एलियनायटीसेलिया - भाग ५
लेखनप्रकार
मागील भागः
एलियनायटीसेलिया भाग ४
एलियनायटीसेलिया भाग ३
एलियनायटीसेलिया भाग २
एलियनायटीसेलिया भाग १
आता मार्कची ड्यूटि संपली होती आणि तिथे दुसरा कंट्रोलर आला होता. तो फारच विचित्र होता स्वभावानी! तो होता अर्धा मराठी, अर्धा पंजाबी, आणि लहानपणापासून फ्रान्समधे राहिलेला, आनंद राजवीर सिंग त्याचं नाव! मला पाहुन वसकन म्हटला 'येस्सस... व्हात दु यु वान्त'..
तो आनंद थोडासा सणकीच होता. तो वंशानी जरी भारतीय असला तरी कट्टर फ्रेंच होता. त्यामुळे त्याला इंग्रजांबद्दल राग असावा असं मला वाटायचं. मी काही दिवस त्याचं निरीक्षण केल्यानंतर तसं डेव्हला विचारलं, त्यानी सांगितल्यावर समजलं, त्याचा राग इंग्रजांवर नसून इंग्रजीवर होता. झालं असं की तो वंशानी भारतीय, आई-वडील अगदी मस्त इंग्रजी बोलायचे, पण हा लहानाचा मोठा झाला फ्रान्समधे, त्यामुळे इंग्रजी फारसं येतच नव्हतं. पण आपल्या विषयात जाम हुशार, त्यामुळे इंग्लंडात नोकरी अगदी सहज मिळाली. आता प्रश्न आला भाषेचा, कारण बहुतांश ब्रिटीशांना एकच भाषा येते आणि याला अडीच भाषा येत असून पुन्हा संवादात अडथळा. अडीच भाषा म्हणजे, फ्रेंच उत्तम यायचं, आणि मराठी, पंजाबी आणि इंग्लीश अर्ध-अर्ध! पुन्हा याचे इंग्लीश म्हटल्यावर उच्चाराचा वांदा! त्यामुळे तो काही ओरडून म्हणाला नाही मला, पण मला तसंच वाटलं; आई बहुदा पुण्याची असावी! मी लगेच त्याला "बोन्जूर" घातलं, बोन्जूर म्हणजे फ्रेंच लोकांचा रामराम! मग तो लगेच नीट, प्रेमानी बोलायला लागला, "बोन्जूर! सो, हाऊ ज्दू यु ज्दू? व्हात आर यू ज्दूईंग हिअर ऑन सॅतर्दे?". मग मी त्याला काय काय झालं ते सांगितलं आणि त्या सकाळच्या ऑब्झर्व्हेशन्सचा लॉग मला पाठवण्याची विनंती केली. "व्हात्स बिग दील अबाऊत इत? आय कान हेल्प यू विज्थ ज्द ज्देता रिदक्शन ऑफ ज्द ज्देत फ्रॉम ज्द लित्ल वन!" "अरे वा, हा तर एकदम मदत करायला तयार आहे तर!", त्याच्या त्या जकारयुक्त फ्रेंच हेलांतून अर्थाचा मागोवा काढत मी विचार केला. त्यानी मला लव्हेल टेलिस्कोपच्या सकाळच्या सत्राचे सगळे लॉग्ज इमेल केले आणि मी पुन्हा त्या छोटू टेलिस्कोपकडे गेले. तिथला सगळा डेटा माझ्या मशीनवर कॉपी केला आणि परत आले. आता आनंद महाराजांनी एक पुस्तक काढून हातावर ठेवलं, "हे गे मॅन्युअल, यात सगलं नीत लिहिलं आहे. तेक युअर ताईम तू रिद्यूस ज्द देता आन्ड गिव मी अ शाऊत इफ यू नीद माय हेल्प." "थ्यँक्स अ लॉट. आणि खरंच तुला दोन वाक्य का होईना मराठीत नीत आपलं, नीट बोलता येतात.", असं म्हणून मी परत आपल्या जागेवर गेले.
पहिल्यांदा लॉग्ज तपासले, इमेलमधे ज्या नवीन एक्स-रे सोर्सचा उल्लेख केला त्याची आणि आम्ही जो नवा सोर्स पाह्यला त्याची पोझिशन जवळजवळ एकच होती, ते दोन्ही एकच सोर्स असावेत असा संशय येण्याइतपत! मग मी छोटू टेलिस्कोपचा "देता" कसा रीड्यूस करायचा यासाठी ते पुस्तक उघडलं. फार काही कठीण नव्हतं. आवश्यक ती सॉफ्टवेअर्स घेतली आणि सुरू केलं. पण आता मात्र वेळ लागत होता. मग मी आधी एक इमेल केला ज्यांनी तो एक्सरे सोर्स पाहिला होता त्यांना, होजेला, आम्ही जी काही निरीक्षणं केली होती त्यांची माहिती पाठवली आणि लवकरच डेटा रीड्यूस करुन पाठवते याचं आश्वासनही दिलं. होजेही नवा सोर्स सापडल्यामुळे आज हापिसातच होता. त्याचाही लगेच थ्यँक्यूचा इमेल आला. तो फारच खूष झाला असणार. त्याला स्वतःलाच आपल्याला नवा सोर्स मिळाल्याचा आनंद होता वर आता न मागता "रेडीओ"मधला डेटा मिळत होता. जर सरधोपट मार्गानी गेला असता तरी त्यात कमीतकमी एखादा दिवसतरी जातोच. आज रात्रीपासून त्याला काही वेळ दुसर्या रेडिओ टेलिस्कोपवर मिळालेला होताच. त्यामुळे आता मला थोडी उसंत होती डेटा रिडक्शन करण्यासाठी आणि जबाबदारी हलकी झाल्यासाअखं वाटत होतं!
