एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !
एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी !
आपल्याकडे महाराष्ट्र आणि गोवा मध्ये जो नाग मिळतो त्याला -चष्मा नाग (spectacled cobra)किंवा लोकांच्या भाषेत 'दहाचा आकडावाला नाग" म्हणतात. पुण्यामध्ये सदाशिव पेठ्तल्या वाड्याच्या जिन्याखाली,सहकारनगरमधील बंगल्यात-अडगळीच्या खोलीत, धनकवडीला चुली मध्ये, आंबेगाव पठारावर विहिरीमध्ये, लुल्लानगर मध्ये स्वीमींग तलावामध्ये,पार्वती जनता वसाहतीत मोरीच्या बोळात, (सिंहगड रस्ता) वडगाव बुद्रुक मधील इमारतीच्या पिण्याच्या प्यायच्या टाकीत आणि शेवटी कर्वेनगर मध्ये स्कूटर च्या डिक्कीत मला हा मिळाला आहे......(भाग ५)...
माझ्या ४-५ वर्षाच्या कारकिर्दीत मी पन्नास-एक नाग पुण्यात पकडले असतील. प्रत्येक कॉल हा माझ्या साठी एक साहसी आणि नाविन्यपूर्ण अनुभव होता. पण त्यातले काही कॉल मला अगदी "काल-परवा" केल्यासारखे आठवतात.
आधीच्या भागात लिहल्याप्रमाणे विषारी साप पब्लिक मध्ये पकडणे ही खूप मोठी जवाबदारी असते. म्हणून साप पकडायला लागल्यानंतर काही महिन्याने मला राजाभाऊंनी "एक " कॉल दिला. ऑक्टोबर महिन्याची संध्याकाळ होती,थोडा अंधार पडायला लागला होता, मी आणि अजून एक सर्पमित्र (शिकाऊ) गाडीवर कात्रज-कोंढवा रस्त्यावरच्या एका भागात पोहचलो. गल्लीच्या कोपऱ्यावर असते तसे साधे किराणामालाचे दुकान होते. वाण्याने सांगितले की आतल्या कोठीच्या खोलीत साप दिसला. आम्ही खोली पहिली तर थोडी अंधारी होती, भिंतीच्या कडेला ४-५ पोती रचून ठेवली होती. आम्ही तडक सर्पोद्यान वरून आलो होतो म्हणून माझ्या बागेमध्ये टोर्च नव्हता. परिस्थितीचा अंदाज घेऊन मी त्या वाण्याला इमर्जन्सी लाईट घेऊन दरवाज्यात उभा राहायला सांगितले, आणि स्टिक घेऊन खोलीत घुसलो.(आम्ही सर्पोद्यानवाले फक्त हात आणि "?" स्टिक वापरतो.)त्याच थोड्या प्रकशात मी आणि माझा मित्र पोती हळूहळू करून हलवायला लागलो, शेवटचे पोतं हलवेपर्यंत सापाचा काही पत्ता नव्हता.
माझ्या ४-५ वर्षाच्या कारकिर्दीत मी पन्नास-एक नाग पुण्यात पकडले असतील. प्रत्येक कॉल हा माझ्या साठी एक साहसी आणि नाविन्यपूर्ण अनुभव होता. पण त्यातले काही कॉल मला अगदी "काल-परवा" केल्यासारखे आठवतात.
