एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !
भाग ६ ....तेच आपल्या पूर्वजांनी केले, नागाबद्दल अंधश्रद्धाने भरलेल्या गोष्टीलिहून त्याची निगेटिव्ह पब्लिसिटी केली आणि मग त्याने काम नाही झाले म्हणून दिसेल तिकडे ठेचला......
या अंधश्रद्धा प्रामुख्याने नागाबद्दलच का ?
कॉलेज मधल्या सुंदर मुलीबद्दलच अफवा पसरवल्या जातात, त्याच नियमाने राजबिंड्या नागाच्या निगडीत अंधश्रध्दा पूर्वापार चालत आल्या आहेत.
आजच्या सारख्या 'बँक ऑफ इंडिया' पूर्वीच्या काळी नव्हत्या त्यामुळे सोन-नाणे कुठे साठवायचे हा प्रश्न असायचा. तसेच पासवर्ड ने चालणारी कपाटे, तिजोऱ्या या कल्पना ज्युल व्हर्न च्या कादंबऱ्या मध्ये पण आल्या नव्हत्या. भिंतीच्या भोकात, मंदिराच्या दगडात सोनं लपवले तरी प्रोब्लेम, कारण आपली मनुष्यजात फारच चौकस, भोकात काही दिसले की काढलेच बाहेर. आधीच्या भागत लिहिल्या प्रमाणे मनुष्य हा फार भित्रट प्राणी आहे. लहान मुलांना आपण बागुलबुवा ची भीती दाखवतो तशीच या मोठ्या चोर लोकांसाठी-
वरती वर्णलेला अनुराग कश्यपचा पिच्चर आठवा- या मण्याचा नागाला काय उपयोग असेल, नागीणीला इम्प्रेस करायला असता तर सगळ्या नागांना असला पाहिजे. विज्ञानाप्रमाणे कधी कधी नागाचे विष काही गोष्टी बरोबर मिसळून किडनी स्टोन सारखा खडा तयार होऊ शकतो. पण ती शक्यता पण फार कमी असते कारण नागाचे विष हे cyanide hydrate salts असते आणि त्याची पाण्याबरोबर रसायनीक अभिक्रिया होत नाही. हल्लीचे गारुडी करड्या रंगाचे नाग मणी विकतात ते खरे बेन्झाईट चे खडे असतात. हे कडे जास्त भोका-भोकाचे असतात त्यामुळे त्याची porosity जास्त असल्याने त्याची द्रावण शोषून घ्यायची क्षमता जास्त असते. नाग चावलेला माणूस हा खडा लावला की वाचतो, हा खडा ज्या च्या कडे असेल तो अब्जाधीश होतो, असा यांचा दावा असतो. विचार करा, असे असते तर हे गारुडी मर्सिडीज मधून फिरले असते आणि ताज मध्ये पुंगी वाजवली असती.
अश्याच प्रकारच्या अनेक अंधश्रद्धा वापरून पूर्वी लोकं आपली संपती टिकवून ठेवत असतील.
"तुमची गर्ल फ्रेंड नागकन्या आहे का ?" हा प्रश्न सहकारनगर मधल्या सुखवस्तू-सुशिक्षित (?) माणसाने विचरला होता. आत्ता विचार करा- चार बुकं शिकलेला माणूस अश्या चित्रपटांचा बळी ठरत असेल तर अशिक्षित माणसाची काय अवस्था. तुम्ही जसे आपल्या प्रजातीच्याच (आणि जातीच्या !)बाईशी लग्न करता तसेच नाग (मेल कोब्रा) हा नागिणी (फिमेल कोब्रा) बरोबरच रत होतो. या सगळ्या नागकन्या- विषकन्या हे या चित्रपटातील अंधश्रद्धाची पिल्ले आहेत. पूर्वीच्या काळी राजेमहाराज्यांकडे 'विषकन्या' असायच्या त्या म्हणजे हेरगिरीचे प्रशिक्षण मिळालेल्या विष प्रयोगात (सगळीच केमिस्ट्री !) निपुण मादक सुंदरी होत्या.
कुठे केवड्याच्या बनातली सळसळणारी ती सुंदर नागीण तर कुठे ही डोक्यावर तांब्याचा नाग लावलेली हिडीस श्रीदेवी !
