<नाव सुचले नाही>
लेखनविषय:
काव्यरस
काळजातल्या जखमांना, न्याय पाहिजे होता
तु घाईत होतीस अन् , त्यांना वेळ पाहिजे होता
तू गेलीस परंतु , हा वसंत ईथेच आहे
मोग-याला तुझा जरासा, सुगंध पाहिजे होता
रोजचेच आहे, हे ही धुके परंतु
सुर्यास आज यायला, उजेड पाहिजे होता
तू दिल्या जखमांचे, ओझे कधीच नव्हते
एकदा तरी पण करायला, मी वार पाहिजे होता
एकटाच येत गेलो , हरेक मैफिलीतून मी
ऎकल्या स्वरांचा मला, झंकार पाहिजे होता
हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू
आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता
वाचने
5662
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
मस्तच!!
हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होताहे खासचं!! 'नकार' शिर्षक कसे वाटते?
जबरदस्त झालीय!
तू दिल्या जखमांचे, ओझे कधीच नव्हते एकदा तरी पण करायला, मी वार पाहिजे होताआणि
हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होताकातिल शेर आहेत!
शेवटचे कडवे आवडले !
पण जरा मीटरध्ये बसवली तर अजून छान वाटेल
सहज सुचवतेय,
काळजातल्या जखमांना, न्याय पाहिजे होता
होतीस घाईत तू अन्, त्यांना वेळ पाहिजे होता
गेलीस तू परंतु , हा वसंत ईथेच आहे
मोग-याला तुझा जरासा, सुगंध पाहिजे होता
रोजचेच आहे, हे ही धुके परंतु
सुर्यास आज यायला, उजेड पाहिजे होता
तू दिल्या जखमांचे, ओझे कधीच नव्हते
पण एकदा कराया, मी वार पाहिजे होता
एकटाच होतो येत, हरेक मैफिलीत मी
ऎकल्या स्वरांचा मला, झंकार पाहिजे होता
मी विचारल्या प्रश्नास, तू गेलीस म्हणून हो,
आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता
In reply to सुंदर शब्दांकन. by कवितानागेश
मीटरमधे बसवल्यावर आता छान वाटतंय! नाहीतर तो 'वार' फारच खटकत होता. सात वारांमधला वाटत होता.
In reply to सुंदर शब्दांकन. by कवितानागेश
छान सुधारणा केलीस. आता खरच पहिल्यापेक्शा छान वाटतीये. धन्यवाद.
१+ माउ
च्यायला प्रोपोज केल्यावर हो म्हणाली आन नंतर सोडून गेली काय ?
खूपच छान !!!
सुरेख लिहिलेय.
छान.
शेवटचा 'नकार' विशेष वाटला.
मस्स्स्स्स्स्त
हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होताहे कातिल!!!!
उत्तम
:) लवलि .....
सर्वांना धन्यवाद.
मि.का. 'नकार' चांगल शीर्षक आहे
छान आहे.
गझल आवडली.. माऊतैनी सुचवलेल्या सुधारणा आवडल्या..
मस्तच ! :)
नेमका कोणता प्रश्न विचारला असेल, ज्याला नकार मिळायला हवा होता. हा विचार करणारी,
--स्नेहांकिता
चाणक्यमियाँ, माशाल्लाह। :)
मस्त मस्त
मला आधी शीर्षकामुळे विडंबन असेल असे वाटले होते. पण छान रचना निघाली!
मस्तच!!
"हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू
आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता"
छान गुंफलय !! एकदम मस्त.
व्वाह