एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !
आधीच्या भागात लिहिल्याप्रमाणे विष हे नागाच्या पाचकसंस्थेचा अविभाज्य घटक असते,तेच नसल्यामुळे नाग काही खाऊ शकत नाही आणि शेवटी मरण पत्करतो. आपण माणसे जगायची ५० वर्ष झाली तरी बॉडी मेंटेन करण्यासाठी लाख लफडी करतो मग त्यामध्ये वाघाच्या हाडाच्या औषधापासून ते आग्रावरून-प्रवास सगळे आले. आपला मेंदू मोठा म्हणजे आपण जास्त हुशार, जास्त शक्तिमान म्हणून आपण आल्या अकलेचा उपयोग नागाला हालहाल करून मारायला करतो. मांजर मारल्यावर सोन्याची मांजर काशीला अर्पण करायची असते हा जर नियम नागासाठी लागू केला तर $ चा भाव परत कमी होईल. ;)
ज्यांना ही क्रूर शस्त्रक्रिया जमत नाही ती माणसे दाभण घेऊन नागाचे तोंड शिवून टाकतात. या फोटो मध्ये बघा, टाके घालून तोंड शिवून टाकले आहे.
करोडो वर्षापासून नाग या पृथ्वीवर आहे, अनेक आपत्तींना तोंड देउन, स्वतः मध्ये तसे अनुरूप बदल घडवून त्याने आपले अस्तिव टिकवून ठेवले आहे पण फक्त या माणूस या आपत्ती पुढे तो काही करू शकला नाही. "ग्रेट पावर कम्स विथ ग्रेट माजुरडानेस" या उक्तीप्रमाणे तोंड शिवलेला,विषाच्या ग्रंथी जाळलेल्या असाहाय्य नाग पुजेसाठी आणला जातो. 'त्याचे डोके काय दुधात बुडवतात, त्याच्या फण्यावर हळद-कुंकू काय वाहतात' इ. हे का फक्त तर आपली स्वतः ची भरभराट व्हावी.(कुठल्याही पूजेचे कानक्लुजन तेच असते फक्त एक्सपरीमेंट च्या पद्धती बदलतात!)करा ना पूजा, पण तुम्हाला त्यासाठी खऱ्या नागाचा बळी द्यायची काय गरज आहे, इतरवेळी दगडात देव शोधणारे आम्ही या नागाच्या वेळी फक्त माती खातो.
दुध फुफ्फुसात गेलेला, शिवलेल्या जखमेवर कुंकू लावलेला नाग शेवटी माळरानावर सोडून दिला जातो. घारी, गरुड याच्याकडून त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचे सुदैव नाही तर हळूहळू शक्ती कमी होत जाते आणि शेवटी या राजबिंड्या नागाचा मुंग्या लागून मृत्यू होतो.
नागपंचमीच्या आधी याची मोठी बाजारपेठ पश्चीम बंगाल आणि राजेस्थान मध्ये भरते त्यातून पूर्ण भारतामध्ये हजारो नाग दरवर्षी पाठवले जातात. तरी हल्ली सर्पोद्यान सारख्या संस्था जनजागृतीचे काम जोमाने करत आहेत, त्यामुळे नागपंचमी च्या दिवशी धंदेवाईक गारुड्यांचा धंदा थोडा कमी झाला आहे. तरी पण पण जो पर्यंत आपल्यावरचा अंधश्रद्धेचा प्रभाव कमी होणार नाही तो पर्यंत हे निष्पाप मृत्यू असेच चालू राहणार. तुम्ही विचार करा- तुम्ही नागपंचमीला खऱ्या नागाची पूजा केली तर तुम्ही त्यानिमित्ताने त्याच्या होणाऱ्या मृत्यूला तुम्हीच जवाबदार असता, खऱ्या नागाची डिमांड थांबली तर सप्लाय बंद पडेल.
"उल्का कोसळल्यामुळे डायनासोर नामशेष झाले तसे नागपंचमीमुळे नाग नामशेष न होवो", हीच नागपंचमीच्या निमित्ताने प्रार्थना !
(या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)
In reply to पाहवत नाहीये या फोटोजकडे. by प्रीत-मोहर
In reply to अरेरे :( by अर्धवटराव
In reply to अजगराला खिळ्याने ठोकून by जॅक डनियल्स
माजुरडानेसहा शब्द आवडला.
इतरवेळी दगडात देव शोधणारे आम्ही या नागाच्या वेळी फक्त माती खातोसहमत! याआधीचा भागही अतिशय आवडला. प्रतिक्रियांत म्हटल्याप्रमाणे माहितीपूर्ण तरीही बोजड न होणारा.
In reply to इतरवेळी दगडात देव शोधणारे by नंदन
माहितीपूर्ण तरीही बोजड न होणारा.सहमत.