त्या सोने लपवलेल्या जागी 'भुजंग'(नाग) रक्षा करतो, या अंधश्रद्धेचा जन्म झाला असावा.वास्तविक पाहता, अश्या सोनं लपवलेल्या जागा नेहमी किल्ल्यांची, मंदिराची तळघरे, घरातले चोर कप्पे अश्या असल्याने तिकडे निसर्गतः थंडावा असायचा आणि जमीन खूप भुसभुशीत असल्याने उंदीर-घुश्यांची बिळे पण असायची. म्हणजे राहायला 'येसी घर' आणि वरती पाहिजे तेंव्हा सुग्रास जेवण, त्यामुळे कोणता नाग ती जागा सोडेल. बहुतेक खूप कष्ट करून (किंवा हुंड्यात ;)) त्याला ती जागा मिळत असेल. जर अश्या ठिकाणी, कधी कोणी चोर संपत्ती लुटायला गेलाच, तर तो जाणार कंदिलाच्या-चिमणीच्या प्रकाशात, मग त्याला काय दिसणार डोंबलं ! आधीच भित्रट त्यातून अंधार, जशी आपल्याला कोथळीगडाच्या गुहेतली सावली मल्लिका शेरावत पासून ते वेताळापर्यंत वाटू शकते तसेच त्याला, मग तो जळमटे लागलेला काळा नाग (अंधारात काळांच दिसणार.)अंगावर केस असलेला २० फुटी भुजंगच वाटणारच.
नागाच्या अंगावर केस असतात ही दुसरी अंधश्रद्धा.पोटात कावळे ओरडायला लागल्यावर आपण जे अन्न खातो, त्याचे रुपांतर ऊर्जेमध्ये होते. अंगावरील केसांचे मुख्य काम म्हणजे कुठल्याही सस्तन प्राण्याच्या (माणूस, कुत्रा, बैल इ.) शरीरात जी उर्जा निर्माण होते त्याचे उत्सर्जन कमी करणे आणि शरीर थंड राखणे.(जिम नंतर घाम वाळल्यावर जे थंड वाटते ते ;)) थोडक्यात म्हणजे केस हे शरीरासाठी इन्सुलेशन चे काम करतात. सरपटणारे प्राणी त्यांचे शारीरक तापमान कमी झाले की उन्हात बसून आणि वाढले की बिळात थंड जागी बसून कमी-जास्त करत राहतात. म्हणून उन्हात बसलेला नाग हा त्याची बॉडी ट्यान करत नसून त्याच्या शरीरातले तापमान वाढवत असतो.
निसर्ग हा अनुराग कश्यप च्या पिच्चर सारखा आहे, ज्याची कशाची गरज नसते, असे त्यात काही आढळत नाही.म्हणून नागासारख्या थंड रक्ताच्या प्राण्यांच्या (भाग ५ वाचा) अंगावर केस असूच शकत नाही, त्याची त्यांना नैसर्गिक गरजच नाही. या नागाच्या अंगावरील केसांचा उगम 'भिंतीवरच्या जळमटामध्ये' आहे. आत्ताच्या काळात ती अंधश्रद्धा बळकट करण्यचे श्रेय धंदेवाईक गारुड्यांच्या शिवणकामाला देता येईल. (गारुडी घोड्याचे,डुकराचे केस नागाच्या अंगावर शिवतात.) ज्यांना हे शिवणकाम येत नाही ते गारुडी नागाच्या उरलेल्या कातीला (पेटीतला नाग स्वतः कात टाकू शकत नाही म्हणून ती हाताने काढवी लागते.)कोळसा घासून काळे करतात.
केसांच्या सारखीच दुसरी अंधश्रध्दा म्हणजे नागाच्या डोक्यावर नागमणी असतो.याचा उगम पणे लोभातून झाला असावा, असे नागमणी शोधायच्या नादात लोकांना लपवलेले सोने-नाणे शोधायला प्रवृत्त करतात येईल, असा शिम्पल विचार चोराने केला असेल. हा फोटोशॉप केलेला फोटो बघा, नागमणी कसा हेड लाईट सारखा चमकतो आहे.
