शाळेत पावणे आलते.
कशाला कायकी.
आमाला कायबाय इचारलं.
धडा वाचाया लावला, पाडे इचारले.
अंक्या, भान्या, निमी हुशार हायेत बक्कळ.
त्यास्नी समदं येतं.
माज्या टकु-यात शिरतं, -हात नाय.
आमचे अण्णा म्हणत्यात “डोस्क्याला भोक हाये एक”.
गवसलं न्हाय ते बेणं – एक चिंधी बांधली की काम जालं!
मला विचारलं कायतरी पावण्यानी. भ्याव वाटलं येकदम.
कांडल्यावानी झालं छातीत. ठोके नुस्ते. धाडधाड धाडधाड.
आवाज खोल हिरीतून आला.
पावणे हसले. गुर्जीबी हसले.
समदी हसली. म्याबी हसली.
पावणे गेले.
गुर्जी आले.
माजे केस वढत एक ठिउन दिली गालावर. दातच तुटला येक.
रडत म्या चिराकले, “काSओ गुर्जी”
“बक्षीSस” ते म्हणले.
समदी पुन्ना हसली.
म्या रडतच व्हती.
तरीबी हसली.
*शतशब्दकथा
वाचने
14824
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
आई गं.. किती दुष्ट गुर्जी
काय की या वेळेला जरा कळाली
अण्णा म्हणतात डोक्याला भोक
In reply to काय की या वेळेला जरा कळाली by किसन शिंदे
हीहीही
In reply to अण्णा म्हणतात डोक्याला भोक by अद्द्या
हसायला काय झालं रे अभ्या
In reply to हीहीही by अभ्या..
हेहेहेहे अगेन
In reply to हसायला काय झालं रे अभ्या by अद्द्या
हाहाहा
In reply to हेहेहेहे अगेन by अभ्या..
आभारी आहे राव साहेब.
In reply to अण्णा म्हणतात डोक्याला भोक by अद्द्या
:(
कविता बेस्ट हो
कविता!
In reply to कविता बेस्ट हो by अद्द्या
अच्छा . .
In reply to कविता! by आतिवास
संवेदना पोहचली.
अरेरे
बाकी कथा मस्त जमलीये
In reply to अरेरे by तिमा
माणुसघाणे काका म्हणुन तर
In reply to अरेरे by तिमा
काहीजणांच आयुष्य! दुसरे
अगदी अगदी
In reply to काहीजणांच आयुष्य! दुसरे by स्पंदना
अप्रतिम!
च च!!! ती लहान मुलगी
करुण कथा! आवडली.
वाईट वाटलं
लिहिताय सुंदर... चटका लागतोच!
नेहमीप्रमाणे..
आवडले
उत्कट..
वाईट वाटले.
चूक नक्की काय झाली हे न
प्रभावी कथन.
+१
In reply to प्रभावी कथन. by सस्नेह
:-)
In reply to +१ by प्यारे१
आपल्याकडची शिक्षक जमात
+१११११११११११११११११.
In reply to आपल्याकडची शिक्षक जमात by शिल्पा ब
आभार
वाचून कळवळलो हो!
+१
In reply to वाचून कळवळलो हो! by नगरीनिरंजन
मस्त चटका लावणारे लिखाण!
चटका..