आम्हा घरी धन..
लेखनप्रकार
राम्राम मंडळी.
खरडफळ्यावर गेले दोन दिवस अनेक जण आपापल्या आवडीच्या कविता देत आहेत.. त्यावरून या धाग्याची कल्पना सुचली.
चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया.
लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या.
मी सुरूवात करतो..
********************************************************
गोनिदांच्या दुर्गभ्रमणगाथेतून, रायगडावरील आषाढाचे चित्रदर्शी वर्णन...
ज्येष्ठ संपतो. आकाश मेघांनी भरभरून येवू लागतं. रायगड ऐन कोकणांत. आकाश आपल्यावर प्रसन्न असलं, कीं तिथून समुद्ररेखा दिसू शकते. सूर्य अस्ताला जात असावा, उतरता उतरता तो क्षितिजाशी टेकावा, त्या क्षणी थेट पश्चिम क्षितिजाशी सूर्यप्रकाशानं चकाकणारं सागरजळ दिसतं. अनेकदां ते पाहिलंही आहे. अर्थ असा, की थेट समुद्रापासून रायगडावेरी कशाचीही अटक नाही. समुद्रावर गर्दी करून जमलेला मेघांचा समूह पूर्वेच्या दिशेनं चालून येवू लागला, की त्याला आढळतो रायगड. एखाद्या प्रचण्ड चौरंगासारखा. अन् मग तो असा बरसू लागतो की सांगता पुरवत नाही. लोटावर लोट चालून येतात. ते थांबतच नाहीत. येतात आणि गडाच्या माथ्यावर कोसळतात. त्यांच्याबरोबरच येते धुई. ती सगळा डोंगर आपल्या कवेत घेते. हातावरचं कांही दिसत नाही. अगदीं आपल्या नाकाचा शेंडादेखील.
त्या दिवसात धनगरं आपापल्या झापांमधून रानशेण्यांची शेकोटी करून तासन् तास तापत बसतात. इकडे पाऊस धुवांधार कोसळत असतो, तों तों धनगरं मात्र प्रसन्न होत असतात. कारण असा मोप पाऊस बरसला, की गड हिरवागार होणार असतो. त्याची म्हसरं अन् गावल्या भरपूर जोगावणार असतात. कासंड्या भरभरून दूध देणार असतात.
तर त्या धनगरांशेजारी बसून एकीकडे शेकत, दुसरीकडे त्याच्या चौकश्या करीत बसणं इतकं सुखाचं असतं, म्हणून सांगू! त्यांच्यापास हवा तेवढा वेळ असतो. ती मोकळी झालेली असतात. भरंवसा निपजलेला असतो, कीं हा परदेशी पाहुणा आपला मित्र आहे. सखा सुहृद आहे. असं अंतर हरपलेलं असतं. मग ती नाना परींचं बोलत असतात. सुखाचं. दु:खाचं. प्रापंचिक चिंतांचं. गाईम्हशींचं. त्यांच्या वेतांचं. दुधाचं. तें सगळं ऐकून वाटू लागतं, की आपण आपल्या भोंतीचा प्रपंच म्हणजेच सगळं विश्व असं गृहीत धरतो, ते किती चूक आहे! मात्र हे ध्यानी येण्यासाठींही असं त्यांच्या पोटात शिरावं लागतं. त्यांच्या मनी भरंवसा निपजूं द्यावा लागतो.
किंवा धर्मशाळेतल्या खोलींत चिप्प बसून असावं. नगारखान्याच्या ओवर्यात हात पाय पोटाशी घेवून बसावं. जगदीश्वराच्या देवळांत आसरा घेऊन पावसाचं चण्डनृत्य आनभवीत असावं. ध्यानी येवू लागतं, की पावसाच्या या धारानृत्यालाही एक ताल आहे. कधी तो धुमाळीचं बोट धरून बरसतो. कधी एकतालाच्या ठोक्यांत खाली उतरतो. कधी त्या धारांच्या त्रितालाचा ठेका सुरू असतो. चहुंकडून घेरून येणारं धुकट कुंद असतं. स्वत:वेगंळं काहीही दिसत नाही. कशाचंही भान नसतं. त्यात हा ताल असा कांही अंगी भरतो, की सांगता पुरवत नाही.