वरती वर्णलेला अनुराग कश्यपचा पिच्चर आठवा- या मण्याचा नागाला काय उपयोग असेल, नागीणीला इम्प्रेस करायला असता तर सगळ्या नागांना असला पाहिजे. विज्ञानाप्रमाणे कधी कधी नागाचे विष काही गोष्टी बरोबर मिसळून किडनी स्टोन सारखा खडा तयार होऊ शकतो. पण ती शक्यता पण फार कमी असते कारण नागाचे विष हे cyanide hydrate salts असते आणि त्याची पाण्याबरोबर रसायनीक अभिक्रिया होत नाही. हल्लीचे गारुडी करड्या रंगाचे नाग मणी विकतात ते खरे बेन्झाईट चे खडे असतात. हे कडे जास्त भोका-भोकाचे असतात त्यामुळे त्याची porosity जास्त असल्याने त्याची द्रावण शोषून घ्यायची क्षमता जास्त असते. नाग चावलेला माणूस हा खडा लावला की वाचतो, हा खडा ज्या च्या कडे असेल तो अब्जाधीश होतो, असा यांचा दावा असतो. विचार करा, असे असते तर हे गारुडी मर्सिडीज मधून फिरले असते आणि ताज मध्ये पुंगी वाजवली असती.
अश्याच प्रकारच्या अनेक अंधश्रद्धा वापरून पूर्वी लोकं आपली संपती टिकवून ठेवत असतील.प्रत्येक अंधश्रद्धेच्या मागे कोणा-कोणाचा तरी स्वार्थ दडलेला असतो.हेच बघा, आधी बागुलबुवा -मग मांजर -मग शेवटी पोलीस मामा अश्या चढत्या क्रमाने आपण लहान पोरांना भीती घालत असतो त्याच पद्धतीने मोठ्या माणसांसाठी जेंव्हा एका अंधश्रद्धेची भीती कमी होते तशी नवीन अंधश्रद्धा होत निर्माण जाते.
साध्या भुजंगच्या इस्टोरी मधून भीती निघून गेल्यावर हायर वर्जन ची अंधश्रद्धा आली की "नाग डूख धरतो."डूख धरणे ही भावना आहे, नागाचा मेंदू डूख धरण्यासाठी विकसित झाला नसून खाणे कसे शोधायचे यासाठी विकसत झाला आहे. आपल्या घरी बायको- आई ने स्वयंपाक नाही बनवला तर नाक्यावर जाऊन आपण भाजी-पाव खाऊ शकतो पण नागाला मात्र उंदीर (२ आठवड्यातून एकदा का होईना ) स्वतः शोधायचा असतो. जो काही नंतर वेळ उरतो त्यामध्ये स्वतः चे इतर भक्षकापासून (गरुड, घार, माणूस इ.) रक्षण करायचे असते. त्यांची वधूवर सूचक मंडळे नसल्याने दरवर्षी नवीन नागीण (:)) स्वतः शोधून आपली प्रजा वाढवायची असते. त्यामुळे त्याला डूख धरणे वगैरे अश्या फालतू कामांसाठी वेळच नसतो. जर आपल्याला खुन्नस काढायचीच असली तर आपण आपल्या साईजचा आणि ताकदीचा विचार करतो, उगाचच तालिबान माजले आहे म्हणून ओसामाला मारायला जात नाही. मग नाग तरी कशाला त्याच्या पेक्षा अतिविशाल मनुष्य प्राण्यावर खुन्नस काढेल, ते शक्यच नाही. विज्ञानिक दृष्ट्या पण हे सिद्ध झाले आहे की नागाचा मेंदूची माहिती साठवण्याची क्षमता खूप कमी असते, मग तो त्याचा उपयोग खुन्नस ची माहिती साठवायला कशाला करेल. हे म्हणजे ५१२ एमबी च्या मेमरी मध्ये संजय लीला भन्साळीचा सिनेमा दोन वेळा साठ्वण्यासारखे आहे. जी माणसे साप पाळतात (शास्त्रीय प्रयोग करायला किंवा फेसबुकचा अल्बम भरवायला ! ) त्यांना हे माहित असते की ५ वर्ष सांभाळलेला नाग पण टॉमी बोलावल्यावर त्यांच्याकडे येत नाही. तसेच नागाला सगळी दुनिया काळी-पांढरी (black and white) दिसते त्यामुळे त्याला दोन मनुष्य प्राण्यात भेद करणे खूप वेळा शक्यच नसते. त्यामुळे 'नागाचे डूख धरणे' हे माणसाने निर्माण केलेली अंधश्रद्धा आहे. त्याची सुरवात वरती लिहिल्या प्रमाणे संपत्तीच्या रक्षणासाठी झाली नंतर ती पारंपारिक कथेतून सर्वातोंडी झाली. सगळ्यात जास्त ती लोकांमध्ये पसरली असेल तर ती 'नागीन