माXXXद . . .
कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ? कारण माणूस त्याच्या भाषेसह बदलत आहे . .
" अबे माXXXद दिखता नही क्या ?? " एक अलिशान गाडी पुढे जात असताना शिवी हासडून गेली .. वेळ असेल रात्री ९ च्या आसपासची . कयानीच्या स्वर्गीय मावा केक ची चव जिभेवर आहे तोपर्यंतच घर गाठायचे या इराद्याने तुलनेने मोकळ्या रस्त्यावरून सणकत निघालो होतो . एस . जी .एस मॉल समोर फोनवर बोलत थांबलो असताना , एक निराधार योजनेचाच आधार असलेला , परिस्थितीने गरीब आणि अकाली वृद्धत्वाची देणगी मिळालेला बाप्या माणूस बिडी फुकट शेजारून गेला . कदाचित आनंदी असावा . बिडीच्या धुरात आणि कैक दिवस न केलेल्या दाढीत मला हसू दिसत होते . मोडक्या हेंडलला लावलेली मळकी पिशवी चाचपत आणि त्या भल्या मोठ्या मॉल कडे कुत्सित नजरेने पहात पुढे सरकत होता . काहीतरी होते त्या पिशवीत . . खूप काहीतरी मौल्यवान , आनंद देणारे ! पण निराधार -गरिबांना आनंदी राहायचा आनंद मिळतो कोठे ? स्वनाच्या दुनियेत वावरत असताना तो पृथ्वीवरचा रस्ता मात्र थोडासा भरकटला . एखादा फूटच . पण तो फुट मागून येणाऱ्या बि. एम . डब्लू स अडथळा करण्यास पुरेसा होता . सणकत येत असलेली गाडी या अनपेक्षित आणि भिकार अडथळ्याने चिडली . " अबे माXXXद दिखता नही क्या ?? असे 'कट ' मारून जात म्हणाली . अंगात ताकद नसलेल्या निराधाराला तेवढा 'कट' पुरेसा होता . . पडला माXXXद . . त्याच्या पिशवीसह . . गाडीवानाने आनंदाने शेजारी दिलेली टाळी माझ्या नजरेने टिपली . .
" कशाला आई घालायची रस्त्यात ? भिकारXट साला " . . माझ्या शेजारी कमनीय बांध्याच्या तरुणीसोबत फुकत थांबलेल्या कोण्या पोट्ट्याने आपली प्रतिक्रिया न मागता देऊन टाकली . हसायचे फिदी फिदी आवाज घुमत राहिले . तो माXXXद आता चेष्टेचा विषय झाला होता . काही वेळाने तो स्वतःच उठला . पिशवी हुडकू लागला . काळ्या रंगाची ती carry bag पुरती फाटली होती . आतील जिलेबी आणि बालुशाही रस्त्यावरच्या मातीत मिसळली होती . कोणासाठी घेतली असेल त्याने ? घरी दोन -चार डोळे त्याची वाट बघत असतील ? अनेक दिवस उरवून आणि पुरवून खाण्यासाठी बा काय आणतो याची वाट पहात असतील ? हो . . कदाचित . . तो बा मातीने माती पुसत होता . कळकट शर्टाच्या कोपऱ्याने जिलेबी -बालुशाही वर लागलेली माती पुसत होता . आपल्या नशिबाला दुषणे देत होता . कोपऱ्याला आणि गुढघ्याला झालेल्या जखमा विसरून मातकट अन्न गुंडाळायला नवा कोरा कागद हुडकत होता . एकटा … एकाकी … समाजाची नजर चुकवत पण हसण्याला कान देत ! कोण मदत करणार त्याला ? आपल्यावर संस्कार आहेत न ? ' रस्त्यावर पडलेले न उचलण्याचे ' ! कदाचित एखादा सुटातला साहेब किंवा लो वेस्ट मधली तरुणी पडली असती तर उचलायची इच्छा नक्कीच झाली असती . कारण त्यात मोह , स्टेट्स , संस्कार आणि कदाचित वासनाही असतात . याला उचलून काय साध्य होणार ? हा तर साला ' माXXXद ' आहे . . .