चुकत-माकत या नव्या दुर्बीणीच्या डेटावर काम सुरू झालं, तेवढ्यात पुन्हा एकदा कंप्यूटरच्या कंसोलवरची घंटा किणकिणली, नवं इमेल आलं होतं. आता काय त्रास आहे म्हणून जाऊन पाहिलं तर निरुपमचं इमेल होतं, काल तू भांडून गेलीस, मला वाईट वाटलं. मी एवढं तुटेपर्यंत ताणायला नको होतं वगैरे! मलातरी कुठे ताणायचं होतं, मी ही त्याला मलापण वाईट वाटल्याचं सांगितलं. वातावरणातला तणाव एकदम निवळला आणि आमचा इमेल संवाद पुन्हा पूर्वीसारखा सुरू झाला. आणि अचानक त्याचं इमेल आलं, "मला माहित नाही तू माझ्याबद्दल काय विचार करतेस ते! पण मला असं वाटतंय की मी तुझ्या प्रेमात पडलोय." काय बोलावं, काय करावं मला काही सुचलंच नाही. मी तशीच थिजले जागच्याजागी! थोड्या वेळानी त्या धक्क्यातून बाहेर पडले आणि त्याला लिहिलं, "मला तू बर्याच दिवसांपासून आवडतोस. पण बोलावं का न बोलावं असा संभ्रम होता. मी इथे, इंग्लंडमधे आणि तू तिकडे भारतात. हे कसं चालेल मला माहित नव्हतं. अजून साधारण तीनेक वर्ष तरी माझी पीएच.डी. चालेल आणि त्यापुढे मला कुठे नोकरी मिळेल मला माहित नाही. आणि मला आत्तातरी असं वाटत नाही की लग्न करुन, फक्त दोघांना एकाच ठिकाणी नोकरी मिळत नाही म्हणून मी माझा व्यवसाय सोडून देणार नाही. तू नीट विचार कर, मुलीला फक्त 'आपण आवडतो' म्हणून लगेच "they both lived happily ever after" म्हणण्याएवढे पोरकट आपण दोघेही नाही आहोत!". त्याचं लगेचच उत्तर आलं, "ते तर मलाही माहित आहे. आणि लग्न झालं म्हणून स्वतःचं शिक्षण, व्यावसायिक आयुष्य सगळं विसरुन, घरात बसणारी मुलगी मलाही चालणार नाही. आपल्याकडे "पुढे काय" याचा विचार करायला अजून जवळजवळ तीन वर्ष आहेत."; आता मात्र मी संपूर्ण हवेतच होते. थोड्या वेळानी तो ऑफिसमधून घरी गेला. खरंतर आता मला काम करायचा प्रचंड कंटाळा आला होता. आता मला बाहेर जाऊन त्या थंडीतल्या स्वच्छ हवेत बागडावसं वाटत होतं. पण शब्द दिला होता.
परत डेटा रिडक्शन करायला लागले. बरचसं काम संध्याकाळी चारच्या सुमारास संपलं. आता फक्त ते सगळे आकडे एका आकृतीत बंदिस्त करायचे होते. पण आता फार झालं असं वाटलं. ते सगळे आकडे भरले एका फाईलमधे, ते काय आकडे आहेत, अशी सगळी माहितीपण टाईप केली आनी दिली त्या सोर्सवाल्या, होजेला, पाठवून! त्याच्याकडून थोड्या वेळात धन्यवादाचा इमेला आला आणि मी थोडी शांत बसले. तेवढ्यात कोणीतरी बाहेरुन चालत येतंय असा आवाज आला. कोणीतरी मुलगी असणार, कारण पेन्सिल हील्स वाजत होते बाहेर! यावेळेला कोण आलं इकडे? तेवढ्यात माझ्या ऑफिसचं दार उघडलं. त्या मोठ्या खोलीत मी दाराच्या बरोब्बर दुसर्या टोकाला, दाराकडे पाठ करून बसायचे. आज संपूर्ण इमारतीतच शुकशुकाट होता. आता कोण असेल असा विचार येतो न येतो तोच मागून एक अत्यानंदी आवाज आला, "हे सन्हिता, आय पास्ड द ड्रायव्हिंग टेस्ट! नाऊ आय कॅन ड्राईव्ह!". जेनी! लगेचच उठून मी ब्रिटीश पद्धतीनी, मिठी मारून, तिचं अभिनंदन केलं. तिला झालेला आनंद दिसतच होता तिच्या चेहर्यावर! आता मला कारणही मिळालं होतं आणि कंपनीही, आनंद व्यक्त आणि साजरा करायला! आम्ही लगेच ठरवलं आता संध्याकाळी जेवायला पबमधे जायचं. "पण एक मिनिट!", माझ्या डोक्यातला शंकासूर कधीही शांत बसत नाही, "आपल्याकडे कार कुठे आहे, एवढ्या थंडी-वार्यात चालत जायचं?". "हाहाहा, मी त्याची सोय आधीच केली आहे. टेस्ट पास झाले म्हणून आईनी तिची गाडी दिली मला, मी माझी घेईपर्यंत!" जेनी तयारीनिशी आली होती. "ठीक आहे मग, धमाल करु, आपण. पण आता घरी जाऊ या, मी दमल्ये खूप आणि तुला काही सांगायचंय मला!"