आधीच्या भागात लिहल्याप्रमाणे विषारी साप पब्लिक मध्ये पकडणे ही खूप मोठी जवाबदारी असते. म्हणून साप पकडायला लागल्यानंतर काही महिन्याने मला राजाभाऊंनी "एक " कॉल दिला. ऑक्टोबर महिन्याची संध्याकाळ होती,थोडा अंधार पडायला लागला होता, मी आणि अजून एक सर्पमित्र (शिकाऊ) गाडीवर कात्रज-कोंढवा रस्त्यावरच्या एका भागात पोहचलो. गल्लीच्या कोपऱ्यावर असते तसे साधे किराणामालाचे दुकान होते. वाण्याने सांगितले की आतल्या कोठीच्या खोलीत साप दिसला. आम्ही खोली पहिली तर थोडी अंधारी होती, भिंतीच्या कडेला ४-५ पोती रचून ठेवली होती. आम्ही तडक सर्पोद्यान वरून आलो होतो म्हणून माझ्या बागेमध्ये टोर्च नव्हता. परिस्थितीचा अंदाज घेऊन मी त्या वाण्याला इमर्जन्सी लाईट घेऊन दरवाज्यात उभा राहायला सांगितले, आणि स्टिक घेऊन खोलीत घुसलो.(आम्ही सर्पोद्यानवाले फक्त हात आणि "?" स्टिक वापरतो.)त्याच थोड्या प्रकशात मी आणि माझा मित्र पोती हळूहळू करून हलवायला लागलो, शेवटचे पोतं हलवेपर्यंत सापाचा काही पत्ता नव्हता.
पण जेंव्हा आम्ही शेवटचे पोते थोडे सरकवले, तेंव्हा ३-४ फुटी नाग दिसला. माझा मित्र ओरडला, "अरे कोब्रा !" आणि पुढच्या क्षणी खोलीत अंधार झाला....तो वाणी लाईट घेऊन पसार झाला होता....जिवावरचा प्रसंग असल्यामुळे कचकचीत २-४ शिव्या गेल्या... पण क्षणार्धात परिस्थीतीची जाणीव झाली, पोते काढल्यामुळे तो नाग अस्वस्थ होऊन खोलीत सरपटत होता, थोडासा संधिप्रकाश होता, त्यामध्ये मी संधी साधली आणि नागाला पोत्यात घातले. बाहेर आल्यावर तो वाणी 'सॉरी' म्हणला, पण माझ्या मते त्याची पण काही चूक नव्हती. त्याच्या जागी माझ्या ओळखीचा कोणी पण असता तर अंधारात "कोब्रा" हा शब्द ऐकून पळाला असता. या कॉलनंतर प्रत्येक वेळी मी स्वतःचा टोर्च घेऊन गेलो, "माझी ब्याट, फक्त मीच वापरणार !" याच चालीवर कोणाच्या हातात मी तो दिला नाही. बिरबलाच्या "माकडणीच्या गोष्टीचे तत्व - स्वतः चा जीव फक्त !" हे मनावर कोरून ठेवले. सर्पोद्यान चा प्रत्येक कार्यकर्ता हा "वन-म्यान आर्मी" असतो, त्यामुळे शक्यतो माझ्या बरोबर कॉलला जाताना कोणी नसायचे.त्यामुळे छोट्या कामासाठी खूप वेळा दुसऱ्या लोकांची मदत घ्यावी लागायची. खूप वेळा कोणी मदत करायला पण यायचे नाही, मग एका हाताने काम करून, दुसऱ्या हाताने साप पकडायला लागायचा. एकदा असाच दुपारी तळजाई पठारावरच्या वस्तीतून कॉल आला. तिकडे पोहचल्यावर लोकांनी सांगितले, घराच्या बाजूला कोन्क्रीटच्या पाईप (व्यास: २ फुट) खाली साप गेला आहे. तो १५ फुटी सुट्टा-पाईप वजनदार होता, काही भाग त्याचा जमिनीत पण रुतला होता. नशिबाने एक माणूस मदतीला आला, एका बाजूने मी आणि दुसऱ्या बाजूने तो असे आम्ही पाईप रोल करायला लागलो. अर्धा फुट वर जाताच आम्हाला दोघांना तो साप दिसला.....