हळूं हळूं पाऊसधारा उणावू लागतात. धुकट विरूं लागतं. कमींत कमी दिवसांतले कांही तास तरी मग बाहेर पडावं. पायांतळी वाहाणारे इवलाले वहाळ वलांडीत चहूं दिशा भटकावं. टकमकावर जावं. दिसली, तर तळातली शोभा पाहावी. काळ दुथडी भरून वाहात असते. पुन: धुकटं झाकोळून येतात. मग माघारे वळून, पायांतळी सांचलेल्या डबक्यांतलं पाणी उडवत गंगासागरावरून बालेकिल्ल्यात शिरावं. नगारखान्याबाहेर पडावं, बाजारपेठेत शिरावं. पावसधारांनी काय कवतिक केलं आहे, ते ध्यानी येवू लागतं. तें पाणी भुईचं कवच भेदून आत शिरलं. कड्यांची आवरणं भेदून आत घुसलं. त्या कवचा-आवरणाखाली गतवर्षी उन्हाळ्यांत वाळून कोळ झालेली तृणबीजं सुरक्षित असतात. तें पाणी त्यांच्या भंवताली गोळा होतं. त्यांना गुदगुल्या होतात. ती फुगतांत. टरारतात. अंग ठसठसू लागतं. मग तें वरील बाजूनं फुटतं. एक नाजूक लवलवता कोंब बाहेर येतो. पोपटी रंगाचा. तो भुई-कडा भेदून वर उठतो. मोठ्या नवलानं भंवताल न्यांहाळू लागतों. एक. दुसरा. तिसरा. सहावा. दहावा. शंभरावा. हजारावा. अन् पाहतां पाहतां अवघं धरतीमंडळ हिरव्या सौंदर्यानं बहरून येतं. सगळे डोंगर, दरे, कडे, दरकुटं, ओघळी, घळी, लवणं असं सगळं चिरतरूण होऊन जातं.
महिन्या दीडमहिन्यात तृणपुष्पं आपले डोळे विस्मयानं उघडीत आकाश न्याहाळूं लागतात. सोनावळी धुमारते. तेरडा उंच उंच उठूं लागतो. त्याला कळे फुटतात. ती अनाम तृणपुष्पं, ती सोनावळी, ती तेरड्याची फुलं, असा काही विलक्षण रूपगौरव डोंगरभर दाटतो म्हणून सांगू! पायातळी असा वनपुष्पांचा गालिचा अंथरलेला असतो, आणि आपण विराण्या देशींच्या राजपुत्रासारखे त्या रूजाम्यावरून अवशेष धुंडाळीत हिंडत असतो...
********************************************************
वाचने
88213
वाचनखूण
प्रतिक्रिया
172
धन्यवाद मोदकराव! सविस्तर भर
In reply to धन्यवाद मोदकराव! सविस्तर भर by आदूबाळ
+१
आधी या उतार्या बद्दल लोटांगण
In reply to आधी या उतार्या बद्दल लोटांगण by स्पंदना
धन्यवाद
वा! उत्तम कल्पना!
नको नको !
In reply to नको नको ! by परिकथेतील राजकुमार
तसला मजकूर इकडे कुठे द्यायचा.
तरि अवधान एकवेळें दीजे
सुरेख धागा. धन्यवाद.
वाहवा ...
In reply to वाहवा ... by चौकटराजा
गुगलल्यावर सापडली.
In reply to गुगलल्यावर सापडली. by प्रभाकर पेठकर
पुख विदस लाझे
In reply to पुख विदस लाझे by चौकटराजा
म्हाईपण बुहत भाआरी!!
In reply to पुख विदस लाझे by चौकटराजा
जम्या लाई.
प्रतिदिनी आपल्या शारीरिक,
सगळेच आवडले.
In reply to सगळेच आवडले. by प्यारे१
ह्या धाग्याबद्दल मोदकाला
In reply to ह्या धाग्याबद्दल मोदकाला by प्यारे१
पहिले वाक्य वाचून झालेला आनंद
In reply to पहिले वाक्य वाचून झालेला आनंद by मोदक
अरे ????????
बा. भं च्या काही..
आत गोठलेले आसू,
देखणे ते चेहरे
In reply to देखणे ते चेहरे by यशोधरा
सुरेख !
In reply to सुरेख ! by चौकटराजा
यशोधरातै - धन्यवाद!
In reply to सुरेख ! by चौकटराजा
याच शब्दप्रभुची अजुन एक मस्त कविता
In reply to याच शब्दप्रभुची अजुन एक मस्त कविता by ज्ञानोबाचे पैजार
जीवन त्यांना - बाकीबाब
In reply to जीवन त्यांना - बाकीबाब by मैत्र
बोरकर
In reply to देखणे ते चेहरे by यशोधरा
देखणे ते चेहरे, हीच इथे पोस्ट
काय करु शकाल तुम्ही
समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला
नक्षत्रांच्या गावातून उतरली
In reply to नक्षत्रांच्या गावातून उतरली by यशोधरा
देवा परमेश्वरा!
In reply to देवा परमेश्वरा! by स्पंदना
हेच म्हणतो..
In reply to नक्षत्रांच्या गावातून उतरली by यशोधरा
अप्रतिम.. भारावणारं...
गोनिदांचं अजून एक नितांतसुंदर
In reply to गोनिदांचं अजून एक नितांतसुंदर by प्रचेतस
भिजणारा मावळ ..
छान आहे धागा. आमच्यासारख्या
"सखी मंद झाल्या तारका" -
In reply to "सखी मंद झाल्या तारका" - by आदूबाळ
एझॅक्टली अवांतर नाही
In reply to एझॅक्टली अवांतर नाही by पैसा
तू काढ असा धागा,मी टाकीन हवी
In reply to तू काढ असा धागा,मी टाकीन हवी by मदनबाण
आहे की. हा घ्या..
