माझी पार्श्वभूमी :
१) शाखेत गेला नाही तर रात्री जेवेण नाही अशा गल्लीत, वाड्यात, वातावरणात जन्म आणि बालपण.
२) वयाच्या नवव्या वर्षापासून शाखेत. नंतर महाविद्यालयात व्यावसाईक शिक्षण घेताना वसतिगृहात रहाताना कॅम्पस वर शाखा सुरु केली. नियमित चाळीस तरुणांची शाखा चालवली.
३) संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय.
४) स्थानिक, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, आतल्या गोटातल्या बैठका, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे, बौद्धिके यांना नियमित अपेक्षित आणि उपस्थिती.
५) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे .
६) सध्या संघ आणि परिवारापासून लांब. राम मंदिर हे आंदोलन अनावश्यक असून देशाचा घात करणारे आहे असा सुरुवाती पासून राष्ट्रीय अधिका-याशी मतभेद होता. बाबरी उध्वस्त करण्याने देशाचे अपरिमित नुकसान झाले अशी भावना- जे सत्य आहे. संघाची ती अत्यंत क्रूर- केवळ-राजकीय खेळी होती. काम करत असताना बरेच न पटणारे मुद्दे येत होते. पण सगळे आपल्याला वाटते ते तसेच व्हावे असे नव्हे - असे स्वत:ला समजावत पुढे गेलो …. राम मंदिर हे कधीच राष्ट्रीय आंदोलन नव्हते आणि नाही. या देशातल्या समस्त हिंदूंची ती भावना नव्हे - काही लोकांची असेल.
सद्य विषय : अलीकडे संघ अधिका-यांनी हिंदुनी तीन मुले होऊ द्यावीत अशी व्यक्त केलेली विधाने. संघाने भारता मध्ये आधीच एक दुभंग निर्माण केलाय - हिंदू आणि अन्य असा. त्या दुभंगला खत पाणी घालण्यासाठी अशी विधाने आणि आचरण संघ करत असतो. लव्ह जिहाद वगैरे.दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे. सामान्य स्वयंसेवकांच्या डोक्यात, मनात, रक्तात हा भेद इतका पक्का रुजलाय की त्यांना आपण करू तीच देशभक्ती, आपण करू तेच सामाजिक काम आणि आपले सामाजिक प्रकल्प हेच फक्त देश पुढे ढकलण्याचे इंधन आहे - असा पक्का समज आहे. या विषयावर त्यांना अन्य कांही ऐकणे सोसवतच नाही.
अन्य महत्वाचे : या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. वास्तविक आवश्यकता आहे ती लोकशिक्षणातून प्रस्थापित व्यवस्थे मध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नाची. समांतर व्यवस्थेमधले संघाचे सामाजिक, राजकीय ( भाजप ), शैक्षणिक, आर्थिक प्रकल्प हे तद्दन सत्ता केन्द्री, मनुष्य केन्द्री आणि बहुतांशी आतबट्ट्यातले आहेत. ज्या सामाजिक प्रकल्पांचा मुखवटा धारण करून संघ आपला ढोल बडवतो त्या सामाजिक प्रकल्पांचे वेगवेळ्या निकषांवर ऑडीट केल्यास सत्य समोर येऊ शकते.
संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत. अशी जनता आसाराम बापूंच्या कळपात पण असते आणि अन्य ब-याच ठिकाणी. संघाची तिसरी शक्ती आहे ते प्रत्यक्ष संघात आणि संपूर्ण संघ परिवारात असणारी भोंदू मंडळी किंवा सत्ता केंद्रे. प्रचंड मोठ्यावर भोंदुगिरी येथे चालते. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्या बौद्धीकांनी आपण आपले घरदार सोडून राष्ट्राय स्वाहा करायला निघालो आहोत त्याचे पाय मातीचे आहेत हे भाबड्या जमातीला कधीच कळत नाही. भाजपच नव्हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक प्रकल्पांमध्ये ही सत्ता केंद्रे आहेत, भोंदुगिरी आहे आणि विचारद्रोही लोक आहेत.
भारतीय समाज एकसंधच असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.
वाचने
42192
प्रतिक्रिया
275
मिसळपाव
प्रतिक्रिया
हिंदू आणि मुसलमान या केवळ
ह्म्म्म्म!
In reply to हिंदू आणि मुसलमान या केवळ by बलि
या रेषा कृत्रिम आणि स्वार्थी
In reply to ह्म्म्म्म! by राजु भारतीय
रेषा कृत्रिम आणि स्वार्थी
In reply to या रेषा कृत्रिम आणि स्वार्थी by श्रीगुरुजी
???
In reply to रेषा कृत्रिम आणि स्वार्थी by राजु भारतीय
वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला
+१०००००००००
In reply to वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला by प्रकाश घाटपांडे
वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला
In reply to वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला by प्रकाश घाटपांडे
संघ कार्यकर्ते आणि वैचारीक
In reply to वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला by प्रकाश घाटपांडे
वैचारिक बदलाचा प्रवास....