त्या क्षणी मी काही विचार करायच्या आत त्याने पाईप सोडून दिला. माझा पाय त्या पाईप मध्ये अडकला. मला पण तो "नाग" दिसला होता, आणि हे पण माहित होते की तो माझ्या बाजूला येणार. (पाईप च्या खाली पाणी जाऊन थोडी पोकळी होती.) त्यावेळी मी वूडल्यांड ची सॅण्ड्ल घातली होती.(जाहिरात करत नाही, मजबुतीचे प्रमाण सांगतो आहे !) निमिषार्धात मी सांडल मधून पाय कसाबसा सोडवून घेतला. पुढच्या काही सेकंदात तो नाग माझ्या सॅण्ड्ल कडे आला आणि त्यात शिरून बसला.काही क्षणापूर्वी जीकडे माझा पाय होता आत्ता तिकडे तो चकचकीत नाग शिरून बसला होता. अनवाणी पायानेच तो पाईप मी कसाबसा एकट्याने हलवला, तो पर्यंत नागोबा मस्त पैकी सॅण्ड्ल मध्ये बसले होते. त्यानंतर मग नेहमी प्रमाणे मी त्याला शांतपणे पोत्यात घातला. नशिबाने त्या दिवशी मी सॅण्ड्ल घातली होती, नेहमीसारखा बूट असता पाय बाहेर काढू शकलो नसतो. दुसरे म्हणजे माझ्या सॅण्ड्लला घामाचा वास येत नव्हता नाही तर नागोबा माझ्यावर चिडला असता.;) आधीच्या भागात लिहिल्याप्रमाणे मी २४ तास ड्युटी वर असायचो,कॉलेज, घर सगळी कडून त्या-त्या भागातले कॉल करायचो. सगळ्यात जास्त कॉल करायचो ते अभियांत्रिकीच्या पी.एल. मध्ये. तो काळ फळ सुखाचा असायचा, दिवसभर अभ्यास आणि रात्री साप ! असेच एकदा, मे महिन्याच्या रात्री २ वाजता पुण्याच्या एका पेठेमधून कॉल आला. ती पेठ खरं तर माझ्या घरापासून दूर,आणि माझ्या कॉलच्या कक्षेत येत नव्हती. पण बहुतेक "बिबवेवाडीच्या" मावशी,काकू, आत्या कडून त्यांना माझा नंबर मिळाला होता. नेहमी सापाचा कॉल आला की लोकांची चेहऱ्यावरची भीती मला फोन मध्ये दिसायची, म्हणून मी जास्त करून तरी नकार द्यायचो नाही. त्यामुळे मी झोप बाजूला सारून, तडक सुटलो. तिकडे पोहचलो तर "नाना फडणीसांच्या काळचा" वाडा होता, वाड्याच्या चौकात सगळी झोपाळलेली लोकं जमली होती. त्यांना बघून मला जरा हसूच आले, कारण झोपेतून उठलेली लोकं त्यांच्या नैसर्गिक मेकप मध्ये असतात.(नंतर तीच माणसे अंघोळ करून, शर्ट प्यान्ट मध्ये खोचतात, तेल लावून भांग पडतात, अत्तर लावतात आणि मग माणसासारखे दिसायचा प्रयत्न करतात) ;) साप जिन्याखालच्या अडगळीमध्ये गेला होता. आत्ता ज्यांनी जुने पुण्यातले वाडे पहिले असतील त्यांना कल्पना असेल की त्या लाकडी जिन्याखाली काय काय असते.
