मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<नाव सुचले नाही>

चाणक्य · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
काळजातल्या जखमांना, न्याय पाहिजे होता तु घाईत होतीस अन् , त्यांना वेळ पाहिजे होता तू गेलीस परंतु , हा वसंत ईथेच आहे मोग-याला तुझा जरासा, सुगंध पाहिजे होता रोजचेच आहे, हे ही धुके परंतु सुर्यास आज यायला, उजेड पाहिजे होता तू दिल्या जखमांचे, ओझे कधीच नव्हते एकदा तरी पण करायला, मी वार पाहिजे होता एकटाच येत गेलो , हरेक मैफिलीतून मी ऎकल्या स्वरांचा मला, झंकार पाहिजे होता हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता

वाचने 5659 वाचनखूण प्रतिक्रिया 24

मस्तच!!
हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता
हे खासचं!! 'नकार' शिर्षक कसे वाटते?

नगरीनिरंजन Tue, 04/02/2013 - 14:33
जबरदस्त झालीय!
तू दिल्या जखमांचे, ओझे कधीच नव्हते एकदा तरी पण करायला, मी वार पाहिजे होता
आणि
हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता
कातिल शेर आहेत!

कवितानागेश Tue, 04/02/2013 - 15:15
पण जरा मीटरध्ये बसवली तर अजून छान वाटेल सहज सुचवतेय, काळजातल्या जखमांना, न्याय पाहिजे होता होतीस घाईत तू अन्, त्यांना वेळ पाहिजे होता गेलीस तू परंतु , हा वसंत ईथेच आहे मोग-याला तुझा जरासा, सुगंध पाहिजे होता रोजचेच आहे, हे ही धुके परंतु सुर्यास आज यायला, उजेड पाहिजे होता तू दिल्या जखमांचे, ओझे कधीच नव्हते पण एकदा कराया, मी वार पाहिजे होता एकटाच होतो येत, हरेक मैफिलीत मी ऎकल्या स्वरांचा मला, झंकार पाहिजे होता मी विचारल्या प्रश्नास, तू गेलीस म्हणून हो, आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता

चिगो गुरुवार, 04/04/2013 - 16:26
गझल आवडली.. माऊतैनी सुचवलेल्या सुधारणा आवडल्या..

सस्नेह Sat, 04/06/2013 - 14:03
नेमका कोणता प्रश्न विचारला असेल, ज्याला नकार मिळायला हवा होता. हा विचार करणारी, --स्नेहांकिता

पैसा Sun, 04/07/2013 - 19:07
मला आधी शीर्षकामुळे विडंबन असेल असे वाटले होते. पण छान रचना निघाली!

धनावडे Mon, 08/07/2017 - 01:05
मस्तच!! "हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता"