नौस
म्या सक्काळी उटायच्या आदीच आण्णा कुटतरी जातेत.
आज सांजच्याला आले तवा हासत व्हते.
म्हन्ले, “आन्जाक्का, उद्यापासून आम्ही पण तुमच्या शाळेत येणार बरं का!”
ह्ये काय ल्हान नाईत. उगा कायबी बोल्तेत.
“तुमास्नी गुर्जी घ्येणार नायती,” म्या बोल्ली.
आण्णा हस्ले. म्हन्ले, “हेडमास्तर आहे मी...”.
बाबौ! आता कायबी कराया येतंय.
कुणाची टाप नाय भांडायची. गुर्जीबी वरडायचे न्हाईत. मज्जा.
पन आण्णांचं कायतरी येगळंचं सुरु.
अब्यास कर, सुद्द बोल,
भांडू नको, श्या दिऊ नको,
पाडे म्हन. अकशर चांगलं कहाड.
गंपतीचं भजन म्हन.
घरात आय, साळंत हे. हैतच.
पोरपोरी हस्त्येत.
रडू रडू होतंय मला.
येशीतल्या मारोतीरायाला दोन रुपैचा नौस बोलून आलेय.
“द्येवा, माजीबी बदली कर” म्हनूनशान!
*शतशब्दकथा
वर्गीकरण
हेहेहे! ही चिमणी भारीये हां..
आवडलं !
हा हा !
In reply to हा हा ! by सस्नेह
असेच म्हणतो. नवसाला पाव नै तर
ही चिमणी नेहमी...
(No subject)
:)
आवडले.
‘आंजी’चं दुखणं मला कळलं..
In reply to ‘आंजी’चं दुखणं मला कळलं.. by निवांत पोपट
हाहा, अंदाज आवडला ...
अजून एक शब्दशतक ! अभिनंदन !!
मस्त....
लैच ग्वाड हाय ही आन्जी..
एवढी भिडली नाही आधीच्या
गमतीदार.
उत्तम
द्वाड कुठली!
आभार
ओकीटोकी...
मस्त एकदम
हिहीहाहाहा
छान.
ह्ही ह्ही..ह्हा..ह्हा..
हाहाहा!
In reply to हाहाहा! by पैसा
सहा वर्ष!
In reply to सहा वर्ष! by आतिवास
हेहेहे!
खरं आहे...
धा रुपयाचा नवस
In reply to धा रुपयाचा नवस by चित्रगुप्त
:-)