माXXXद . . कधीकाळी हा शब्द उच्चारला कि भांडणे व्हायची . . आपल्या आईचा भयंकर अपमान झाला आहे असे समजून दुध का कर्ज अदा व्हायचा पण आता तो काळ गेला . शब्द आणि अपशब्द यातील पडदा विकासाच्या आणि सुधारणेच्या नावाखाली आपणच फाडून काढला . आणि " बीप ' संस्कृतीचा उदय झाला . सध्या तरुणाईचे कार्यक्रम म्हणजे दर ४ शब्दानंतर बीप असे समीकरणच झाले आहे . आपण बडी ,डूड ,स्टड आणि जे काय असेल ते सिद्ध करण्यासाठी आपल्या तीर्थारुपांपासून ते अनोळखी व्यक्तीच्या मातुश्रीपर्यंत सर्वाना शाब्दिक अलंकार देणे हा आजचा ' ट्रेंड ' आहे . अंतरवस्त्रा पासून ते डोक्याला लावायच्या जेल ( तेल आता हद्दपार झाले न ) पर्यंत ब्रांड बघणारे आपल्या शब्दांचे स्टेट्स मात्र बघत नाहीत . बघायची त्यांना गरज वाटत नाही . संस्कार आणी नितीमत्ता हे शब्द आजी आजोबांसोबत वृद्धाश्रमात शेवटच्या घटका मोजत आहेत .. मिळवलेला पैसा -प्रतिष्ठा आणी बुडाखालची गाडी शिव्या द्यायचे शिकवत नाही पण शिव्या हासडायचा माज आणि अधिकार मात्र देते . आपल्या मनासारखा न वागणारा , कोणत्याही गोष्टीत आपल्यापेक्षा कमी असणारा प्रत्येक जण 'मा , बे " इत्यादी असतो . . शिकवणारा शिक्षक असो वा बौद्धिक घेणारा मित्र -मैत्रीण हे सगळे 'चू ' असतात . . आणी यात वावगे काहीच नसते ! २४ म्हणजे "आमच्या " वेळी म्हणायचं वय नाही पण खरच आमच्या वेळी 'शिंच्या ' म्हणल्या वरही गालावर ५ बोटांच्या टेटू उठायचा आणी तो बरेच दिवस टीकायचा सुद्धा . . पण आता तसे होत नाही आणी होणार सुद्धा नाही . . कारण आई -वडील मुले यात मैत्रीचे नाते असते म्हणे . . आणी मैत्रीत मा ,बे ,भो ,चू हे शब्द हॉट फेवरीट असतात . . खर न ? कोणी कोणते शब्द वापरावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न पण कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ? कारण माणूस त्याच्या भाषेसह बदलत आहे . . . छत्रपती शिवाजी महाराज , स्वातंत्र्यवीर सावरकर यानंतर भाषाशुद्धी ची मोहीम हाती घेतलीच पाहिजे . कारण आपली भाषा हा आपल्या संस्कारांचा ,संस्कृतीचा आणी स्वत्वाचा आरसा असतो असे माझे मत आहे . त्याची वेळीच शुद्धी झाली पाहिजे .
असे अनेक माXXXद आपल्या भोवती जगत ,वावरत असतात . प्रचंड विश्वात जग आणी जगात आपली जागा हुडकत असतात . त्यांना ती मिळालेली नसते म्हणून आपल्या तीर्थरूपाना किंवा आपल्याला मिळालेली असते . पण लक्षात कोण घेतो ? म्यानर्स हे केवळ पंचतारांकित हॉटेलात , मिटिंग टेबलावर किंवा हातात मद्याचे प्याले घेऊन हा हु करताना जपायचे असतात . . रस्त्यावर कोण पाहतो मला ? माझा खरा 'रंग ' या फडतूस लोकांना दाखवला तर काय बिघडणार आहे ? याच मनोवृत्तीने आपल्यासह अनेक रस्त्यावर उतरतात आणी शाब्दिक अत्याचार सुटतात आणी स्टेट्स च्या नावाखाली मिरवतात . मी त्या मादरचोद कडे पाहत होतो . . प्रतिष्ठीतव्यक्तीने आपल्यावर विनाकारण मारलेला शिक्का आपल्या अश्रुनी पुसत पुढे सरकत होता . . आपल्या घराकडे . . वाट पाहणाऱ्या पोरांना मळकट जिलेबी -बालुशाही घालण्यासाठी !! असे किती माXXXX तुम्हाला भेटले ?
-अंकुर रविकांत देशपांडे
http://spaandaan.blogspot.in/2013/04/blog-post_20.html
***PUBLISHED HERE WITH PRIOR PERMISSION OF THE AUTHOR.
वाचने
26174
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या बोली भाषेला
मुन्नाभाइ एम बि बि एस मधील किस्सा आठवला...
आजकाल असे वागणे म्हणजे आपण
मला हा थोडा "दवणीय*" गल्लत
हम्म...
एकुण लिखाण आवडल.
लिखाण आवडलं
ऑ ?
In reply to लिखाण आवडलं by पैसा
छान आहे!
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद.
In reply to छान आहे! by पैसा
माझा प्रश्न त्या रोखाने नाही
In reply to धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
हायला !
In reply to माझा प्रश्न त्या रोखाने नाही by पैसा
बरोबर उलट
In reply to हायला ! by परिकथेतील राजकुमार
बरोबर
In reply to बरोबर उलट by पैसा
हा हा हा, सहमत आहे ...
In reply to हायला ! by परिकथेतील राजकुमार
अरे !
In reply to हा हा हा, सहमत आहे ... by छोटा डॉन
समतोल आणि प्रामाणिक
In reply to हा हा हा, सहमत आहे ... by छोटा डॉन
मग कर्कश ते बोलावे काय निमित्य ?
In reply to माझा प्रश्न त्या रोखाने नाही by पैसा
हे बाकी खरं आहे.
In reply to धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
बरोबर आहे मालक,
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
कपाळात जाणे...
In reply to बरोबर आहे मालक, by मालोजीराव
माझ्या पण कपाळात गेल्या
In reply to बरोबर आहे मालक, by मालोजीराव
नाय हो !
In reply to माझ्या पण कपाळात गेल्या by योगी९००
ह्म्म्म्म्
In reply to नाय हो ! by मालोजीराव
काळजी घ्या.
दांभिकपणा पणा असा नाही हो
In reply to काळजी घ्या. by प्रभाकर पेठकर
मला वाटते की लेखक स्वतः हा
In reply to काळजी घ्या. by प्रभाकर पेठकर
दांभिकपणा.??? too much
In reply to काळजी घ्या. by प्रभाकर पेठकर
असे शब्द एका ठराविक ठिकाणी
असलेली लाज सोडण्यात मराठी
शिव्यांच्या निमित्ताने...
>>>यःकिंचित प्राण्यानं
In reply to शिव्यांच्या निमित्ताने... by धमाल मुलगा
बेशिकमधला घोळ!
In reply to >>>यःकिंचित प्राण्यानं by प्यारे१
+१
In reply to बेशिकमधला घोळ! by धमाल मुलगा
+१
In reply to >>>यःकिंचित प्राण्यानं by प्यारे१
तेज्यैला . . .
In reply to >>>यःकिंचित प्राण्यानं by प्यारे१
चांगला प्रतिसाद
In reply to शिव्यांच्या निमित्ताने... by धमाल मुलगा
एक अरुंद गल्ली. त्यात दोन
कठीण आहे..