आणि नगीना' या तद्दन गल्लाभरू चित्रपटातून. या चित्रपटातून नागाबद्दल च्या अंधश्रद्धा स्वाईन फ्लू सारख्या तळागाळातील लोकांपर्यंत पसरल्या. आपल्या समाजातली लोकांचे वाचन खूप कमी त्यातून वैज्ञानिक वाचन तर जवळ पास शून्य. त्यामुळे खूप साऱ्या काल्पनिक कथांना सत्य कथांचा दर्जा देण्यात येतो. बॉलीवूड ला तर काय पैसा पाहिजे त्यामुळे अंतू बर्वाच्या चालीवर "चित्रपट काढणारे काय, कायपण काढतात आणि बघणारे काय कायपण बघतात. !" या चित्रपटांनी जेवढे सर्पसृष्टीचे नुकसान केले असेल तेवढे पारंपारिक समजुती मधून पण झाले नसेल.
"तुमची गर्ल फ्रेंड नागकन्या आहे का ?" हा प्रश्न सहकारनगर मधल्या सुखवस्तू-सुशिक्षित (?) माणसाने विचरला होता. आत्ता विचार करा- चार बुकं शिकलेला माणूस अश्या चित्रपटांचा बळी ठरत असेल तर अशिक्षित माणसाची काय अवस्था. तुम्ही जसे आपल्या प्रजातीच्याच (आणि जातीच्या !)बाईशी लग्न करता तसेच नाग (मेल कोब्रा) हा नागिणी (फिमेल कोब्रा) बरोबरच रत होतो. या सगळ्या नागकन्या- विषकन्या हे या चित्रपटातील अंधश्रद्धाची पिल्ले आहेत. पूर्वीच्या काळी राजेमहाराज्यांकडे 'विषकन्या' असायच्या त्या म्हणजे हेरगिरीचे प्रशिक्षण मिळालेल्या विष प्रयोगात (सगळीच केमिस्ट्री !) निपुण मादक सुंदरी होत्या.
कुठे केवड्याच्या बनातली सळसळणारी ती सुंदर नागीण तर कुठे ही डोक्यावर तांब्याचा नाग लावलेली हिडीस श्रीदेवी !
नागाबद्दलची शेवटची मुख्य अंधश्रद्धा म्हणजे नाग पुंगीवर डोलतो.या अंधश्रद्धेचा जन्म तर व्यावसाईक गारुड्यांनी केला असावा. नागासमोर काही पण हलवले तर तो फणा काढतो, म्हणजे एखाद्या काठीवर रुमाल लावून ती ती जरी पुंगी प्रमाणे हलवली तर तो त्या समोर डोलेल. पण ही पुंगी ही गारुड्यांच्या पिच्चरला डॉल्बी डिजिटल साऊंड इफेक्ट देते. विज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे की नागाला ऐकू येत नाही. जर ऐकू येत असते तर नाग डोलतो तसा कुठला पण साप गारुड्याने डोलवून दाखवला असता. या सगळ्या अंधश्रद्धा, माझ्या घरात पण होत्या,तिकडून सुरवात करून मी कॉल वरती यांचे निर्मूलनासाठी प्रयत्न केले आहेत. आत्ता आपल्याला डिस्कवरी-national geographic वरच्या खूप चांगल्या नागांवरच्या चित्रफिती पाहायला मिळतात. आंतरजालावर सगळी वैज्ञानिक माहिती, तूनळ्या उपलब्ध आहेत. यांचा वापर करा आणि अश्याच सगळ्या अंधश्रद्धा दूर करायचा प्रयत्न करा. कुठली पण नागाबद्दल माहिती ऐकली तर त्याचा तर्कशुद्ध विचार करा आणि अंधश्रद्धेच्या निर्मितीला आळा घाला. या लेखात मी खूप महत्वाच्या आणि ज्यांच्यामुळे सर्प-सृष्टी चा सगळ्यात जास्त नाश होतो अश्या नागाबद्दलच्या अंधश्रद्धा समाविष्ट केल्या आहेत. बिनविषारी आणि इतर सापांच्या अंधश्रद्धा पुढील त्या-त्या लेखात समाविष्ट करीनच, पण अजून काही अंधश्रद्धा किंवा प्रश्न असल्यास प्रतिक्रियामध्ये टाका, मी माझ्या परीने उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. (या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)
वाचने
47990
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
"तुमची गर्ल फ्रेंड नागकन्या
तुमची गर्लफ्रेंड नागकन्या आहे
माझी नाही पण, आपल्याला
In reply to तुमची गर्लफ्रेंड नागकन्या आहे by प्रकाश घाटपांडे
भारी..