मी माझा पसारा आवरला आणि तिच्या गाडीकडे जायला लागलो. तिला आधीपासून निरुपम ऐकून माहित होताच. मी तिला काय काय झालं ते सांगितलं. "वाव! दॅट्स ग्रेट! आज तू नाही म्हणालीस तर बघ, आज तुला माझाबरोबर 'सेलिब्रेट' करायला लागणारच!", आता हिला काय म्हणानार? "ते सगळं ठीक आहे गं, पण तू दारु पिणार आणि मीपण! मी तर लायसन्स मिळाल्यापासून कधी गाडी चालवलीपण नाही आहे. आपण तिथे पबमधे दारु प्यायली तर परत कशा येणार?" माझी शंका रास्त होती. "ठीक आहे काही हरकत नाही. आपण आधी होम्स चॅपलला जाऊ, तिथल्या दुकानात आपल्याला वाईन मिळेलच. मग पबमधे जाऊन जेवू आणि मग घरी येऊन बाटली उघडता येईल?" आता का-कू करायला काही जागाच नव्हती. जेनीचा प्लॅन फुलप्रूफ होता. आम्ही घरी आलो, डेव्ह आणि मिंगपण घरी होते त्यांनाही सांगितलं. संध्याकाळी सगळ्यांनी पबमधे जेवायला जायचं ठरवलं. मी सकाळी फार लवकर उठले होते त्यामुळे आता दमल्यासारखं झालं होतं. दिवसभर डोक्यालाही फार त्रास करवून घेतला होताच आणि शिवाय रात्री घरी आमची पार्टी किती वेळ चालेल याचीही कल्पना नव्हती. जेवायला जाण्यासाठी अजून दीडेक तास होता, मी म्हटलं, "मी तासभर आराम करते. साडेसहाला निघायचंय, सव्वासहापर्यंत मी येते खाली." या सगळ्या गोंधळात मी माईकच्या ऑब्झर्व्हेशन्सबद्दल आणि त्या नव्या एक्सरे सोर्सबद्दल विसरूनच गेले होते. सगळ्यांना तात्पुरता बाय करून मी वर पहिल्या मजल्यावर, माझ्या खोलीत आले. बॅग भिरकावून दिली एका कोपर्यात, पडदे ओढून खोलीत रात्र केली आणि दिवाणावर झोकून दिलं स्वतःला! बरं वाटलं आडवी झाल्यावर, कधी डोळा लागला समजलंच नाही. आणि थोड्या वेळानी काचेवर टकटक आवाज येताहेत असं वाटलं.
क्रमशः
वाचने
13392
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
छान
In reply to छान by सुनील
>> त्या
In reply to >> त्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
पिंट
In reply to >> त्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्म्म
In reply to ह्म्म by आनंदयात्री
जियो आंद्या
In reply to ह्म्म by आनंदयात्री
पण हा
In reply to पण हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
एलियन
In reply to ह्म्म by आनंदयात्री
पण हा
In reply to ह्म्म by आनंदयात्री
ह्म्म
थोड्या
छान.
In reply to छान. by अभिज्ञ
सॉरी फॉर लेट
सर्व भाग
In reply to सर्व भाग by विनायक प्रभू
छान लिहिता
हां... आता
हा ही भाग आवडला.
यमी आज्जी
शेवट
ह्म्म्म्म्
मस्त
मस्त चाल्लंय !!!
दिस भाग
In reply to दिस भाग by आनंदयात्री
"खन्द्या आन्द्याचा खान्दा"
In reply to दिस भाग by आनंदयात्री
द चा ज्द
In reply to द चा ज्द by ३_१४ विक्षिप्त अदिती
(तेव्हा आता तरी जरा बरे वागा!)
त्रेबाँ
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
पुढे?
In reply to पुढे? by मृदुला
'त्खैब्यां'
क्रमशः वाचल्यानंतरचं
हम्म..
स्मूथ!!!
यम्मी ताई
मस्तच गं
In reply to मस्तच गं by बिपिन कार्यकर्ते
आणि तुझ्या
४-५ भाग
आंद्या
वा वा
मस्त!
मस्त...
In reply to मस्त... by प्रभाकर पेठकर
नाही हो काका
वावा..
पहिला भाग