खुप छान विचार आहे, कि आपण
शिव्या वापरुन बोलल्या जाणार्
+१
In reply to शिव्या वापरुन बोलल्या जाणार् by यशोधरा
वाणीवर न जाता विचारांना
अख्खा तांदूळ टाकून द्त नाहीत
In reply to वाणीवर न जाता विचारांना by वेल्लाभट
:ड :ड
In reply to अख्खा तांदूळ टाकून द्त नाहीत by यशोधरा
मग उत्तर तुम्हीच दिलं आहे.
In reply to :ड :ड by वेल्लाभट
थोडं अवांतर: (किंवा बरंच
भारीच
In reply to थोडं अवांतर: (किंवा बरंच by आतिवास
वर आम्ही-पक्षी पुरुषजात कशी
In reply to भारीच by बॅटमॅन
खरंच आहे ते (राखाडी आयतातले
In reply to वर आम्ही-पक्षी पुरुषजात कशी by शुचि
बाकी नॅगिंग करणे ही कुणाची
In reply to खरंच आहे ते (राखाडी आयतातले by बॅटमॅन
पुरषांना बायका कळणार नाहीत
In reply to बाकी नॅगिंग करणे ही कुणाची by शुचि
परवा एक लेख वाचला "सायकॉलॉजी
In reply to पुरषांना बायका कळणार नाहीत by बॅटमॅन
सापडला. हा तो लेख
In reply to परवा एक लेख वाचला "सायकॉलॉजी by शुचि
या धाग्यावर असे बोलताहात तर
In reply to परवा एक लेख वाचला "सायकॉलॉजी by शुचि
प्रतिसाद आवडला आणि संपूर्ण
In reply to थोडं अवांतर: (किंवा बरंच by आतिवास
पर्फेक्ट!
In reply to थोडं अवांतर: (किंवा बरंच by आतिवास
आर्थिक सत्तेतून येणारा माज
In reply to थोडं अवांतर: (किंवा बरंच by आतिवास
आणि म्हणून खडेच खायचे असंही
मला वाटते की आत्यंतिक राग,
मूर्ख, बावळट, हलकट, नालायक,
आपली घट्ट मैत्री आहे हे
In reply to मूर्ख, बावळट, हलकट, नालायक, by ज्ञानोबाचे पैजार
विठ्ठलाला विठ्या, काळ्या
In reply to आपली घट्ट मैत्री आहे हे by प्रकाश घाटपांडे
गोष्ट शिव्यांची चालु आहे तर
स्ट्रेसबस्टर
माझ्या शिव्या
शिव्यांचा उगीच निषेध करणार्
हे चालेल
In reply to शिव्यांचा उगीच निषेध करणार् by बॅटमॅन
बाकी काही द्या, पण जिलब्या
In reply to हे चालेल by पैसा
म्हणजे हव तर शिव्या द्या पण
In reply to बाकी काही द्या, पण जिलब्या by बॅटमॅन
अगदी अगदी!!
In reply to म्हणजे हव तर शिव्या द्या पण by प्रकाश घाटपांडे
> 'इथे ? भर रस्त्यात?'
ऑ ?
In reply to > 'इथे ? भर रस्त्यात?' by आशु जोग
तेव्हा आल्यावरती तिची भेट
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
पेहले इस्तेमाल करे फिर
In reply to तेव्हा आल्यावरती तिची भेट by मालोजीराव
>का उगाच माझ्याकडून चार
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
नैसर्गिक शिव्या
शिव्या सुद्धा नैसर्गिक वाटल्या पाहीजेत.
नारायण पेठ, पुणे
आमच्या ईथल्या भाषेबद्दल ईतर
कोकणात सिन्धूदुर्ग जील्ह्यात
Men socialize by insulting
भारी (आणि खरं) वाक्य आहे!
In reply to Men socialize by insulting by शुचि
लेखात फुल्ल्या फुल्ल्या का
बिकाचा याच विषयावरचा एक सुंदर
हाच तो लेख. परत वाचला. मजा
In reply to बिकाचा याच विषयावरचा एक सुंदर by गणपा