In reply to माझी नाही पण, आपल्याला by जॅक डनियल्स
लेखन आवडले...
मल तरी माहित नाही, पण
In reply to लेखन आवडले... by मदनबाण
पण हत्तीच्या सुळ्याना एवढे
In reply to मल तरी माहित नाही, पण by जॅक डनियल्स
बिचारा हत्ती !
In reply to पण हत्तीच्या सुळ्याना एवढे by मदनबाण
अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण
पाटेश्वर ला पण आहेत कारे
In reply to अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण by प्रचेतस
हो.
In reply to पाटेश्वर ला पण आहेत कारे by मालोजीराव
ते पहिल्या शिल्पतल नागाच
In reply to अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण by प्रचेतस
वल्ली वरून उजवीकडचे शिल्प
In reply to अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण by प्रचेतस
ते शिल्प मोरगावजवळच्या
In reply to वल्ली वरून उजवीकडचे शिल्प by चाफा
मस्त फोटो आहेत.
In reply to अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण by प्रचेतस
@विषकन्या खात्यापित्या घरच्या
In reply to मस्त फोटो आहेत. by जॅक डनियल्स
लेखन आवडले
भारी ए ! पण चित्र कै दिसली
अजुन एक अंधश्रध्द्दा ...
ऐकीव माहितीनुसार मध्यंतरी
In reply to अजुन एक अंधश्रध्द्दा ... by प्रसाद गोडबोले
खरा आहे…एक्सटसी साठी वापरतात
In reply to अजुन एक अंधश्रध्द्दा ... by प्रसाद गोडबोले
मी पण ऐकले आहे की कोरेगाव
In reply to अजुन एक अंधश्रध्द्दा ... by प्रसाद गोडबोले
हा लेख संपुर्ण लेखमालेतला
"तुमची गर्ल फ्रेंड नागकन्या
कोणती विचारले असते तर तीच
In reply to "तुमची गर्ल फ्रेंड नागकन्या by आदूबाळ
तुमचा या विषयावरचा लेख वाचला
+१ +१ +१ टु किसनदेव!
In reply to तुमचा या विषयावरचा लेख वाचला by किसन शिंदे
*****
क्रमश:
डोळ्यासमोर चित्र उभे राहिले,
In reply to क्रमश: by जेपी
लैच भारी..
धन्यवाद् !
In reply to लैच भारी.. by चिगो
लेखमाला मस्तच !
तुमचे बरोबर आहे, ती तिचे
In reply to लेखमाला मस्तच ! by कपिलमुनी
छान माहिती
जबरी पंचेस!!!
आंतरजालावर वाचलेल्या
नाग: अंधश्रद्धेचा बळी !
सगळ्या सापांना प्रत्येक
In reply to नाग: अंधश्रद्धेचा बळी ! by भ ट क्या खे ड वा ला
अधेले
In reply to नाग: अंधश्रद्धेचा बळी ! by भ ट क्या खे ड वा ला
मस्त
मस्त..
जेडी - एक प्रश्न.
