थ नाही. बहुदा कॅसलच करेल तो आता.

चतुरंग नवीन

घड्याळ जरा मागं पडलंय. १७ मिनिटे जास्त घेतलीत मॅग्नुसपेक्षा. तिकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे.

केदार-मिसळपाव नवीन

आता पुढे घोड्याची अदलाबदल करणार का?

चतुरंग नवीन

घोड्यांचे एक्स्चेंज घडवून आणायचा डाव असावा. त्यामुळे मग बी प्यादे सी ३ मधे येऊन हत्तीला बी स्तंभ मोकळा मिळतो आणि हत्ती थेट बी ३ पर्यंत धडक मारु शकतो. दुसर्‍या बाजूने आनंदचा काळा उंट ई५ मधून सी ३ मधल्या घोड्यावर मोर्चा लावयला येऊ शकतो...असं काहीतरी..

केदार-मिसळपाव नवीन

In reply to by चतुरंग

कार्ल्सन ने घोडा एक्स्चेंज केला तर, पण ते थोडे अशक्य वाटते. आनंदचा काळा उंट किवा घोडा ई५- शक्य आहे. पण मग आनंद किल्लेकोट करणार आणि वजीराला हत्तीचा सपोर्ट देणार.

रमताराम नवीन

आपली चापलुसी इथेही दाखवायला हवी का हो मि. सुंदर. कशी माणसं ही च्यामारी. ह्यॅ:

चतुरंग नवीन

In reply to by रमताराम

दहा वेळा अम्मा, अम्मा चा घोष करायला मिळायला नको का? वीस कोटी काय उगीच दिलेत होय!! :)

केदार-मिसळपाव नवीन

In reply to by केदार-मिसळपाव

आता कार्ल्सन काय करणार? वजीरावजीर ? मग आनंद किल्लेकोट नाही करु शकणार

चतुरंग नवीन

आम्हाला कॉमेंट्री ऐकायची आहे. तू कायकाय काशी केलीस ते नंतर बघू!

चतुरंग नवीन

प्याद्यांची संख्या समान आहे आणी सगळी प्यादी समोरासमोर आहेत. त्यामुळे प्याद्यांच्या रोलरकोस्टरला आपोआपच खीळ बसली! पांढरा घोडा बी आणि ई५ दोन्हीकडे येऊ शकत नाही. आता आनंद कॅसल करुन घेईल बहुदा.

केदार-मिसळपाव नवीन

कार्ल्सन हत्ती डबल करेल त्यच्याकडे तसाही पांढर्‍या घरातला ऊंट आहे.

चतुरंग नवीन

ई७ मधे घेतलाय आनंदने आणि मग उंट डी७ कारण सी६ च्या प्याद्याला सपोर्ट.

चतुरंग नवीन

बहुतेक त्याचे दोन्ही हत्ती कार्लसनच्या वजिराच्या बाजूला आणायचे असावेत. तिकडून बी स्तंभ उघडा आहे आणि कार्लसन तिकडे हत्ती चटकन आणू शकत नाहीये!