In reply to जेडी, क्या बात! by आदूबाळ
In reply to अरे सन सिटीच्या जागी खरच २-३ by जॅक डनियल्स
In reply to @खरच २-३ मोठी वारुळे होती, तो by अत्रुप्त आत्मा
In reply to @जॅक डनियल्स>>> येक विचारायचं by अत्रुप्त आत्मा
In reply to अरे सन सिटीच्या जागी खरच २-३ by जॅक डनियल्स
In reply to जेड्स, आपल्या (!) आमराईला by आदूबाळ
In reply to आपली राई गेली कधीच ...साले by जॅक डनियल्स
In reply to अरे सन सिटीच्या जागी खरच २-३ by जॅक डनियल्स
In reply to ( 'खरे गारुडी' - आपल्या नागला पोटच्या पोराप्रमाणे जपतो, by सुबोध खरे
In reply to इतरवेळी दगडात देव शोधणारे आम्ही या नागाच्या वेळी फक्त माती खातो. by सुधीर
In reply to अवघड आहे by बॅटमॅन
In reply to तिथे माझ्या माहितीप्रमाणे असे by जॅक डनियल्स
In reply to नाग मंडळे असतात आणि स्पर्धा by बॅटमॅन
In reply to जेडी ची माहिती बर्यापैकी by मोदक
हवे तितके नाग गळ्यात घालून फोटो काढण्याची सुविधा असते. अत्यंत ओंगळवाणा प्रकार असतो तो.साप जातात जिवानिशी हे खरं आहे. पण त्यात नक्की ओंगळवाणं काय आहे ते नाय कळ्ळं. तसं असतं तर इतके लोक कसेकाय गेले असते फोटो काढून घ्यायला? (मुद्दा साप्/नाग गळ्यात घालून फोटो काढावे की नाही, त्याने त्या प्राण्यांना काय अपाय होतो हा नसून ओंगळवाणेपण काय असावे हा आहे.)
In reply to +१ by धमाल मुलगा
In reply to मी पाहिलेला प्रकार असा होता.. by मोदक
In reply to मी पाहिलेला प्रकार असा होता.. by मोदक
In reply to माझ्या माहिती प्रमाणे मण्यार by जॅक डनियल्स
कॉमन क्रेट..?
आम्हाला कात्रज ते सिंहगड च्या ट्रेक दरम्यान कात्रज बोगद्यावरच आरामात पहुडलेला दिसला होता, तो हाच फटू..
एकदा बालगंधर्वला आपला सूड मण्यारीचे पिल्लू तुडवत होता. सोबत बुवा पण होते!
मला शिराळ्याला मण्यार पाहिल्याचे नक्की आठवत आहे - नागासारखेच हाल करत असावेत :-(In reply to ह्योच का मण्यार..? by मोदक
In reply to ह्योच का मण्यार..? by मोदक
In reply to ह्योच का मण्यार..? by मोदक
In reply to तुडवत होता? by सूड
In reply to माझ्या माहिती प्रमाणे मण्यार by जॅक डनियल्स
In reply to मण्यारीचे विष नागापेक्षा by सुबोध खरे
In reply to आजच इथल्या दैनिकात बनावट सर्प by अभ्या..

In reply to हा बघा फेस्बुक वरचा एक सो कुल सर्पमित्र ! थोडे शोधा खूप सापडतील. by जॅक डनियल्स
In reply to भले बहाद्दर! by धमाल मुलगा
In reply to Untamed and Uncut नावाची by मोदक
In reply to हा बघा फेस्बुक वरचा एक सो कुल सर्पमित्र ! थोडे शोधा खूप सापडतील. by जॅक डनियल्स
In reply to फार वाईट वाटले... by मदनबाण
In reply to मला वाटतं पुराणातल्या त्या by चाफा
In reply to आँ? by रामपुरी
In reply to मला आजपर्यंत वाटत होता की "हा by मदनबाण
In reply to मला वाटतं पुराणातल्या त्या by चाफा
In reply to आमच्याकडे कोल्हापुरात by झकासराव
नागुबं घ्या नागुबं !!मस्त वाक्य आहे.
In reply to लेखांची पी डि एफ फोटो सह हवी आहे( तुमच्या खर्या नावांसह-) by विटेकर
निसर्गाला सोबत घेऊन विस्तारलेल्या भारतीय संस्कृतीत ही क्र्र प्रथा काय म्हणून आली असेल?अहो मूळ उद्देश कसाही असला तरी त्याची वाट लागणे हे सर्वत्रच दिसते, जातीव्यवस्था, सतीप्रथा, लहान मुलींची हत्या, इ.इ. प्रथाही अशाच डिव्हेलप झाल्या ना. क्रूरतेबद्दलच बोलायचे झाले तर यज्ञात पशुबळीही देतच होते पूर्वी. अजूनही कितीतरी जत्रांत बोकड इ. बळी देतातच.
In reply to प्रत्येक नाग पंचमीच्या १ by माझीही शॅम्पेन
पाहवत नाहीये या फोटोजकडे.