माफ करा मला उत्तर द्यायला वेळ
In reply to जेडी - एक प्रश्न. by मोदक
डॉक्युमेंटरी
In reply to माफ करा मला उत्तर द्यायला वेळ by जॅक डनियल्स
एकदम मस्त !!
सुंदर खुसखुशीत शैलितील लेख.
अंगावरील केसांचे मुख्य काम म्हणजे कुठल्याही सस्तन प्राण्याच्या (माणूस, कुत्रा, बैल इ.) शरीरात जी उर्जा निर्माण होते त्याचे उत्सर्जन कमी करणे आणि शरीर थंड राखणे.येथे "...शरीर थंड राखणे." ऐवजी "...शरीर गरम राखणे." असे पाहिजे. शिवाय केसाच्या उपयोगासाठी जी प्राण्यांची उदाहरणे दिली आहेत त्यापैकी माणूस आणि बैल यांच्यात केस हे केवळ अतीप्राचीन पुर्वजांकडून आलेले पूर्णपणे निरुपयोगी अवयव आहेत. कुत्र्यांपैकी काही अतीथंड प्रदेशातील जाती सोडल्या तर इतरांतही केसांची तीच अवस्था आहे. मात्र थंड प्रदेशातल्या पोलार अस्वल, याक, इ. प्राण्यांमध्ये केसांचा शरीर गरम ठेवण्यास उपयोग होतो.तुमचे बरोबर आहे. माझी थोडी
In reply to सुंदर खुसखुशीत शैलितील लेख. by डॉ सुहास म्हात्रे
आवडेश
बिच्चारे नागराव :(
बघावा म्हणतोय "दुध का कर्ज"
In reply to बिच्चारे नागराव :( by अर्धवटराव
अंधश्रद्धेच्या....
In reply to बिच्चारे नागराव :( by अर्धवटराव
मेलो...
In reply to अंधश्रद्धेच्या.... by जॅक डनियल्स
खूपच छान
सुरेख लेखमाला...
:):):)
In reply to सुरेख लेखमाला... by झकासराव
अन्धश्रद्धा निर्मूलन
हा लेख लिहिला तेंव्हा डॉ.
In reply to अन्धश्रद्धा निर्मूलन by हुप्प्या
अवांतर
नाक...
या वरती पुढच्या एका भागात
In reply to नाक... by शरभ
हॉलीवूड
हो हॉलीवूड पण त्याच लायनी
In reply to हॉलीवूड by कपिलमुनी
भन्नाट!
ओ संपादक तै,
In reply to भन्नाट! by पैसा
+१
In reply to ओ संपादक तै, by दादा कोंडके
फोटोशॉप ची कमाल !
In reply to ओ संपादक तै, by दादा कोंडके
तुंबा थँक्स!
In reply to भन्नाट! by पैसा
हसुन हसुन पोट दुखायला लागले
जेड्स, नवीन लेख टाकणे...
ह्या लेखमालेचा आमच्यावर कदापि
संग्रही ठेवावी अशी लिष्ट.
In reply to ह्या लेखमालेचा आमच्यावर कदापि by निनाद मुक्काम …
सहमत
रोचक, प्रांजळ, खुमासदार, माहितीपुर्ण
सापाचे विश
याचे उत्तर मला माहित नाही. पण
In reply to सापाचे विश by आनंदराव
बुद्धीची का कल्पनाशक्तीची?
In reply to याचे उत्तर मला माहित नाही. पण by जॅक डनियल्स
कल्पनाशक्ती च्या पलीकडची
In reply to बुद्धीची का कल्पनाशक्तीची? by आदूबाळ
अशाच नावाचा एक आनन्दयात्री
In reply to सापाचे विश by आनंदराव
" जर का आपल्याले सरप (साप)
बुद्धीची का कल्पनाशक्तीची?
बुद्धीची का कल्पनाशक्तीची? बादवे, लिमये मास्तरांनी आनंदरावांना कधी घरी जेवायला बोलावलं नव्हतं ना?
अदुबाल, लिमये मस्तराना आम्हालाच कधि कधि जेवायला घेउन जावे लागत होते. मास्तर अविवाहित होते.मस्त.. लेख आणि प्रतिसाद
धन्यवाद ! मिपावर ,
In reply to मस्त.. लेख आणि प्रतिसाद by रुपी
+१११११११११११११११