In reply to "सखी मंद झाल्या तारका" - by आदूबाळ
सुंदर
In reply to "सखी मंद झाल्या तारका" - by आदूबाळ
सखी मंद झाल्या तारका
In reply to सखी मंद झाल्या तारका by मोदक
यस! शेवटच कडव म्हणताना अजुनही
In reply to यस! शेवटच कडव म्हणताना अजुनही by स्पंदना
अगदी असंच होतं,
माचीवरला बुधा
In reply to माचीवरला बुधा by मैत्र
आणि 'शितु' मधले देखिल काही
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा
मस्त धागा
In reply to मस्त धागा by स्पा
+१
गोनिदांच्या 'महाराष्ट्रदर्शन'मधुन ...
पांढरे निशाण उभारण्याची
साहित्याची श्रीमंती मिरवताना
In reply to साहित्याची श्रीमंती मिरवताना by इनिगोय
|| ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच
|| ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे || || माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे ||
गदिमांचे हे शब्द वाचून काय वाटले ते आजही सांगू शकणार नाही. __/\__In reply to || ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच by मोदक
+१११११११११११११११११११११
In reply to +१११११११११११११११११११११ by मैत्र
गदिमा मोस्ट कन्सिस्टंट
वपुर्झा : व पु काळे …
कवी अनिल/ ग्रेस /शांता शेळके / इंदिरा संत
ज्ञानेश्वरांच्या समाधीचे अभंग
भाऊसाहेब पाटणकरांची आठवण कशी
In reply to भाऊसाहेब पाटणकरांची आठवण कशी by मोदक
आणखी काही
In reply to आणखी काही by चौकटराजा
हे कवि तुझ्या कल्पनेची कीव
हे कवि तुझ्या कल्पनेची कीव करावी वाटते सांगितले कुणी प्रणयाला रात्र व्हावी लागते ...?क्या बात है चौरा!!!! ************************************************ तुला न सांगता तुला, गीतात माझ्या गुंफतो, स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो असेच रोज न्हाऊनी, लपेट ऊन कोवळे, असेच चिंब केस तू, उन्हात सोड मोकळे तुझा सुगंध मात्र मी, हळुच येथे हुंगतो, स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो अशीच रोज अंगणी, लवून वेच तू फूले, असेच सांग लाजूनी, कळ्यांस गूज आपुले, तुझ्या कळ्या, तुझे फूले, येथे टिपून काढतो, स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो अजून तू अजाण ह्या, कुंवार कर्दळीपरी, गडे विचार जाणत्या, जुईस एकदा तरी, दुरुन कोण हा तुझा, मकरंद रोज चाखतो, स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो ...सुरेश भटIn reply to हे कवि तुझ्या कल्पनेची कीव by मोदक
अप्रतीम !!!!!!!!!!
In reply to हे कवि तुझ्या कल्पनेची कीव by मोदक
तुला न सांगता तुला, गीतात
In reply to तुला न सांगता तुला, गीतात by तिरकीट
हो बरोबर.
In reply to हो बरोबर. by इनिगोय
या धाग्याबद्दल मोदकाचे आभार
In reply to हे कवि तुझ्या कल्पनेची कीव by मोदक
बाकी धाग्याची संकल्पनेबद्दल
घर परतीच्या वाटेवरती
जग हे बंदीशाला
अभय आणि राणी बंग यांचे "अ
In reply to अभय आणि राणी बंग यांचे "अ by मोदक
असे भयानक हुशार अन बुद्धिमान
माझी एक अत्यंत आवडती
In reply to माझी एक अत्यंत आवडती by मराठीप्रेमी
कवी सदानंद रेगे
In reply to माझी एक अत्यंत आवडती by मराठीप्रेमी
मार्गदर्शक
व्वा...!
भंगु दे काठिण्य माझे
कवी बी.
बालकवी-
In reply to बालकवी- by ज्ञानोबाचे पैजार
वावावा..
माझ्या आवडीच्या दोन कविता आहेत
In reply to माझ्या आवडीच्या दोन कविता आहेत by मी-सौरभ
अरे दाद्या.. तुला काठावर पण
In reply to अरे दाद्या.. तुला काठावर पण by मोदक
कणा :- कुसुमाग्रज
In reply to अरे दाद्या.. तुला काठावर पण by मोदक
प्रेमाचा गुलकंद - केशवकुमार
In reply to अरे दाद्या.. तुला काठावर पण by मोदक
दाद्या
प्रभा गणोरकर
आरती प्रभू यांची अखेरची कविता
मराठीतून उर्दू-हिंदीत घुसतो आहे, क्षमा करा, पण राहवत नाही
विश्रब्ध मनाच्या कातरवेळी,
कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा अन्योक्ती !!
झकास!