In reply to वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला by प्रकाश घाटपांडे
@ राजू भारतीय ...
In reply to वैचारिक बदलाचा प्रवास.... by राजु भारतीय
तुमचा आबा झालाय !
In reply to @ राजू भारतीय ... by मुक्त विहारि
@ राजू भारतीय ...
In reply to तुमचा आबा झालाय ! by राजु भारतीय
>>> अहो राम मंदिर हे फक्त
In reply to तुमचा आबा झालाय ! by राजु भारतीय
४७ नंतर ९१ पर्यंत ज्या अनेक
In reply to तुमचा आबा झालाय ! by राजु भारतीय
४७ नंतर ९१ ?????
In reply to ४७ नंतर ९१ पर्यंत ज्या अनेक by llपुण्याचे पेशवेll
का अभ्यास कच्चा आहे वाटतं
In reply to ४७ नंतर ९१ ????? by राजु भारतीय
समस्या जितकी जुनी तितकी ती
In reply to वैचारिक बदलाचा प्रवास.... by राजु भारतीय
हे राहिलंच
स्पष्टीकरण....
In reply to हे राहिलंच by आदिजोशी
मुसलमान आणि हिंदू व्यक्तींमधला सरसकट विवाह वा प्रेम हे लव्ह जिहा
In reply to स्पष्टीकरण.... by राजु भारतीय
?????? !
In reply to मुसलमान आणि हिंदू व्यक्तींमधला सरसकट विवाह वा प्रेम हे लव्ह जिहा by अनिरुद्ध प
… आणखीन एक !
In reply to ?????? ! by राजु भारतीय
धन्यवाद
In reply to … आणखीन एक ! by राजु भारतीय
सगळ्या वाक्यांशी सहमत
In reply to धन्यवाद by अनिरुद्ध प
मला पहिला परिच्छेद खोटा वाटत
In reply to सगळ्या वाक्यांशी सहमत by मुक्त विहारि
का ?
In reply to मला पहिला परिच्छेद खोटा वाटत by पुष्कर जोशी
का बरे खोटा ?
In reply to का ? by राजु भारतीय
सोड ना!
In reply to का बरे खोटा ? by पिशी अबोली
क्या बात क्या बात प्यारेआबा..
In reply to सोड ना! by प्यारे१
मी खरा की खोटा ......! धन्य आहे !!!
In reply to का बरे खोटा ? by पिशी अबोली
बस बस बस... थँक्यू...
In reply to मी खरा की खोटा ......! धन्य आहे !!! by राजु भारतीय
होप आय एम नौ इनफ मोडेस्ट !
In reply to बस बस बस... थँक्यू... by पिशी अबोली
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाबाबत
In reply to स्पष्टीकरण.... by राजु भारतीय
इथे वाचायला वेळ कुठे आहे?
In reply to मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाबाबत by इष्टुर फाकडा
३००+
३०० + होतील ही!
In reply to ३००+ by बिपिन कार्यकर्ते
माफक सदस्य.
संघाविषयी कधीही आपुलकी नव्हती पण......?
काय हे ....?
In reply to संघाविषयी कधीही आपुलकी नव्हती पण......? by बाबा पाटील
@ राजू भारतीय ...
In reply to काय हे ....? by राजु भारतीय
मला लेखाचा पहिला परिच्छेद १००
In reply to @ राजू भारतीय ... by मुक्त विहारि
का बरे ?
In reply to मला लेखाचा पहिला परिच्छेद १०० by पुष्कर जोशी
सरळ सरळ सांगा न राव धाग्या चे
In reply to का बरे ? by राजु भारतीय
:)
@ राजू भारतीय ...टाळी एका हाताने कधीच वाजत नाही...
.
In reply to @ राजू भारतीय ...टाळी एका हाताने कधीच वाजत नाही... by मुक्त विहारि
दुरुस्ती
In reply to . by उद्दाम
@ उद्दाम...
In reply to . by उद्दाम
.
In reply to @ उद्दाम... by मुक्त विहारि
बहुपत्नीत्वाची चाल हिंदू
In reply to . by उद्दाम
.
In reply to बहुपत्नीत्वाची चाल हिंदू by मृत्युन्जय
आक्षेपार्ह
In reply to . by उद्दाम
कायदा तुमच्याच संसदेने केलेला
In reply to . by उद्दाम
.
In reply to कायदा तुमच्याच संसदेने केलेला by मृत्युन्जय
तुमची आणि आपली सर्वांची
In reply to . by उद्दाम
अक्कल गहाण ठेवली असल्यास
In reply to तुमची आणि आपली सर्वांची by मृत्युन्जय
कंची साळा तुमची???
In reply to . by उद्दाम
@ ट़ का......
