मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी पहिली कविता

रसिका तिलेकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
माझ्या ओठांच्या कळीवर फुलंलेल हसु म्हणजे तु... माझ्या बंद पापण्या मधे तु.... मी डोळे बंद न करता पाहिलेले स्वप्न म्हणजे तु... माझ्या श्वासात भिनलेला गंध म्हणजे तु... माझी प्रेरणा तु.... माझा आत्मा तु... मी म्हणजे फक्त तु अणि तुच...

वाचने 3564 वाचनखूण प्रतिक्रिया 29

मिसळलेला काव्यप्रेमी 09/07/2013 - 16:23
कदाचित अशी मांडणी केली तर अजुन वाचनीय होईलः
माझ्या ओठांच्या कळीवर फुललेल हसु म्हणजे तु माझ्या बंद पापण्या मधे तु मी डोळे बंद न करता पाहिलेले स्वप्न म्हणजे तु माझ्या श्वासात भिनलेला गंध म्हणजे तु माझी प्रेरणा तु माझा आत्मा तु . मी म्हणजे तु आणि फक्त तुच

In reply to by चित्रगुप्त

मिसळलेला काव्यप्रेमी 09/07/2013 - 17:19
ओ काका, जाउद्या हो, सुरवात आहे.

In reply to by चित्रगुप्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 09/07/2013 - 17:59
कवितेत अशी सूट घेता येते. *कवितेमधे र्‍हस्व-दीर्घाचे बंधन पाळता येत नसल्यामुळे वृत्तानुसार र्‍हस्वदीर्घ लिहावे. [पाहा: सुगम मराठी व्याकरण-लेखन. मो.रा.वाळंबे. पृ.क्र. २००] -दिलीप बिरुटे

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 09/07/2013 - 23:58
आपका हुक्म सरआंखोपर . माझ्या शब्दांच्या मोळीवर ओतलेल रॉकेल म्हणजे तु माझ्या कुन्द पिपाण्यांमधे तु मी पाय न ओढता खेळ्लेला हुतुतू माझ्या श्वासात अड्कलेला शब्द फक्त हुतुतू माझी हौस हुतुतू माझा फंडा हुतुतू मी म्हणजे तू तू म्हनजे हुतुतू

In reply to by कवितानागेश

क्लिष्ट शब्दांच्या भिंतीवर मारलेल्या निरर्थक पिंका "मी" विषयांतराच्या भाऊगर्दीत हुकलेले लॉजीक "मी" "माझी" गुणगुण "माझी" फुणफुण "माझी" भुणभुण "मी"च्च्च्च्च "माझी" हौस "मी" "माझा" फंडा "मी" "माझा" सोस "मी" "मी" म्हणजे "मी"च्च्च्च्च

In reply to by मोदक

बॅटमॅन 10/07/2013 - 16:35
पडक्या माझ्या घराला आज माझा मीच हात देतो रडक्या माझ्याच गजला माझा मीच दाद देतो. सौजन्य -ललित मासिकाचा दिवाळी अंक-साल १९७०-८० मधले कुठलेसे.

कवितानागेश 09/07/2013 - 23:47
चांगलं लिहिताय. कविता वाचण्याचाही सराव ठेवला तर लिहिण्यात अजून सुट्सुटीत्पणा येइल.

In reply to by प्यारे१

अभ्या.. 10/07/2013 - 17:06
प्यारे त्यांना चांगले सांगितले होते. तुमच्या बीएसेनेल मधल्या प्रीती, दिपीका वर कविता करा. नाय म्हणले. :( म्हणले आता सिब्बलाचा जमाना हाय. त्यांचाच बाजार ऊठला, आता कुठली आलीय किरपा? ;)

Bhagwanta Wayal 11/07/2013 - 11:17
कृपा सिब्बलची नाही किंवा कुठल्या देवीची नाही तर कृपा एका सद्गुरुची आहे म्हणुनच मी येथे आहे अस म्हणायचे आहे.