पुरातत्त्वखात्याला तिकडे पाठवले तर प्रत्येक वाड्याचा जिना हा युनिस्को चे राष्ट्रीय हेरीटेज घोषित करतील.तसेच खूप थंडावा आणि लपायला जागा आल्यामुळे उंदीर-घुशीच्या कित्येक पिढ्यांची बाळंतपण तिकडे होत असतात. तश्याच जिन्याखाली मी तोंडात टोर्च आणि हातात स्टिक घेऊन घेऊन मी सरपटलो. (रांगायला पण जागा नव्हती.) हळू हळू करून जिन्याच्या तोंडावरचे सामान बाजूला करायला लागलो, मदतीची अपेक्षा नव्हतीच, लोकं "मौत का कुवा" बघावा, तसे वरून मला बघत होते. साधारण अडीच ते तीन पर्यंत मी एकटाच पुरतान समान हलवत होतो,आणि एकदम मला ३-४ फुटी नाग दिसला. चकचकीत करडा नाग, मोठ्या उंदराला खाऊन कसेबसे वेटोळे मारून बसला होता. (मला बासुंदी-पुरीच्या सुग्रास जेवणानंतर आराम खुर्ची मध्ये बसलेल्या माझ्या काकाची आठवण आली.) उंदराला खाल्ले असल्यामुळे त्याला जास्त हलता येत नव्हते, त्यामुळे तो नुसते फणा वर काढून फुत्कार टाकत होता. मी त्याला शांतपणे स्टीकने ओढत जीन्याबाहेर काढला आणि पोत्यात घातला. "मौत का खेल" बघणाऱ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. माझा अक्षरशः अवतार झाला होता, पण नाग पकडल्यामुळे एक मानसिक समाधान मिळाले होते. त्यानंतर मग नेहमी सारखी ओळख परेड, नेहमीचे प्रश्न "तुम्हाला सिद्धी आहे का ? इ." चालू झाले. मी ज्यांनी फोन केला होता त्यांना पेट्रोल साठी २० रु (साल २००६)मागितले. एवढ्या रात्रीची केलेली मेहनत, त्या अंधारात धोक्यात घातलेला जीव या पुढे तर ते जास्त काही नव्हते, असो. त्या काकांनी मला ते पैसे दिले, माझा नंबर परत लिहून घेतला. इतक्यात एक आज्जी त्या घोळक्यातून बाहेर आल्या आणि माझ्या कडे वरून खाली बघत म्हणाल्या,
"चांगल्या घरचा दिसतो, असले गारुडी धंदे कशाला करतो रे बाबा ?"घरचे संस्कार असल्यामुळे उलट उत्तर देता आले नाही, "आवडते म्हणून करतो असेच... " असे बोलून गाडीला किक मारली, नंतर एक कटिंग टाकल्यावर डोके ताळ्यावर आले. हा प्रसंग एवढा मनावर कोरला गेला आहे की अजून त्या आज्जींचा चेहरा मला आठवतो. या नंतर मी यावरती खूप विचार केला, शेवटी एकच उत्तर मिळाले की "समाजात बसलेली सापाची भीती आणि अंधश्रद्धा " हे जो पर्यंत कमी होत नाही तो पर्यंत आमच्या सारख्या गारुड्याना अश्या आज्ज्या, मावश्या, काका-मामा कॉल वर भेटतच राहणार. पुढच्या भागात इतर विषारी साप आणि त्यांचे अनुभव....
वाचने
51427
वाचनखूण
प्रतिक्रिया
76
वाचतोय
तुमच्या फण्याची आपलं पायाची
In reply to तुमच्या फण्याची आपलं पायाची by बॅटमॅन
+ २५ ब्याट सह आत्मू मॅन!
In reply to + २५ ब्याट सह आत्मू मॅन! by अत्रुप्त आत्मा
निव्वळ थोर __/\__
In reply to निव्वळ थोर __/\__ by मोदक
धन्यवाद् !
वाचतोय... पुढील भागांची वाट
प्रत्येक भागात नवीन नवीन
In reply to प्रत्येक भागात नवीन नवीन by बाळ सप्रे
धन्यवाद् !
In reply to धन्यवाद् ! by जॅक डनियल्स
खरयं.. कोकणातल्या घरी खूप गरज
फारच खतरनाक अनुभव घेतलेत की
वाचते आहे.. भन्नाट अनुभव आणि
सहीच!
लवकरच पुण्याला येणार आहेच .
In reply to लवकरच पुण्याला येणार आहेच . by अद्द्या
धन्यवाद् !
In reply to धन्यवाद् ! by जॅक डनियल्स
जरूर जरूर .
रोचक लेखमालिका
In reply to रोचक लेखमालिका by आतिवास
+ 1000000000000000000
In reply to रोचक लेखमालिका by आतिवास
+111111111111111111111
In reply to +111111111111111111111 by पिलीयन रायडर
मला पण असाच प्रॉब्लेम आला होता,,,
In reply to रोचक लेखमालिका by आतिवास
अत्यंत माहितीपूर्ण आणि अत्यंत
In reply to अत्यंत माहितीपूर्ण आणि अत्यंत by गणपा
आमच पण असच...