In reply to कंची साळा तुमची??? by टवाळ कार्टा
....आपोआप विरघळलेला असेल.
In reply to @ राजू भारतीय ...टाळी एका हाताने कधीच वाजत नाही... by मुक्त विहारि
तुम्ही स्वतः उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद...
In reply to ....आपोआप विरघळलेला असेल. by राजु भारतीय
किरकोळीत नका हो काढू !
In reply to तुम्ही स्वतः उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद... by मुक्त विहारि
तुम्हाला देखील संघ आवडत नाही असे दिसते.....
In reply to किरकोळीत नका हो काढू ! by राजु भारतीय
.... मग रामाचे मंदिरच कशाला ?
In reply to तुम्हाला देखील संघ आवडत नाही असे दिसते..... by मुक्त विहारि
>>> हिंदूचे रक्षण संघ करतो तर
In reply to .... मग रामाचे मंदिरच कशाला ? by राजु भारतीय
>>> गुजरात सोडता एकही राज्यात
In reply to किरकोळीत नका हो काढू ! by राजु भारतीय
हमममम!
In reply to >>> गुजरात सोडता एकही राज्यात by श्रीगुरुजी
>>> अहो, लिहीण्याच्या ओघात
In reply to हमममम! by राजु भारतीय
गुड जोक !
In reply to >>> अहो, लिहीण्याच्या ओघात by श्रीगुरुजी
वरील विचार मंथन हे राजू
In reply to @ राजू भारतीय ...टाळी एका हाताने कधीच वाजत नाही... by मुक्त विहारि
लै जुना विषय.. मी १८५७ ला
लै जुना विषय....
In reply to लै जुना विषय.. मी १८५७ ला by ध्यानस्थ बगळा
सद्य विषय
'दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे' हा मुद्दा पटण्यासारखा आहे, पण...
४) स्थानिक, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, आतल्या गोटातल्या बैठका, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे, बौद्धिके यांना नियमित अपेक्षित आणि उपस्थिती. ५) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे .ते..६) सध्या संघ आणि परिवारापासून लांब.इथपर्यंत आमुलाग्र बदल घडण्याइतकं काय घडलं? ३)संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत.या वरच्या वर्णनात मला वाटतं "संघ" या शब्दाच्या जागी "शिवसेना", "मनसे", "काँग्रेस", "रिपाइं", "सीपीएम" किंवा "तृणमूल काँग्रेस", यांपैकी कुठल्याही पक्षाचं नाव घातलं तर चालेल, हो ना? ४) अखेरीसः "रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी" यामध्ये आपल्याला संघाने स्वतःच्याच सदस्यांची केलेली वैचारिक नसबंदी अभिप्रेत असावी, तसं असेल तर so called बुद्धीजीवी असलेले इतक्या मोठ्या संख्येने सदस्य अशी नसबंदी कित्येक दशकं का होऊ देत असावीत, आणि तुमच्यासारखे त्याला उघड विरोध का करीत नसावेत? असो, लिखाणाचं धाडस इथे केलंत याचं कौतुक वाटतं; असंच लिखाण "पांचजन्य" मध्ये प्रसिद्ध होईल का?लिखाणाचं धाडस इथे केलंत याचं कौतुक वाटतं;
In reply to 'दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे' हा मुद्दा पटण्यासारखा आहे, पण... by बहुगुणी
विटेकर ....!
In reply to लिखाणाचं धाडस इथे केलंत याचं कौतुक वाटतं; by विटेकर
जरा सविस्तर !
In reply to 'दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे' हा मुद्दा पटण्यासारखा आहे, पण... by बहुगुणी
क्लासीक.
अर्धवट्राव !
In reply to क्लासीक. by अर्धवटराव
आश्चर्य आहे.
In reply to अर्धवट्राव ! by राजु भारतीय
़कुट य
In reply to आश्चर्य आहे. by अर्धवटराव
अरे...
In reply to ़कुट य by राजु भारतीय
>>>सिंपल दाद
In reply to अरे... by अर्धवटराव
एकच नंबर
In reply to अरे... by अर्धवटराव
लेखातल्या कोणत्याही मुद्यावर काहीही चर्चा करण्यात रस नाही
`एक कुटुंब एक मुल'
In reply to लेखातल्या कोणत्याही मुद्यावर काहीही चर्चा करण्यात रस नाही by संजय क्षीरसागर
जातीनिहाय विचार करुन प्रश्न कसा सुटणार?
In reply to `एक कुटुंब एक मुल' by मुक्त विहारि
भाबडा आशावाद....
In reply to जातीनिहाय विचार करुन प्रश्न कसा सुटणार? by संजय क्षीरसागर
अगदी असंच काही नाही.
In reply to लेखातल्या कोणत्याही मुद्यावर काहीही चर्चा करण्यात रस नाही by संजय क्षीरसागर
हा पेपर भारतीय असल्याने....
In reply to अगदी असंच काही नाही. by धन्या