In reply to रोचक लेखमालिका by आतिवास
अत्यंत माहितीपूर्ण आणि अत्यंत रोचक लेखमालिका.
वाचतोय... पुढील भागांची वाट पाहतोय!!
जबरे अनुभव आणि मस्त लेखनशैली
प्रणाम!
धन्य आहे!
वाचनीय लेखमाला
बहुधा मिपा-वरील सर्वाधिक
चांगल्या घरच्या बाळा,
In reply to चांगल्या घरच्या बाळा, by आदूबाळ
भाई नको.!
In reply to भाई नको.! by जॅक डनियल्स
काय हो, लिवा की त्याबद्दल.
In reply to काय हो, लिवा की त्याबद्दल. by बॅटमॅन
जर भाई चे नाव लपवले तर
In reply to जर भाई चे नाव लपवले तर by जॅक डनियल्स
ओह अच्छा.
खूप सूंदर, साहसी आणि वाचनीय लेखमाला.
In reply to खूप सूंदर, साहसी आणि वाचनीय लेखमाला. by Pearl
धन्यवाद् !
भन्नाट!
एक से एक अनुभव
मस्त लेख.....
In reply to मस्त लेख..... by सौ.मुवि
धन्यवाद् !
मित्रा
जबर्या..
ओह्ह...
लेखमाला अत्यंत उत्तम झालीये
In reply to लेखमाला अत्यंत उत्तम झालीये by संजय क्षीरसागर
धन्यवाद् !
In reply to धन्यवाद् ! by जॅक डनियल्स
एखाद्याला कोपच्यात घेतल्या वर ...
In reply to एखाद्याला कोपच्यात घेतल्या वर ... by संजय क्षीरसागर
हो,म्हणजे मैदानात समजा समोर
In reply to धन्यवाद् ! by जॅक डनियल्स
(दुसऱ्याचे डोके विनाकारण
सादर प्रणाम
ब्येष्ट लेखमाला
खूप मस्त शैलीत प्रबोधन करताय.
मस्त लिहतो आहेस.
खतरनाक!
ड्यान्जर अनुभव आहेत की.
अतिशय उत्तम लेखमालिका
In reply to अतिशय उत्तम लेखमालिका by अभिज्ञ
तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे.
सुरेख लेख-मालिका
वूडल्यांड वरून लक्षात आलं…
In reply to वूडल्यांड वरून लक्षात आलं… by अनुप कुलकर्णी
इजा करणार !
In reply to इजा करणार ! by जॅक डनियल्स
"आपल्याला काही कळत नसताना
In reply to "आपल्याला काही कळत नसताना by मोदक
चांगला प्रश्न !
In reply to इजा करणार ! by जॅक डनियल्स
सद्या मी बेकर्सफील्ड
In reply to सद्या मी बेकर्सफील्ड by खटपट्या
असे काही आहे का..?
In reply to असे काही आहे का..? by मोदक
हो हेच !
In reply to असे काही आहे का..? by मोदक
हो बरोबर, आणखी एक फोटो
In reply to सद्या मी बेकर्सफील्ड by खटपट्या
तुमचे एकदम बरोबर आहे, तुमच्या
In reply to तुमचे एकदम बरोबर आहे, तुमच्या by जॅक डनियल्स
हो बरोबर, असेच साप दीसतात कधी
In reply to हो बरोबर, असेच साप दीसतात कधी by खटपट्या
एकदा तर एक मादी कैट फोक्स
जे.डी ..____/\___
एकदम खतरनाक .
अत्यंत सुंदर!
अनुभव रुचि खेरीज
नेहमीप्रमाणे मस्त
गारूड करणारी लेखमाला
In reply to गारूड करणारी लेखमाला by एस
+१
In reply to +१ by आदूबाळ
+११
पुढचा भाग लिहिला असेल तर त्याची लिंक द्या .